Latest Post

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘आपल्या जनसमुदायाच्या बाबतीत ज्या गोष्टीपासून सर्वाधिक मला भय आहे ती म्हणजे माझा जनसमुदाय आपल्या इच्छांचे म्हणणे ऐकू लागेल आणि भौतिक जग प्राप्त करण्यासाठी लांबलचक दिवास्वप्ने पाहू लागेल तेव्हा त्याच्या स्वअभिलाषेचे म्हणणे ऐकण्याच्या  परिणामस्वरूप तो सत्यापासून दूर होईल आणि भौतिक जग प्राप्त करण्याच्या आकांक्षा परलोकापासून गाफील करतील. (लोकहो! या जगाने कूच केले आहे, ते जाऊ लागले आहे आणि  परलोकाने कूच केले आहे, ते येऊ लागले आहे. त्यांच्यापैकी प्रत्येकाचे मानणारे आहेत जे त्याच्यावर प्रेम करतात. तुमच्यासाठी उत्तम आहे की तुम्ही जगाचे लोभी बनू नका, तुम्ही या  वेळी अनुसरणाच्या घरात आहात आणि हिशोबाची वेळ अजून आलेली नाही आणि उद्या तुम्ही हिशोबाच्या घरात (परलोकात) असाल, तेथे अनुसरणाची कसलीही संधी मिळणार नाही.’’  (हदीस : मिश्कात)
पैगंबर मुहम्मद (स.) एका मनुष्याला उपदेश करताना म्हणाले, ‘‘तुम्ही पाच गोष्टींची पाच गोष्टींपूर्वी कदर करा- आपल्या तारुण्याला वृद्धत्व येण्यापूर्वी, आपल्या आरोग्याला आजारापूर्वी,  आपल्या खुशालीला आपल्या दारिद्र्यापूर्वी, आपल्या फुरसतीला व्यस्ततेपूर्वी आणि आपल्या जीवनाला मृत्यूपूर्वी.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : तारुण्यात खूप अनुसरण करा, कारण जख्ख वृद्धत्वाच्या स्थितीत इच्छा असूनदेखील काहीही करू शकणार नाही. आपल्या निरोगीपणाचा परलोकाच्या तयारीत वापर करा,  कदाचित आजारी पडाल आणि काहीही करू शकणार नाही. जेव्हा अल्लाह खुशाली देईल तेव्हा त्यापासून आखिरतचे कार्य करा, कदाचित तुम्ही गरीब व्हाल. मग अल्लाहच्या मार्गात संपत्ती खर्च करण्याची संधी मिळणार नाही. या संपूर्ण जीवनाची कदर करा आणि ते अल्लाहच्या कार्यात व्यतीत करा अन्यथा मृत्यू येऊन अनुसरणाच्या सर्व संधी संपुष्टात येतील. माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) नमाजसाठी मस्जिदमध्ये आले तेव्हा त्यांनी पाहिले की काही लोक मोठमोठ्याने हसत होते.  पैगंबर म्हणाले, ‘‘जर तुम्ही सुख नष्ट करणाऱ्या मृत्यूला अधिक आठवले असते तर त्याने तुम्हाला हसण्यापासून रोखले असते. मृत्यूची मोठ्या प्रमाणात आठवण करा, तो सुख नष्ट करणरा आहे आणि कबर दरदिवशी म्हणते की मी वाटसरूंचे घर आहे, मी एकांताची कोठडी आहे, मातीचे घर आहे आणि जेव्हा एखादा मोमिन भक्त कबरीत दफन केला जातो तेव्हा  कबर त्याचे स्वागत करते. म्हणते की तू माझ्या पाठीवर चालणाऱ्यांपैकी मला सर्वाधिक प्रिय होतास. आज तुला माझ्या ताब्यात देण्यात आले आहे. पाहा मी तुझ्याशी किती चांगला  व्यवहार करते ते.’’ पैगंबर पुढे म्हणाले, ‘‘त्या मोमिन भक्तासाठी ती कबर त्याची दृष्टी जेथवर पोहोचेल इतकी ती विशाल बनते. त्याच्यासाठी स्वर्गाच्या दिशेने एक दरवाजा उघडला  जातो. जेव्हा एखादा दुराचारी अथावा एकेश्वरत्व नाकारणारा दास दफन केला जातो तेव्हा कबर त्याचे स्वागत करीत नाही. ती म्हणते की तू माझ्याकरिता माझ्या पाठीवर चालणारांपैकी  सर्वाधिक अप्रिय मनुष्य होतास. आता तुला माझ्या हवाली करण्यात आले आहे आणि तू माझ्याजवळ आला आहेस. पाहा, मी तुझ्याशी किती वाईट व्यवहार करते ते.’’ पैगंबर  म्हणतात, ‘‘मग कबर त्याच्यासाठी आकुंचित पावते आणि इतकी अरुंद होईल की त्याच्या फासळ्या एकमेकांत अडकतील.’’ असे म्हणत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एका हाताची बोटे  दुसऱ्या हाताच्या बोटांमध्ये अडकविली. त्यानंतर म्हणाले, ‘‘त्याच्यावर ७० अजदा साप सोडण्यात येतील. त्यांच्यापैकी प्रत्येक साप इतका विषारी असेल की जमिनीवर त्याने फुंकर  मारली तर त्याच्या विषाच्या परिणामामुळे त्या जमिनीवर कधीही काहीही उगवू शकणार नाही. मग हे सर्व अजदा साप त्याच्या दंश करतील आणि चावा घेतील. असेच अंतिम  निवाड्याचा दिवस येईपर्यंत त्याच्याशी होत राहील. तो अल्लाहच्या दरबारात हिशोब देण्यासाठी उभा केला जाईल.’’ मग पैगंबर म्हणाले, ‘‘कबर मनुष्याकरिता स्वर्गाच्या बागांपैकी एक  बाग बनते अथवा नरकाच्या खड्ड्यांपैकी एक खड्डा.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : जेव्हा एखादा मनुष्य आपल्या क्षमतेनुसार जगातील दुष्टव्यांचा सामना करीत पारलौकीक जीवनाची तयारी करता करता मरण पावतो. दरम्यानच्या जीवनात ज्याला कबर म्हटले जाते, त्याच्याशी अल्लाह कृपा करतो आणि तो आनंदित होतो. जो मनुष्य जीवनभर वाईट कर्म करीत राहतो आणि पश्चात्ताप व्यक्त न करता मरण पावतो तेव्हा त्याच्याशी  काहीसा तसाच व्यवहार केला जाईल जसा न्यायालयात हजर होण्यापूर्वी कारावासात होत असतो. हदीसच्या शेवटच्या भागाचा अर्थ आहे की मनुष्याने हवे तर आपल्या वर्तणुकीद्वारे  कबरीतील जीवनाला आरामदायक व सुखमय जीवन बनवावे अथवा मग दुराचाराच्या स्थितीत हे जीवन व्यतीत करावे आणि मग कबरीतील शिक्षेला सामोरे जावे.

    - सय्यद अबुल आला मौदूदी
   
    या पुस्तिकेत एकेश्वरत्व सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यात आले आहे आणि मनुष्याच्या विनाशाचे, अन्याय, अत्याचाराचे मूळ कारण स्पष्ट करून या जगात शांतता कशी नांदेल याची चर्चा आली आहे.
    या सृष्टीचे दहा-वीस नव्हे तर दोनच ईश्वर असते तरीही सृष्टीव्यवस्था इतक्या नियमित व सुचारूपद्धतीने चालू शकली नसती. वस्तुस्थिती केवळ इतकीच नाही की जग एखाद्या निर्मात्याविना निर्माण झाले नाही तर ते एकट्या अल्लाहनेच निर्माण केले आहे. तसेच ही विश्व व्यवस्था सत्ताधिशाविना चाललेली नाही तर वास्तविकता तो एकच एक सत्ताधारी आहे.

    आयएमपीटी अ.क्र. 20     -पृष्ठे - 24      मूल्य - 16                आवृत्ती - 19 (2013)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/dzfe5pdbedbc7uc6ruwttdpjgsawm8ju

    - अबुल आला मौदूदी
   
    या ग्रंथात लेखकाने इस्लाम एक परिपूर्ण, आदर्श व अद्वितिय अशी जीवन व्यवस्था आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्र तिने व्यापलेले आहे. ह्याच ईशप्रदत्त जीवन व्यवस्थेत मानवी कल्याण दडलेले आहे.
    इस्लामची नैतिक व्यवस्था, इस्लामची राजकीय व्यवस्था, इस्लामची सामाजिक व्यवस्था, इस्लामची आर्थिक व्यवस्था आणि इस्लामची आध्यात्मिक व्यवस्था, ह्या जीवनाच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांविषयी सोदाहरण चर्चा आली आहे.

    आयएमपीटी अ.क्र. 19      -पृष्ठे - 40     मूल्य - 20               आवृत्ती - 7 (2013)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/3rpnw8ziw5idb2oqa1az1xljjv47rxu0

    - सय्यद अबुल आला मौदूदी
   
    या पॉकेट साईझ पुस्तिकेत इस्लामचे पैगंबर जगन्नेता आहेत हे स्पष्ट करण्यात आले आहे. जगन्नेता बनण्यासाठी चार अटींची पूर्तता करावी लागते त्या बद्दलचा खुलासा आला आहे.
    जगन्नेता पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या चारही अटींची पूर्तता कोणत्या मर्यादेपर्यंत केली आहे, या विषयीची चर्चा उत्तरार्धात आली आहे. त्यांचे कार्य विश्वव्यापी होते. त्यांनी मानवजातीच्या बिघडलेल्या जीवन प्रणालीत अमूलाग्र बदल घडवून एक आदर्श व अद्वितिय समाज व राष्ट्र नवनिर्माण कार्य जगापुढे करून दाखविले. फक्त एका जातीसाठी व राष्ट्रासाठी ते नव्हते.
आयएमपीटी अ.क्र. 18  -पृष्ठे-08        मूल्य - 06   आवृत्ती - 12 (2013)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/v18s3b34h1vupu1yypz3bqghqk8jure4

 - अबुल आला मौदूदी
    या पुस्तिकेत अल्लाज जवळ `दीन' केवळ `इस्लाम' आहे, हे संक्षिप्तपणे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच ``सत्यधर्म अल्लाहजवळ केवळ इस्लामच आहे'' सामान्य लोकांना `इस्लाम' एका धर्माचे नाव आहे, असे वाटते. तो धर्म आजपासून 15 शतकांपूर्वी अरबस्तानात उदयास आला आणि त्यांची स्थापना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी केली होती अशी सर्वसामान्यांची गैरसमजून आहे.
    याच गैरसमजुतीचे निराकरण या पुस्तिकेत करतांना लेखकांने अद्दीन `अलइस्लाम'चा अर्थ स्पष्ट करून मनुष्यासाठी जीवन पद्धतीची गरज सांगितली.

आयएमपीटी अ.क्र. 16   -पृष्ठे - 24    मूल्य - 10    आवृत्ती - 8 (2013)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/5b2bm3p5342cx4zvyhrz8ro1fdfgc1u2

    - सय्यद अबुल आला मौदूदी
   
    या छोटेखाली पुस्तिकेत लेखक महोदयांनी स्पृश्यापृश्यता म्हणजेच उच्च-नीच भेदभाव कोणत्याही समाजाला पोखरून नष्ट करणारी कीड आहे, हे पटवून सांगितले आहे. ज्या देशाला हा रोग जडलेला आहे, तेथे सुखशांती नांदू शकत नाही की खराखुरा विकासही होऊ शकत नाही. उच्च-नीचतेचा भेदभाव अस्वाभाविक आहे.
    सर्व अल्लाहचे दास आहेत आणि सर्व एकाच मातापित्याची संतती आहे म्हणून सर्वजण एकाच परिवाराशी संबंधित असून भाऊ भाऊ आहेत. इस्लामच्या दृष्टिकोनातून एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठत्व सदाचरण व ईशभयावर अवलंबून आहे. हे कुरआन व हदीसची उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.

    आयएमपीटी अ.क्र. 08 -पृष्ठे - 10  मूल्य - 06            आवृत्ती - 7 (2013)


डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/g1gkbscrmrb64idkop505gxmpj7hj65a

रोजा हे अनेक कारणामुळे इस्लामच्या खऱ्या स्वरुपाचे द्योतक आहे. कुरआनने धर्माची स्पष्ट केलेली कल्पना ही रोजा मध्ये सर्वांगांने स्पष्ट होते. कारण रोजा मनुष्याला फक्त सदाचरणींच बनवत नाही तर त्याच्या आत्म्याला आणि विचाराला एक दिशा देते. बहिरंग आणि अंतरंग दोन्ही ईशपरायण बनतात. याबद्दलचे स्पष्टीकरण खालील प्रेषितकथनाने अधिक स्पष्ट होते.
‘‘जी व्यक्ती आयुष्यभर रोजे ठेवते अशा व्यक्तीचे रोजे निरर्थक आहेत.’’ (बुखारी)
‘‘तुम्हाला दोन किवा त्यापेक्षा जास्त दिवसांचे सततचे रोजे ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.’’ (मुस्लिम)
एकदा प्रवासात प्रेषित मुहम्मद (स.) यांनी लोकांची गर्दी एका व्यक्तीभोवती पाहिली. विचारपूस केल्यानंतर कळले की तो प्रवासी रोजादार आहे. प्रेषित म्हणाले, ‘‘प्रवासात रोजा ठेवणे योग्य नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना अपरिमित कष्ट झेलावे लागतात.’’ (बुखारी)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचा सोबती (र.) जो मदिनाबाहेर राहत होता तो एकदा त्यांच्याजवळ आला आणि भेट झाल्यानंतर निघून गेला. एक वर्षानंतर तो पुन्हा आला या वेळी तो फार दुबळा झाला होता. तो ओळखूसुध्दा आला नाही. प्रेषितांनी त्याला विचारले, ‘‘काय झाले आहे, मागील वर्षी तू चांगला सदृढ होता.’’ त्याने उत्तर दिले, ‘‘मी वर्षभर दिवसातून एकदाच जेवण घेत असे (रोजा ठेवत असे).’’ हे ऐकल्यानंतर प्रेषित म्हणाले, ‘‘तू स्वतः ला का कष्ट दिले?’’ (अबू दाऊद)
आपण वरील प्रेषितकथनांचा विचार केला तर हे सिध्द होते की रोजामुळे ईशपरायणतेचा क्रांतीकारक अर्थ निघत आहे. ईशपरायणता रोजाचा मूळ हेतु आहे. रोजामध्ये ‘स्व’चा नाश होत नाही. तर ‘स्व’वर नियंत्रण राहते. दुसऱ्या शब्दांत ईशपरायणतेबरोबर त्याची मौलिकता आणि महत्त्वसुध्दा रोजादार जाणून घेतो. समजून उमजून घेतो. हे सर्व अनुभवातूनच! जेव्हा ‘रोजा’ हा शब्द कानी पडतो तर लगेचच ‘स्व’च्या मागणीला रोखून धरणे म्हणजे रोजा हे आपल्या लक्षात येते. ती ‘स्व’च्या मागणीचा अतिरेकसुध्दा होऊ देत नाही. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘ज्याने आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्याचे भय बाळगले होते आणि मनाला वाईट इच्छेपासून दूर ठेवले होते, स्वर्ग त्याचे ठिकाण असेल.’’ (कुरआन ७९: ४१)
ईशपरायणता मनाला स्वैर सोडून कधीच प्राप्त होत नाही. रोजा दिव्य अवतरणानुसार त्या ‘स्व’वर नियंत्रण ठेवतो व त्याला सैरावैरा पळू देत नाही. याचा अर्थ ‘स्व’ला मारून टाकणे असा मुळीच नाही. दुसऱ्या धर्मात ‘स्व’ला अतिकष्ट देऊन आणि मनोकामनांचे दमन करून नष्ट करणे अतिउच्च दर्जाचे पुण्य समजले जाते. इस्लामला हा अतिरेक मुळीच मान्य नाही. इस्लामनुसार हे पुण्य नाही तर पाप आणि अत्याचार आहे. रोजा तुम्हाला या सत्यतेची आठवण नेहमी करून देतो. काही संबंधित प्रेषितकथने आपण येथे पाहू या.
1. ‘‘पहाटे सहेरी (जेवण) करा रोजा सुरू करण्यापूर्वी हे एक लाभकारक कृत्य आहे. - मुस्लिम
2. लोक रोजा सोडण्यासाठी वेळेत घाई करतील तेवढे त्यांना पुण्य लाभेल.’’ - मुस्लिम
3. ‘‘लोक जोपर्यंत रोजा सोडण्यात वेळेवर घाई करत राहतील तोपर्यंत हा धर्म वर्चस्व स्थापित करून राहील.’’ - अबू दाऊद
4. ‘‘अल्लाह स्पष्ट करतो की माझा प्रिय दास तो आहे जो वेळेत रोजा सोडण्यासाठी घाई करतो.’’ -तिरमिजी
अशा प्रकारे वरील प्रेषितकथनानुसार रोजाचे महत्त्व स्पष्ट होते. ईशपरायणता म्हणजे ‘स्व’चे दमन अथवा नाश नव्हे तर स्वयंनियंत्रण होय. हे स्वयंनियंत्रण दृष्टिकोनाची शिस्तबध्दता आणि आवडीनिवडीची शिस्तबध्दता दर्शविते. ‘स्व’ला दिव्यप्रकटन अथवा ईश्वरेच्छेला प्रत्यक्ष व्यवहारात कार्यान्वित करणे. असे करताना स्वतःच्या आवडीनिवडींना, इच्छांना कुठेही थारा न देणे ईशपरायणतेला अपेक्षित आहे. अल्लाहची प्रसन्नताप्राप्तीसाठी फक्त अल्लाहचे आदेश पाळणे पुरेशे नाहीत तर त्याबरोबर आपल्या मनातील इच्छांना आवर घालून स्वतःच्या इच्छेनुसार न वागणे आवश्यक आहे. अल्लाहची उपासना- इबादत करणे म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकथित ईश्वरांना नाकारणे आणि अल्लाहचे एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणे या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत. अल्लाहला आत्मसमर्पण करणे आणि ईशपरायण जीवन जगणे म्हणजे अल्लाह आणि त्याच्या प्रेषिताची आज्ञाधारकता स्वीकारणे होय. ज्यांना न करण्याचा आदेश दिला आहे त्यांना नाकारणे आणि ज्यांच्यासाठी परवानगी दिली आहे त्या गोष्टी आचरणात आणणे हे माणसाला आत्मिक समाधान प्राप्त करुन देते. अल्लाह आणि त्याच्या प्रेषिताने घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करणे आणि स्वतःची भर त्यात न घालता, मर्यादा भंग न करता जीवन कंठत राहणे ईशपरायणता आहे.
रोजाचा उद्देश ईशपरायणतेला वृध्दिगंत करणे आहे. एकीकडे रोजा ठेवण्याच्या व्यक्तीला पहाटे जेवण सेहरी करण्याची कडक ताकीद दिली आहे. सेहरी न करता रोजा ठेवणारा अल्लाहची कृपा प्राप्त करु शकत नाही, तसेच रोजा सोडण्याच्या वेळेसंबंधीसुध्दा कडक ताकीद आहे. रोजा सोडण्यात विलंब याला श्रध्देत कमतरता म्हटले गेले आहे. ही दोन्ही कृत्ये ईशपरायणता प्राप्त करण्याच्या मार्गातील अडथळे आहेत. ‘स्व’वर नियंत्रण अशा कृत्यामुळे होते. यामुळे रोजाचा हेतूसुध्दा साध्य होण्यास मदतच होते. ही दोन्ही प्रकारची ताकीद स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा मार्ग बंद करते. स्वतःच्या इच्छेनुसार आवडीनुसार तर रोजाचे योग्यरित्या पालन होऊच शकत नाही. रोजा ठेवण्यासाठी ठरवून दिलेली वेळ न पाळता आपल्या मनाप्रमाणे करणे हे स्वार्थी वृत्तीचे लक्षण आहे. हे तर खरे धर्मात स्वतःची ढवळाढवळ करण्यासारखे आहे. असे जर असेल तर रोजामुळे स्वयंनियत्रंण होते हे म्हणणेच चुकीचे ठरते. मर्यादांचे उल्लंघन करणे याचसाठी निषिध्द आहे. या सर्व बाबींचा आपण विचार केला तर कळून येते की रोजाला इस्लामचा आधारस्तंभ का म्हणून संबोधले आहे आणि इस्लामची इमारत या अधारस्तंभाअभावी का म्हणून अपूर्ण राहते हेसुध्दा आपणास कळून येते.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget