Latest Post

माननीय जैद बिन अरकम (र.) कथन करतात की, अंतिम प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘जो माणूस शुद्ध अंत:करणाने ‘ला इलाहा इल्लल्लाह’ (ईश्वराशिवाय कोणीच  पूज्य नाही) असे म्हणतो, तो स्वर्गात दाखील होईल. लोकांनी विचारले की, ‘‘शुद्ध अंत:करणाचा अर्थ काय? प्रेषितांनी सांगितले की, ‘‘शुद्ध अंत:करण म्हणजे, ‘कलमा-ए-तौहीद’ (एकाच  ईश्वरावर संपूर्ण विश्वास असल्याचे धर्मसूत्र) उच्चारल्यानंतर तो माणूस ईश्वराच्या संपूर्ण हराम (निषिद्ध) कर्मापासून दूर असला पाहीजे. ‘तिर्मिजी’ या हदीस ग्रंथात एक प्रेषित वचन  आहे की, ‘‘जो बंदा (भक्त; ईश्वराचा दास) कलमा-ए-तौहीद उच्चारील आणि मोठ्या अपराधांपासून दूर राहील, तो जन्नतमध्ये दाखल होईल. उपरोक्त प्रेषित वचने खूप महत्वाची आहेत.  केवळ ‘‘ला इलाहा इल्लल्लाह’’ मुखाने उच्चारणे म्हणजे स्वर्गात दाखल होण्याची हमी नाही तर याबरोबरच ईश्वर आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दाखविलेल्या सरळ मार्गावर चालणे  आणि मोठ्या अपराधांपासून (पापापासून) कटाक्षाने अलिप्त राहणे, स्वर्गात दाखल होण्यासाठी आवश्यक आहे. अल्लाहचे गुणवैशिष्ट्येमाननीय
अबु हुरैरा (र.) द्वारे उल्लेखित आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘सर्वश्रेष्ठ अल्लाहची नव्यान्नव नावे आहेत. जो यांना स्मरणात राखील, जन्नतमध्ये दाखल  होईल.’’ (हदीस - बुखारी)

भावार्थ
‘स्मरणात राखण्याचा’ अर्थ हा की, जो मनुष्य यांच्या अर्थ व  आशयाला जाणेल आणि त्यांच्या निकडीला पूर्ण करील, अर्थात माणसाने या गुणविशेषांचा प्रभाव आपल्या अंगी आत्मसात  करावा आणि जीवनभर याच्या निकडीनुसार आचरण करावे. अल्लाहच्या ९९ नावांचा, गुणवैशिष्ट्यांचा तपशील जाणून घेण्याचा व त्यांच्या निकडी माहीत करून घेण्याचा उत्तम मार्ग  म्हणजे माणसाने पवित्र कुरआनचे पठण करावे, ज्यात अल्लाहच्या समस्त गुणवैशिष्ट्यांचे स्पष्टीकरण आहे. तसेच त्यांच्या कोणत्या निकडी (गरज) आहेत व माणसाने यापासून  कशाप्रकारे लाभ घेतला पाहिजे, हे सर्व पवित्र कुरआनमध्ये सांगितले आहे. तोच मनुष्य याचा लाभ होऊ शकतो जो पवित्र कुरआनचे पठण करण्याची सवय लावून घेईल.

अल्लाहचे काही प्रमूख गुणवैशिष्ट्यपूर्ण नावे

रब्ब
याचा अर्थ पालन पोषण करणे, यथायोग्य अवस्थेत राखणे, सर्व प्रकारच्या धोक्यापासून वाचवित आणि विकासाची सर्व साधने उपलब्ध करीत कमालीच्या दर्जाप्रत पोहोचविणे. मातेच्या  उदरातील अंध:कारामध्ये अन्न, हवा आणि पाणी कोण पोहोचवितो? असा तो कोण आहे, जो माता-पिता व इतरांच्या मनात प्रेम भावना निर्माण करतो? तारुण्य आणि स्वास्थ कोणी  प्रदान केले आहे? आमच्या जीवनाला योग्य स्थितीत राखण्यासाठी आणि आत्म्याच्या संगोपनासाठी त्याने आपला ग्रंथ (पवित्र कुरआन) पाठविला. जो त्याच्या समस्त उपकारांमध्ये  सर्वात मोठा उपकार आहे. या उपकाराची निकड अशी की आम्ही त्या ईशग्रंथांची कदर जाणावी, आपल्या जीवनात सामावून घ्यावे आणि जे लोक याच्या अवीट गोडीपासून अपरिचित असतील तर त्यांना परिचित करावे. 

अर्रहमान् अर्रहीम
हे दोन्ही शब्द रहमत (दया) शब्दापासून बनले आहेत. पहिला शब्द उत्साह, आवेग आणि वैपुण्य या अर्थाचा आहे तर दुसरा नित्यता व सातत्याचा आशय बाळगतो. रहमान तो, ज्याची  दया अतिशय उचंबळणारी आहे. हवा, पाणी, अन्न व इतर सर्व गरजांची उपलब्धता याच गुणविशेषात आहे. या रहमानची सर्वात मोठी रहमत (दया) म्हणजे कुरआनचे अवतरण,  रहमानने कुरआनची शिकवण दिली, मानवाला अस्तित्व प्रदान केले, मानसाला बोलण्याचे सामर्थ्य दिले. आणि रहीम तो ज्याचा दयानुक्रम कधीही संपत नाही. रहीम ज्याची दया अनुग्रह  कायमस्वरूपी आहे. 

अल अ़जी़ज
अर्थात सर्व सत्ताधिकारी, ज्याचा सत्ताधिकार सर्वावर वर्चस्व राखून आहे. ज्याच्या सत्ताधिकारास कोणीही आव्हान करू शकत नाही. जर तो आपल्या  दासावर अनुग्रह करू इच्छितो तर कोणतीही शक्ती त्यास रोखू शकणार नाही. जर तो शिक्षा, यातना, देऊ इच्छिल तर कुठलीही शक्ती त्याच्या निर्णयाला रद्दबदल करू शकत नाही.

निर्लज्ज माणूस कितीही मोठा गुन्हा सहजपणे करू शकतो. एवढेच नव्हे तर त्यावर गर्व सुद्धा करू शकतो. अशा लोकांची संख्या ज्या समाजात वाढते तो समाज सुद्धा निर्लज्ज समाज  होवून जातो. अलिकडे प्रत्येक देशात असा निर्लज्ज समाज मोठ्या प्रमाणात फोफावतांना दिसतो आहे. आश्चर्य म्हणजे ’हया’ (लज्जा) ज्या समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे त्या  मुस्लिम समाजातील एक मोठा गट ही निर्लज्जपणे वागताना दिसतो आहे.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हंटले आहे की, ’’प्रत्येक धर्माचे एक वैशिष्ट्ये असते, इस्लामचे वैशिष्ट्य हया आहे.’’ निर्लज्ज समाजामध्ये सर्वात जास्त हानी महिला आणि मुलांची होती.  अशा समाजात भ्रष्टाचार बोकाळतो, अप्रमाणिकता वाढते, लोक मोठ्या प्रमाणात खोटं बोलू लागतात, त्यामुळे कोणावरही सहजा-सहजी विश्वास ठेवता येत नाही. प्रत्येकाचे प्रत्येक  बोलणे तपासून पहावे लागते. प्रत्येक व्यवहार जपून करावा लागतो. जरा दुर्लक्ष झाले की, मोठ्या प्रमाणावर फसवणुकीला सामारे जावे लागते. समाजात स्वार्थीपणाची भावना प्रबळ  होते. त्यातून चक्रवाढ व्याजाची पद्धत रूढ होते. त्यात गरीबांचे सर्वाधिक नुकसान होते. श्रीमंत लोकांना गरीबांची दया येत नाही. त्यातून गरीबांच्या आत्महत्या वाढतात. त्या समाज  उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा समाजाला फारसा फरक पडत नाही. समाज संवेदनाहीन होतो. कोणी कोणाच्या मदतीला धावून येत नाही. स्वहितापुढे राष्ट्रहिताशीही तडजोड केली जाते. सरकारमध्येही निर्लज्ज माणसांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होतो. त्याचा लाभ श्रीमंतांना होतो गरीब डावलले जातात. जिथे कुठे अशी परिस्थिती निर्माण झालेली असेल, त्या ठिकाणी  राहणाऱ्या मुस्लिम समाजाची जबाबदारी आपोआपच वाढते. नैतिकतेची उत्कृष्ट आचारसंहिता अर्थात कुरआन ज्यांच्याकडे आहे आणि तो अल्लाहचा कलाम (ईशवाणी) आहे असा ज्यांचा  दावा आहे त्यांना निर्लज्जतेकडून मिळालेले हे आव्हान स्विकारून आपला दावा खरा आहे, हे सिद्ध करण्याची संधी मिळते.
भारतीय मुस्लिम समाजाकडे ही संधी चालून आलेली आहे. भ्रष्ट, अनीतिमान आणि निर्लज्ज लोकांची भरपूर वाढ समाजात झालेली आहे. आपल्या कोषातून बाहेर पडून, आत्ममग्नतेचा  त्याग करून, आपल्या वागण्या-बोलण्या आणि व्यवहारातून इस्लामी लज्जाशिलतेचे प्रदर्शन जळीस्थळी करून लज्जाशील समाज कसा असतो हे दाखवून देण्याची संधी आपल्याला  मिळालेली आहे. हे आव्हान सोपे जरी नसले तरी अगदीच अश्नय आहे असेही नाही.
अगदी अशाच परिस्थितीमध्ये सातव्या शतकात
सुरूवातीला मदीना शहरात व नंतर अरबस्थानामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी निर्लज्ज अरबी टोळ्यांमधून लज्जाशील समाज निर्माण करून दाखवला होता. प्रेषित सल्ल. यांचे  वारसरदार म्हणून आता आपली पाळी आहे. प्रेषित सल्ल. यांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचे केवळ गुणगाण करून भागणार नाही तर त्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल.  त्यासाठी कुरआन आणि सुन्नाहमध्ये लज्जाशील समाज निर्मितीसाठी काय मार्गदर्शन केले आहे, याचा संक्षिप्त आढावा घेणे आजच्या लेखाचा उद्देश्य आहे. तर चला पाहूया, लज्जाशील  समाज कसा निर्माण होऊ शकतो ते जगातील प्रत्येक देश आपल्या नागरिकांना कायद्यात पकडतो मात्र इस्लाम आपल्या मानणाऱ्यांना नैतिकतेत पकडतो. कायदा त्यानंतर येतो.  कायद्यात पकडण्याची वेळच येऊ नये, यासाठी इस्लाम एक लज्जाशील समाज निर्माण करू इच्छितो. त्यासाठी इस्लामला मानणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये ’हया’ कशी निर्माण  होईल, यासाठी वेगवेगळे उपाय सूचवितो.
माणसामध्ये हया निर्मितीचे सर्वात मोठे साधन रोजा आहे. रोजा समज येताच ठेवावा लागतो. मणुष्य जेव्हा पौगंड अवस्थेत असतो तेव्हा त्याला केवळ अल्लाहसाठी अन्न आणि  पाण्याचा त्याग करण्याची शिकवण दिली जाते. तो संधी असूनसुद्धा रोजाच्या दरम्यान काही खात किंवा पीत नाही. खाण्यापिण्याची जेव्हा तीव्र इच्छा मनामध्ये निर्माण होते तेव्हा तो  स्वतःशीच लाजतो. येथूनच माणसाच्या व्यक्तीत्वात लज्जानिर्मितीची सुरूवात होते. हया निर्मितीचे दूसरे मोठे साधन नमाज होय. दिवसातून पाच वेळेस नियमित नमाज अदा करणारा  माणूस कुठलेही वाईट कृत्य करण्यापूर्वी स्वतःशीच लाजतो. कारण नमाजमुळे त्याच्या मनामध्ये हया निर्माण होते. कुरआनने म्हटलेले आहे की, ’इन्नसलात तन्हा अनिल फाहाशाई वल  मुनकर’ ’अर्थात निश्चितच नमाज अश्लिल व अपकृत्यापासून रोखते’ (संदर्भ : सुरे अनकबूत आयत नं. 45)
नियमितपणे नमाज अदा करणाऱ्या माणसाला व्यवहारात अपकृत्य करण्याची संधी येताच नुकत्याच अदा केलेल्या नमाजमुळे त्याच्यात निर्माण झालेल्या लज्जाशीलतेतून तो त्या  अपकृत्यापासून दूर राहतो. चार-दोन तासाच्या ठराविक अंतराने दिवसातून पाच वेळेस नमाज अदा केल्याने दिवसभरात त्याच्या मनामध्ये कायम लज्जेची भावना तेवत असते. त्यातूनच  तो एक लज्जाशील व्यक्ती बनतो आणि अशाच व्यक्तींच्या समुहातून एक लज्जाशील समाजाची निर्मिती होत असते.
लज्जेचा संबंध साधारणपणे लैंगिक वागणुकीशी लावला जातो. जेव्हा सर्वप्रथम एका स्त्री आणि एका पुरूषाची निर्मिती करून अल्लाहने त्यांना स्वर्गामध्ये ठेवले आणि एका विशिष्ट  वृक्षाच्या फळाचा आस्वाद घेण्यापासून रोखले तेव्हा सैतानाने शपथा घेऊन त्यांना त्या वृक्षाचे फळ खाण्यास भाग पाडले. तेव्हा त्यांचे गुप्तांग एकमेकांसमोर उघडे पडले आणि तात्काळ दोघांच्याही मनामध्ये लज्जेचा भाव निर्माण झाला. तेव्हा त्यांनी इतर झाडांची पाने तोडून स्वतःचे गुप्तांग झाकण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, 1) ’’ सरतेशेवटी त्या उभयंता (पती-पत्नी) नी त्या झाडाचे फळ खाऊन टाकले. परिणाम असा झाला की लगेच त्यांचे गुप्तांग एकमेकांसमोर उघड झाले आणि लागले ते स्वतःला स्वर्गाच्या पानांनी झाकावयास. आदम (अलै.) ने आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली.’’(सुरे ताहा : आयत नं. 121)
2) ’’श्रद्धावंत स्त्रियांना सांगा की त्यांनी आपल्या दृष्टींची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे आणि आपला साजशृंगार (लोकांसमोर) दर्शवू नये. त्या व्यतिरिक्त  जे सहजासहजी प्रकट होईल आणि आपल्या छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा. त्यांनी आपला साजशृंगार प्रकट करू नये परंतू, या लोकांसमोर पती, पिता, पतीचे वडील, आपली मुले, पतीची मुले, भाऊ, भावांची मुले, बहिणींची मुले, आपल्या जवळीकीतील स्त्रिया, आपल्या दासी, ते हाताखालचे पुरूष जे एखादा अन्य प्रकारचा हेतू बाळगत नसतील आणि ती मुले जी स्त्रियांच्या गुप्त गोष्टींशी अद्याप परिचित झालेली नसतील. महिलांनी आपले पाय जमीनीवर आपटत चलू नये की जेणेकरून त्यांनी जो आपला शृंगार लपविलेला आहे  त्याचे ज्ञान इतरांना होईल.’’ (सुरे नूर आयत क्र. 31)
3) प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले की, ’’हया (लज्जा) आणि ईमान (श्रद्धा) दोघे एकत्र असतात. त्यापैकी जर एकही गेली तर दूसरी आपोआपच जाते. ’’ (हदीस)
4) प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले की, ’’श्रद्धेचे 60 ते 70 किंवा यापेक्षा थोडे अधिक स्तर आहेत. सर्वात उत्कृष्ट स्तर तौहिद (अल्लाहला एक मानने) हा आहे आणि सर्वात शेवटचे स्तर खिदमते खल्क (जनसेवा) आहे. म्हणजे रस्त्यात पडलेल्या त्या वस्तू दूर हटविणे ज्यापासून वाटसरूंना इजा पोहोचण्याची शक्यता आहे.’’ (हदीस)
हया इस्लामी श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. आज अनेक लोक ज्या प्रकारचे तोकडे आणि तंग वस्त्रे परिधान करतात व त्यातून त्यांच्या शरीराचे नको तसे व नको तितके प्रदर्शन होत  राहते. त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की, हे लोक किती निर्लज्ज आहेत. मात्र लज्जेचा संबंध फक्त शरीर झाकण्यापुरताच किंवा लैंगिक संबंधांमध्ये नैतिकता राखण्यापुरताच मर्यादित  नसून माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये सर्व वाईट गोष्टींपासून लांब राहण्यासाठी ज्या भावनेची गरज भासते त्या भावनेला इस्लाममध्ये ’हया’ अर्थात लज्जा म्हटलेले आहे. या संदर्भात  जमाअते इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी रहे. यांनी मोठे सुंदर भाष्य केलेले आहे. ते म्हणतात, ’’इन्सान के अंदर ’हया’ का जज्बा एक फितरी(नैसर्गिक) जज्बा है. और  उसका अव्वलीन (प्रथम) मजहर (प्रदर्शन) ’हया’ है. जो अपने जिस्म के मक्सूस हिस्सों (लैंगिक अवयव) को दूसरे के सामने खोलने में आदमी को फितरतन महेसूस होती है. कुरआन  हमें बताता है के, ये ’हया’ इन्सान के अंदर तहेज़ीब (संस्कृती) के इरतका (विकास) से मसनुई (कृत्रीम) तौर पर पैदा नहीं हुई है और ना ही ये इक्तेसाबी (दूसरीकडून घेतलेली) चीज  है. जैसा के शैतान के बाज शागीर्दोने कयास (अंदाजा) किया है. दरहकीकत (खरोखर) ये फितरी चीज है. जो अव्वल रोजसे इन्सान में मौजूद थी. शैतान की पहली चाल जो उसने  इन्सान को उसकी फितरत-ए-इन्सानी की सिधी राह से हटाने के लिए चली. ये थी के, उसके जज्ब-ए-हया (लज्जेची भावना) पर जर्ब (वार) लगाए और बरहनगी (नग्नता) के रास्ते से  इसके लिए फवाहीश (अश्लिलता) का दरवाजा खोले और उसको जिन्सी (लैंगिक) मामले में बद-राह (पथभ्रष्ट) कर दे. ब-अल्फाज-दीगर (दुसऱ्या शब्दात) कहें तो अपने हरीफ (प्रतिद्वंद्वी) अर्थात इन्सान के महाज (च्या आत) में जईफ तरीन (अतिशय नाजूक) मुकाम (स्थान) जो उसने हमले के लिए तलाश किया वो उसकी जिंदगी का जिन्सी पहेलू था.  और अपनी जर्ब जो उसने (सैतानाने) लगाई वो उस महाज-ए-फसील (युद्ध क्षेत्र) पर लगाई जो ’हया’ की सुरत में अल्लाह ने इन्सान की फितरत (प्रवृत्ती) में रख्खी थी. शैतान और  उसके शागिर्दों की ये रविश (पद्धत) आजतक ज्यूं की त्यूं कायम है. तरक्की (प्रगती) का कोई काम उनके हां शुरू नहीं हो सकता जब तक के औरत को बेपर्दा करके वो बाजार में न  लाकर खडा कर दे और किसी न किसी तरह उसे उरयां (नंगी) न कर दें. ये इन्सान की ऐन फितरत है के वो बुराई की खुली दावत को कम ही कुबूल करता है. उमूमन (साधारणपणे)  उसे जाल में फंसाने के लिए हर दाई-ए-शर (अपप्रवृत्तीचे प्रचारक) को खैरख्वाह (हितचिंतक) के भेस में ही आना पडता है.’’ (संदर्भ : तफहिमुल कुरआन खंड 2 पान क्र. 15-16).
आत्तापर्यंत झालेल्या वरील विवेचनावरून सुज्ञ वाचकांच्या लक्षात आलेच असेल की, लज्जाशील समाज निर्मितीचे आव्हान किती मोठे आहे? अशा समाजनिर्मितीच्या कार्यासाठी प्रत्येक  सद्प्रवृत्तीच्या व्यक्तीने स्वतःला वाहून घ्यावे, इथपत या कामाची गरज आहे. जमात-ए-इस्लामी हिंदने स्वतःला या कामासाठी 1941 पासून वाहून घेतलेले आहे. आपल्या तरूण पीढिस  व पुढच्या पीढिस निर्लज्जतेच्या वावटळीपासून सुरक्षित ठेवायचे असल्यास लज्जाशीलतेची सुरूवात आपल्या सर्वांना स्वतःपासून करावी लागेल. ही देशसेवाच नव्हे तर मानवतेची सेवा  सुद्धा ठरेल, यात वाद नाही.

- एम.आय.शेख
9764000737

प्रेषित मुहम्मद (सलअम्) यांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी बोधी प्राप्त झाली. अल्लाहकडून त्यांना कुरआनच्या अध्यायांच्या स्वरूपात संदेश येऊ लागले आणि समतेची शिकवण देणारे  ते संदेश प्रेषित (सल्ल.) लोकांना सांगू लागले. हो, समतेची शिकवण देणारे ते अल्लाहचे संदेश होते. उदाहरणार्थ -
‘‘...अन् त्यादिवशी जीवंत गाडलेल्या मुलीशी विचारलं जाईल की, तीला कोणत्या अपराधापायी मारलं?’’ (कुरआन-81:8-9)
म्हणजे महाप्रलयानंतर (कयामतनंतर) अल्लाहला या दुष्कृत्याबद्दल अपराधी बापाला किंवा भ्रूणहत्या करणाऱ्यांना जाब द्यावा लागेल, असा त्याचा अर्थ आहे. अशा प्रकारे मनाला  भिडणारं प्रबोधन प्रेषित (सल्ल.) करू लागले अन् पाहता पाहता रसातळाला गेलेला पूर्ण अरबस्तान हा एक प्रगत, विकसित समाज बनला. प्रेषित मुहम्मद सलअम् यांनी ऐन उमेदीच्या  पंचविसाव्या वर्षी त्यांनी चाळीस वर्षाच्या अन् दोनदा विधवा झालेल्या एका महिलेशी, आदरणीय खतीजामाईंशी लग्न केले.
माता खतिजा यांचा त्यावेळी चार देशात आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचा. लग्नानंतरही प्रेषितांनी त्यांना रोखलं नाही. महिलांना त्यांनी स्वतःची ओळख कायम ठेवण्यासाठी प्रोत्साहीत  केले. उदाहरणार्थ - इस्लामनुसार लग्नानंतरही मुस्लिम महिलेचं नाव बदलत नसते, तिच्या बापाच्या जागी तिच्या पतीचे नाव, आडनाव लागत नसते किंवा शेख-सय्यद असं दुहेरी  आडनाव लावायची गरज नसते. घटस्फोटीत महिलेला पोटगी म्हणजे पोट भरण्याची भरपाई दिली जात नसल्याचा गैरसमज पसरविला जातो. तीचा तलाक होवो की न होवो, पण  लग्नाआधीच तीला महेरच्या स्वरूपात पोटगी मिळत असते. तसेच तलाकनंतरही ही पोटगी देण्याची जबाबदारी एकतर इस्लामी शासनाची असते, ते नसेल तर ती देण्याची जबाबदारी  वक्फ बोर्डाची असते.
तलाक देण्याचा अधिकार हा फक्त पुरूषांनाच असतो हा देखील गैरसमज पसरविला जातो. पण निकाहआधीच वाटाघाटी करून खुलाअ व तलाक ए तफवीजचे अधिकार पत्नीला बहाल  केले जाऊ शकतात, ही समतामूलक शिकवण अनेक मराठी जणांना अजूनही माहित नाही. तालेबानच्या तुरूंगात दिवस काढलेल्या बीबीसीची पत्रकार इवॉन्न रिडलेने जेंव्हा हे वाचले की,  कुरआनची सर्वात पहिली अधिकृत प्रत प्रेषितांनी उम्मे हानी नावाच्या एका महिलेकडे ठेऊन एका महिलेच्या विेशासार्हतेवर विेशास ठेऊन प्रेषितांनी महिलांचा गौरव केलेला आहे, तेंव्हा  तीने इस्लामची दिक्षा घेतली. पण त्याच शांतीदूत पत्रकार रिडलेला भारतात केरळला येण्याची यापुर्वीच्या पुरोगामी सरकारने मनाई केली होती, असो. प्रेषितांनी जी अकरा लग्ने केली  होती, ती तिथल्या विविध टोळ्यांमध्ये असलेलं वैर संपुष्टात आणण्याकरिता एका-एका टोळीच्या एका एका मुलीशी लग्न करून सगळ्यांना नातेसंबंधात जोडून सामाजिक एकात्मता  कायम केली होती. हाच सामाजिक एकात्मतेच्या उदात्त हेतूनेच आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनीही आठ लग्ने केली होती. इस्लाममध्ये जो बहुपत्नीत्वाची परवानगी (आदेश नव्हे)  दिलेली आहे, त्यामागे निराधार महिलांना आधार देण्याचा, त्यांना सेक्स वर्कर्स बनण्यापासून रोखण्याचा उद्देश आहे. पण आज निराधार महिलांशी लिव्ह इन रिलेशन किंवा फ्रेंडशिप म्हणून विवाहबाह्यसंबंध ठेवणे तर गुन्हा नाही, पण तिच्याशी दुसरं लग्न करणं गुन्हा ठरवला जातोय, असो.
सर्व पत्नींशी न्याय करण्याची कडक अट या बहुपत्नीत्वात घालून दिलेली आहे, हे विशेष! न्याय होत नसेल तर तीला कोर्टात तक्रार करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. प्रेषितांनी  आपल्या प्रत्येक पत्नीला एक एक स्वतंत्र घर घेऊन दिलं होतं. ते घर प्रेषितांच्या नव्हे तर त्या पत्नींच्या नावे ओळखले जात होते. जसे सौदांचं घर, आयेशांचं घर, उम्मे सलमांचं घर  वगैरे. हीच परंपरा पुढे भारतीय बादशहांनीही पुढे चालू ठेवली. इथेही मुमताज महाल, बीबी का मकबरा, चांद बीबी का मकबरा वगैरे महिलांच्या नावे महालांची नावे ठेवण्याची परंपरा  होती. आज जर आपल्या बायकोच्या नावाने कुणी अमुक विल्ला, तमूक मेंशन नाव ठेवलं तर तीची टर उडवली जाते. पण प्रेषितांची ही महान समतामूलक परंपरा मुस्लिम बादशहांनी  पुढे सुरू ठेवली होती. प्रेषितांनी महिलांना मशिदीतही प्रवेश दिला होता. हीच परंपरा पुढे मुस्लिम बादशहांनीही सुरू ठेवली होती. आजही औरंगाबादला शाही मशिदीजवळ महिलांची मशिद  आहे. ती मशिद पुरूषांच्या मशिदीच्या थोडी पुढे आहे. याचा अर्थ त्यात नमाज पढत असणाऱ्या महिलांची रांग ही पुरूषांच्या मशिदीत नमाजचं नेतृत्व करणाऱ्या इमामच्या पुढे जात  होती. पण इमामच्या पुढे जाऊन त्या इमामच्याच नेतृत्वात कुणालाच नमाज पढता येत नाही, त्यासाठी वेगळी जमात बनवावी लागते. याचाच अर्थ त्या मशिदित महिलांची वेगळी  जमात नमाज पढायला उभी राहत होती अन् साहजिकच आहे की, त्या महिला एका महिला इमामच्याच नेतृत्वात नमाज अदा करत होत्या. अन् विशेष म्हणजे हे सगळं पुरोगामी कार्य  सर्वात कट्टर मानला जाणाऱ्या औरंगजेबाच्या काळात घडत होतं. अन् औरंगाबादला अशा एक नाही तर तीन तीन महिलांच्या मशिदी आहेत. या पुरोगामी कार्याच्या मूळाशी प्रेषितांचीच  समतामूलक शिकवण आहे.

- नौशाद उस्मान
औरंगाबाद
9029429489

मांगी हुई राहतोंसे बेचैनिया बेहतर हैं
खैरात की नींद का हर ख्वाब पराया है


फार काळापुर्वी पैगंबर मुहम्मद(स.) यांच्या एका अनुयायाने इस्लामचा संदेश पोहोचवण्यासाठी एका शहरात प्रवेश केला तेव्हा त्यानी तो संदेश स्त्रीयांसमोर अतिशय सुंदरपणे मांडला  आणि ते म्हणाले, मी तुम्हाला पुरुषांच्या गुलामीगीरीतून मुक्त करुन तुम्हास ईश्वराच्या दास्यत्वात आणण्यासाठी आलो आहे. कारण इस्लाम काळापुर्वी स्त्री ही शापित होती जागातील  सारी पापे करावी आणि त्याचे प्रायश्चित्त म्हणजे स्त्रीच्या रुपात जन्माला यावे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. एखाद्याला मुलगी झाली की, पाप समजुन तिला जमीनीत गाडुन  टाकत असत. स्त्रीया ह्या शैतानाच्या सुत्रधार आहेत, स्त्रीचा चेहरा पाहणे अपयशी समजायचे. अशा वातावरणात ज्याने केवळ कायदेशीरपणे व प्रत्यक्षपणेच नव्हे तर बौद्धिक दृष्ट्या  देखील एक महान आंदोलन उभे केले ते म्हणजे ईस्लाम आहे . ईस्लामने स्त्रीजन्म हा शापित नाही तर वरदान आहे हे शिकविले. त्याने 1400 वर्षापूर्वीच सांगितले की, कोणत्याही  मणुष्याने दुसऱ्या मनुष्याची हत्या केली म्हणजे त्याने सर्व मानवजातीची हत्या केली. त्याचबरोबर ते पैगम्बर मुहम्मद (सल्ल.) यांचेच व्यक्तीत्व आहे ज्यानी स्त्रीला अपमान वा  लज्जेच्या गर्तेतून उचलून सन्मानीत उंचीवर पोहोचविले.
त्यानी पित्यांना सांगितले जो कोणी आपल्या मुलीला दफन करणार नाही वा तिला अपमान वा लज्जेचा गोष्ट न मानता तिचे पालन-पोषण करुन तिचे अधिकार देण्यास प्राधान्य देईन  त्या व्यक्तीला ईश्वर स्वर्गात स्थान देईल. अशाप्रकारे ईस्लामनेच स्त्री वा पुरुष यांच्या प्रवृत्तीत सकारात्मक परिवर्तन घडवून आणले. त्या काळात दोन प्रकारच्या स्त्रीया होत्या. एक  पत्नी जिला फक्त घर होते, प्रतिष्ठा नाही आणि दुसरीकडे दासी च्या रुपात जिचा फक्त कामेच्छा तृप्त करण्याकरिता वापर केला जात असे. एखादी सुंदर दासी असेल तर तिच्यावर  पैज लावुन जुगार खेळत असत. आणि तिने त्यास विरोध केल्यास तिला विस्तवाचे चटके देत असत. याबाबतीत आपण ईस्लामपूर्व काळाबरोबर आपल्या ईतिहासावर दृष्टिक्षेप टाकतो  तेव्हा आपण एकिकडे पाहातो तीच स्त्री जी आई म्हणुन मनुष्याला जन्म देते व पत्नी म्हणुन पुरुषाची सहचारिणी बनते,तिला सेविका नव्हे तर दासीच्या पदावर ठेवण्यात आले. परंतु  स्त्रीची प्रतिष्ठा वा स्त्री-पुरुष समानता या विचारांची सुरुवात देखील मानवाच्या डोक्यात इस्लामनेच घातली आहे आणि हे विचार पैगम्बर मुहम्मद (सल्ल.) यांच्या तोंडून निघाले. ज्या  विचारांनी मानवी विचारांची दिशा कायमची बदलली व जगाला दाखवुन दिले की स्त्री सुद्धा तशीच मनुष्य आहे ज्याप्रामाणे पुरुष आहेत. ’लोकहो, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा  ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी बनविली आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरूष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर रहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर  लक्ष ठेवून आहे.’( सुरे निसा : 1)
मासिक पाळि येणे ही नैसर्गीक बाब आहे मात्र त्या दिवसात स्त्रीला अपवित्र समजायचे त्यामुळे तिला घरापासुन दुर ठेवायचे व तिला पाप व अपमानाचा पुतळा समजण्यात यायचे. ईस्लामने तिला फक्त प्रार्थना करण्यास मनाई केली मात्र ती मासिक पाळीच्या कालावधीत तशीच वावरु शकते जाशी ती रोज वावरते. ती शापित म्हणून तिला सम्पती वा वारसाहक्कापासुन वंचित ठेवले कारण ती एक हुंडा देवुन विक्रीची वस्तु आहे असे समजले जात होते, पालक आपल्या मुलीला परायाधन समजायचे म्हणुन ते तिला अशिक्षित ठेवायचे आणि जिथे कमी पैशात तिची विक्री होईल तिथे तिचे लग्न करुन द्यायचे. करायचे मग तो जोडीदार तिला पसंत असो वा नसो याचा विचार पण करत नसत. ईस्लामने मात्र स्त्रीलाही पुरुषाप्रमाने वारसाहक्काचे हकदार बनविले.
ईस्लामने विवाहाच्या बाबतीत मुलीच्या पालकास प्राधान्य जरुर दिलेले आहे परंतु हेही स्पष्ट केले आहे की तिचा विवाह तिच्या परवानगिनेच व्हावा. त्याचबरोबर पैगम्बरिनी स्त्री ही  परायाधन आहे या विचारांचा नायनाट केला आणि आदेश दिले. स्त्री ऐवजी पुरुषाने स्त्रीला हुंडा द्यायचा ज्याला अरेबिक मधे मेहर म्हणतात. एखाद्यावेळी ती आपल्या पतीसोबत समाधानी नसेल तर तिला कोणताही हक्क नव्हता (विभक्त) घटस्फोट घेण्याचा मात्र पतीला तिला कधीही सोडण्याचा अधिकार होता. मात्र अशा वेळेस ईस्लामने स्त्री जर पतीसोबत  समाधानी नसेन तर तीला पण विवाह बंधन तोडुन विभक्त होण्यास व्यापक अधिकार दिलेले आहेत.
स्त्री जर विधवा झाली तर तिचे मुंडण करायचे व पृथ्वीवरील सर्व सुख-सुविधांचा त्याग करणे अनिवार्य आहे, असे नियम तिच्यावर लादायचे अणि ती तिला कुठलाही श्रृंगार करण्याचा अधिकार नव्हता. आकर्षक कपडे परिधान करणे म्हणजे तिच्या विवाहाची स्थीती दर्शविणे, असा समजला जात असे. विधवा स्त्रीला कधी-कधी प्राणी असे म्हटले जाते. कारण केवळ  तिच्या पतीच्या उपस्थितीनेच तिला मानवी दर्जा दिला जातो. त्याशिवाय विधवेला दुसरे लग्न करण्यास मनाई होती कारण तिला निव्वळ पाशवी ईच्छांची गुलाम व कामुक वस्तू  समजले जात असे. ईस्लामने विधवेला मानवी हक्कापासून दूर न ठेवता तिला समाजात आदर व सन्मान दिला आहे. त्याचप्रमाणे तिला पुन्हा लग्न करण्याची परवानगीही दिली.  पैगम्बर मुहम्मद (सल्ल.) एका माणसाला म्हणाले सर्वात मोठे दान म्हणजे आपल्या त्या मुलीवर उपकार जी (वैधव्यामुळे अथवा घटस्फोट दिला गेल्यामुळे) तुझ्याकडे परत पाठवीली  गेली असेल आणि तुमच्या शिवाय दुसरा कोणिही तिचा पालक नसेन.
या अधिकाराशिवाय ईस्लामने तिला मतदानाचा अधिकार, धनसंपत्तीचा अधिकार, स्त्रीला व्यवसाय वा उद्योगधंद्याचे स्वातंत्र्यही दिलेले आहे. पुढे ईस्वीसनाच्या अठराव्या शतकात  युरोपीय तत्वज्ञांनी व लेखकानी जेव्हा समाजाच्या विरुद्ध व्यक्तिच्या अधिकारांचा पक्ष घेऊन आवाज उठविला व व्यक्ती स्वातंत्र्याची तुतारी फुंकली आणि ही तुतारी ग्रीस रोम ईराणप्रमाणे हिंदुस्थानात देखील पोचली आणि तीने संसर्गजन्य रोगाप्रमाणे पसरुन शतकानुशतकासाठी मनुष्याला ऱ्हास व पतनाच्या खड्ड्यात लोटले.परिणामी पाश्चिमात्य संस्कृती
व सभ्यतेच्या प्रगतीची गती त्या मार्गावर लागली ज्यावर वाटचाल करीत तीने आज मोठी मजल मारली आहे. या अधिकारांनी जरी स्त्रीच्या दर्जे ला उंचावाले आणि तिच्या हक्काना  उभारले गेले तरी याचा स्त्री स्वातंत्र्यावर वाईट परिणाम झाला नसून सुपरिणाम झाला आहे. समानतेचा अर्थ असा घेतला की स्त्री व पुरुष केवळ नैतीक दर्जा व मानवी अधिकारात  समान आहेत असे नव्हे तर सांस्कृतिक जीवनात देखील स्त्री ने तीच कामे करावीत जी पुरुष करतात. याची सुरुवात म्हणजे पाश्चिमात्य देशात अठराव्या शतकात स्त्रीला शिक्षणाचा  अधिकार मिळाला आणि हिंदुस्थानात तिला अधिकर 1948 मध्ये मिळाला अर्थातच याचे श्रेय डॉ.आंबेडकरांना दिले पाहिजे. मात्र आपण हे पण नजरेत घेतले पाहिजे की खऱ्या स्त्री  शिक्षणाची सुरूवात 1400 वर्षापुर्वी ईस्लामनेच केली. ज्याचे उत्तम उदाहरण म्हणजे फातिमा अल-फिही ज्यांनी 900 व्या शतकात जगातील सर्वात पहिले विद्यापीठ मोरक्कोमध्ये उभारले.
आज स्त्रीया मनुष्याच्या दास्यत्वात इतक्या वाहून गेल्या आहेत की ज्या गोष्टीत त्यांची स्वत:ची योग्यता, मुल्य यश-अपयश नियंत्रित करतात तेच तिचे आता प्रभू बनलेले आहेत. पण  ईस्लामने तिला शिकविले की, तू फक्त ईश्वराची दास बणून रहा नाकी पुरुषांची. आपला निर्माता ज्याने महीलेचे मूल्य व योग्यता परीभाषित केलेली आहे, कालांतराने तिच्या या मानवी  मुल्यांना समाजाने पुरुषांसमोर वारंवार दुय्यम दर्जा दिलेला आहे. परिणामतः स्त्रीला पुरुषांच्या संबंधात तिची योग्यता, मूल्य शोधण्यास भाग पाडण्यात आले. कुरआनमध्ये म्हटलेले आहे  की, ’’लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरूष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ  तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’’ (कुरान 49 :13).
आधुनिक काळात काही स्त्रियांनी एक दोषपूर्ण मान्यता स्वीकारली आहे ती म्हणजे पुरुष हाच एकमेव तिचा आदर्श आहे आणि ती कधीच परिपूर्ण मानव होऊ शकत नाही जो पर्यंत ती  एक पुरुषासारखी बनत नाही. परंतु ईश्वर कुरानात सांगतोय स्त्री आणि पुरुषांचा दर्जा ईश्वरसमोर समान आहे. मात्र त्यांचे हक्क व जबाबदाऱ्या भिन्न आहेत आणि तो स्त्री-पुरुष दोघांना  सन्मानित करतो-त्यांच्या समानतेत नाही- तर त्यांच्या विशिष्टतेत करतो. मात्र विचित्र पाश्चिमात्य समानतेने स्त्रीला तिच्या नैसर्गीक दैनंदीन कर्तव्यापासून गाफिल व परावृत्त केले  याचा परिणाम हा संस्कृतीवर तर झालाच त्याचबरोबर मानवाच्या अस्तित्वावर सुद्धा झाला. जेव्हा स्त्री आर्थीक, राजनैतीक, सामुहिक उद्योगात उत्साहाने सहभागी होत गेली तेव्हा  समाजाने तिला एक अतिशय स्पष्ट संदेश शिकवला. आणि तो संदेश म्हणजे: पातळ व्हा. कामुक व्हा. आकर्षक व्हा. त्यासाठी मेक-अप करा , कमी कपडे परिधान करा व देह प्रदर्शन  करा.
सुंदर राहण्याच्या कारणांसाठी आपले जीवन, आपले शरीर, आपली प्रतिष्ठा, प्राणपणास लावा आणि तिने हे आंधळेपणाने आत्मसात केले या हव्यासापोटी जर पूर्वी आम्ही आमच्या  शरीराला झाकण्यासाठी कपडे घालत होतो तेव्हा आम्हाला पुरुषाप्रमाणे किमत मिळत नव्हती, पण आज आम्ही ते मिळविण्यासाठी व फॅशनसाठी कमीत कमी घालतो व जास्तीत जास्त  शरीर प्रदर्शन करतो जेणेकरुन आम्ही अधिक आधुनिक व सुंदर दिसू आणि जास्तीत जास्त पुरूषांना आकर्षित होणे हेच माझ्या सुंदरतेचे प्रतीक आहे. परिणामतः तिने विेशास ठेवला  की आपण स्वत:च्या नैसर्गीक गुणवत्तेप्रमाणे काही केलेले महत्त्वाचे नाही, आपण केवळ त्या पदासाठी पात्र आहोत ते म्हणजे जितके आपण पुरुषांना प्रसन्न करु आणि पुरुषांकरिता  सुंदर दिसू. अशाप्रकारे स्त्रीने आपले शरीर जाहिरातदारांना विक्री करण्यास दिले. परिणामतः पोर्नोग्राफी चा जन्म झाला आणि समाजाच्या करमणुकीच्या कार्यक्रमात भागीदारी, क्लब व  रंगमंच, नृत्य व संगीतातील निमग्नता हे स्त्रीचे प्रमुख व्यवसाय झाले आहेत. ज्याद्वारे ती कोणते नैतीक कामाचे पैसे न कमविता तिच्या शरीर प्रदर्शनाचे पैसे कमवित आहे. तिच्या  या कामाला समाजाने कला असे सोज्वळ नावाने संबोधित केले. पण दुसरीकडे बलात्काराचे प्रमाण वाढू लागले. कालांतराने तिने स्वतःच बलात्काराचा शेवट केला व स्वतःच शरिराला  विकू लागली आणि त्याला तिने लिविंग रिलेशनशिप असे नवीन नाव दिले.
स्त्री या व्यवसायात पुरुषांपेक्षा जास्त पैसे कमवू लागली आणि तीने प्रगतीचा उच्चांक गाठला पण खरच प्रत्येक पुरुषाने स्वतः च्या मुलीला, बायकोला व आईला हा प्रश्न जरुर करावा  की, काय स्त्रीने देह प्रदर्शन करुन प्रगती करणे योग्य आहे की तिने देह झाकुन प्रगती करणे योग्य आहे? जागरुक बुद्धि आणि सवेदनशील अंतःकरण असेल तर ईस्लामने आणलेली  पडदा पद्धत म्हणजे हिजाब याला सडेतोड उत्तर देते. प्रत्येकाला पडद्यात असलेली मुस्लिम स्त्री गावंढळ वाटते परंतु ते विसरतात की ही पद्धत स्त्रीच्या लज्जतेचे पूर्ण संरक्षण करते.  तिचे शरीर एक सामाजिक प्रदर्शनीय वस्तू नसून ते फक्त तिच्या पतीसाठीचे समर्पण दर्शविते आणि त्याचबरोबर वाईट माणसाच्या नजरेतून संरक्षण करते. शारिरिक प्रदर्शनाऐवजी  व्यक्तीमत्वाला महत्व देते व त्याचबरोबर पोशाख स्पर्धा संपविते. परदा पद्धत अशा कोणत्याच प्रगतीमधे अडसर ठरत नाही ज्या प्रगतीत तिला तिचे नारीत्व शीलत्व आणि तिची  प्राणप्रतिष्ठा गमावून बसावे लागेल. जोपर्यंत स्त्री पुरुषांची नक्कल करण्याचे प्रयत्न व त्यांच्याप्रमाणे वागणे थांबवणार नाही आणि जोपर्यंत ईश्वराने तिला दिलेल्या स्वतःमधील सौंदर्याची  व विशिष्टतेची किंमत कळणार नाही तोपर्यंत ती स्त्री म्हणून कधीही मुक्ती मिळवू शकणार नाही. तुम्ही सन्मानित आहात परंतु, परपुरुषांसोबत संबंध बनवून नाही किंवा त्यांना प्रसन्न करुन देखील नाही. स्त्री म्हणून आपले मूल्य आपल्या शरिराचा आकार , कीती पुरुष तुमचे प्रशंसक आहेत, किंवा आपल्या पुरुष मित्रांची संख्या मोजून नाही. तर मानव म्हणून आपले  मूल्य उच्च प्रमाणात मोजले जाते ते म्हणजे धार्मिकता, सात्विकता आणि पवित्रतेच्या प्रमाणात. स्त्री म्हणून आपले पूर्णत्व अल्लाहपासुन आणि त्याच्यापर्यंतच आपले नाते आहे. ..
मी तुम्हाला ईथे उभे राहून सांगेन की  तुम्ही कशाचेही गुलाम नाहीत. ना फॅशन चे, ना सौंदर्याचे न पुरुषाचे. आपण केवळ ईश्वराचे गुलाम आणि केवळ ईश्वराचेच आहोत. मी अगदी धाडसाने सांगते तुम्हाला सांगा, या सर्व जगाला की आपण आपले मन, शरीर हे पुरुषांना संतुष्ट करण्यासाठी येथे नाही आहोत तर आपण ईश्वरास संतुष्ट करण्यासाठी येथे आहोत.  त्यांना सांगा की आपण येथे एक शोभेची वस्तु नाहीत, ना ही प्रदर्शनात ठेवणारी वस्तु आहोत आणि ना ही आपले शरीर सार्वजनिक वापरासाठी आहे.खात्री करुन द्या ह्या जगाला की  त्याने तुमची किंमत एक विक्रीची वस्तु एवढी नाही आकारली पाहीजे किंवा पायांची एक जोडी म्हणून नुसते सुंदर पाय दाखवून शुज विकायला वापरली नाही पाहिजे. आपला एक  आत्मा, एक मन, ईश्वराचे सेवक आहेत. आणि स्त्रीचे मूल्य त्या आत्म्याच्या सौंदर्याने परिभाषित केले जाते, ज्या हृदयाने ती ईश्वराला समर्पित होवुन जाते ना की पुरुषाला. तिचे शरीर  ती फॅशनच्या दुनियेला प्रदर्शित करण्यास वापरत नाही तर त्याला झाकून ठेवून ईश्वराच्या नियमावलीप्रमाणे कर्म करण्यास व्यतीत करते जी जवाबदारी ईश्वराने स्त्री म्हणून तिला देऊ  केली आहे. ईस्लामने स्त्रीला दिलेल्या उच्च दर्जाची वा अधिकाराची स्तुती मी ह्यासाठी करीत नाही की मी ईस्लामवर ईमान आणला आहे, वस्तुतः मी ईस्लामवर ईमान मुळी अशासाठी  आणला आहे की मला त्यात कमालीचे संतुलन व प्रमाणबद्धता आणि निसर्गाच्या कायद्याशी सदृश्यता दिसून येते. जे पाहून माझे मन ग्वाही देते की हा कायदा बनविणारा तोच तर  आहे जो पृथ्वी व आकाशाचा निर्माता आहे आणि अप्रत्यक्ष व प्रत्यक्षाचा जाणकार आहे आणि सत्य असे आहे की ईस्लाम हा ईश्वराचा धर्म आहे आणि विभिन्न देशात भटकणाऱ्या  मानवाना न्याय वा मध्यम मार्गाची दृढपद्धत तोच दाखवून देणारा आहे. सर्वमहान ईश्वर म्हणतो, ’’श्रद्धावंत पुरुष व श्रद्धावंत स्त्रिया हे सर्व एक दुसऱ्याचे मित्र आहेत, भलेपणाचा आदेश  देतात व वाईट गोष्टीपासून रोखतात, नमाज कायम करतात, जकात देतात आणि अल्लाह व त्याच्या पैगंबराचे आज्ञाधारक आहेत, हे ते लोक आहेत ज्यांच्यावर अल्लाहचा कृपावर्षाव  होणारच. खचितच अल्लाह सर्वांवर प्रभावी आणि चतूर व बुद्धिमान आहे. या श्रद्धावंत पुरुष आणि स्त्रियांसाठी अल्लाहचे वचन आहे की त्यांना अशा बागा प्रदान करील ज्यांच्या खालून  कालवे वाहात असतील, आणि ते त्याच्यात सदैव राहतील, त्या सदाबहार बागांत त्यांच्याकरिता स्वच्छ निवासस्थाने असतील, आणि सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे अल्लाहची प्रसन्नता त्यांना प्राप्त होईल. हेच मोठे यश आहे.(सुरह तौबा 71-72)

मांगी हुई राहतोंसे बेचैनिया बेहतर है.
खैरात की नींद का हर ख्वाब पराया है.

सीमा देशपांडे
7798981535

‘हज’ हे इस्लामच्या मूलभूत असलेल्या पाच प्रार्थनाविधीपैकी एक विधी आहे. प्रत्येक मुस्लिमास यथासामर्थ्य जीवनात एकदा हजविधीसाठी काबागृहास जाणे अनिवार्य आहे. काबागृहाच्या भूभागात प्रेषित इब्राहीम(अ) आणि प्रेषित इस्माईल(अ) यांच्या त्याग व बलिदानाचा सुगंध दरवळत आहे. येथे ‘सफा’ आणि ‘मरवा’च्या टेकड्या असून येथेच प्रेषित इब्राहीम(अ) यांची भार्या माननीय हाजरा(अ) आपल्या तहानने व्याकूळलेल्या तान्हुल्याकरिता पाणी शोधत धावपळ करीत होती. याच ठिकाणी ‘जमजम’ नावाची विहीर निघाली आणि त्यांनी आपल्या तान्हुल्याची याच विहिरीच्या पाण्याने तहान भागविली. त्या रेताळ प्रदेशात आजपासून सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी निघालेल्या या विहिरीचे पाणी अतिउष्ण हवामान असूनही आजपर्यंत आटलेले नाही. आजही कोट्यवधी जनता या पाण्याचा मनमुराद लाभ घेते. त्याचप्रमाणे याच वातावरणात अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्या सत्यधर्माचा डंका वाजला आणि प्रारंभी इस्लाम स्वीकारून इस्लामच्या मार्गात खडतर संघर्ष केला आणि त्यांचा संदेश घरोघर पोहोचविला. त्यांच्या रक्तरंजित संघर्षाच्या खुणा प्रत्येक ठिकाणी स्पष्ट दिसतात. याबरोबरच मक्का शहरात विजय मिळविणार्या लष्कराच्या तुकड्या गस्त घालताना दिसतात. ‘जबले नूर’ (अर्थात कांतीमय पर्वत) वरील कडे हे इतर सर्व पर्वतापेक्षा भिन्न आणि विशिष्ट स्वरुपाचे आहे. याच पर्वतावर ‘हिरा’ नावाची गुहा असून याच गुहेत आदरणीय प्रेषितांवर दिव्यवाणी प्रथमतः अवतरित झाली असून या गुहेचे स्वरुपही चौदाशे वर्षांपासून आजपर्यंत जसेच्या तसे आहे. याच ठिकाणी असलेल्या ‘सफा’ पर्वतावरून पहिल्यांदा आदरणीय प्रेषितांनी लोकांना जाहीर आवाहन केले होते की, ‘‘हे मानवांनो! ऐहिक आणि पारलौकिक जीवनात यशस्वी होण्यासाठी एकमेव असलेल्या ईश्वराचीच उपासना करा!!!’’ याच ठिकाणी माननीय उम्मे हानी(र) यांचे निवास होते. येथूनच प्रेषितांना ‘मेअराज’चा प्रवास ईश्वराने घडवून आणला. येथेच ‘शाबे अबीतालिब’चे स्थान आहे. याच स्थानावर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि हाशिम कबिल्याच्या परिवारजणांना तीन वर्षांपर्यंत समाजापासून विभक्त राहावे लागले. जवळच ‘सौर’ नावाची गुहा आहे, हीच ‘गुहा’ ‘हिजरत’ (वतनत्याग) ची पहिली मजल होय. येथेच ‘तनईम’ हे ठिकाण असून याच ठिकाणी इस्लामद्रोह्यांनी माननीय जैद(र) आणि माननीय खब्बाब(र) या प्रेषितसोबत्यांना ठार केले.
याच ठिकाणी ‘मुहस्सर’ची घाटी असून याच घाटीत आदरणीय प्रेषितांच्या जन्माच्या तीन वर्षांपूर्वी हत्तींच्या फौजेवर ईश्वराचा कोप आला होता. येथेच कुरबानी (बलिदान) ची ती जागा आहे, जेथे ईश्वराच्या एका इशार्यावर प्रेषित इब्राहीम(अ) हे आपल्या मुलाचा बळी देण्यासाठी त्यास घेऊन गेले होते.
तात्पर्य हेच की, येथील प्रत्येक ठिकाण आपल्या इतिहासाच्या पवित्र अध्यायांचे एक सुवर्ण पान आहे. ‘हज’चे उद्दिष्ट जेथे हे आहे की, ईश्वराशी पूर्णतः संबंध प्रस्थापित करणे आणि एकेश्वरवादाच्या इब्राहीमी केंद्राशी असलेले संबंध घनिष्ट करणे होय. तेथेच हादेखील उद्देश आहे की, आपले वर्तमान आपल्या धर्माच्या भव्यतम भविष्याशी एकरूप व्हावे.
वर उल्लेख केल्याप्रमाणे हिजरी सन नऊमध्ये ‘हज’च्या प्रसंगी मुक्ती आणि विभक्तीची घोषणा झाली. ‘सूरह-ए-बरात’च्या चाळीस आयती माननीय अली(र) यांनी विरोधकांसमोर वाचून दाखविल्या, याचा वर उल्लेख झालेलाच आहे. या ‘हज’मध्ये प्रेषित मुहम्मद(स) हजर होऊ शकले नाहीत आणि यानंतर लागलीच ईश्वरातर्फे ‘हज’ हे अनिवार्य असण्याची घोषणा झाली.
हिजरी सन दहामध्ये आदरणीय प्रेषितांनी ‘हज’ करण्याचा इरादा केला. प्रेषितांच्या ‘हज’ करण्याची वार्ता समजताच जवळच्या परिसरातील सर्वजण प्रेषितांसह ‘हज’ यात्रेस जाण्याच्या तयारीस लागले. ‘हज’यात्रेवर निघण्यापूर्वी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी एक विशेष भाषण दिले. एक लाख २४ हजार लोकांना घेऊन प्रेषितांनी हज यात्रेची सुरुवात केली.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी काबागृहास प्रदक्षिणा घातली. मक्केतील इब्राहीम स्थळावर दोन रकअत नमाज पढली. ‘हज’चा संपूर्ण विधी संपल्यावर प्रेषितांनी लोकांना संबोधित केले. या अंतिम हजच्या वेळी झालेले प्रेषितांचे भाषण म्हणजे उच्चकोटीचे आंतरमानवी दस्तावेजच होय. हे भाषण केवळ आपल्या काळातील अतुलनीय विधानप्रणाली नसून त्यासारखी विधानप्रणाली विश्व अस्तित्वात असेपर्यंत तयार होणार नाही, तसेच या विधानप्रणालीस कोणत्याही काळात आणि कोणत्याही भागात कोणताच पर्याय नाही, ही बाब सर्वसिद्ध आहे! याच विधानप्रणालीस विश्व कल्याणास्तव आणि पवित्र धार्मिक भावनेसह लागू करण्यासाठी एका विश्वव्यापी दलाची किवा जनसमूहाची ईश्वराने निर्मिती केली आहे. या ईश्वरी विधानप्रणालीचे काही घटक वर्तमान युगात इतर विधानप्रणालींतही आढळतात. परंतु या विधानप्रणालींमागे इस्लामची प्रेरणाशक्ती नसल्याने त्या यशस्वी होत नाहीत. कारण विद्युत दिवा किती जरी मोठा असला आणि वीजच नसेल तर तो दिवा प्रकाशमान होणार कसा काय?
अंतिम ‘हज’च्या प्रसंगी प्रेषितांनी दिलेल्या भाषणात इस्लामच्या मूलभूत श्रद्धेव्यतिरिक्त काही मूलभूत इस्लामी नियमावलीसुद्धा दिली. याच नियमावलींच्या आधारावर संपूर्ण जीवनाच्या रहस्याचा उलगडा होतो. या मूल्यांबाबतीत आजचे प्रगत जगसुद्धा अज्ञान आहे.
‘अंतिम हज’च्या प्रसंगी प्रेषित मुहम्मद(स) यांनी केलेल्या भाषणातून हे सत्य समोर येते की, आजतागायत ३००० वर्षांच्या इतिहासामध्ये आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे पहिलेच पावन व्यक्तिमत्त्व आहेत की जे समस्त मानवतेसाठी व्यापक आणि विस्तृत संदेश घेऊन आले आणि या संदेशास एका क्रांतिकारी आंदोलनाचे स्वरुप दिले. या आंदोलनातून मानवकल्याणकारी असलेल्या इस्लामी शासनाची स्थापना केली आणि येथेच न थांबता ही शासनव्यवस्था जगातील सर्व राष्ट्रांपर्यंत पोहोचविण्याकरिता समस्त मानवजातीसमोर साक्षीदाराच्या स्वरुपात उभे राहणारा जनसमूह स्थापन केला.
आता या भाषणाच्या काही महत्त्वपूर्ण अंशाचा येथे उल्लेख करण्यात येत आहे.
‘‘लोकहो! मी आज जे सांगत आहे, ते लक्षपूर्वक ऐका. कदाचित या वर्षानंतर या ठिकाणी मी तुम्हासमोर नसणार! अज्ञान काळातील (इस्लामपूर्व काळातील) संपूर्ण विधान व नियम माझ्या पायाखाली आहेत. (म्हणजेच गैरइस्लामी विधान व नियम नष्ट करण्यात येत आहेत) हे मानवांनो! आपणा सर्व मानवजातीचा (व सृष्टीतील समस्त सजीव आणि निर्जीव वस्तूंचा) निर्माता व पालनकर्ता हा एकच (ईश्वर) असून आपण समस्त मानवजातीचा पितासुद्धा एकच आहे. अर्थात मानवतेत ऐक्य हे एकच पालनकर्ता आणि एकच पिता (आदरणीय आदम) असण्याच्या आधारावरच प्रस्थापित होऊ शकते. म्हणजेच एकाच ईश्वराच्या आदेशांचे पालन करण्याची आन घेतल्याने मानवांतर्गतचे कोणत्याही प्रकारचे भेदभाव पार नष्ट होतात. त्याचप्रमाणे समस्त मानवजात ही एकाच पित्याची संतती असल्याने समस्त मानव आपसात बांधव आहेत. तेव्हा भेदभावाचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणूनच कोणत्याही अरब माणसाला कोणत्याही बिगरअरब माणसावर कोणत्याही प्रकारे श्रेष्ठत्व नाही. कोणत्याही गोर्या माणसास कोणत्याही काळ्या माणसावर कोणतेच श्रेष्ठत्व नाही. (अर्थात अरब असो, बिगरअरब असो, काळा असो वा गोरा असो, श्रीमंत असो की गरीब असो, कोणीच कोणापेक्षा श्रेष्ठ नाही. कोणासही कोणत्याही पटीने फाजील आभिमान बाळगण्याचे कारण नाही.) एवढेच सत्य आहे की, ईश्वराच्या दृष्टिकोनात श्रेष्ठ मानव केवळ तोच आहे, जो ईशप्रेमास्तव आणि ईशभयास्तव उत्तम आचरण ठेवतो आणि संयमाने वागतो. (अर्थातच वंश, वर्ण, प्रदेश, राष्ट्र, भाषा व यासारख्या इतर सर्वच बाबींमुळे माणूस श्रेष्ठ होत नसून श्रेष्ठत्वाचे मूळ हे मानवाचे योग्य (इस्लामी) आचरण होय. इस्लाम धर्माची हीच ती मूळ विचारसरणी आहे, जिचा स्वीकार केल्याने माणूस माणसांचा बंधु होतो. बंधुभावाचा यापेक्षा सत्य आधार इतर दुसरा कोणताच असू शकत नाही. जगात कोणासही या गोष्टीचा अधिकार नाही की, त्याने देश, वर्ण, वंश व अशा इतर आधारांवर मानवास संघटित होण्याची हाक द्यावी.)
हे लोकहो! तुम्ही आपल्या निर्माता व पालनकर्ता असलेल्या ईश्वरास भेटण्याच्या अंतिम क्षणापर्यंत अवैधरीत्या कोणत्याही मानवाची हत्या करणे व त्याची संपत्ती (आणि शील) घेणे निषिद्ध आहे. जे लोक तुमच्या सेवेत आहेत, त्यांना तेच खाऊ घाला, जे तुम्ही स्वतः खाता आणि त्यांना तीच वस्त्रे द्या, जी वस्त्रे व पोषाख तुम्ही स्वतः वापरता.
अज्ञानकाळात (गैरइस्लामी काळात) झालेल्या सर्व हत्यांच्या बदला घेण्याची चालू असलेली शृंखला येथेच थांबविण्यात येत आहे. अज्ञानकाळात दिलेल्या कर्जावरील घेण्यात येणारे आणि देण्यात येणारे व्याज संपविण्यात येत आहे. आजपासून कोणीही आपल्या कर्जावरील व्याज घेऊ नये. (इस्लामपूर्व काळात व्याजाची प्रथा खूप जोरात होती, ती प्रेषितांनी नष्ट केली व व्याजव्यवहारास निषिद्ध ठरविले.)
हे मानवांनो! स्त्रियांवर पुरुषांचे आणि पुरुषांवर स्त्रियांचे अधिकार आहेत. स्त्रियांनी आपल्या पतींचे आणि पतींनी आपल्या पत्नींचे अधिकार अनिवार्यरीत्या पूर्ण करावेत. स्त्रीकडून एखादी चूक घडलीच तर पुरुषांनी त्यांना आपल्या शयनगृहापासून वेगळे ठेवावे. केवळ एवढीच शिक्षा देण्याचा पतीला अधिकार आहे. खबरदार! स्त्रियांवर कोणत्याच प्रकारची सक्ती करू नये. आपल्या पत्नींना मारझोड करू नये. मग जेव्हा पत्नीस आपल्या चुकीची जाणीव होईल तेव्हा चांगल्या परीने त्यांना क्षमा करावी.
स्त्रियांच्या बाबतीत मी तुम्हास खबरदार करीत आहे की, त्यांच्याशी चांगले व प्रेमपूर्वक वर्तन करा. कारण त्या तुमच्यावर अवलंबून आहेत. त्या ईश्वराने तुमच्याकडे ठेवलेल्या ठेवी व अनामती आहेत. (म्हणून त्यांना धक्कादेखील लागता कामा नये.) ईश्वराने घालून दिलेल्या (अर्थात इस्लामी) नियमांनुसार त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करावे.
हे लोकहो! मी ईश्वराचा अंतिम प्रेषित आहे. माझ्यानंतर कोणीही प्रेषित येणार नाही. म्हणून मी तुम्हास ईश्वराचा आदेश देतो की, आपल्या निर्माता व पालनकर्ता ईश्वराचीच उपासना करावी. केवळ त्याच्याच आदेशानुसार आणि त्यानेच घालून दिलेल्या नियमांनुसार जीवन व्यतीत करावे. पाच वेळा नमाज पढावी, रमजान महिन्यात रोजे (उपवास) धरावे, आपल्या ईश्वराच्या घराचे दर्शन घ्यावे (अर्थात ‘हज’ करावे) आणि आपल्या प्रमुखाचे (वैध) आदेश व नियमांचे पालन करावे, तरच तुम्हास मुक्ती मिळून स्वर्गप्राप्ती होऊ शकते.
तुम्ही कधीही मार्गभ्रष्ट होऊ नये म्हणून मी तुम्हास दोन बाबी प्रदान करीत आहे. एक म्हणजे ईश्वरी ग्रंथ (दिव्य कुरआन) आणि दुसरे म्हणजे माझी जीवनप्रणाली (प्रेषितप्रणाली).’’ एवढे बोलून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले, ‘‘हे ईश्वरा! तू साक्षी आहेस की, मी तुझा संदेश मानवजातीपर्यंत पोहोचविला.’’ मग लोकांना उद्देशून म्हटले, ‘‘हा संदेश येथे हजर नसलेल्या मानवांपर्यंत पोहोचवावा.’’
प्रेषितांनी आपले भाषण संपविल्यावर नमाज अदा केली आणि ईश्वरासमोर प्रार्थना केली. याचप्रसंगी दिव्य कुरआनची ही आयत अवतरित झाली, ज्यामध्ये ईश्वराने म्हटले आहे,
‘‘या दिवशी तुमच्यासाठी तुमचा धर्म परिपूर्ण केला आहे आणि तुमच्यावरील माझी कृपा पूर्णत्वास नेली आहे. तसेच तुमच्यासाठी (जीवनविधीस्तव) मी (ईश्वराने) इस्लाम धर्म पसंत केला आहे.’’(संदर्भ : दिव्य कुरआन - ५ -४)
या आयतींचा स्पष्ट अर्थ असा होय की, आदरणीय प्रेषितांना ज्या उद्देशपूर्वीस्तव जगात पाठविण्यात आले होते, तो उद्देश पूर्ण झाला आणि ईश्वरातर्फे धर्माचे (जीवनसंहितेचे) जे नियम व आदेश यायचे होते ते सर्व आदेश व नियम प्रेषितांमार्फत आलेले आहेत.
यानंतर आदरणीय प्रेषितांनी ‘हज’च्या बाकीच्या विधी आटोपल्या. कुरबानीसाठी आणलेले ६३ उंट आदरणीय प्रेषितांनी स्वतःच्या हाताने ‘जबह’ केले. (कापले) बाकीचे उंट माननीय अली(र) यांच्या हस्ते जबह करण्यात आले.
जिलहज्जा महिन्यादरम्यान उत्तर रात्री मक्का शहरी ‘तवाफे विदाअ’ (निरोप प्रदक्षिणा) केल्यावर ‘फजर’ (सकाळ) ची नमाज अदा करून आपल्या सोबत्यांसह मदीना शहरी परत आले.
‘अंतिम हज’च्या प्रसंगी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी म्हटले होते,
‘‘या वर्षानंतर पुढील वर्षी कदाचित मी तुमच्या समोर नसेलही.’’
तसेच असेदेखील म्हटले की,
‘‘हे ईश्वरा! तू साक्षी आहेस, की मी तुझा संदेश मानवजातीपर्यंत पोहोचविला आहे.’’
मग असेदेखील म्हटले की,
‘‘लोकहो! मी तुमच्याकरिता ईश्वरी आदेश (दिव्य कुरआन) आणि माझी जीवनप्रणाली देऊन जात आहे. या दोन्हींवर आचरण केल्यास तुम्ही कधीच वाट भटकणार नाही.’’
मग ईश्वराचा आदेश असा आला की,
‘‘आजच्या दिवशी समस्त मानवांसाठी धर्मास (जीवनसंहितेस) पूर्णत्वाचे स्वरुप देण्यात आले आहे.’’
प्रेषितांच्या मृत्यूच्या सहा महिन्यांपूर्वी ‘सूरह-नस्त्र’ अवतरित झाली व यामध्ये असलेल्या संकेतावरून हे स्पष्ट झाले की, ईश्वरी दूत सत्य धर्माचे प्रवक्ते, इस्लामी समुदायाचे मार्गदर्शक नवीन सभ्यतेचे दाता आणि मानवतेचे उपकारक आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे लवकरच जगाचा निरोप घेणार आहेत. एवढेच नव्हे तर अंतिम हज करून परत येताना ‘गदीरे खुम’ या ठिकाणी पोहोचल्यावर प्रेषितांनी स्पष्टपणे म्हटले की,
‘‘मीसुद्धा एक मानव आहे आणि माझ्याकडे ईश्वरातर्फे लवकरच मृत्यूचा दूत येईल.’’
यानंतर असेही म्हटले,
‘‘मी तुमच्यावर दोन जवाबदार्या टाकून जात आहे, एक ईश्वरी ग्रंथ (दिव्य कुरआन) की ज्यामध्ये मार्गदर्शन आहे. म्हणून ईश्वरी ग्रंथास नेहमीच आपले मार्गदर्शक बनवा. दुसरी जी जवाबदारी तुम्हास सोपवीत आहे, ती माझ्या परिवारजणांची आहे. त्यांचा विसर पडू देऊ नका.’’
प्रेषितांच्या बोलण्याचा उद्देश अगदी स्पष्ट होता. प्रेषितानंतर येणार्या काळाच्या बाबतीत ते सूचना देत होते. पहिल्या वाक्यात ईश्वरी ग्रंथास मार्गदर्शक आणि जीवनाचे विधान बनविण्याची सूचना आणि दुसर्या वाक्यात प्रेषितांच्या परिवारजणांची काळजी घेण्याची सूचना होती. कारण प्रेषितपरिवाराच्या लोकांनी संपूर्ण जीवनच सत्यास अर्पण केलेले तर होतेच, शिवाय जीवनभर त्यांना धनहीन राहूनच जगावे लागलेले होते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या परिवारजणांसाठी कोणतीच संपत्ती कमावून ठेवली नव्हती. तसेच त्यांच्यासाठी कोणतेही हित, अधिकार वा आरक्षण निश्चित केले नव्हते. प्रेषितांनीही स्वतः आपले प्रत्येक हित व अधिकार सत्यावर बळी चढविले तर होतेच, शिवाय आपल्या परिवारजणांनासुद्धा संपत्ती न जमविण्याची आणि संपत्तीचा लाभ न घेण्याची शिकवण दिली होती. म्हणून प्रेषितांनी आपल्या सोबत्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली की, माझ्या परिवारजणांची काळजी वाहावी. त्याचप्रमाणे आदरणीय प्रेषितांचे वैयक्तिक जीवन त्यांच्या परिवारजणांनी खूप जवळून पाहिल्यामुळे त्यांना प्रेषित जीवनप्रणालीचा चांगला अभ्यास होता आणि मुळातच प्रेषित जीवनप्रणाली मानवांपर्यंत पोहोचविण्याचे सर्वांत उत्तम साधन म्हणजेच त्यांचे परिवारजण होय. म्हणून त्यांच्या मार्गदर्शनापासून वंचित न राहण्याकरितासुद्धा त्यांची काळजी वाहणे आवश्यक होते. याचप्रसंगी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी असेदेखील म्हटले, ‘‘मी ज्याचा प्रिय मित्र आहे, ‘अली(र)’ सुद्धा त्याचा प्रिय मित्र होय! हे ईश्वरा! जो ‘अली(र)’ यांच्याशी मैत्री करील, तूदेखील त्याच्यांशी मैत्री कर आणि जो ‘अली(र)’ यांच्याशी वैरभाव ठेवील, तूसुद्धा त्याच्याशी वैरभाव ठेव!’’
अर्थातच माननीय अली(र) हे प्रेषितांचे जावई आणि चुलत भाऊदेखील होते. त्यांनी बर्याच महत्त्वाच्या कामगिर्या पार पाडल्या होत्या. प्रेषितांकरिता पावलोपावली नाना संकटे झेलली आणि बर्याच वेळा आपले प्राण धोक्यात घालून प्रेषितांचे प्राण वाचविले. धर्मयुद्धात प्राण पणाला लावून रणभूमी गाजविली. ते ज्ञान आणि विधीशास्त्रात पारंगत होते. अगदीच बालपणापासून त्यांनी प्रेषितांसोबत आपल्या जीवनाचा एक एक क्षण घालविला आणि प्रेषितांवर येणारे प्रत्येक संकट आपल्यावर घेतले. प्रेषितांशी त्यांचे नातेही होते आणि ते प्रेषितांच्या मुलासारखेच होते.
‘गदीरे खुम’च्या ठिकाणी माननीय अली(र) यांच्या बाबतीत प्रेमपूर्वक वर्तन करण्याची प्रेषितांची सूचना ऐकताच माननीय उमर(र) यांनी त्यांना शुभकामना देऊन आलिगन दिले. माननीय बरीदा अस्लमी(र) यांनी तर जीवनभर अली(र) यांची सेवा केली.
‘सफर’ महिन्याच्या (अकरा हिजरी सनात) वेळी प्रेषितांनी ईश्वर मिलनाची तयारी सुरु केली. एके दिवशी ‘उहुद’च्या ठिकाणी जाऊन ईश्वरासमोर नतमस्तक झाले आणि प्रार्थना केली, मग सर्वांना संबोधून म्हटले,
‘‘लोकहो! मी तुमचा निरोप घेणार आहे आणि ईश्वरासमोर तुमच्याबाबतीत साक्ष देणार आहे. मी ‘कौसर’च्या हौदाचे येथूनच दर्शन करीत आहे. मला या गोष्टीची भीती नाही की माझ्यानंतर तुम्ही अनेकेश्वरवादी व्हाल. केवळ एवढीच भीती वाटते की, माझ्या पश्चात तुम्ही ऐहिक सुखात गुरफटून सत्याची साथ सोडाल.’’
मग निम्या रात्री ‘बकीअ’ या कब्रस्तानात जाऊन आपल्या मृत नातेवाइकांसाठी मोक्षप्राप्तीची प्रार्थना केली आणि मृतांना उद्देशून म्हणाले,
‘‘मी लवकरच तुम्हाला येऊन भेटणार आहे.’’
नंतर एके दिवशी आंदोलनाच्या विशेष कार्यकर्त्यांची भेट घेऊन म्हणाले,
‘‘हे विश्व ईश्वराचे आहे. या विश्वात राहणारा प्रत्येकजण ईश्वराची निर्मिती आहे. तुम्हाला ईश्वराने शासन याकरिता प्रदान केले आहे की, तुम्ही त्यांच्या समस्या सोडवाव्यात. त्यांचे दुःख दूर करावे. त्यांचे अधिकार त्यांना प्रदान करावेत. त्यांच्यावर तुम्हास प्रभुत्व मिळाल्याचा अर्थ असा मुळीच नव्हे की, तुम्ही त्यांच्याशी उदंडपणाचे आणि दांभिकतेचे वर्तन करावे.’’
‘बकीअ’ कब्रस्तानातून परतताना प्रेषितांची प्रकृती खालावू लागली. आजारपणातही आदरणीय प्रेषित आंदोलन आणि इस्लामी राज्याची पूर्णतः काळजी वाहात होते. सफर महिन्याच्या सव्वीस तारखेस प्रेषितांनी ‘रोम’ वर हल्ला करण्याचा आदेश दिला आणि दुसर्या दिवशी माननीय उसामा बिन जैद(र) या तरुण व तडफदार योद्ध्यास या लष्करी मोहिमेचा प्रमुख नियुक्त केले. माननीय उसामा(र) यांचे वय या वेळी खूप कमी होते.
मृत्यूच्या पाच दिवसांपूर्वी प्रेषितांची प्रकृती थोडी सुधारली असल्याने ते मस्जिदमध्ये आले आणि आपल्या अनुयायांना संबोधित करताना म्हटले,
‘‘तुमच्यापूर्वी असे लोक होऊन गेलेत की ज्यांनी आपल्या प्रेषित आणि धार्मिक नेत्यांच्या कबरींना पूजास्थळे बनविली होती. (अर्थात प्रेषित आणि धर्मगुरुंच्या कबरींची पूजा व आराधना करू लागले व कबरींवर माथा टेकू लागले होते.) तुम्ही मात्र असे मुळीच करु नका. (कारण पूजा व आराधना केवळ ईश्वराचीच करणे आवश्यक आहे.)’’
मग प्रेषितांनी सामूहिक नमाज पढविली व परत लोकांना उद्देशून म्हणाले,
‘‘मी तुम्हास अन्सार (मदीनावासी जनता) च्या अधिकारांच्या बाबतीत विशेष जाणीव करून देत आहे. कारण हे लोक माझ्या शरीराचा पोषाख आणि माझ्यासाठी मार्गसाधन होय. त्यांनी त्यांच्या वाट्याची जवाबदारी पूर्ण केली. आता तुमच्यावर त्यांच्या जवाबदार्या शिल्लक आहेत.ईश्वराने आपल्या दासास (मानवास) याचा पूर्ण अधिकार दिला आहे की त्याने वाटल्यास केवळ ऐहिक सुखसमृद्धी घ्यावी अथवा वाटल्यास ईश्वराची मर्जी मिळवावी.’’आता प्रेषितांची प्रकृती मात्र खालावली. लोकांमध्ये शोकाकूल वातावरण निर्माण झाले. तेव्हा लोकांची अवस्था पाहून प्रेषित मुहम्मद(स) दोन जणांच्या सहार्याने परत मस्जिदमध्ये आले आणि लोकांना संबोधित केले,
‘‘प्रिय जणांनो! मला खबर मिळाली आहे की, तुम्हास माझ्या मृत्यूचे भय वाटते. माझा मृत्यू तुम्हासाठी असहनीय बाब झाली आहे. परंतु तुम्हास हे सहन करावे लागणारच आहे. कारण माझ्यापूर्वी जेवढे प्रेषित या जगाच्या पाठीवर आलेत, तेसुद्धा नेहमी जीवंत राहिले नाहीत. मला पण ईश्वरभेटीस जाणे भाग आहे. मी तुम्हास सूचना देतो की अंसार (मदीनावासी जनता) शी भलाई आणि उपकार व सौहार्दाचे वर्तन करा. तसेच मी सूचना करतो की, मुहाजिरीन (स्थलांतरीत) जणांनी आपसात सद्भावाचे व स्नेहभावाचे वर्तन करावे.’’
या भाषणानंतरच्या सोमवारी प्रेषितांनी आपल्या सोबत्यांना पाहून स्मीत हास्य केले. याच्या काही क्षणानंतर प्रेषितांनी हात उचलून प्रार्थना करताना तीन वेळेस म्हटले,‘‘अल्ला हुम - मा अर - रफीऊल आला!’’आणि माननीय आयशा(र) (प्रेषितांची अंतिम भार्या) यांच्या कुशीत डोके ठेवून ईश्वरभेटीस गेले. हा ‘रब्बील अव्वल’ महिन्याच्या बारा तारखेचा दिवस असून सकाळची वेळ होती. या वेळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे वय चौसष्ट वर्षे आणि चार दिवस एवढे झाले होते. प्रेषितांचा मृत्यू म्हणजे एक विलक्षण घटना होती. एकाच क्षणामध्ये कित्येक शतकांचा अंत झाला होता. काळ जागीच स्तब्ध झाला होता. सर्वांचाच थरकाप उडाला होता. काळीज पार फाटून गेले होते. मने शिथील झाली होती. रक्त गोठून गेले होते. शब्द अबोल झाले होते. विश्वात निख शांतता पसरली होती. पाकळ्या कोमेजून गेल्या होत्या. सगळीकडे स्तब्धता! जीवनभर मानव कल्याणास्तव झटणार्या एका युगपुरुषाचा अंत झाला होता. माननीय उस्मान(र) यांना काही सुचत नव्हते. माननीय अली(र) अचेतावस्थेत पडले होते. माननीय अब्दुल्ला बिन अनीस(र) यांना शोक अनावर झाल्याने त्यांनी जागीच प्राण सोडला होता. माननीय उमर(र) यांचे काही वेळासाठी मानसिक संतुलन बिघडले होते.
आदरणीय प्रेषितांच्या मृत्यूमुळे केवढी मोठी पोकळी निर्माण झाली होती. प्रेषितांनी तयार केलेल्या समूहाने खरोखरच अशा संकटमय परीस्थितीतही आपल्या जवाबदारीची जाणीव आणि चारित्र्याच्या अभूतपूर्व दृढतेचा पुरावा अशा प्रकारे सादर केला की तत्काळ नेतृत्वाची ही पोकळी भरून काढली आणि या अतिशय नाजुक परिस्थितीतही कोणत्याच प्रकारची स्पर्धा झाली नाही.
ही आहे या थोर महामानवाची चरित्रकथा, ज्याचे उपकार समस्त मानवतेवर आहेत. आपण या अंतिम प्रेषितांची उम्मत (अनुयायीसमूह)आहोत. आपल्या प्रेषितांनी आपल्या हित व कल्याणासाठी अपार दुःख झेलले, ना ना प्रकारचे बलिदान दिले. त्यामुळे आपल्याजवळ त्यांचे ऋृण फेडण्याची ऐपतसुद्धा नाही.
शेवटी ईशदरबारी पाणावलेल्या डोळ्यांनी प्रार्थना करू या की, हे ईश्वरा! तुझ्या आदेशांवर आणि प्रेषितांनी दाखविलेल्या मार्गावर समस्त मानवजातीस जाण्याची सद्बुद्धी मिळो आणि समस्त मानवजातीचे कल्याण होवो!तथास्तु!

उपवास धर्माचा एक आधारभूत स्तंभ आहे. अल्लाहचे भय व शुचिर्भूतता आणि अल्लाहशी संबंध जोडण्यात नमाजप्रमाणेच उपवासाचे (रोजा) सुद्धा फार महत्व आहे. याच कारणामुळे फर्ज रोजांच्या (अनिवार्य उपवास) शिवाय नफल (जे केले नाही तरी चालते) रोजांचीसुद्धा महत्ता सांगितली गेली आहे आणि त्यांची प्रेरणा दिली गेली आहे. हदीस आणि प्रेषित मुहम्मद (स) यांच्या चरित्राच्या पुस्तकावरून ज्ञात होते की, महिलासहाबी नफल रोजे मोठ्या प्रमाणात ठेवीत असत.
उम्मुलमोमिनीन माननीय आयेशा (र) यांच्यासंबंधी साद बिन इब्राहीम म्हणतात -
‘‘त्या सदैव रोजे ठेवीत असत.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : ६८)
त्यांचे पुतणे कासिम बिन मुहम्मद म्हणतात -
‘‘त्या निरंतर उपवास (रोजे) करीत असत.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : ७५)
उम्मुलमोमिनीन माननीय हफ्सादेखील फार अधिक नफिल रोजे ठेवीत असत. माननीय नाफे (र) म्हणतात -
‘‘माननीय हफ्सा (र) यांचे निधन तेव्हा झाले जेव्हा त्या निरंतर उपवास करू लागल्या होत्या.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : ८६)
असे एक कथन आहे की, एकदा प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना घटस्फोट देण्याची इच्छा केली, तेव्हा ईश्वरसंदेश (वही) अवतरली आणि माननीय जिब्रईल (अ) यांनी सांगितले,
‘‘हफ्सा (र) यांना परत रूजू करून घ्या. ते अशासाठी की त्या फार उपवास करणाऱ्या व रात्री नमाज पढणाऱ्या आहेत आणि त्या स्वर्गातसुद्धा आपल्या पत्नी राहतील.’’ (अलइस्ती आब - ४ : २६९)
महिला सहाबींच्या नफिल रोजासंबंधी अनेक विखुरलेले प्रसंग हदीसच्या पुस्तकांत आढळतात. यावरून रोज्यासंबंधी त्यांच्या आवडीची कल्पना येते. माननीय आयेशा (र) वर्णन करतात की, त्या आणि माननीय हफ्सा (र) या दोघींनी रोजा ठेवलेला होता. इतक्यात जेवण समोर आले, तेव्हा त्या जेवल्या. माननीय हफ्सा (र) यांनी ही गोष्ट प्रेषित मुहम्मद (स) यांना सांगितली, तेव्हा दुसऱ्या दिवशी तो पुरा करण्याची (कजा) प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना आज्ञा दिली. (मिश्कातुल मसाबीह (किताबुस्सौम) तिर्मिजी व अबू दाऊदचे प्रमाण)
प्रेषित मुहम्मद (स) उम्मुलमोमिनीन माननीय जुवैरिया (र) यांच्या घरी गेले. शुक्रवारचा दिवस होता. त्यांनी रोजा ठेवलेला होता. प्रेषित मुहम्मद (स) यांनी विचारले, ‘‘तुम्ही काल रोजा ठेवलेला होता काय ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘नाही.’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी परत विचारले, ‘‘उद्या रोजा ठेवण्याची इच्छा आहे काय ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘नाही’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘‘रोजा तोडा (सोडा)’’ एका कथनात उल्लेख आहे की, त्यांनी रोजा तोडला. (बुखारी (किताबुस्सौम))
माननीय उम्मे हानी (र) मक्का विजयाच्या दिवशीच्या एका प्रसंगाचे वर्णन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) बसलेले होते. माननीय फातिमा (र) प्रेषित मुहम्मद (स) यांच्या डाव्या बाजूला आणि त्या उजवीकडे बसल्या होत्या. एक दासी एक पेय घेऊन आली. प्रेषित मुहम्मद (स) यांनी ते प्यायल्यानंतर माननीय उम्मे हानीकडे दिले. त्या ते (प्रसाद म्हणून लगेच) प्यायल्या आणि म्हणाल्या, ‘‘हुजूर ! माझा उपवास होता. परंतु मी (आपले उष्टे) प्याले.’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी विचारले, ‘‘कजा (नंतर पुरा करण्याचा) चा रोजा तर ठेवला नव्हता ना ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘नाही, नफल होता.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले की, ‘‘नाफल रोजा ठेवणाऱ्याला हा अधिकार आहे की, त्याने इच्छिले तर रोजा पूर्ण करावा अथवा मध्येच तोडावा.’’ (मिश्कातुलमसाबीह (किताबुस्सौम) तिर्मिजी.)
उम्मे अम्मारा म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) एके दिवशी त्यांच्या घरी आले. त्यांनी जेवण वाढले. प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘तुम्हीही खा.’’ त्या म्हणाल्या, ‘‘माझा रोजा आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘रोजेदराच्या घरी जेव्हा जेवले जाते तेव्हा जेवण पूर्ण होईपर्यंत फरिश्ते (देवदूत) घर मालकासाठी प्रार्थना करीत राहतात.’’ (मिश्कातुल मसाबीह (किताबुस्सौम) अहमद, तिर्मिजी, इब्ने माजाचे प्रमाण.)
रूबीअ बिन्ते मुअव्वज (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी आशूरा (मुहर्रम महिन्याची दहा तारीख) च्या दिवशी अन्सारांच्या मोहल्ल्यात घोषणा करविली की, ‘‘ज्या लोकांनी जेवण-खाण केले असेल, त्यांनी संध्याकाळपर्यंत काही खाऊ नये व ज्यांनी रोजा ठेवला असेल, त्यांनी आपला रोजा पूर्ण करावा. यानंतर आम्ही स्वतःदेखील रोजा ठेवीत होतो आणि आपल्या मुलांनासुद्धा ठेवावयास सांगत होतो. जेव्हा ते भुकेने रडत असत, तेव्हा आम्ही लोकरीची खेळणी बनवून संध्याकाळपर्यंत त्यांना त्यात रमवीत असू.’’ (बुखारी (किताबुस्सौम) मुस्लिम (किताबुस्सियाम)
दुसऱ्याकडून रोजे ठेवण्याचादेखील उल्लेख आढळतो. एका महिलेने प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, माझ्या आईचे निधन झाले आहे. तिच्यावर पंधरा रोजे फर्ज (अनिवार्य) आहेत. एका कथनात आहे की, तिच्यावर एक महिन्याचे रोजे फर्ज आहेत. अन्य एका कथनात दोन महिन्यांचे रोजे फर्ज आहेत. काय मी तिच्याकडून रोजे ठेऊ शकते ? प्रेषित मुहम्मद (स) यांनी विचारले, ‘‘जर तिच्यावर कोणाचे कर्ज असते तर तुम्ही अदा केले नसते का ?’’ ती म्हणाली, ‘‘होय.’’ प्रेषित म्हणाले, ‘‘अल्लाहचे कर्ज तर या गोष्टीचे अधिक हक्कदार आहे की ते अदा केले जावे.’’
एका कथनावरून असे कळते की, प्रश्नकर्ता पुरुष होता. (बुखारी (किताबुलहज्ज) किताबुस्सौम, मुस्लिम (किताबुस्सियाम) येथे हा प्रश्न धर्म विधानाच्या रूपात विवाद्य नाही, केवळ इतका संकेत पुरेसा आहे की, हनफी पंथानुसार मृत माणसातर्फे रोज्यांची पूर्तता केली जात नाही.) असेही शक्य आहे की, हे वेगवेगळे प्रसंग असतील. याचे समर्थन यावरूनदेखील होते की, प्रश्न विभिन्न प्रकारचे आहेत.

- राजेंद्र नारायण लाल

भाषांतर : अब्दुर्र्हमान शेख



आयएमपीटीअ.क्र. 100    पृष्ठे- 65      मूल्य - 22           आवृत्ती - 4 (March 2015)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/ii4a47pu4fyw8kmqws6i68p6ogvm99wg

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget