Latest Post

- सय्यद अबुल आला मौदूदी
   
    या पुस्तिकेत मौलाना साहेबांचे दोन लेख आले आहेत, एकेश्वरत्व आणि अनेकेश्वरत्व या विषयावर विचार मांडले आहेत. या वर्णनाने वाचकास एकेश्वरत्व आणि अनेकेश्वरत्वातील फरक कळतो आणि त्या दोहोंतील वैशिष्ट्ये लक्षात येतात.
    एकेश्वरत्व किती सार्थक व अनेकेश्वरत्व किती भयानक व दुष्परिणामी आहे. आणि एकेश्वरत्व किती प्रकाशमय असून अनेकेश्वरत्व किती अंधकारमय आहे याचा अनुभव येतो. अनेकेश्वरत्वाने किती नीतिहीन समाज निर्मिती होते आणि एकेश्वरत्वामुळे पवित्र व सुंदर समाज नव-निर्माण होते, हे उघड होते.

    आयएमपीटी अ.क्र. 102     -पृष्ठे - 16     मूल्य - 10               आवृत्ती - 4 (2013)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/cqlogb0ugyp2pdhhrm3oi367btu9nbg7

जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या दिनाची खरी सुरूवात स्त्रियांविषयीच्या सामुहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली. त्यावेळी तयार कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रिया व मुले यांना काम भरपूर पण मजूरी कमी असे प्रमाण होते. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये महिलांनी याविरूद्ध लढा पुकारला. जगाच्या इतिहासात स्त्रियांनी संघटित होवून स्वतःचे अधिकार मागण्यासाठी केलेला हा पहिला संघर्ष मानला जातो.
    1908 साली विविध देशांमधील महिला प्रतिनिधीसह कार्यकर्ती्नलारा झेटगी हिने सुचविल्याप्रमाणे 8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली. भारतात मुंबईमध्ये 8 मार्च 1943 ला पहिला महिला दिन साजरा करण्यात आला.
    सामान्यतः प्रत्येक समाजात स्त्रियांना हीन समजले जात असे. त्यांचा अपमान केला जात असे आणि तèहेतèहेच्या अत्याचारांचे त्यांना लक्ष्य बनविले जात असे. भारतीय समाजात, पतीचा मृत्यू झाल्यास पतीच्या प्रेताबरोबर पत्नीला सुद्धा जीवंत जाळले जात असे. चीन मधील स्त्रिच्या पायात आखूड लोखंडी बूट घातले जात असत. अरबस्तानात मुलींना जीवंत पुरले जात असे.
    इतिहास साक्षी आहे की या अत्याचाराविरूद्ध आवाज उठविणारे सुधारक अलिकडच्या युगात जन्मले आहेत. परंतु, या सर्व सुधारकांपूर्वी शेकडो वर्षे अरबस्तानात पैगंबर मुहम्मद सल्ल. हे स्त्रियांचे मोठे हितचिंतक असल्याचे दिसते व ते स्त्रियांवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराचा बिमोड करतात.  स्त्रीचा गौरव केला जातो हे खरे पण सत्य काही वेगळेच आहे. स्त्री जन्मा तुझी ही कहानी हृदयी अमृत नयनी पाणी.
    21 व्या शतकात आधुनिकतेचे वारे वाहत असताना आजही स्त्रियांचे हुंडाबळी जातात, लैंगिक छळ व अत्याचार केला जातो. त्यांना हीन वागणूक दिली जाते. लिंग तपासणी करून स्त्री जन्माला येण्याअगोदर कोवळा जीव गर्भात मारला जातो. तेव्हा वाटते कोवळी कळी खुडण्याचा अधिकार समाजाला दिला कुणी?
    अल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे या जगात जेव्हा आगमन झाले तेव्हा देखील मुलींना ओझे समजले जात होते. त्या लोकांना नेहमीच ही आशंका राहत असे की, योग्य स्थळ न मिळाल्यास त्यांना आपल्या मुली इतर टोळीमध्ये द्याव्या लागतील. ही देखील एक आशंका सदैव असे की, लुटारू त्यांना पकडून नेऊन दासी बनवून ठेवतील. या सर्व कारणांमुळे ज्या घरी मुलगी जन्माला येत असे, त्याचा चेहराच उतरून जात असे. (आणि आताच्या काळामध्ये सुद्धा काही प्रमाणात हीच परिस्थिती आहे).  ‘‘आणि त्यापैकी एखादयाला जेव्हा मुलीच्या जन्माची खुषखबर देण्यात येते. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळीमा पसरते व तो तो र्नतासमान घोट गिळून बसतो. लोकांच्यपासून लपत-छपत फिरतो की या वाईट बातमीनंतर काय तोंड दाखवावयाचे, विचार करतो की  अपमानित होऊन मुलीला घेऊन रहावे अथवा मातीत पुरावे? पहा, कसे वाईट निर्णय आहेत. (कुरआन : सुरह 16ः 58,59)
    स्वतःला प्रगत समजणारा वर्ग तर इतका निर्दयी आहे की, शिशुच्या जन्माची देखील वाट पहात नाही. गर्भावस्थेतच स्कॅनिंग करून मुलगा की मुलगी हे पाहिले जाते. मुलगी असेल तर गर्भपातच होतो. याचसाठी 1994 मध्ये एक कायदा बनविला गेला होता. छशींरश्र ऊळरसपेीींळल ढशलहपर्ळिींश ठशर्सीश्ररींळेप रपव झीर्शींशपींळेपेष चर्ळीीीश अलीं. या कायद्यान्वये गर्भलिंग निदान गुन्हा ठरविला गेला असून, देखील दरवर्षी 5 ते 8 लाख मुलींची गर्भामध्येच हत्या केली जाते.
     इस्लाम भ्रूणहत्येला घोर अपराध ठरवितो व याला थोपविण्यासाठी विविध मार्ग चोखाळतो. ज्या-ज्या कारणांमुळे अथवा आशंकामुळे भ्रूणहत्या केली जाते, त्यांनाच इस्लाम दूर करतो. इस्लामनुसार मुलगी ही अहोभाग्य, शालिनता व कल्याणपद आहे. तिच्या पालनपोषणाची व उत्तम प्रशिक्षणाची शिकवण तो देतो. सामाजिक पातळीवर हे उत्तम प्रद सिद्ध झाले आहे.’’आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या मुीला विचारले जाईल ती कुठल्या अपराधापायी ठार केली गेली? (कुरआन 81ः 8,9)
    देशातील कित्येक राज्यामध्ये मुलां-मुलींच्या जन्मदरात खूपच तफावत आहे. विशेषतः गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली व हिमाचल प्रदेशमध्ये. या राज्यांमध्ये 1000 मुलामागे 800 मुली आहेत. 1991 च्या जनगणनेनुसार पंजाबमध्ये 1000 मुलांमागे 875 मुली होत्या आणि 2009 मध्ये ती तफावत 793 वर पोहोचली. ज्या समाजामध्ये इतके मुलींचे अधिकार नाकारले जातात अथवा त्यांना कनिष्ठ समजले जाते त्या ठिकाणी मुलींची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांना वर उचलण्याकरिता या शिकवणीची गरज आहे. तरीही आज भारतीय स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती पथावर आहे.
    शेतातील मजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत तिची यशस्वी घौडदौड चालू आहे. ती शिक्षिका, डॉ्नटर, ग्रामसेविका, सरपंच, तलाठी, जिल्हाधिकारी पोलीस निरीक्षक, पायलट, ड्रायव्हर, खेळाडू अशा एक ना अनेक क्षेत्रात आपली यशस्वी भूमिका बजावत आहे. सलाम या नारी श्नतीला.  जगाने स्त्रीला अबला असे गोंडस नाव दिले आहे. ती अबला नसून सबला आहे. महिला आज खरच स्वतंत्र सक्षम झाली आहे का? हा प्रश्न समाजाला अंतर्मुख होण्यास भाग पाडतो हे ही तितकेच खरे आहे.
    कालामानाप्रमाणे मुली शाळा, कॉलेजात, शिकत आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले आहेत. त्या स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत.आजची स्त्री आता पेटून उठली आहे. तिला तिच्या हक्काची जाणीव झाली आहे. खरंच ती स्वतंत्र आहे? असा प्रश्न पडतोच.  बालिकेपासून ते वृद्धेवर ही अत्याचार होताना दिसतात. गर्दीत, समाजात, शाळेत, नातेवाईकात आज एकटी स्त्री असेल तर ती खरोखरच सुरक्षित आहे का? तर नाही हेच उत्तर येईल. ही परिस्थिती खेड्या, पाड्यापासून मोठ्या शहरापर्यंत एकच आहे. मला वाटते महिलांपुढे अनेक आव्हाने आहेत सर्वात जास्त आहे ते म्हणजे तिची सुरक्षितता, तिचे आरोग्य आणि घरगुती हक्क.
    निरोगी, हसतमुख आणि शांत स्त्री घराचे वैभव असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्त्रियांनी स्वतः आत्मपरिक्षण करून स्वतःमधील न्युनतेची भावना कमी करावी, अंग प्रदर्शन न करता आपल्या क्षेत्रात कष्टाने जिद्दीने उत्तूंग गरूड झेप घ्यावी, शिक्षणाची कास सोडू नये स्वतःचे आरोग्य जपावे. पुढची पिढी सुसंस्कारित घडावी म्हणून प्रत्येक आईने मुलीच्या मागे खंबीरपणे उभे रहावे. हुंडाविरोधात, स्त्री भ्रुणहत्या विरोधात मोठे पाऊल उचलावे, नवीन काहीतरी निर्माण करावे, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीची मैत्रीण व्हावे, मनाशी खरे रहावे.
दर्या की कसम मौजों की कसम ये ताना, बाना बदलेगा, तु खुद को बदल के देख जरा तब ही जमाना बदलेगा
    इस्लामने स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व मानले आहे. तिच्या हक्काचा व अधिकाराचा विचार फक्त एका दिवसापुरता किंवा एका वर्षापूरता केलेला नसून तिच्या संपूर्ण जीवनालाच इस्लामने सुरक्षित केले आहे. एक मुलगी म्हणून तिची जबाबदारी पित्यावर सोपवण्यात आली आहे. बहिण असेल तर भावावर, व बायको म्हणून नवऱ्यावर व एक आई म्हणून तिच्या मुलांवर पूर्णपणे जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि जो ही जबाबदारी पूर्ण करणार नाही त्याला अत्यंत वाईट शिक्षेची पूर्वसूचना कुरआनमध्ये देण्यात आली आहे. कुरआनचा अभ्यास केल्यास असे दिसते की स्त्रीयांना त्यांचे जीवन स्वतंत्रपणे व सुरक्षितपणे जगता यावे, याचाच जास्त विचार केला गेला आहे. तीला सर्व अधिकार देण्यात आले आहे. आजचा समाज स्त्री भ्रुणहत्या या समस्येने ग्रस्त आहे पण इस्लामने भ्रुणहत्येला फार मोठे पाप ठरवले आहे. स्त्री-भ्रुणहत्या करणे हा फार मोठा गुन्हा असून त्यासाठी परलोकात तुम्हाला जाब द्यावा लागेल, अशी सूचनाही कुरआनमध्ये करण्यात आली आहे. मुलगी जन्माला आली तर माणसाला खुशखबरी देण्यात आली आहे, की त्याने जर आपल्या मुलीचे समानतेने पालनपोषण केले तर त्याला त्याचा चांगला मोबदला दिला जाईल.  या सर्व बाबी पाहता असे दिसते की स्त्री-पुरूष समानतेचा पुरस्कर्ता स्त्री-जन्माला व तिच्या सुरक्षित व स्वतंत्र जीवनाला व हक्काची समाजाला जाणीव करून देणारा एक सत्यमार्ग व एक परिपूर्ण अशी जीवनपद्धती म्हणजे इस्लाम होय.

- सय्यदा यास्मीन आरा

 माननीय अब्दुल्ला (र.) यांचे निवेदन आहे की, एक मनुष्य प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्याजवळ आला आणि प्रेषित यांना म्हणाला, मी तुमच्याशी प्रेम राखतो. प्रेषितांनी सांगितले, जे तुम्ही बोलता, त्यावर विचार करा. त्याने तीन वेळा म्हटले की, ईश्वराची शपथ, मी तुमच्याशी प्रेम राखतो. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर तुम्ही आपल्या बोलण्यात सच्चे असाल तर दारिद्र्य आणि तंगीचा मुकाबला करण्यासाठी शस्त्रे जमा करा. जे लोक माझ्याशी प्रेम राखतात, त्यांच्या दिशेने गरीबी, भूक, तंगी पुरापेक्षा जास्त वेगाने सरसावून येतात.       (हदीस - तिर्मिजी)
भावार्थ- एखाद्याशी प्रेम करणे व त्याला प्रिय बनविण्याचा अर्थ काय असतो? हाच की त्यांच्या पसंतीस आपली पसंत व त्यांच्या नापसंतीस आपली नापसंत ठरवून घेणे. आपला ‘प्रिय’ ज्या मार्गावर चालतो. त्यास आपला जीवन मार्ग बनवावे. त्याच्या सानिध्यासाठी, सहवासासाठी आणि त्याच्या प्रसन्नतेसाठी सर्वस्व अर्पण केले जावे आणि बलिदानासाठी सदैव तत्पर असावे. प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रिय बनविण्याचा अर्थ, त्यांचे एक एक पाउलचिन्ह जाणून घ्यावे व त्यानुसार आचरण करावे. प्रेषित (स.) यांनी ज्या मार्गात आघात सहन केले त्या मार्गात आघात सोसण्याचा दृढ संकल्प केला जावा. ‘गारे हिरा’ हे प्रेषित (स.) यांचा मार्ग आहे तसेच ‘बद्र व हुनेन’ देखील प्रेषितांचा मार्ग आहे. सत्य धर्माच्या मार्गावर चालण्याचा परिणाम दारिद्र्य, तंगी, उपासमार, इत्यादि गोष्टींचा मारा होईल. हे सर्वविदीत आहे की आर्थिक आघात सर्वात मोठा आघात आहे. याचा मुकाबला फक्त अल्लाहवर भरवसा आणि अल्लाहशी असलेल्या प्रेमानेच होऊ शकतो. ईमानधारक मनुष्य अशावेळी असा विचार करतो की, अल्लाह माझा कार्यसाधक आहे. तो माझा पाठीराखा आहे. मी निराधार नाही. आणि शेवटी मी एक अल्लाहचा गुलाम आहे. गुलामाचे काम फक्त आपल्या मालकाची आज्ञा पाळणे, त्याच्या मर्जीनुसार चालणे. मी ज्याच्या कामावर लागलो आहे तो अतिशय दयावान आणि न्यायी आहे. माझी मेहनत वाया जाऊ शकत नाही, त्याचे (ईश्वराचे) अशा प्रकारे विचार करणे प्रत्येक संकटाला सोपे करणे. शैतानाच्या प्रत्येक शस्त्राला निष्काम करून टाकते. नबुवत/प्रेषितत्त्व, हे एक अधिकारपद आहे. सर्वोच्च अल्लाहकडून त्यासाठी विशिष्ठ व्यक्तीची निवड व नियुक्ती होत असते. अशा निवडलेल्या व नियुक्ती झालेल्या व्यक्तीच्या स्वत:च्या इच्छेलाही काही वाव नसतो. माणसाच्या स्वत:च्या निर्धार व इरादा, धडपड व प्रयत्नांनी, प्रेषितत्त्व प्राप्त होत नसते. आपला प्रेषित कुणास करावा याचा निर्णय घेणारा तो अल्लाहच आहे. ‘‘अल्लाह उत्तम प्रकारे जाणतो की आपल्या प्रेषितत्त्वाचे कार्य कुणाकडून घ्यावे व कसे घ्यावे. (सूरह अनआम). जपजाप्य व ध्यानमग्न आणि तपश्चर्येमुळे मनुष्य अध्यात्मिक दृष्टीने उच्च होऊ शकतो. परंतु हे शक्य नाही की आपल्या या खडतर तपश्चर्येच्या बळावर तो प्रेषितत्त्वपदापर्यंत पोहोचावा व आपल्या तपांमुळे प्रेषितत्त्वाने उपकृत व्हावा. प्रेषितत्त्व हे एक अधिकारपद आणि ठराविक कामगिरी आहे. कोणतेही अधिकारपद स्वत: होऊन केवळ आपल्या प्रयत्नांनी मिळत नसते तर कुणा समर्थ अधिकारीच्या फर्मानाने व नियुक्तीनेच ते प्राप्त होऊ शकते. म्हणून प्रेषितत्त्व, जे एक महान रब्बानी-दैवी पदाधिकार आहे, त्यालाच मिळू शकते ज्यासाठी सृष्टीच्या व मानवजातीच्या खऱ्या शासकाकडून नियुक्ती आदेश मिळाला असेल. प्रेषित जे काही आदेश देतात, आणि दीन, शरिअत (धर्म व शास्त्र) म्हणून ज्या ज्या गोष्टींची शिकवण देतात, ती त्यांच्या स्वत:कडून नसते तर सर्वोच्च अल्लाहकडून असते. सर्वच प्रेषित म्हणतात, ‘‘मी तुम्हाला आपल्या पालनकत्र्याच्या आज्ञा ऐकवित आहे व त्याचाच संदेश ऐकवित आहे पोहोचवित आहे.’’ (सूरह आअराफ) ‘‘ज्याने प्रेषिताचे आज्ञापालन केले त्याने अल्लाहचे आज्ञापालन केले.’’ (सूरह निसा).

प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करताना एक गोष्ट अगदी प्रखरपणे जाणवते आणि ती म्हणजे प्रेषितांनी त्यांच्या कोणत्याही शत्रुशी वैयत्तिक बदला घेतला नाही, कोणत्याही प्रकारे सूड उगविला नाही. मुहम्मद (स.) यांना प्रेषितत्व मिळाले आणि त्यांच्यावर विरोधकाकडून अन्याय, अत्याचार आणि निष्ठूरतेचे पर्वत कोसळले. इतिहासात कधीही न दिसणारा अन्याय व अत्याचार मुहम्मद (स.) आणि त्यांच्या अनुयायांवर व जवळच्या नातलगांवर करण्यात आला. त्यांना घर, परिवार आणि मायभूमी त्यागण्यासाठी विवश केले, त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, आपली प्रिय मायभूमी अर्थात मक्का शहर त्यागून मदीनेस प्रस्थान करण्यास भाग पाडले. मदीना शहरी जाण्यापूर्वी प्रेषितांचा जीव काबागृहात अडकलेला होता. जाताना दर्शन घेण्याची त्यांची तीप इच्छा होती. मात्र विरोधकांकडून अन्याय व अत्याचारांमुळे काबागृहाचे दार त्यांच्यासाठी बंद करण्यात आले. काबागृहाच्या विश्वस्ताने काबागृहाच्या दर्शनासाठी दरवाजाच्या चाव्या देण्यास नकार दिला. मात्र इतिहास साक्षी आहे की ज्यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांना काबागृहाच्या अंतिम दर्शनासाठी चावी देण्यास नकार दिला होता, मक्केवर जबरदस्त विजय मिळविल्यावर प्रेषितांनी त्यांच्यावर सूड न उगविता त्यांच्याच हाती चावी दिली. एवढेच नव्हे तर दयाळू व कृपाळू मुहम्मद (स.) यांनी त्यांना आशीर्वाद दिला की ही चावी त्यांच्याच वंशात असेल. हे इतिहासातील अप्रतिम औदार्य आहे.
मक्का शहरात प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांच्या अनुयायांचा छळ सुरूच होता. मात्र प्रेषितत्व कार्याचे वारे मदीना शहरात वाहत होते आणि तेथे इस्लामचा प्रचार होत होता. विरोधकांना मात्र हे सहन होणे शक्य नव्हते. त्यांनी प्रेषितांचा प्रति प्रेमळ व दयापूर्ण व्यवहाराच्या नसून अगदी शत्रुबरोबरसुद्धा त्यांनी न्यायपूर्ण आणि सदाचारी व्यवहाराच्या शिकवणी दिल्या आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) यांचा खरा परिचय करून देताना कुरआनाने म्हटले आहे,प्रति प्रेमळ व दयापूर्ण व्यवहाराच्या नसून अगदी शत्रुबरोबरसुद्धा त्यांनी न्यायपूर्ण आणि सदाचारी व्यवहाराच्या शिकवणी दिल्या आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) यांचा खरा परिचय करून देताना कुरआनाने म्हटले आहे,
‘‘हे प्रेषित (स.) भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसरन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की ज्याच्याशी तुमचे शत्रुत्व होते, तो जीवलग मित्र बनला आहे.”(कुरआन – ४१:३४)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विश्वाच्या आणि जग अस्तित्वात असेपर्यंतच्या समस्त मानवांना कोणताही भेदभाव न पाळता समान रूपाने सत्यधर्माचा परिचय करून देण्याचे महान कर्तव्य पार पाडले. यात त्यांनी आपला-परका, मित्र-शत्रु असा मुळीच भेदभाव केला नाही. याशिवाय प्रेषितांनी असेही सुचित केले की नेकी, चांगुलपणा आणि भलाई व सदाचाराच्या कार्यात सर्वांचीच मदत करावी. त्याचप्रमाणे अन्याय व अत्याचाराच्या आणि दुष्कर्माच्या कार्यात कोणाची आणि कितीही जवळच्या माणसाचीही मुळीच गय न करता कोणत्याही प्रकारे मदत करू नये. कुरआनात ही बाब अशा शब्दांत सादर करण्यात आली आहे,
‘‘जे कार्य पुण्याईचे व ईशपरायणतेचे आहे, त्यामध्ये सर्वांशी सहकार्य करा आणि जी पाप व अत्याचारांची कामे आहेत, त्यात कोणाशीही सहकार्य करू नका.”(कुरआन – ५:२)
एके प्रसंगी आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे,
‘‘ईश्वराने मला केवळ एवढ्यासाठीच पाठविले आहे की मी नैतिक गुणांना त्यांच्या परमोच्च स्थानावर पोचवावे आणि या कार्यात मी कोणतीही कसर बाकी ठेवू नये.”(हदीस ग्रंथ)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी रंजल्या-गांजल्यांना उराशी कवठाळले, बुडत्याला सहारा दिला, ठेचाळणार्यास हात दिला, अन्याय व अत्याचारपीडिताच्या हाकेवर धावून गेले, शोषित, पीडितांना प्रत्यक्ष न्याय मिळवून दिल्यावरच श्वास घेतला, काटाच काढण्याचे ठरविले. पूर्ण विचार-विमर्श केल्यानंतर त्यांनी असे ठरविले की प्रत्येक कबिल्यातून एका तरुणाची निवड करायची आणि मग त्या सगळ्यांकडून प्रेषितांची हत्या करायची. यामुळे या हत्येत सर्वच कबिले सामील असल्यासारखे होईल आणि या सर्वच कबिल्यांचा सामना करण्याचे धैर्य प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कबिल्यास होणार नाही. ठरल्याप्रमाणे सर्वच कबिल्यातील योद्धे गोळा झाले आणि प्रेषितांच्या घराला घेराव घातला. प्रेषित सकाळी घराबाहेर पडताच सर्वांनी मिळून त्यांच्यावर हल्ला करायचे ठरले.
आणखीन एक लक्षणीय गोष्ट अशी की प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सत्यधर्मविरोधी शत्रुंनादेखील त्यांच्या ईमानदारी आणि प्रामाणिकतेवर जबरदस्त विश्वास होता. याच विश्वासामुळे बर्याच लोकांच्या आणि शत्रुंच्यासुद्धा ठेवी त्यांच्याकडे ठेवण्यात आलेल्या होत्या. एखाद्यास आपली एखादी वस्तु, जिन्नस, द्रव्य, संपत्ती सुरक्षित ठेवावी वाटत असल्यास तो बिनधास्तपणे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे ठेवून निश्चिंत होत असे. अशा प्रकारे प्रेषितांकडे शत्रुंच्या बर्याच ठेवीदेखील सुरक्षिततेस्तव ठेवण्यात आलेल्या होत्या. प्रेषित मुहम्मद (स.) यांना शत्रुंच्या कटकारस्थानाची माहिती मिळाली होती. त्यांनी माननीय अली (रजी.) यांना बोलावले आणि सांगितले की मला मक्का शहर सोडून मदीना शहरी प्रस्थान करण्याचा ईश्वरी आदेश झाला आहे. मी आज मदीना शहरी प्रस्थान करणार आहे. तुम्ही माझ्या पलंगावर माझी चादर पांघरून झोपावे. सकाळ होताच लोकांच्या ठेवी त्यांना सोपवाव्यात.
विचार करण्याची गोष्ट आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांना ठार मारण्याकरिता येणार्या शत्रुंच्या ठेवी परत करण्यात येताहेत. ज्या रात्री प्रेषितांना ठार करण्याचा बेत आखण्यात आला, त्या रात्री प्रेषितांनी त्यांच्या ठेवी परत करण्याची पूर्ण व्यवस्था केली. हा प्रेषितांचा त्यांच्या जीवावर बेतलेल्या शत्रुंशी व्यवहार होता. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दया आणि कृपेचा जो व्यवहार केला आणि ज्या धर्मपरायण आचरणाचे प्रदर्शन केले, त्याचे उदाहरण इतरच कोठेही सापडणे शक्य नाही.
विरोधकांच्या अमानुष छळाला कंटाळून केलेल्या मदीना प्रस्थानाच्या दहा वर्षांनंतर प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मक्का शहरावर विजय मिळविला. ज्या विरोधकांनी प्रेषित आणि त्यांच्या अनुयायांचा अमानुषपणे छळ केला होता, त्यांचे जगणे कठीण केले होते, तीन वर्षांपर्यंतच्या सामाजिक व आर्थिक बहिष्कारांतर्गत अबू तालिब नावाच्या घाटीमध्ये ठेवून अन्न-पाण्यावाचून तडफडण्यासाठी सोडले होते, आज ते समस्त शत्रु पराजित होऊन थरथर कापत विजेता प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमोर उभे होते. मात्र फक्त मित्रांसाठीच नव्हे तर शत्रुंच्याप्रतिसुद्धा दया आणि कृपा असलेल्या प्रेषितांनी कोणत्याही प्रकारे रक्तपात केला नाही. किंचितही त्रास दिला नाही. सर्वांना माफ केले. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याविरुद्ध लढणार्या आणि क्रूर व अमानुष पाषाणहृदयी शत्रुच्या लष्कराचे नेतृत्व करणार्या अबू सुफियान (रजी.) यांना अभय दिले, मान दिला.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचा दयाळू व कृपाळू व्यवहार आणि महान चारित्र्याची या घटनेवरून कल्पना येते की पराजित झालेला शत्रुपक्ष त्यांच्या ताब्यात होता, भयाने थरथर कापत होता, त्यांच्याकडून कशारितीने बदला घेतला जाईल, हे सांगता येत नव्हते. मात्र प्रेषितांनी सर्वांना क्षमा केली, स्वतंत्र केले.
वहशी नावाची एक व्यक्ती मक्का शहरात होता. यानेच प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या प्रिय काका हमजा (रजी.) यांचा वध केला होता. मक्का शहरावर प्रेषितांनी विजय मिळविल्यावर तो तेथून पळून गेला होता. त्यास वाटले होते की, प्रेषित त्यास क्षमा करणार नाहीत. मात्र जेव्हा त्यास प्रेषितांच्या शत्रुंच्या प्रति दया आणि कृपापूर्ण व्यवहाराची सूचना मिळाली, तेव्हा तो परत आला आणि प्रेषितदरबारी हजर झाला. प्रेषितांनी त्याला अभयदान दिले.
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याशी जीवनभर लढणार्या शत्रुंच्या लष्कराचा आणि मक्का शहराचा सरदार अबू सुफियान याची ‘हिंदा‘नावाची पत्नी होती. ती प्रेषितांविषयी अतिशय वैरभाव बाळगत होती. याच वैरभावापोटी तिने प्रेषितांचे प्रिय काका हमजा (रजी.) यांच्या हत्येची वहशीला सुपारी दिली होती. हमजा (रजी.) यांचा वध झाल्यावर त्यांची छाती फाडून काळीज बाहेर काढून दातांनी चावले, त्यांच्या नाक-कानांचा हार गळ्यात घालण्याचे क्रौर्य दाखविले होते. मक्केवर प्रेषितांनी विजय प्राप्त केल्यावर तिने चेहर्यावर पडदा टाकला, जेणेकरून त्यांनी तिला ओळखू नये आणि सार्वजनिक क्षमादानात सामील होऊन जीव वाचवावा. मात्र प्रेषित मुहम्मद (स.) यांनी तिला ओळखले. प्रिय काका हमजा (रजी.) यांच्या हत्येसंदर्भात मुळीच उल्लेख न करता तिलाही माफ करून दया आणि कृपेचे दर्शन घडविले. प्रेषितांच्या या व्यवहारामुळे तिला भयंकर आश्चर्य वाटले. ती खूप प्रभावित झाली आणि इस्लामचा स्वीकार केला.
सफवान-बिन-उमैया ही कुरैशजनांतील प्रमुख व्यक्ती होती. इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कट्टर शत्रुंमध्ये त्याची गणना होत होती. यानेच उमैर-बिन-वहब यास मुहम्मद (स.) यांचा वध करण्यासाठी नियुक्त केले होते आणि बक्षीससुद्धा घोषित केले होते. मात्र प्रेषितांच्या मक्का विजयाची सूचना मिळताच त्याने पळ काढला आणि जद्दाला रवाना झाला. तेथून समुद्रमार्गाने तो येमेनला जाण्याचा विचार करू लागला. उमै-बिन-वहब याने प्रेषितांना सांगितले की सफवान-बिन-उमैया कबिल्याचा प्रमुख असून तो आपल्या भीतीने मक्का शहर सोडून पळून गेला आहे. यावर प्रेषितांनी त्यास अभयदान दिले. उमैर सरळ सफवान बिन उमैयास जाऊन भेटला आणि प्रेषितांच्या अभयदानाची खबर दिली. मात्र सफवानने सांगितले की ‘‘मला भीती वाटते. मी मुहम्मद (स.) यांना खूप छळल्याचे तुम्हाला माहीतच आहे. ते कसे काय मला क्षमा करतील?”
‘‘अद्याप तुम्ही मुहम्मद (स.) यांना ओळखलेच नाही! तुम्ही त्यांची सहनशीलता आणि औदार्य अजून पाहिलेच नाही.” उमैयाने सगळा प्रकार समजावून सांगितला. सफवान उमैर (रजी.) बरोबर प्रेषितांच्या सेवेत हजर झाले, म्हणाले, ‘‘आपण माझा गुन्हा माफ केला, मला अभयदान दिले, असे उमैरने सांगितले ते खरे आहे काय?”
‘‘होय! खरे आहे!” प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले ‘‘मला दोन महिन्यांची मुदत द्यावी,” सफवानने विनंती केली.
‘‘मी तुम्हाला चार महिन्यांची मुदत देतो,” प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले. यानंतर सफवान (रजी.) यांनी सहर्ष इस्लामचा स्वीकार केला.
याप्रमाणेच इस्लामचा कट्टर शत्रु असलेल्या अबू जहलचे पुत्र इक्रमा हे मक्केवर प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या विजयानंतर येमेनदेशी पळून गेले होते. त्यांच्या पत्नीने अगोदरच इस्लामचा स्वीकार केला होता. ती स्वतः येमेनला जाऊन नवर्याला भेटली आणि प्रेषितांकडून क्षमादानाचे आश्वासन दिले. यानंतर दोघे नवरा-बायको प्रेषितदरबारी हजर झाले आणि इक्रमा (रजी.) यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांचा दयाळूपणा अनुभवला. प्रेषितांनी आपल्या कट्टर विरोधक आणि शत्रुच्या या पुत्रास उराशी कवटाळले आणि इक्रमा (रजी.) यांनी इस्लामचा स्वीकार केला.
अरब कबिल्यांपैकी बनी हनीफा हा कबिला इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विरोधक होता. सुमामा बिन अस्साल या कबिल्याचे प्रमुख होत. त्यांना मुस्लिमांनी अटक केली होती. प्रेषितांच्या आदेशाने त्यांना मस्जिदच्या खांबाला बांधून ठेवण्यात आले होते. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यास विचारले,
‘‘कसे आहात ‘सुमामा?”
‘‘हे मुहम्मद (स.)! मी ठीक आहे. तुम्ही जर माझी हत्या केली तर समजा एका कबिल्याच्या सरदाराची हत्या होईल आणि जर जीवदान द्याल तर एका कृतज्ञ व्यक्तीवर उपकार होईल आणि धन पाहिजे असल्यास तेही मिळेल!”
सुमामांचे उत्तर ऐकून प्रेषित मुहम्मद (स.) तसेच निघून गेले. दुसर्या दिवशी...
‘‘कसे आहात सुमामा?” प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विचारले.
‘‘मी तसाच आहे, जसा काल होतो! जर जीवदान द्याल तर एका कृतज्ञ व्यक्तीवर उपकार होईल आणि धनसुद्धा मिळेल!!”
प्रेषित मुहम्मद (स.) परत निघून गेले. यानंतर तिसर्यांदा प्रेषित त्यांच्याकडे आले आणि विचारपूस केली, त्यांनी परत तेच उत्तर दिले. यावेळी मात्र प्रेषितांनी त्यांना सोडून देण्याचे आदेश दिले. सुमामांना प्रेषितांकडून याच दयापूर्ण व्यवहाराची आशा होती. सुटका होताच त्यांनी जवळच्या एका बागेत जाऊन स्नान केले आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमोर इस्लामचा सहर्ष स्वीकार केला आणि आपल्या भावना अशा शब्दांत व्यक्त केल्या.
‘‘हे मुहम्मद (स.)! या अवघ्या धरतीवर तुमच्यापेक्षा जास्त अप्रिय व्यक्ती माझ्या दृष्टीत कोणीही नव्हती. मात्र आज तुम्हीच या समस्त जगामध्ये मला सर्वाधिक प्रिय आहात. ईश्वराची शपथ! पूर्वी तुमच्या धर्मापेक्षा वाईट धर्म माझ्या दृष्टीत कोणताही धर्म नव्हता, मात्र आज सर्वांत जास्त माझा आवडता धर्म ‘इस्लाम’ हाच आहे. ईश्वराची शपथ! समस्त जगात आज मला तुमचीच वसती प्रिय आहे!” पहिल्या दिवशी तर सुमामांना वाटले की त्यांची हत्या करण्यात येईल. मात्र त्यांनी जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रत्यक्ष पाहिले तेव्हा त्यांची निराशा संपली आणि त्यांना मनापासून वाटले की प्रेषितांचा स्वभाव अत्यंत दयाळू आहे. म्हणूनच त्यांनी प्रेषितांशी बोलताना शालीन आणि सभ्य शब्दांचा वापर केला. जणू प्रेषितांचा हा चमत्कारच होता की त्यांच्या मृदू स्वभावामुळे त्यांचा विरोधक आणि वैरीसुद्धा त्यांचा मित्रच होत होता.
हुदैबियाच्या शस्त्रसंधीप्रसंगी माननीय अस्मा (रजी.) (प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या भार्या) यांची आई अद्याप मूर्तीपूजक होती. ती आपल्या मुलीकडे अर्थात अस्माकडे आली आणि आर्थिक मदत मागितली. माननीय अस्मा (रजी.) यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘माझी आई अद्याप मुस्लिम झालेली नाही आणि तिला माझ्याकडून आर्थिक मदतीची गरज आहे, मी तिला मदत करणे योग्य ठरेल काय?” यावर दयाळू आणि कृपाळू प्रेषितांनी सांगितले, ‘‘तिच्याशी दयापूर्ण व्यवहार करावा आणि शक्य होईल तेवढी मदत करावी!”
माननीय अबू हुरैरह (रजी.) हे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कट्टर अनुयायी आणि हदीस संग्रहक होते. मात्र त्यांची आई प्रेषितांना रोज शिव्या-शापांची लाखोली वाहायची. माननीय अबू हरैरह (रजी.) यांना याचे खूप दुःख वाटायचे. त्यांनी प्रेषितांसमोर हा सगळा प्रकार ठेवला, प्रेषितांनी तिच्यावर राग न धरता तिच्यासाठी ईश्वरदरबारी प्रार्थना केली आणि त्यांची ही प्रार्थना स्वीकार झाली. तिने इस्लामचा स्वीकार केला.
सातव्या हिजरी सनात ‘फिदक‘वर विजय प्राप्त झाला. माननीय बिलाल (रजी.) हे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विशिष्ट निकटस्थ व्यक्ती आणि परिवाराचे प्रबंधक होते. पैसे नसल्यावेळी बाजारातून उसणे-पासणे सामान घेऊन येत आणि पैसे आल्यावर उधारी देऊन टाकीत असे. एकदा एक बिगरमुस्लिम व्यक्तीने त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला कर्ज हवे असल्यास माझ्याकडून घेत जा.”
माननीय बिलाल यांनी त्याच्याकडून कर्ज घेतले. एके दिवशी तो बिलाल (रजी.) यांच्याकडे आला आणि तावातावाने म्हणाला,
‘‘ए काळ्या-कुट्ट माणसा! कर्ज परतफेडीच्या मुदतीसाठी फक्त चारच दिवस बाकी आहेत. तू परतफेड नाही केलीस तर तुला माझ्या शेळ्या चारवाव्या लागतील.” या प्रकाराने दुःखी होऊन बिलाल (रजी.) थेट प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमोर हजर झाले. सगळा प्रकार त्यांच्या समोर ठेवला. मात्र प्रेषितांनी त्या सावकाराच्या या दुष्टतापूर्ण व्यवहाराकडे दुर्लक्ष केले आणि त्याचे कर्ज देऊन टाकले.
नजरान शहरावरून ख्रिस्ती धर्मियांचे एक प्रतिनिधीमंडळ मदीना शहरी प्रेषित मुहम्मद (स.) यांना भेटण्यासाठी आले. प्रेषितांनी त्यांचा सत्कार केला आणि मस्जिदामध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. एवढेच नव्हे तर त्यांना त्यांच्या धार्मिक रिती-रिवाजानुसार उपासनेची पूर्ण परवानगीसुद्धा दिली.
सत्यधर्माचा प्रचार करण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ताईफ येथे दौरा केला. हा दौरा एक ऐतिहासिक घटना आहे. ताईफ येथील दौर्यावर असताना तेथील लोकांनी त्यांच्याबरोबर क्रूर आणि दुष्टतापूर्ण व्यवहार केला आणि त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करून त्यांना रक्तबंबाळ केले, मात्र प्रेषितांनी त्यांना शाप न देता त्यांच्या हितातच ईश्वरदरबारी प्रार्थना केली.
प्रेषित शिरोमणी मुहम्मद (स.) यांचे अवघे व्यक्तीमत्त्व म्हणजे ईश्वरी देणगी असलेले दया आणि कृपेचे एक मूर्त स्वरूपच होते. त्यांच्या अवघ्या जीवनात त्यांच्याकडून कोणासही काय अगदी त्यांच्या प्राणांवर बेतलेल्या शत्रुंनासुद्धा दया आणि कृपा मिळाली. आणि हेच कारण आहे की प्रेषितांच्या याच दयाळू व कृपाळू स्वभावामुळे या जगात इस्लामचा प्रचार व प्रसार झाला.

इस्लामने स्त्रीला अन्याय व अत्याचाराच्या जाळ्यातून बाहेर काढले. तिला न्याय दिला. तिला सर्व मानवीय अधिकार दिले, वागणूक, प्रतिष्ठा व श्रेष्ठत्व प्रदान केले आणि समाजास तिचा सन्मान करण्यास शिकविले. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराच्या व गुलामीच्या विरुध्द इस्लामने आवाज उठविला की ज्यामुळे संपूर्ण जग हादरून गेले. इस्लामच्याच प्रभावामुळे तिच्या पूर्वीच्या दास्यत्वाच्या दशेस योग्य व यथार्थ ठरविण्याचे साहस आज कुणीही करू शकत नाही. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘लोकहो, आपल्या पालनकर्त्याच्या कोपचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी बनविली आणि त्या दोघांच्यापासून पुष्कळ पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहच्या कोपचे भय बाळगा. ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर रहा. खात्री बाळगा की, अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.’’ (४:१)
ही या गोष्टीची घोषणा होती की, एक मानव व दुसऱ्या मानवाच्या दरम्यान जे खोटे भेदभाव जगात निर्माण करण्यात आले आहेत, ते सत्याच्या प्रतिकूल, निराधार व निर्मूळ आहेत. संपूर्ण मानवजात एकाच जीवापासून निर्माण झाली आहे. सर्वांचा उद्गम एकच आहे. जन्मजात न कोणी श्रेष्ठ आहे न हीन, न कोणी उच्च जातीचा आहे आणि न कोणी नीच जातीचा सर्वांना सारखे व समान अधिकार आहेत.
स्त्रीच्या तीन योग्यता (भूमिका)
एका घरात स्त्रीच्या तीन स्पष्ट योग्यता असतात आई, पत्नी व कन्या इस्लामने या तिन्ही भूमिकेंमध्ये तिला अत्युच्च स्थान प्रदान केले आहे.
अ) आईच्या रूपात स्त्रीचा दर्जा :- इस्लाम ईश्वर आणि प्रेषित यांच्यानंतर आईला सर्वोच्च दर्जा देतो. आई व वडील दोघांशी सद्व्यवहार करण्याचा आणि त्यांच्या आज्ञापालनाचा आदेश देतो. कुरानोक्ती आहे,
‘‘आणि ही वस्तुस्थिती आहे की, आम्ही मानवाला आपल्या माता-पित्यांचा हक्क ओळखण्याची स्वतः ताकीद केली आहे. त्याच्या आईने यातनामागून यातना सहन करून त्याला आपल्या उदरात ठेवले आणि दोन वर्षे तिचे दूध सोडण्यास लागले. (म्हणूनच आम्ही त्याला उपदेश दिला की) माझ्या प्रती कृतज्ञा दाखव आणि आपल्या मातापित्यांशी कृतज्ञ रहा.’’ (३१:१४)
अल्लाहचे आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांनी वडिलांशीदेखील सद्व्यवहार करण्याची ताकीद दिली आहे, परंतु आईशी सद्व्यवहार करण्यावर त्यांनी जास्त भर दिला आहे.
प्रेषितांचा आदेश आहे,
‘‘मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सदव्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सदव्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सदव्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या पित्याच्या बाबतीत (सदव्यवहाराची) ताकीद देतो.’’ (हदीस-इब्ने माजा)
हजरत अबू हुरैरा (रजि.) यांचे कथन आहे की, एक मनुष्य प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे आला व म्हणाला,
‘‘हे अल्लाहच्या प्रेषिता ! माझ्या सद्व्यवहारास सर्वाधिक योग्य कोण आहे ?’’
प्रेषित म्हणाले, ‘‘तुझी आई !’’
त्याने विचारले, ‘‘त्यानंतर कोण ?’’
प्रेषित म्हणाले, ‘‘तुझी आई !’’
त्याने पुन्हा विचारले, ‘‘त्यानंतर कोण ?’’
प्रेषितांनी सांगितले, ‘‘तुझी आई !’’
त्याने विचारले, ‘‘त्यानंतर कोण ?’’
मग प्रेषित म्हणाले, ‘‘तुझे वडील !’’ (हदीस :अल-अ-द-बुल मुफद्न)
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
‘‘आईची अवज्ञा करणे आणि मुलींना जिवंत दफन करणे हे अल्लाहने तुमच्यावर निषिध्द ठरविले आहे.’’ (हदीस)
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असेही फर्माविले आहे,
‘‘आईच्या पायाखाली स्वर्ग आहे.’’ (हदीस)
ब) पत्नीच्या रूपात स्त्रीचा दर्जा : इस्लाममध्ये स्त्रीचे स्थायी अस्तित्व मान्य करण्यात आले आहे. विवाहामुळे तिचे व्यक्तिमत्व पतीच्या व्यक्तिमत्वात विलीन होत नाही, अथवा ती आपल्या पतीची सेविका वा दासी बनत नाही.
पत्नीच्या बाबतीत कुरआनने म्हटले आहे,
‘‘अल्लाहच्या संकेतापैकी हे आहे की, त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करुणा उत्पन्न केली निश्चितच यात बरीच संकेताचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे चितन व मनन करतात.’’ (कुरआन ३० :२१)
आणखी एके ठिकाणी अल्लाहची आज्ञा आहे,
‘‘पुरुष स्त्रियांवर विश्वस्त आहेत. या आधारावर की, अल्लाहने त्यांच्यापैकी एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठत्व दिले आहे आणि या आधारावर की, पुरुष आपली संपत्ती खर्च करतात. मग ज्या प्रामाणिक स्त्रिया आहेत, त्या आज्ञाधारक असतात आणि पुरुषांच्या गैरहजेरीत अल्लाहच्या देखरेखीत व संरक्षणात त्यांच्या हक्कांचे रक्षण करतात.’’ (कुरआन - ४:३४)
कधी कधी माणसाला एखादी गोष्ट आवडत नसते, परंतु त्यात सदवर्तनाचे अगणित पैलू असतात. स्त्रियांच्या बाबतीत कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘त्यांच्याशी चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करा. जर त्या तुम्हाला नापसंत असतील तर शक्य आहे की, एखादी गोष्ट तुम्हाला पसंत नसेल परंतु अल्लाहने त्यांच्यातच बरेचसे भले ठेवले असेल.’’ (कुरआन - ४ :१९)
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या एका साथीदांराने त्यांना पत्नीच्या अधिकारांच्या बाबतीत विचारले असता ते म्हणाले,
‘‘जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तिलाही खायला द्या, जेव्हा तुम्ही वस्त्रे घ्याल तेव्हा तिलाही वस्त्रे द्या. (रागाच्या भरात) तिच्या तोंडावर मारू नका आणि तिला बरे-वाईट बोलू नका (तिच्याशी मतभेद विकोपाला गेल्यास) तिला घरातून हाकलून न देता घरातच तिच्याशी अलिप्त राहा.’’ (हदीस :अबू दाऊद)
एका विशिष्ट प्रसंगी अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आज्ञा केली,
‘‘कोणत्याही ईशभक्ताने (मोमिन) कोणत्याही धर्मपरायण (मोमिना) पत्नीचा द्वेष करू नये. जर तिची एखादी सवय वाईट वाटत असेल तर दुसरी चांगली वाटेल.’’
(हदीस :मुस्लिम)
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
‘‘श्रध्दावंतांपैकी परिपूर्ण श्रध्दावंत तीच व्यक्ती आहे जिचा स्वभाव (वर्तणूक) चांगला असेल आणि तुमच्यापैकी उत्तम तोच आहे जो आपल्या पत्नींशी सत्यनिष्ठ आहे आणि चांगली वर्तणूक ठेवून आहे.’’ (हदीस)
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एके ठिकाणी आणखी फर्माविले आहे,
‘‘हे विश्व जीवन व्यतीत करण्याचे साधन आहे आणि त्याचे सर्वांत उत्तम साधन सदाचारी पत्नी आहे.’ (हदीस :मुस्लिम)
क) कन्येच्या रुपात स्त्रीचा दर्जा :- अज्ञानकाळात (अर्थात इस्लामपूर्व काळात) अरबवासी मुलांना गर्वाचे साधन आणि श्रेष्ठ संपत्ती समजत होते, परंतु मुली त्यांच्याकरिता क्लेषदायक होत्या. मुलींना ते लज्जास्पद समजत असत आणि त्यांच्याविषयी बोलतानादेखील त्यांची मान शरमेने खाली जात होती. इतकेच नव्हे तर काही कठोरहृदयी बाप आपल्या हाताने आपल्या निष्पाप (अल्पवयीन) मुलींना जिवंत दफन करीत होते कुरआनने म्हटले आहे,
‘‘अल्लाह, पृथ्वी व आकाशांच्या राज्याचा मालक आहे, जे काही इच्छितो निर्माण करतो, ज्याला इच्छितो त्याला मुली देतो, ज्याला इच्छितो त्याला मुले देतो, ज्याला इच्छितो त्याला मुले व मुली दोन्ही देतो आणि ज्याला इच्छितो त्याला अपत्यहीन बनवितो. तो सर्वकाही जाणतो आणि प्रत्येक गोष्टीवर समर्थ आहे.’’ (४२ :४९ - ५०)
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मुलींच्या पालन-पोषणाची प्रेरणा दिली,
‘‘अल्लाहने एखाद्या व्यक्तीची मुलींद्वारे कोणतीही कसोटी घेतली तरी त्या व्यक्तीने त्यांच्याशी सदव्यवहार करणे क्रमप्राप्त ठरते. या मुली त्या व्यक्तीकरिता नरकापासून वाचण्याचे साधन असतील.’’ (हदीस :बुखारी)
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
‘‘तुमच्यापैकी ज्याला तीन मुली अथवा तीन बहिनी असतील आणि तो त्यांच्याशी सद्व्यवहार करीत असेल तर तो स्वर्गात निश्चितच प्रविष्ट होईल.’’ (हदीस :तिर्मिजी)
एका प्रसंगी अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
‘‘जी व्यक्ती दोन मुलींचे त्यांच्या तारूण्यावस्थेपर्यंत पालनपोषण करील, अंतिम निवाड्याच्या दिवशी ती व्यक्ती आणि मी अशा तऱ्हेने (एकत्र) येऊ’’ असे म्हणून प्रेषितांनी दोन बोटे जुळवून दाखविली. (हदीस)
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) सांगतात,
‘‘ज्याला मुलगी असेल त्याने तिला दफन केले नाही अथवा तिच्याशी उपेक्षेने वागला नाही किवा तिच्याऐवजी आपल्या मुलास प्राधान्य दिले नाही, तर अल्लाह त्यास स्वर्गात स्थान देईल.’’ (हदीस)
एकदा अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
‘‘मुलींशी घृणा करू नका, त्या सहानुभूतीची प्रतिमा व अतिमौल्यवान आहेत.’’ (हदीस - मुसनद अहमद)
हजरत सुराका (रजि.) यांना अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विचारले,
‘‘सर्वात मोठे दान कोणते हे मी तुम्हाला सांगू नये काय ?’’
हजरत सुराका (रजि.) यांनी नम्रपणे सांगितले की, ‘‘हे अल्लाहच्या प्रेषिता ! आपण अवश्य सांगावे.’’
प्रेषित म्हणाले, ‘‘आपल्या त्या मुलीवर उपकार कर जी (वैधव्यामुळे अथवा घटस्फोट दिला गेल्यामुळे) तुझ्याकडे परत पाठविली गेली असेल आणि तुझ्याशिवाय दुसरा कोणीही तिचा पालक नसेल.’’ (हदीस)
अशा प्रकारे इस्लामने स्त्रियांचे संवैधानिक अधिकारदेखील सुरक्षित केले आहेत आणि नैतिक स्वरूपातसुध्दा तिला उच्च सन्मान व प्रतिष्ठेचे स्थान प्रदान केले आहे.
जर इस्लामी शिकवणींचा आढावा घेण्यात आला तर स्पष्टपणे एका स्त्रीचे खालील अधिकार आढळून येतात.
  1. एका महिलेस समाजात सन्मानाने जीवन व्यतीत करण्याचा अधिकार आहे.
    अरबांच्या काही जमातीतील लोक आपल्या मुलींना जिवंत दफन करीत होते. कुरआनने त्या मुलींना जिवंत राहण्याचा अधिकार दिला आणि म्हटले की, जो कोणी त्यांच्या या अधिकाराचे हनन करील त्यास अंतिम निवाड्याच्या दिवशी ईश्वरासमोर जाब द्यावा लागेल. कुरानोक्ती आहे, ‘‘तो क्षण आठवा, जेव्हा जिवंत गाडलेल्या मुलीला विचारले जाईल की ती कोणत्या अपराधापायी ठार केली गेली ?’’ (कुरआन - ८१ :९)
  2. इस्लामनुसार प्रत्येक मुलास त्याच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू उपलब्ध व्हाव्यात आणि आपल्या निष्काळजीपणामुळे त्याच्यावर मृत्यू ओढवला जाऊ नये या नैतिक व वैधानिक अधिकारांसह तो जन्म घेत असतो. पवित्र कुरआनचा असा आदेश आहे, ‘‘ज्या माता-पित्यांची इच्छा असेल की त्यांच्या मुलांनी स्तनपान-काळ पूर्ण होईपर्यंत दूध प्यावे तर मातांनी - आपल्या मुलांना पूर्ण दोन वर्षे स्तनपान करावे. अशा अवस्थेत मुलाच्या पित्याने परिचित पध्दतीनुसार त्यांना जेवण-खाण व कपडे-लत्ते दिले पाहिजेत.’’ (२ :२३३)
  3. इस्लामने शिक्षणाचा अधिकार पुरुष व महिला दोघांना फक्त प्रदानच केला नसून मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले आणि मुलींचे पालन-पोषण, त्यांचे शिक्षण-प्रशिक्षण आणि उत्साहपूर्ण विवाह इत्यादी करणाऱ्यास स्वर्गाची शुभ-सूचना दिली आहे.
  4. इस्लामने विवाहाच्या बाबतीत मुलीच्या पालकास व संरक्षकास निश्चितच महत्व दिले आहे. त्याचबरोबर असेही म्हटले आहे की, विवाह त्या मुलींच्या परवानगीनेच होईल. जर महिला विधवा वा घटस्फोटिता असेल तर स्पष्टपणे आपली मान्यता व्यक्त करील आणि कुमारिका असेल तर तिच्या मौनास मूक संम्मती समजली जाईल. अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे. ‘‘जोपर्यंत विधवा व घटस्फोट मिळालेल्या महिलेचे मत प्राप्त होत नाही तोपर्यंत विवाह तिचा केला जाणार नाही, आणि कुमारिकेची अनुमती घेतल्याशिवाय तिचा विवाह होणार नाही.’’ (हदीस)
  5. इस्लामने ‘महर’ (लग्नामध्ये वराने वधूस द्यावयाची कबूल केलेली रक्कम) ला महिलेचा अधिकार म्हटले आहे आणि पुरुषास असा आदेश दिला आहे की, ज्या महिलेशी त्याचा विवाह होईल, त्याने कोणत्याही परिस्थितीत ‘महर’ची रक्कम तिला देणे अनिवार्य राहील. ‘महर’विना विवाह वैध नसेल. कुरआनने स्पष्ट शब्दात घोषणा केली आहे की, ‘‘स्त्रियांना ‘महर’ (स्त्रीधन) आनंदाने (कर्तव्य समजून) अदा करा.’’ (कुरआन - ४ :४)
    विवाहप्रसंगी पतीकडून पत्नीस धन, दाग-दागिने वा संपत्ती इ. देणे अनिवार्य आहे, ज्यास ‘महर’ म्हटले जाते. ‘महर’ उधारदेखील असू शकतो. परंतु तो निश्चित करणे अनिवार्य असते. ‘महर’ स्त्रीची स्वतःची संपत्ती आहे, तिला त्यावर पूर्ण अधिकार आहे. तिच्या संरक्षकाचा त्यामध्ये कसलाही अधिकार नाही.
  6. इस्लाम स्त्रीचे पालन-पोषण करण्याचा अधिकार मान्य करतो. विवाहापूर्वी मुलींच्या संगोपणाची संपूर्ण जबाबदारी तिच्या पित्यावर असते आणि विवाहानंतर तिच्या उपजीविकेची जबाबदारी तिच्या पतीवर येते. जर महिला श्रीमंत असेल तर तिच्याकरिता पती नोकर सुध्दा ठेवील. जर पत्नी पतीच्या नातेवाईकांबरोबर एकत्र कुटूंबात राहू इच्छित नसेल तर ती वेगळ्या घराची मागणी करू शकते. हा तिचा वैधानिक अधिकार आहे आणि पतीने तो पूर्ण करणे आवश्यक आहे.
  7. इस्लामने स्त्रीला व्यवसाय आणि उद्योग-धंद्याचे स्वातंत्र्य प्रदान केले आहे. तिला व्यापार, कृषी, देवाण-घेवाण, उद्योग व कारागिरी, नोकरी, अध्ययन-अध्यापन, पत्रकारिता व लेखनकार्य-सर्व वैध कार्य करण्याची अनुमती आहे. त्यासाठी ती घराच्या बाहेरदेखील पडू शकते, परंतु कौटुंबिक व्यवस्थेमध्ये कसलाही बिघाड वा बाधा निर्माण होऊ नये आणि तिच्या स्थिरतेत विघ्न निर्माण होऊ नये, याकरिता तो (इस्लाम) तिच्यावर काही बंधने अवश्य लावतो.
  8. इस्लामने धन-संपत्तीत स्त्रीच्या मान्यतेसंबंधीच्या अधिकारास मान्य केले आहे आणि त्यातील कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपास अनुचित व अवैध ठरविले आहे. ज्याप्रमाणे मिळकतीचा हक्क पुरुषाला आहे अगदी तसाच अधिकार स्त्रीलादेखील आहे. कुरआनचा आदेश आहे - ‘‘जे काही पुरुषांनी कमविले आहे त्यानुसार त्यांचा वाटा आहे आणि जे स्त्रियांनी कमविले आहे त्यानुसार त्यांचा वाटा आहे.’’ (कुरआन ४ :३४)
    वारसाहक्काबाबत कुरआन म्हणतो,
    ‘‘पुरुषांसाठी त्या संपत्तीत वाटा आहे जी आई-वडिलांनी आणि जवळच्या नातेवाईकांनी मागे ठेवली असेल आणि स्त्रियांसाठीही त्या संपत्तीत वाटा आहे. एक निश्चित वाटा.’’ (कुरआन - ४ :७)

  9. इज्जत व अब्रू प्रत्येक माणसाची मोठी मौल्यवान संपत्ती आहे. इस्लामने स्त्रीस इज्जत व अब्रूचा हक्क प्रदान केला आहे. एखाद्या स्त्रीच्या सतीत्वावर आक्षेप घेणे आणि तिच्यावर व्यभिचार व चरित्रहीनतेचा आरोप करणे इस्लामच्या दृष्टिकोनातून हे सर्व मोठे अपराध व गंभीर गुन्हे आहेत. अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी माणसाला नष्ट करणाऱ्या सात गुन्हयांपैकी एकाचा उल्लेख असा केला आहे.
    ‘‘उत्तम चारित्र्यवान, श्रध्दावंत, भोळ्या-भाबड्या स्त्रियांवर मिथ्या आरोप करणे.’’ इस्लामने कायद्यानुसार असे कठोर पाऊल उचलले आहे की, जो कोणी एखाद्या निर्दोष स्त्रीवर व्यभिचार व चरित्रहीनतेचा मिथ्या आरोप करील त्याला ऐंशी फटके मारले जावेत आणि कोणत्याही प्रकरणात त्याची साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये.
  10. इस्लाम स्त्रीस समिक्षण व आपले मत व्यक्त करण्याचादेखील अधिकार प्रदान करतो. कुरआनने पुरुष व स्त्री दोघांना चांगुलपणाचा हुकूम देण्यापासून आणि कुकृत्यापासून दूर राहण्याचा आदेश दिला आहे. कुराणोक्ती आहे, ‘‘श्रध्दावंत पुरुष व श्रध्दावंत स्त्रिया हे सर्व एक दुसऱ्याचे मित्र आहेत, भलेपणाचा आदेश देतात व वाईट गोष्टींपासून रोखतात.’’ (कुरआन - ९ :७१)
यामध्ये धर्माचा प्रसार-प्रचाराचे, समाजाच्या विकासाचे कार्य, वैचारिक व प्रशासकीय विद्वान आणि अधिकाऱ्यांचे समिक्षण टीका-टिप्पणी सर्व काही येते. स्त्रीने आपल्या मर्यादेत राहून या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे हे तिचे कर्तव्य आहे.
स्त्रीच्या अधिकारांच्या बाबतीत कुरआन व हदीसच्या आदेशांचे काही संकेत आणि उदाहरणे येथे सादर करण्यात आली आहेत. स्त्रीला इस्लाम व कुरआनने कोणते स्थान दिले आहे याबाबतच्या सखोल माहितीकरिता खालील पुस्तकांचे अध्ययन उपयोगी ठरेल.

१. (स.) याचे पूर्ण रूप म्हणजे ‘सल्लल्लाहु अलैहि व सल्लम’ अर्थात - त्यांच्यावर अल्लाहची दया व कृपा असो. जेव्हा संदेशवाहक, प्रेषित मुहम्मद यांचे नाव घेतले वा लिहिले जाते तेव्हा प्रार्थनेचे हे शब्द (वाढविले) म्हटेल जातात.
२. रजि. म्हणजे - ‘रजियल्लाहु अन्हु’ अर्थात - अल्लाह त्यांच्यावर प्रसन्न होवो. जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कोणा साथीदाराचे नाव घेतले जाते वा लिहिले जाते तेव्हा प्रार्थनेचे हे शब्द म्हटले (वाढविले) जातात.

- सय्यद अबुल आला मौदूदी
   
    उर्दू भाषेतील प्रसिद्ध ग्रंथ `अल जिहाद फिल इस्लाम'चे हे मराठी रूपांतर आहे. सर्व देशबांधवांना जे द्वेषभावनेतून इस्लामबद्दल आंधळे शत्रुत्व ठेवत नाहीत, असे वाचक या ग्रंथातून इस्लामच्या शिकवणीनुसार जिहादचा अभ्यास करतील.
    मानवनिर्मित कायद्यांमुळे आज जगात अनाचार, हिंसाचार व उपद्रव माजला आहे. या वैश्विक विनाशकारी समस्येवर एकमेव उपाय ईशकायदे आहेत, जे मानवतेच्या मुक्तीचा एकमेव स्त्रोत आहे. ह्याच तत्त्वाने इस्लामी जिहादचे ईशनिर्मित विधीनियम उत्तम मानवतावादी व मानवी स्वभावानुकूल आहेत, हे ऐतिहासिक सत्य जगाने अनुभवले आहे.

    आयएमपीटीअ.क्र. 101    -पृष्ठे-144      मूल्य - 50           आवृत्ती - 2 (2013)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/c8u0o8q9ailx8ffllo96eo00vgkfgi9l

मुंबई येथील राफायल सॅम्युअल या २७ वर्षीय तरुणाने गेल्या महिन्यात स्वत:च्या आईवडिलांवर खटला गुदरण्याचा विचार जाहीर केला. खटला कशासाठी? तर या दोघांनी माझ्या  संमतीशिवाय मला जन्म दिला म्हणून! याची काही वृत्तपत्रांनी आणि अनेक वाचकांनी दखल घेतली. हे काही जणांना मजेशीर आणि विनोदी वाटेल. काही जणांना मूर्खपणाचे किंवा  बालिश वाटेल. एक मनोरंजक बातमी एवढेच सॅम्युअलच्या बातमीचे मूल्य वाचकांसाठी राहील. पणयाच बातमीचा जरा गांभीर्याने विचार केल्यास जन्म घेणे आपल्या हाती नसते, मृत्यूही  आपल्या हाती नाही. मग आपण जन्म का घेतो? का जगतो? असे असित्वाविषयक प्रश्न उद्भवतात. आधुनिक शास्त्र याचे उत्तर देऊ शकत नाही. पण अध्यात्माद्वारे याचे उत्तर देता  येते. दिव्य कुरआनने यासंबंधी सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे त्याचाच एक गोशवारा...

‘‘लोकहो! जर तुम्हाला मरणोत्तर जीवनासंबंधी काही शंका असेल तर तुम्हाला माहीत असले पाहिजे की आम्ही (अल्लाह) तुम्हाला मातीपासून निर्मिले आहे. मग वीर्यापासून मग  रक्ताच्या गुठळीपासून, मग माणसांच्या आकारयुक्त व आकारहीन तुकड्यांपासून, जेणेकरून तुमच्यावर सत्य स्पष्ट करावे. आम्ही ज्या (वीर्या)ला इच्छितो एका विशिष्ट कालावधीपर्यंत गर्भाशयात थांबवून ठेवतो. मग तुम्हाला एका अर्भकाच्या रूपात काढून आणतो. (मग तुमचे संगोपन करतो) जेणेकरून तुम्ही आपले तारुण्य गाठावे. आणि तुमच्यापैकी कोणी अगोदरच  परत बोलविला जातो आणि कोणी निकृष्टतम वयाकडे परतविला जातो, जेणेकरून सर्व काही जाणून घेतल्यानंतर मग काहीही न कळण्याची अवस्था प्राप्त होते. आणि तुम्ही पाहता की  जमीन कोरडी पडली आहे. मग ज्या क्षणी आम्ही तिच्यावर पाऊस पाडला तेव्हा ती अकस्मात तरारून गेली. फुलली आणि तिने सर्व प्रकारच्या नयनरम्य वनस्पती उगविण्यास प्रारंभ  केला. हे सर्व काही या कारणामुळे आहे की अल्लाहच सत्य आहे आणि तो मृतांना जीवित करतो व तो सर्व गोष्टींवर प्रभुत्व राखतो. आणि हे सर्व (या गोष्टीचे प्रमाण आहे) की  पुनरुत्थानाची घटका आल्याशिवाय राहाणार नाही. यामध्ये कोणत्याही शंकेला वाव नाही. आणि अल्लाह अवश्य त्या लोकांना उठविल जे कबरीमध्ये पोहोचलेले आहेत.’’ (दिव्य कुरआन,  २२:५-७)
दिव्य कुरआनच्या उपरोक्त आयातींमध्ये अतिशय स्पष्टपणे मानवी जीवनाचा जन्म, मृत्यू, पुनरुत्थानासंबंधी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रत्येक मनुष्य त्या तत्त्वांपासून जन्मतो,  जे सर्वच्या सर्व जमिनीतून प्राप्त होतात आणि या संरचनेचा आरंभ वीर्याने होतो. मानवजातीचा आरंभ ह. आदम (अ.) यांच्यापासून केला गेला, जे प्रत्यक्ष मातीपासून बनविले गेले  होते. नंतर मानवजातीचा वंश वीर्यापासून चालत राहिला. म्हणजे सर्वप्रथम अल्लाहने मनुष्याला (आदम अ.) प्रत्यक्ष निर्मितीकार्याद्वारे निर्माण केले. यानंतर मनुष्यामध्येच खुद्द  (मनुष्याला) निर्माण करण्याचे सामर्थ्य ठेवले जेणेकरून त्याच्या वीर्यापासून त्याच्यासारखीच माणसं निर्माण होत जावीत. धरतीच्या तत्त्वांना एकत्रित  करून सृजनशील एका आदेशाने  अल्लाहने त्यात अशी चेतना, जीवन व बुद्धीमत्ता निर्माण केली ज्यामुळे मनुष्यासारखी एक अद्भूत निर्मिती अस्तित्वात आली. या व्यवस्थेला व कार्यक्षमतेला पाहून बुद्धी चकीत होते.  डार्विनच्या काळापासून वैज्ञानिक याकडे मोठ्या घृणास्पदरित्या अवैज्ञानिक दृष्टिकोन समजून दुर्लक्ष करतात. मनुष्य व सर्व सजीवांच्या निर्मितीपासून जीवनाच्या प्रथम जीवाणूच्या प्रत्यक्ष सृजनापासूनही ही मंडळी नकारात्मक भूमिका घेऊच शकत नाही. या प्रथम सृजनस्थितीला मान्य केले नाही तर मग अत्यंत निरर्थक गोष्टीला मान्य करावे लागेल की जीवनाची  सुरूवातसुद्धा एक आघात आहे. फक्त एक कोशिकाधारी प्राण्यात जीवनाची सर्वांत सोपी स्थितीसुद्धा अत्यंत गुंतागुंतीची आणि नाजूक आहे. याला आघात समजणे तर अत्यंत भयानक  असा अवैज्ञानिक दृष्टिकोन आहे. जर मनुष्याने मान्य केले की जीवनाचा सर्वप्रथम किटाणू प्रत्यक्ष सृजन प्रक्रियेने अस्तित्वात आला आहे, तेव्हा हे मान्य करणे स्वाभाविक ठरते की  प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांचा सर्वप्रथम प्राणी निर्माणकर्त्याच्या (अल्लाहच्या) सृजनकार्यापासूनच निर्माण झालेला आहे. नंतर त्याची वंशवृद्धी वेगवेगळ्या रूपात होऊ लागली. याला मान्य  केल्याने त्या अनेक समस्यांची उकल होते जे डार्विनचे समर्थक करूच शकत नाहीत.
‘तुमच्यापैकी कोणी निकृष्टतम वयाकडे परतविला जातो.’ म्हणजे म्हातारपणातील ती व्यवस्था ज्या वेळी मनुष्याला आपल्या शरीराविषयीची सुध (चेतना) नसते. तोच मनुष्य जो  दुसऱ्यांना बुद्धीचे धडे शिकवत होता, म्हातारा होऊन अशा दशेला पोहचतो की मुलंसुद्धा त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करतात व हसतात.
‘अल्लाह अवश्य त्या लोकांना उठविल जे कबरीमध्ये पोहोचलेले आहेत.’ या आयतीमध्ये मनुष्यजन्माच्या विभिन्न अवस्था- धरतीवर पावसाचा प्रभाव व वनस्पतीच्या उगविण्यास पाच  सत्यांना (तत्त्वांना) प्रमाणित करणारे दाखविले आहेत.
(१) अल्लाह एकमात्र सत्य आहे.
(२) अल्लाह मृतांना जिवंत करतो.
(३) अल्लाह प्रत्येक गोष्टीवर सामर्थ्य राखून आहे.
(४) पुनरुत्थान (कयामत) ची घटका येऊन ठेपणारच आहे आणि
(५) अल्लाह त्या सर्वांना जिवंत करेल जे लोक मृत झाले आहेत.

संपूर्ण सृष्टी व्यवस्थेला सोडून मनुष्याने केवळ आपल्याच जन्माचा विचार केला तर कळून येते की मनुष्याच्या अस्तित्वात अल्लाहच्या अनेक निशाण्या व्यावहार्यता कार्यरत आहेत.  मनुष्य जे जेवतो त्यात कुठेच मानवी बीज नसते. हे भोजन शरीरात जाऊन मांस, हाडं, केस आदि बनविले जाते. एका विशिष्ट स्थानावर जाऊन त्याचे वीर्यात रूपांतर होते, ज्यात मनुष्याला जन्माला घालण्याची क्षमता असलेले बीजांड असतात. या बीजांडाचे वैशिष्ट्य म्हणजे एका वेळी पुरुषापासून जितके वीर्य बाहेर पडते, त्याच्यात अनेक करोड बीजांड स्त्री  अंडाणुशी संयोग होऊन मनुष्य जन्म होण्याची क्षमता ठेवतात. परंतु सृष्टीनिर्माता अल्लाह महान तत्त्वदर्शी शासकाचा हा निर्णय आहे की या अगणित बीजांडातून फक्त एकाच बीडांचाला स्त्री-अंडाणुशी मिलनाची परवानगी देतो आणि गर्भाधारणा होते.
‘‘आणि त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नी बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करुणा उत्पन्न केली. निश्चितच यात  बरीच संकेतचिन्हे आहेत त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात.’’ (दिव्य कुरआन, ३०:२१)
निर्माणकर्त्या अल्लाहच्या तत्त्वर्शितेची क्षमता ही आहे की त्याने मानवाच्या एका जातीचे रूप बनविले नाही तर त्यास दोन लिंगांमध्ये (स्त्री-पुरुष) निर्माण केले, जे मानवतेत समान  आहेत. त्यांच्या निर्मितीचे मूळ एकच आहे, परंतु दोन्ही एकदुसऱ्यांपासून भिन्न शारीरिक बनावट, भिन्न मानसिक व मनोवैज्ञानिक वैशिष्ट्ये तसेच भिन्न भावन व इच्छा देऊन निर्माण  केले आहे. ही सर्व वैशिष्ट्ये आणि इच्छा एकमेकांसाठी पूरक आहेत. ‘‘अल्लाह, पृथ्वी व आकाशांच्या राज्याचा मालक आहे. जे काही इच्छितो निर्माण करतो. ज्याला इच्छितो त्याला  मुली देतो, ज्याला इच्छितो त्याला मुले देतो, ज्याला इच्छितो त्याला मुले व मुली दोन्ही देतो. आणि ज्याला इच्छितो त्याला अपत्यहीन बनवितो. तो सर्व काही जाणतो आणि प्रत्येक  गोष्टीवर समर्थ आहे.’’ (कुरआन, ४२:४९-५०)
हे अल्लाहच्या बादशाहीचे निर्बाध्य होण्याचे स्पष्ट प्रमाण आहे. एखादा मनुष्य मग तो जगातील मोठ्यात मोठा सत्ताधिकारी वा आध्यात्मिक महागुरू असेल, तो दुसऱ्यांना संतती देणे  तर दूरचे स्वत:साठी आपल्या इच्छेनुसार संतान जन्माला घालू शकत नाही. ज्यास अल्लाहने निपुत्रिक बनविले, त्यास एखाद्या औषधामुळे किंवा ताईतगंड्यामुळे संततीवाला बनवू  शकत नाही. याविषयी प्रत्येक जण विवश आहे. हे सर्व पाहूनसुद्धा कोणी ईशत्वात सर्वाधिकार होण्याचा गुमान करीत असेल किंवा दुसऱ्यांना ईशत्वाच्या अधिकारात भागीदार बनवित  असेल तर ती त्याचीच नादानी आहे, याची शिक्षा तो स्वत: भोगेल.

मानवी जन्माचा उद्देश-
‘‘आम्ही मानवाला एका मिश्र वीर्यापासून निर्माण केले, जेणेकरून त्याची परीक्षा घ्यावी आणि यासाठी त्याला ऐकणारा व पाहाणारा बनविला. आम्ही त्याला मार्ग दाखविला, मग त्याने  कृतज्ञ बनावे अथवा द्रोह करणारा.’’ (दिव्य कुरआन, ७६:२-३)
एक मिश्रित वीर्य म्हणजे स्त्री-पुरुष दोघांच्या वीर्याचे मिश्रण होय. माणसाची जगात परीक्षा घेण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली. ती परीक्षा म्हणजे मानव कोणती जीवनपद्धती  स्वीकारतो, निर्माणकर्त्याचे आज्ञापालन व सदाचारी की अवज्ञा व दुराचारी जीवनपद्धत?
‘त्याला ऐकणारा व पाहाणारा बनविले’ म्हणजे विचार करणारा बनविले. ‘मग त्याने कृतज्ञ बनावे अथवा द्रोह करणारा’ म्हणजे त्याने ईशपरायण बनावे अथवा ईश्वराला नाकारणारा  याचा त्याला पूर्ण अधिकार देण्यात आला. त्यासाठी तो स्वत: जबाबदार राहील. ‘आम्ही त्याला मार्ग दाखविला’ म्हणजे मार्गदर्शनाची एकच पद्धत नव्हे, तर अनेक पद्धती आहेत. उदाहरणार्थ- प्रत्येक मानवाला ज्ञान, बुद्धीक्षमता, स्वभाव, नैतिक चेतना, अंतरात्मा या सर्व गोष्टी मानवाला निर्माणकर्त्याने दिलेल्या आहेत. त्याद्वारे तो बरे-वाईट, सत्य-असत्य, योग्य- अयोग्य याबाबत निर्णय स्वत: घेऊ शकतो. जगात अगणित घटना अशा घडतात ज्या सिद्ध करतात की एक सर्वोच्च सत्ता त्याच्यावर व संपूर्ण सृष्टीवर शासन करीत आहे. याचप्रमाणे  मनुष्याच्या स्वभावातदेखील त्या सर्वोच्च शासनाच्या अस्तित्वाची साक्ष देत आहेत. ‘‘त्याने मृत्यू आणि जीवन निर्माण केले, जेणेकरून तुम्हा लोकांना आजमावून पाहावे की कोण अधिक 
चांगले कृत्य करणारा आहे.’’ (कुरआन, ६७:२)
म्हणजे या जगात मनुष्याच्या मरण्याचा व जगण्याचा क्रम अल्लाहने त्याची परीक्षा घेण्यासाठी सुरू ठेवला आहे आणि कोणाचे कार्य उत्तम आहे हे पाहावे. या एका लहानशा वाक्यात  अनेक तत्त्वांकडे इशारा करण्यात आला आहे. मृत्यू व जीवन त्याच्याच (अल्लाहच्या) हातात आहे. दुसरा कोणी जीवन प्रदान करणारा नाही की मृत्यू देणारा नाही. मनुष्यजीवन निरुद्देश  नाही, तसेच मृत्यूही निरुद्देश नाही. जीवन त्याच्यासाठी परीक्षेची संधी आहे, मृत्यू म्हणजे परीक्षेची वेळ संपणे आहे. परीक्षेच्या उद्देशाने अल्लाहने प्रत्येक मनुष्यास कर्म करण्याची सवलत  दिली जेणेकरून मनुष्याने स्वत:चे भले वा वाईट करावे. ज्याचे जसे कर्म असेल त्यानुसार त्याला पारलौकिक जीवनात मोबदला दिला जाईल. मोबदला नसेल तर मूलत: परीक्षा घेण्याला 
काहीच अर्थ उरत नाही.
‘‘मी जिन्न आणि माणसांना याशिवाय कोणत्याही अन्य कामासाठी निर्माण केले नाही त्यांनी माझी भक्ती करावी.’’ (कुरआन, ५१:५६)
वरील विवेचनावरून एक बोध मिळतो की मानवी जीवन आईवडिलांच्या शारीरिक मिलनातून लाभत असले तरी त्याचा खरा निर्माता अल्लाह आहे. आईवडील मानवाच्या निर्मितीचे  साधनमात्र आहेत. अल्लाह आपल्या तत्त्वदर्शितेनुसार सृष्टीच नव्हे तर त्यातील प्रत्येक सजीव व निर्जीवाचा निर्माणकर्ता आहे. एका विशिष्ट उद्देशानेच ही निर्मिती व नाश होत असतो.  यासाठी अल्लाहला कुणाची परवानगी, इच्छा वगैरेंची जरुरी नाही. तो स्वयंभू आहे. केवळ मानवच नव्हे तर सृष्टीतील प्रत्येक गोष्ट त्याच्यासमोर विवश, लाचार आहे. तेव्हा माणसाने  आपल्या जीवनाचा उद्देश समजून त्यानुसार आचरण करावे. प्रत्येकास प्रभू सद्बुद्धी देवो, हीच ईश्वरापाशी प्रार्थना!

- वकार अहमद अलीम

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget