Latest Post

मोठ्या प्रमाणावर शिक्षण प्रसाराचा गाजावाजा करून देखील भ्रूणहत्या, हुंडाबळी, सतीप्रथा, देवदासी प्रथा व इतर विविध रूपांतील स्त्री अत्याचार आजही प्रचलीत आहेत. मध्ययुगीन भ्रूणहत्येच्या पारंपारिक पद्धती ऐवजी अत्याधुनिक चिकित्सापद्धत व वैद्यकीय तंत्रज्ञान या करिता राबविले जात आहे.
स्त्री अत्याचारांपैकी स्त्रीभ्रूण हत्या कमी धोकादायक व भयंकर मुळीच नाही. पूर्वी नवजात व आता जन्म न झालेल्या बालिकांना मृत्यूची वाट दाखविली जात आहे. उघडपणे अल्ट्रा सोनोग्राफी द्वारे गर्भलिग चिकित्सा केली जात असून काही रुपयांच्या मोबदल्यात स्त्री गर्भाला जन्मापुर्वीच संपवले जात आहे. या बाबतची आकडेवारी इतकी भयानक व अंगावर काटा आणणारी आहे की, कुठल्याही संवेदनशील व्यक्तीचे अंतरात्मा व हृदय पिळवटून जाते. याबाबतीत सर्व कायदे व नियम मृगजळ बनून गेले आहेत.
या बाबतच्या एक सर्वेक्षणानुसार भारतामध्ये प्रतिवर्षी लाखापेक्षा जास्त महिला गरोदरपणामधे मृत्युमुखी पडतात. यातील अकरा टक्के महिलाचा मृत्यु गर्भपाताशी संबंधीत आहे. सद्यस्थितीमध्ये स्त्री भ्रूणहत्येने सामाजिक व वैद्यकीय समस्येचे रूप धारण केले आहे. हे स्पष्ट नाही की किती महिलांचे गर्भपात झाले आणि किती महिलांना स्वेच्छेने अथवा एखाद्या पारिवारीक अथवा सामाजिक विवशतेतून गर्भपात करावे लागले.
याची देखील आकडेवारी उपलब्ध नाही की किती महिलांना अशा गर्भपातादरम्यान मृत्युने कवटाळले आहे. आमच्या देशातील विभिन्न प्रादेशिक, क्षेत्रिय, भाषिक व आर्थिक विषमतेमधुन देखील ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, सर्वत्र स्त्री भ्रूणहत्येची कारणे समान आहेत. वंशाला दिवा हवा व निकृष्ठ आर्थिक स्तरामुळे भेडसावणाऱ्या हुंडा व इतर समस्या इ.
या बाबतीत शासन गफलतीमध्ये आहे. गर्भपाताचे प्रमाण वाढो अथवा खाली जावो कुणाला निष्कारण आपली कोप नासवायची आहे? अशा परिस्थितीमध्ये निव्वळ अनुमानच बांधावे लागतात.उपलब्ध आकडेवारीला कुठवर सत्यनिष्ठ व वस्तुस्थितीदर्शक मानावे हा प्रश्नच आहे. एका अंदाजानुसार दरवर्षी आपल्या देशामध्ये ५ लाखापासून २ कोटींपर्यंत गर्भपात केले/करविले जातात. त्याच प्रमाणे गर्भधारणेच्या वयोगटातील दर हजारांमागे २६० ते ४५० महिला विभिन्न कारणासाठी गर्भपात करतात. ‘फॅमिली मेडीसीन इंडिया’ या पत्रिकेने रामी छाबडा व नुना शील द्वारा संचलीत १९९४ मधील एका सर्वेक्षणानुसार इ. सन १९९२ मधे भारतात एकंदर १ कोटी १० लाख गर्भपात केले गेले. यांतही आश्चर्य नाही की देशामध्ये गर्भपाताला वैद्यानिक मान्यता २० वर्षापूर्वीच मिळाली असून देखील यामधील केवळ ६.६%गर्भपातच नोंदणीकृत होते.
एका अहवालानुसार १९९१ पासुन आजपर्यंत नोंदणीकृत गर्भपाताच्या संख्येमध्ये बदल झालेला नाही. १९९१ मध्ये मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रामधुन एकूण ६ लाख ३६ हजार ४५६ गर्भपात झाले, तर १९९८-९९ या कालावधीमध्येही संख्या ६ लाख ६६ हजार ८८२ होती. असा सर्वमान्य समज आहे की, एका कायदेशीर वैद्यकीय गर्भपातामागे कमीत कमी १० ते १२ बेकायदेशीर गर्भपात होतात. जागतिक बँकेच्या १९९६ च्या अहवालानुसार प्रचलित अत्याधुनिक वैद्यकीय सेवेद्वारे दरवर्षी ५० लाख अवैध गर्भपात केले अथवा करविले जातात. आय.सी.एम.आर. या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार इ.स. १९८९ मध्ये देशामध्ये ४० लाख बेकायदेशीर गर्भपात असुरक्षितरत्यिा करण्यात आले.
सुलभ गर्भपाताला दिलेल्या कायदेशीर परवानगी मुळे स्त्रीभ्रूणा करिता जीवन असुरक्षित झाले आहे. कुटूंबामध्ये पुत्रप्राप्तीची प्रेरणा इतकी तीव्र असते की, धर्मभीरु व कायद्याचे पालन करणाऱ्या महिला देखील कायद्याचे उल्लंघन करुन व जीव धोक्यात घालून गर्भपाताकरीता संमती दर्शवितात.
८० च्या दशकाच्या शेवटी देशामध्ये गर्भ लिग निदानाचे आधुनिक तंत्रज्ञान लोकप्रिय होत गेले.
मागील ५ वर्षामध्ये गर्भ लिग निदान व स्त्रीभ्रूण हत्येच्या आकडेवारी मध्ये चितनीय वाढ झाली आहे. पंजाबच्या आरोग्य विभागाच्या मा. संचालकानी मान्य केले आहे की, १९९७ मधे राज्यामध्ये पुरुष व स्त्री प्रमाण प्रती हजारी ७५१ पर्यंत घसरले आहे. आर्थिक दृष्टया संपन्न असलेल्या दिल्ली व हरयाणामधील परिस्थिती जास्त वेगळी नाही. जेथे नेहमीच पुरुषसत्ताक संस्कृती राहिली अशा उत्तर पश्चिम भारतातच नव्हे तर, आश्चर्यकारकरित्या मणीपूर, केरळ व आसाम सारख्या राज्यांमध्ये जेथे इतर राज्यांच्या तुलनेने महिलांमध्ये जास्त जागरुकता व अधिकार आहेत स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण लक्षणीय आहे.
या संबंधी उपलब्ध आकडेवारी नुसार पुत्रप्राप्तीच्या अभिलाषेपोटी दरवर्षी ४० लाख माता अवैध गर्भपाताकरिता आपला जीव धोक्यामध्ये टाकण्यास तयार असतात. इंडियन मेडीकल असोसिएशन नुसार तर ५० लाखांचा टप्पा कधीच पार झाला आहे. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगानुसार गर्भामध्येच मारल्या गेलेल्या बालिकांची संख्या चार ते पाच कोटी आहे, शासकीय तक्त्यांनुसार मात्र देशामध्ये आजपर्यंत निव्वळ १०७ स्त्रीभ्रूण हत्या झाल्या आहेत, हे हास्यास्पद नव्हे काय?
सर्वसामान्यपणे गर्भपाताचा निर्णय स्त्री घेत नाही. विशेषतः हुंड्याची दुष्ट प्रथा, कौटुंबिक व आर्थिक कारणे या अपराधाकरिता प्रेरणा देतात. गंभीर परिस्थिती तेव्हा निर्माण होते जेव्हा आर्थिक कारणामुळे अथवा गरीबीमुळे बोगस डॉक्टरांची मदत घेतली जाते. कधी कधी हे जीवावर बेतते. पावसाळ्यात उगवणाऱ्या कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे ग्रामीण व शहरी भागांमध्ये उगवलेल्या तथाकथित नर्सिंग होम व प्रसुति केंद्रामधुन ह्या अवैध धंद्यामधून मोठी उलाढाल होत आहे.
अशा खालच्या पातळीवरील दुष्कृत्ये निव्वळ कायदे बनवून थांबत नसतात तर सामाजिक जागृती व लोकशिक्षणाची नितांत गरज आहे. या मुद्यावर स्त्री संघटनांनी पुढे आले पाहिजे. याशिवाय शासनाने आपली जबाबदारी ओळखून एम.टी.पी. अॅक्ट या कायद्याला कठोरपणे लागू केले पाहिजे. रुग्णालये व सोनोग्राफी मशिनांची योग्य नोंदणी करवावी. तसेच १९९४ च्या पी.एन.डी.टी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांचा मुलाहिजा न करता कठोर कारवाई करावी व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्ट्रासोनोग्राफी ची केंद्रे व गर्भपात केंद्रावर बारीक नजर ठेवावी लागणार आहे.

प्रेषित (स) यांची गरज
अशा प्रसंगी एक व्यक्ती आपल्या समोर येते आणि म्हणते, जे सत्य तुम्ही जाणून घेऊ इच्छिता, त्याचे ज्ञान मला दिले गेले आहे आणि ते असे आहे,
‘‘या सृष्टीचा एक ईश्वर आहे ज्याने संपूर्ण सृष्टीची रचना केली आहे, आणि आपल्या असामान्य शक्तीद्वारे त्याची व्यवस्था सांभाळली आहे. ज्या वस्तू तुम्हास प्राप्त आहेत, त्या सर्व त्यानेच देऊ केल्या आहेत आणि प्रत्येक बाब त्याच्याच अधीन आहे. हे जे तुम्ही पहात आहा की भौतिक जगात, निसर्गात कोणताही विरोधाभास नाही, ते व्यवस्थितरित्या आपले कार्य करीत आहे, जेव्हा की मानवी जग अपूर्ण असल्याचे दिसते. येथे प्रचंड अराजकता माजली आहे, त्याचे कारण, हे की मानवाला स्वातंत्र्य देऊन त्यास आजमाविले जात आहे. तुमच्या स्वामीची इच्छा आहे की त्याचा कायदा जो भौतिक जगात प्रत्यक्षात लागू होत आहे, तो मानवाने आपल्या जीवनाकरिता स्वतः लागू करावा. तेच अस्तित्व सृष्टीचा निर्माता आहे, तोच त्याची निगा राखणारा आहे. तुमच्या कृतज्ञता व आभार प्रकटनाचा तोच खराखुरा हक्कदार आहे आणि तोच आहे जो तुम्हास आश्रय देऊ शकतो. त्याने तुमच्याकरिता एका अनंत अमर्याद जीवनाची व्यवस्था करून ठेवली आहे, जे मृत्यूपश्चात येणार आहे, जेथे तुमच्या आशा, आकांक्षा, अभिलाषा पूर्ण होऊ शकतील. जेथे सत्य - असत्य विलग केले जाईल आणि सदाचारीना त्यांच्या सदाचाराबद्दल व दुराचारीना त्यांच्या दुराचाराबद्दल फलप्राप्ती होईल. त्याने माझ्या माध्यमाने तुमच्यापाशी आपला ग्रंथ पाठविला आहे, ज्याचे नाव ‘कुरआन’ आहे. जो यास मान्यता देईल तो यशस्वी होईल, जो अमान्य करील, तो अपमानित होईल.’’
हा आवाज प्रेषित मुहम्मद (स.) यांचा आहे, जो दिड हजार वर्षापूर्वी अरबस्तानच्या वाळवंटात बुलंद झाला होता. आणि आज सुद्धा आम्हास साद घालित आहे. सत्य जाणून घ्यावयाची इच्छा असेल तर माझ्या या आवाजाकडे तुमचे कान लावा आणि जे काही मी सांगत आहे, ते लक्षपूर्वक ऐका.
काय हा आवाज खरोखर सत्याचा आवाज आहे? काय आपण यावर श्रद्धा ठेवली पाहिजे, यावर विश्वास ठेवला पाहिजे? ते कोणते परिणाम वा मापदंड आहे, ज्याद्वारे हे चूक व बरोबर असणेचा निर्णय घेता यावा?
काही लोकांचे असे मत आहे की या सत्याचा आम्ही त्यावेळी स्वीकार करू ज्यावेळी प्रत्यक्षात ते आमच्या डोळ्यांना दिसेल. सत्याचे स्वचक्षूंनी ते दर्शन घेऊ इच्छितात परंतु जणू एखाद्याने अंकगणिताच्या माहितीविना खगोलशास्त्राचे अध्ययन करण्याचा प्रयत्न करावा व म्हणावे की तो खगोल शास्त्राच्या केवळ त्याच गोष्टींना मान्य करील ज्या उघड्या डोळ्यानी पाहता येतात, अंकगणिताचा तर्क मी मान्य करणार नाही, अशातलाच हा प्रकार होय. त्याचा हा आग्रह, मानवाला आपल्या स्वतःच्या क्षमता, सामर्थ्याचे वस्तुनिष्ठ ज्ञान नसल्याचे द्योतक आहे.
मानवाची पाहण्याची शक्ती मर्यादित आहे. वास्तवतेला पाहणे त्याच्या आवाक्यापलिकडचे आहे. वास्तवता आपण पाहू शकत नाही. त्याची अनुभूती मात्र आपणास होते. एकवेळ होती जेव्हा मानले जायचे की जगाची निर्मिती चार वस्तूंनी झाली आहे. आग, पाणी, हवा आणि माती. दुसर्या शब्दात पहिल्यांदा मनुष्याचा असा गैरसमज होता की सत्य, वास्तवता एक अशी वस्तू आहे जी पाहता येणे शक्य आहे. परंतु आधुनिक संशोधनाने त्यास चुकीचे सिद्ध केले आहे. आता जगातल्या सर्व वस्तू सूक्ष्म अणू (परमाणू) पासून बनल्या असल्याचे आपण जाणतो. अॅटम - अणू एका सर्वसाधारण सफरचंदाच्या आकारमानापेक्षा तितकाच लहान असतो जितका आपल्या जमिनीपासून सफरचंद असते.
अॅटम, एका अर्थाने सूर्यग्रहमाला (Solar System) आहे ज्याचे एक केंद्र आहे. या केंद्रामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रान असतात आणि त्याच्या चोहोबाजूनी इलेक्ट्रान वेगवेगळ्या कक्षा वर्तुळात अशा प्रकारे गतिमान असतात, जसे सूर्याच्या चोहोबाजूनी त्याच्या ग्रहांचे भ्रमण सुरु असते. आकारमानाने सेंटिमीटरच्या पाच हजार करोड भागापैकी एक भाग म्हणजे इलेक्ट्राॅन होय. आपल्या केंद्राच्या चोहोबाजूनी एका सेकंदात तो करोडो वेळा प्रदक्षिणा घालतो. त्याची नुसती कल्पना करणे देखील कठिण किबहुना अशक्यप्राय आहे. इतकेच नव्हे तर अंतर्विश्वातील ही अंतिम मर्यादा आहे किवा नाही याचीही आपणास कल्पना नाही. या आंतरविश्वामध्ये आणखीन लहान सहान विश्व असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावरून आपली पाहण्याची दृष्टी किती कमकुवत आहे, हे स्पष्ट होते. मग प्रश्न हा उद्भवतो की प्रोटॉन आणि न्यूट्रानचे अत्यंत सूक्ष्म कण एकत्रितरित्या जे केंद्र बनवितात, ते कशा प्रकारे स्थिर आहे. शेवटी त्या केंद्रातून न्यूट्रान व प्रोटॉन बाहेर का पडत नाहीत. ती कोणती वस्तू आहे जी त्याना परस्पर जखडून ठेवून आहे. शास्त्रज्ञांचे असे मत आहे की या भौतिक कणा दरम्यान एक ऊर्जा अस्तित्वात आहे आणि याच ऊर्जेने केंद्रातील न्यूट्रान व प्रोटॉन नामक कणाना परस्परात जखडून ठेवले आहे. त्यास प्रतिबद्ध ऊर्जा (Binding Energy) संबोधिले गेले आहे. अर्थात पदार्थ आपल्या अंतिम अंशरूपात ऊर्जा होय. मी म्हणतो, काय ही ऊर्जा डोळ्यांनी पाहिली जाऊ शकते? कोणत्याही सूक्ष्मदर्शी (माइक्रोस्कोप) द्वारे त्यास पाहिले जाऊ शकते? यावरून सत्य, वास्तव, आपल्या अंतिम रूपात एक दृष्टीस न पडणारी गोष्ट आहे, मानवी चक्षूंनी त्याचे दर्शन घेता येणे शक्य नाही, हे आधुनिक विज्ञानाने स्वतः मान्य केल्याचे सिद्ध होते.
आता जर प्रेषित (स.) यांचे कथन मान्य करण्यास आपण ही अट घातली की ते ज्या सत्याची, वास्तवतेची सूचना देत आहेत, त्या आम्हास पाहता व स्पर्श करता आल्या पाहिजेत, तेव्हाच आम्ही ते मान्य करू, तर ही अत्यंत मूर्खपणाची गोष्ट ठरेल. जसे भारतीय इतिहासाचा एखादा विद्यार्थी ईस्ट इंडिया कंपनी संदर्भात अध्ययन करते वेळी आपल्या अध्यापकांना म्हणावे की कंपनीची सर्व पात्रे माझ्यासमोर आणून उभी करा आणि त्यानी सर्व घडलेल्या घटनांची माझ्या समोर पुनरुक्ती करावी, तेव्हाच मी तुमचा इतिहास खरा मानीन, अशातलाच हा प्रकार आहे.
मग तो कोणता निकष आहे ज्या आधारे आपण, हा संदेश खरा की खोटा, आणि आपण तो स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय घेता येईल? माझ्या मते सदर संदेशाच्या पडताळणीची तीन विशिष्ट अंगे आहेत. पहिले हे की त्याची व्याख्या सत्याशी किती समानता बाळगते. दुसरे हे की जीवनाच्या अंत - परिणामाबाबत त्याने प्रस्तुत केलेला दावा हा निव्वळ दावाच आहे की त्याचा काही पुरावा देखील त्याचेकडे उपलब्ध आहे. तिसरी गोष्ट ही की त्याने प्रस्तुत केलेल्या संदेशामध्ये काय असे एखादे असामान्य वैशिष्टय आढळून येते की त्यास ईश्वरवाणी संबोधिले जाऊ शकेल? या तिन्ही दृष्टिकोनातून जेव्हा आपण प्रेषित (स.) यांच्या कार्याची पडताळणी करतो तेव्हा त्यापैकी प्रत्येक पैलू संदर्भात ते अत्यंत यशस्वीरित्या त्या निकषावर पूर्णतः सत्यावर असल्याचे माहित होते.
  1. प्रेषित (स.) यांनी सृष्टीची जी व्याख्या केली आहे, त्यामध्ये आपल्या सर्व समस्यांचे समाधान आहे. आपल्या आंतरबाह्य जगतात जितके प्रश्न निर्माण होतात, त्या सर्वांचे ते उत्कृष्ट उत्तर आहे.
  2. जीवनाच्या अंतिम परिणामाबाबत प्रेषित (स.) यांचा जो दावा आहे, त्याकरिता तो एक स्पष्ट पुरावाही स्वतःजवळ बाळगतो. तो हा की विद्यमान जीवनात त्या परिणामाचा नमुनाही आपणास दाखवून दिला जो नंतरच्या जीवनात येण्याची तो खबर देत आहे.
  3. तो ज्या वाणीला ईश्वराची वाणी म्हणतो, त्यामध्ये इतके असामान्य वैशिष्टय आढळते की निःसंशय ते एखाद्या महान अलौकिक दिव्य शक्तीची वाणी आहे, एखाद्या मनुष्याची ती वाणी असू शकत नाही, हे मान्य करावे लागते.
चला, आता या तिन्ही बाजूनी प्रेषित (स.) यांच्या संदेशाचे परीक्षण करून पाहू या.
प्रेषित (स.) यांची सत्यता
प्रेषिताच्या संदेशाचे पहिले स्पष्ट वैशिष्टय हे की ते मानवाच्या अंतर्मन-स्वभावाशी एकरूप होते. याचा अर्थ असा की मानवानी उपजत जी प्रकृती आहे, तीच सदर व्याख्येची प्रकृती आहे. सदर व्याख्येचा पाया एकमेव ईश्वराच्या अस्तित्वावर ठेवणेत आला आहे आणि एका ईश्वरा संबंधीचा विवेक मानवाच्या प्रकृतीत समाविष्ट आहे. त्यास दोन भक्कम पायाभूत आधार आहेत. एक हा की मानवी इतिहासाच्या सर्व ज्ञात युगामध्ये मानवाच्या बहुसंख्येने किबहुना जवळपास संपूर्ण जनसंख्येने ईश्वराचे अस्तित्व मान्य केले आहे. मानवाची बहुसंख्या ईश्वरी विवेकापासून रिक्त राहिली असावी असे एखादे युग कधीही मानवावर आलेले नाही. ईश्वराप्रती विवेक, मानवी स्वभावाचा अत्यंत शक्तिशाली विवेक असल्याचीच प्राचीन काळापासून आजतागायत मानवी इतिहासाची सर्वमान्य साक्ष आहे. दुसरा आधार हा की माणूस जेव्हा संकटात सापडतो तेव्हा अनायासे त्याचे अंतर्मन ईश्वराला पुकारु लागते. जेथे एखादे आश्रय दृष्टीस पडत नाही तेव्हा ईश्वराचा आश्रय तो शोधू लागतो. सुशिक्षित असो वा निरक्षर, धार्मिक असो वा नास्तिक, पुरोगामी असो वा संकुचित वृत्तीचा; जेव्हा कधीही त्याच्यावर असा प्रसंग ओढवतो ज्यावेळी त्याचे काहीच चालेनासे होते, त्यावेळी तो एका अशा अस्तित्वाकडे याचना करू लागतो जे सर्वशक्तीमान आहे, आणि जे सर्व शक्तींचा खजिना आहे. आपल्या नाजूक समयी ईश्वराचे स्मरण करण्यास मनुष्य विवश आहे. त्याचे एक बोलके मजेदार उदाहरण आपणास स्टालिनच्या जीवनात आढळून येते.

हा उल्लेख चर्चिलने दुसर्या महायुद्धाशी सबंधित आपल्या पुस्तकात भाग ४ पृष्ठ क्रमांक ४३३ वर केला आहे -
इ. स. १९४२ च्या नाजूक परिस्थितीत हिटलर संपूर्ण युरोपकरिता धोकादायक बनला होता. चर्चिलने मॉस्कोला भेट दिली होती. त्याप्रसंगी चर्चिलने आपल्या संयुक्त लष्करी कारवाई संबंधाची योजना स्टालिनला सांगितली. चर्चिल लिहतात की सदर योजनेवर चर्चा करता करता एक असा मुद्दा उपस्थित झाला ज्यावर चर्चिलचा उत्साह इतका वाढला की न राहवून त्याच्या तोंडून शब्द निघाले , “May God Prosper this undertaking.'' (ईश्वर या मोहिमेत यश देवो)
त्याचबरोबर प्रेषिताच्या आवाहनाचे हे वैशिष्टय आहे की मनुष्याला ज्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, तसेच विश्व व जगाला पाहताना आपल्या मनमस्तिष्कात जे प्रश्न निर्माण होत असतात, त्या सर्व प्रश्नांची ती व्याख्या आहे.
विश्वाच्या अध्ययनाने आपणास या निष्कर्षापर्यंत पोहचविले होते की केवळ योगायोगाने वा अपघाताने या सृष्टीची उत्पत्ती होऊ शकत नाही. त्याचा निर्माणकर्ता अवश्य असला पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर या व्याख्येत आहे. जग केवळ भौतिक मशीन नाही. यामागे एखादे असामान्य मस्तिष्क असले पाहिजे, जे त्यास चालवित असावे असे आपणास वाटत होते. या व्याख्येत त्या प्रश्नाचे उत्तरही समाविष्ट आहे. त्या कृपाळू अस्तित्वाचा आपण शोध घेत होतो आणि आपला आश्रय बनू शकेल, अशा एका अस्तित्वाच्या शोधार्थ आपण होतो. सदर व्याख्येत त्याचे उत्तरही सापडते.
मानवी जीवन इतके अल्पायुषी का ही गोष्ट आपणास मोठी चमत्कारिक वाटत होती. मानवाला आपण अमर पाहू इच्छित होतो. आपण आपल्याकरिता एका विशाल विस्तृत मैदानाच्या शोधात होतो, जेथे आपल्या आशा, अभिलाषा साकार व्हाव्यात. या व्याख्येमध्ये त्याचे उत्तरही आहे. मग खर्याचे खरे व खोट्याचे खोटे उघड व्हावे आणि चांगले व वाईट विभक्त केले जावे, प्रत्येक मानवाला त्याचे योग्य स्थान दिले जावे, ही मानवी परिस्थितीची निकड होती. त्या प्रश्नाचे उत्तर देखील सदर व्याख्येमध्ये आढळते. तात्पर्य जीवना संदर्भातील सर्व प्रश्नांची पूर्णतः उत्तरे त्यामध्ये आहेत आणि ती उत्तरे अशी आहेत की याहून उत्कृष्ट उत्तरांची आपण कल्पना देखील करू शकत नाही. याद्वारे विश्वाच्या अध्ययनाने आपल्या मस्तिष्कात निर्माण झालेल्या त्या सर्व प्रश्नांचे निराकरण होते.
प्रेषितांच्या संदेश - आवाहनाचे दुसरे मोठे वैशिष्टय पाहू. जीवनाच्या परिणामाबाबत जो दृष्टिकोन तो प्रस्तुत करतो, त्याचा एक व्यवहारिक नमुना स्वतः आपल्या जीवनात प्रस्थापित करून आम्हास दाखवतो. तो म्हणतो, जगाचा अशाच तर्हेने जुलमी व अत्याचारपिडीतासह अंत होणार नाही तर त्याच्या अंतानंतर सृष्टीचा स्वामी प्रकट होईल आणि खर्या खोट्या व्यक्तींना एकमेंकापासून विभक्त करील. ती वेळ येण्यामध्ये जो विलंब होतो आहे, तो केवळ वर्तमान परिक्षेच्या कार्यकलापाच्या समाप्ती पुरता आहे, जे तुमच्याकरिता अध्याहृत आहे.
उपरोक्त नुसते कथन करून तो बाजूला हटत नाही तर त्याबरोबर मी जे काही करतो, ते खरे असण्याचा पुरावा, त्या न्यायालयाचा एक नमुना विश्वाचा स्वामी माझ्या माध्यमाने याच जगात तुम्हाला दाखवून देईल, असा तो दावा करतो. माझ्या माध्यमाने सत्याला तो प्रतिष्ठित करील व असत्याला पराजित करील, आपल्या आज्ञाधारकांना प्रतिष्ठा प्रदान करील आणि अवज्ञाकारींना अपमानित करून त्याना प्रकोपात टाकील. ही घटना घडूनच राहील मग जगातील लोकांचा कितीही विरोध का होईना आणि त्याला नष्ट करण्याकरिता त्यानी आपली सर्व शक्ती पणाला का लावेनात, असाही तो दावा करतो.
ज्याप्रमाणे परलोक (आखिरत) घडणे हे निश्चितरित्या ठरले आहे आणि कोणी त्यास प्रतिबंध करू शकत नाही. त्याप्रमाणे माझ्या जीवनात त्याचा नमुना प्रदर्शित होणे अनिवार्य आहे. ही एक निशाणी असेल येणार्या दिवसाची आणि हा पुरावा असेल या गोष्टीचा की सृष्टीची निर्मिती न्याय तत्वावर झाली आहे. तसेच या गोष्टीचा देखील की मी ज्या शक्तीचा प्रतिनिधी आहे, ती एक अशी शक्ती आहे जी सर्व शक्तींपेक्षा श्रेष्ठतर आहे. ही शक्ती एके दिवशी तुम्हाला स्वतःसमोर उभी करून सर्व आधीच्या व नंतरच्या मानवांचा निर्णय करील.
हे आव्हान तो त्या समयी देत आहे जेव्हा की तो एकाकी आहे. संपूर्ण राष्ट्र - लोकसमूह त्याचा शत्रू बनले आहे. त्याची स्वतःची मातृभूमी त्याला थारा द्यावयास तयार नाही. त्याच्या जवळच्या नातलगांनीही त्याची साथ सोडली आहे. त्याचेकडे भौतिक साधन सुविधा नाहीत, आणि तो पूर्ण विश्वासानिशी विजय माझा होईल आणि माझ्या माध्यमाने ईश्वरी न्यायलयाची धरतीवर प्रस्थापना होईल, अशी घोषणा करीत आहे.
ऐकणारे त्याची थट्टा मस्करी करतात,परंतु अत्यंत गंभीरतेने तो आपले कार्य तडीस नेत आहे. देशातील बहुसंख्य लोक त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतात, त्याचे सर्वकाही उध्वस्त करतात, देशत्याग करण्यास त्याला विवश करतात, त्याला संपविण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावतात. परंतु हे सर्वकाही त्याच्यापुढे निष्प्रभ ठरते, फार कमीच लोक त्याला साथ देतात. एकीकडे मूठभर साथीदार तर दुसरीकडे प्रचंड बहुसंख्या असते. एकीकडे साधन सामग्रीची विपुलता तर दुसरीकडे साधन सामग्रीचा तुटवडा. एकीकडे देश बांधवांचे, राष्ट्राचे समर्थन तर दुसरीकडे सगेसोयरे व इतरांचा एकत्रित विरोध. अशा कठिण परिस्थितीत त्याचे साथीदार वरचेवर भयभीत होतात, परंतु प्रत्येक वेळी तो असेच म्हणतो की प्रतीक्षा करा, ईश्वरी निर्णय प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही. कोणतीही शक्ती त्यास रोखू शकत नाही.
चौथे शतकही संपले नव्हते. त्याचे आव्हान पूर्णत्वास पोहचते, आणि इतिहासातील आपल्या पद्धतीची एकमेव अशी वेगळी घटना घडते. ज्या दाव्यानिशी एका व्यक्तीने आपल्या कामास सुरुवात केली होती, अगदी त्याच स्वरुपात त्याचा दावा पूर्णत्वास पोहचला आणि त्याचे विरोधक त्यात काही कमी जास्त करू शकले नाहीत. सत्य व मिथ्या वेगवेगळे झाले. ईश्वराच्या आज्ञाधारकांना प्रतिष्ठा मिळाली आणि अवज्ञाकारींचा प्रभाव संपुष्टात येऊन त्याना शासित बनविले गेले.
अशा प्रकारे या संदेशाने मानवांना ज्या परिणामाची सूचना दिली होती, त्याचा एक नमुना जगात प्रस्थापित केला गेला, जो प्रलया (कयामत) पर्यंत एक धडा व बोध आहे. या नमुन्याची परिपूर्णता परलोक (आखिरत) मध्ये होईल ज्यावेळी अखिल मानवजातीला ईश्वरी न्यायालयात उपस्थित करून त्यांच्याबाबत निर्णय होईल.
त्या मानवाचा दावा सत्य असणेचा तिसरा पुरावा, ती वाणी होय ज्यास तो ईशवाणी (कलामे इलाही) म्हणून प्रस्तुत करतो. सदर ईशवाणी येऊन कित्येक शतके लोटली. परंतु त्याचे महात्म्य, त्याची सत्यता आणि वास्तवते संदर्भात त्या मधील कथनाचा एक शब्द देखील चुकीचा सिद्ध होऊ शकला नाही, जेव्हा की त्रुटी, उणीवारहित कोणतेही असे मानवी पुस्तक आढळत नाही.
दुसर्या शब्दात कुरआन ईश्वरी ग्रंथ असल्याचा स्वतः कुरआनच पुरावा आहे. त्याची विविध अंगे आहेत परंतु या ठिकाणी मी केवळ त्याच्या तीन पैलू - संदर्भात वर्णन करीन. एक त्याची निवेदन शैली, दुसरा, त्याच्या अर्थामध्ये विरोधाभास नसणे, तिसरा त्याचे चिरस्थायित्व - शाश्वतपणा !

मुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ‘ईश्वराची मदत कधी येईल?’ तेव्हा ईश्वराच्या दयासागरात मोठी भरती येते आणि ईश्वरी उत्तर मिळते की,
‘‘बस आता पुरे झाले! ईश्वराची मदत आता खूप जवळ आहे!!!’’
याच नियमानुसार ‘मेराज’च्या डोळे दिपविणार्या उत्सवात ईश्वराकडून आदरणीय प्रेषित मुहम्मद (स) यांना शुभवार्ता आणि मार्गदर्शक बाबी सुचविण्यात आल्या.
‘मेराज’चे वास्तव असे आहे की, आदरणीय प्रेषितांना ईश्वरी सान्निध्याचे अत्युच्च स्थान प्राप्त झाले. परलोकाची सहल करविण्यात आली. परोक्षाचे दर्शन घडविण्यात आले. विशेष आयती आणि संकेतांचे अवलोकन करविण्यात आले व भविष्यकाळात येणार्या परिस्थितींबाबत ईश्वरी मार्गदर्शन करण्यात आले.
‘मेराज’ची घटना एक ईश्वरी चमत्कार आहे. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना बरेच ईश्वरी चमत्कार देण्यात आले. परंतु विरोधकांकडून अशा ईश्वरी चमत्कारांची वारंवार मागणी होत असूनही या चमत्कारांचे दर्शन घडविण्यात आले नाही. कारण दैवी चमत्कार पाहूनसुद्धा विरोधक प्रेषितांच्या प्रेषितत्वावर श्रद्धा ठेवण्यास तयार नव्हते. दैवी चमत्कारास ते ‘जादू’चे नाव देऊन ईश्वरी प्रकोपाचे हक्कदार ठरत होते. प्रेषित मुहम्मद(स) हे पुराव्यांवरच जास्त जोर देत असत. उत्तम प्रकारच्या मानवी भावनांना साद घालून, ईशद्रोह आणि मूर्तीपूजांनी बरबटलेल्या जीवनाचे अनिष्ट परिणाम समोर ठेवून, एकमेव उपास्य असलेल्या ईश्वरावर धारणा घेऊन असलेल्या उत्तम चारित्र्याचे प्रदर्शन करून आणि अन्याय व अत्याचाराचे उत्तर स्नेह आणि दयाभावाने देऊन या गोष्टीसाठी प्रयत्न करण्यात आले की, लोकांनी सत्याची पारख करून आणि सत्याला विवेकबुद्धीने स्वीकारून, तसेच असत्याला नाकारून जीवनाची योग्य दिशा निवडावी. शिवाय ईश्वरास जेव्हा आणि ज्या ठिकाणी आपला चमत्कार दाखविणे योग्य व उचित वाटले, त्या ठिकाणी व त्या प्रसंगी त्याने आपल्या प्रेषितांच्या माध्यमाने चमत्कार दाखविले. सत्यसमर्थकांनी आणि सत्यविरोधकांनी आपापल्या परीने त्यापासून प्रभाव ग्रहण केले.
‘मेराज’ची घटना २७ ‘रजब’ हिजरी सन पूर्व ३ मध्ये घडली. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे माननीय उम्मे हानी(र) यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत होते. ती सोमवारची रात्र होती. ईश्वराचा फरिश्ता ‘जिब्रील’ आला आणि त्याने प्रेषितांना झोपेतून जागे करून आपल्यासोबत ‘काबागृहात’ नेले. मग त्यांना ‘बुराक’ नावाची स्वारी प्रदान केली. ही स्वारी एवढी तीव्र गतिमान होती की, प्रेषित मुहम्मद(स) या स्वारीवर स्वार होताच ‘बैतुल मक्दस’ला पोहोचले. हे ठिकाण पॅलेस्टाईनमध्ये आहे) अर्थात दैवी प्रवासाची ही पहिली मजल होती. हे ठिकाण दाखविण्याचा ईश्वरी हेतु असा होता की, इस्लामच्या ज्या भलाईच्या राष्ट्रीय आंदोलनास जीवित करण्यासाठी अंतिम प्रेषित उठले होते, त्या आंदोलनाचे मोठे आणि जुने केंद्र त्या अंतिम प्रेषितांना दाखविण्यात यावे आणि सत्यधर्माच्या चळवळीतील मागच्या काळात होऊन गेलेले मार्गदर्शक अर्थात प्रेषितांची भेट करून द्यावी.
‘‘बैतुल मक्दस’ येथील ‘अक्सा’ मस्जिदमध्ये मागे होऊन गेलेल्या सर्व प्रेषितांचा जमाव जमलेला होता. या संमेलनातील सर्व प्रेषितांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे हार्दिक स्वागत केले आणि मग सर्वच प्रेषितांनी त्यांच्या नेतृत्वात दोन रकअत नमाज अदा केली.
नमाज झाल्यावर जिब्रील फरिश्त्याने प्रेषित मुहम्मद(स) यांना ‘बुराक’वर स्वार करून आकाश मंडळावर घेऊन गेला. शेवटपर्यंत विभिन्न आकाश मंडळांचे द्वार उघडत गेले. या प्रवासात प्रेषितांना विभिन्न पापांच्या पापीजणांच्या शिक्षाप्रद घटनांचे दर्शन घडविण्यात आले.
मग जेव्हा विशेष सान्निध्याचे एक विशेष स्थान आले, तेव्हा कुरआनच्या प्रदानित ज्ञानानुसार प्रेषित मुहम्मद(स) यांना विशेष ईश्वरी बोध देण्यात आला. तो दिव्यबोध कुरआनातील ‘सूरह-ए-बकरा’ आणि ‘सूरह-ए-बनी इस्त्राईल’मध्ये स्पष्ट करण्यात आला आहे.
सूरह-ए-बनी इस्त्राईलमध्ये भविष्याची ही खूशखबर आहे की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे इस्लामी आंदोलन यशस्वी होईल. सत्यधर्म अर्थांत इस्लामचा विजय होईल आणि असत्य पराजित होईल. यामध्ये ही बाबसुद्धा स्पष्ट करण्यात आली आहे की, ‘मक्का’वासी प्रेषित मुहम्मद(स) यांना व त्यांच्या अनुयायांना वतन त्यागण्यावर विवश करतील. म्हणूनच ‘हिजरत’ अर्थात वतनत्यागाची म्हणजेच स्थलांतराची शिकवण देण्यात आली. हिजरतनंतर मग ‘जिहाद’ अर्थात सत्यधर्म प्रस्थापित करण्यासाठी वा मानवकल्याणासाठी ईशमार्गात प्रयत्न करण्याचा काळ येईल.
‘यहूदी’ अर्थात ‘ज्यू’ लोकांना स्पष्टपणे बजावण्यात आले की, ‘‘तुमच्या कुकर्मामुळे जगाच्या आणि मानवांच्या नेतृत्वाची धुरा तुमच्याकडून ईश्वराने हिसकावून घेतली आहे. आता तुमच्याकरिता केवळ एकच संधी आहे, अर्थात तुम्ही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या संदेशाचा स्वीकार करावा. म्हणजेच ईश्वरास उपास्य स्वीकार करावे, मुहम्मद (स) यांना ईश्वराचे प्रेषित स्वीकार करावे आणि इस्लामी व्यवस्थेचा अंगीकार करावा. अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील.’’
मक्का शहरातील विरोधकांनाही तंबी करण्यात आली की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्याशी आणि त्यांच्या अनुयायांशी जसे वर्तन तुम्ही कराल, तसेच वर्तन तुमच्याशी करण्यात येईल. इस्लामी आंदोलनात जर तुम्ही बाधा आणली तर मुळीच खपवून घेतले जाणार नाही. आता निर्णयाची वेळ येऊन ठेवली आहे! ’’
या प्रसंगी ईश्वराकडून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना राहणीमान आणि खाणपान व्यवस्थेचे मूळ नियम देण्यात आले. याच नियमांनुसार इस्लामी शासनास कार्य करावे लागेल. हे नियम संक्षिप्तरीत्या मांडण्यात येत आहेत.
  1. केवळ ईश्वरालाच उपास्य जाणून अनेकेश्वरांचा त्याग करा.
  2. मातापित्यांचा सन्मान करा व त्यांची आज्ञा पाळा.
  3. नातलग, गरीब व प्रवाशांचे अधिकार द्या आणि अवैध व अनुचित मार्गांनी पैसा व संपत्ती खर्च करू नका.
  4. हक्कदारांच्या मदतीचे कार्य एखाद्या कारणासाठी करता न आल्यास नम्रपणे नकार द्या.
  5. संपत्ती कमाविण्यासाठी आणि खर्च करण्यासाठी मध्यममार्गाचा अवलंब करा.
  6. निर्धन होण्याच्या भीतीने संततीवध अथवा भ्रूणहत्या करू नका.
  7. व्यभिचार करू नका आणि अश्लीलतेच्या जवळही फटकू नका.
  8. हकनाक कोणाचाही वध करू नका.
  9. वयात न आलेल्या अनाथांचे व त्यांच्या संपत्तीचे रक्षण करा.
  10. आपण केलेल्या करारांची व समझोत्यांची अंमलबजावणी करा.
  11. देवाणघेवाण, व्यवहार, मोजमाप आणि तराजू चांगले ठेवा.
  12. जी गोष्ट तुम्हाला ज्ञात नाही, तिच्या मागे पडू नका, कारण मानवास श्रवण, दर्शन, मन व मस्तिष्काचा हिशोब ईश्वरासमोर द्यावा लागणार आहे.
  13. पृथ्वीवर गर्वाने आणि मटकत चालू नका.
‘मेराज’च्या प्रसंगी देण्यात येणारे हेच ते ईश्वरी नियम होते, ज्यावर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आदर्श इस्लामी राज्याची स्थापना केली. प्रेषित मुहम्मद(स) यांच्या नंतरसुद्धा धार्मिक नेते आणि न्यायप्रिय मुस्लिम शासकांनी हेच आदर्श समोर ठेवून शासन चालविले. शिवाय यापुढेसुद्धा ज्या ठिकाणी इस्लामी व्यवस्था लागू करण्याची योजना असेल, त्या ठिकाणी याच नियमांच्या आधारावर व्यवस्था लागू करण्यात येईल.
आकाश मंडलांमध्ये ईश्वरी कांतीमय वातावरणात ज्या वेळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना या नियमांवर आधारित आदेश प्रदान करण्यात आले असतील तेव्हा त्यांना भविष्याच्या क्षितिजावर ज्योतीपुंज उदयास येत असताना दिसला असेल.
मक्का आणि तायफसारख्या अतिशय प्रतिकुल वातावरणात एखादा भौतिकवादी असता तर कदाचित त्याने कधीचाच निराश होऊन आपल्या आंदोलनकार्यास बंद केले असते. परंतु हा क्रांतिदूत प्रेषित मुहम्मद(स) यांचा प्रेषित्विक विवेक होता, जो ईश्वरी कांती आणि मार्गदर्शक प्रकाशांनी उजळून याची सत्यकल्पना बाळगत होता की, अंधाराचे साम्राज्य संपून आता कांतीमय प्रभात होणार आहे.
ईश्वराकडून प्रेषितांना दुसरा उपहार हा पाच वेळा नमाज अदा करण्याचा मिळाला. याच मंगलप्रसंगी आदरणीय प्रेषितांना ‘तहज्जुद’ (उत्तरार्धिची) नमाज अदा करण्याचा आदेश देण्यात आला आणि शुभ वार्ता कळविण्यात आली की, या ‘नमाज’च्या माध्यमाने प्रेषितांना ‘महमूद’चे स्थान (प्रशंसनीय स्थान) प्रदान करण्यात येणार आहे.
ईश्वरी वाणी आणि कांतीमय तेजांनी संपन्न होऊन प्रेषित मुहम्मद(स) जेव्हा परत आले, तेव्हा प्रथम ते बैतुलमक्दस (येरूशलेम) या ठिकाणी उतरले व नंतर ‘बुराक’वर स्वार होऊन मक्केस परतले. सकाळी सकाळी प्रेषितांनी ‘मेराज’च्या प्रसंगाचा कुरैश कबिल्याच्या लोकांसमोर उल्लेख केला, तेव्हा त्यांनी सुरुवातीस आश्चर्य व्यक्त केले आणि मग या दैवी चमत्काराचा उपहास उडविला. टाळ्या वाजविल्या. खिल्ली उडविली. कुरैश कबिल्याच्या ज्या लोकांनी ‘बैतुलमक्दस’ पाहिले होते, त्यांनी प्रेषितांच्या दाव्याची परीक्षा घेण्यासाठी तेथील ठळक खुणा विचारल्या. प्रेषितांनी बैतुलमक्दिसचे पूर्ण स्वरूप वर्णन केले. शिवाय त्यांनी हेदेखील सांगितले की, रस्त्यामध्ये अमक्या ठिकाणी एका व्यापारी काफिल्याचा उंट हरवला होता. हा काफिला ‘सीरिया’कडून ‘मक्केस’ येत होता. हा उंट शोधल्यावर त्यांना सापडला. या काफिल्याचा लाल रंगाचा उंट सर्वात पुढे होता. जवळपास तीन दिवसांत हा काफिला मक्का शहरात पोहोचेल.’ प्रेषितांनी सांगितल्याप्रमाणेच घटना घडली. तिसर्या दिवशी तो काफिला खरोखरच मक्का शहरी पोहोचला. खरोखरच लाल रंगाचा उंट सर्वात पुढे होता. काफिल्याच्या लोकांना उंट हरविल्याच्या घटनेबाबत विचारले असता त्यांनीही या घटनेची तीच सविस्तर हकिकत सांगितली, जी प्रेषित मुहम्मद(स) यांनी तीन दिवसांपूर्वी सांगितली होती. आता मात्र विरोधकांना प्रेषितांच्या दैवी चमत्कारिक मेराजच्या घटनेचा पूर्ण विश्वास झाला. परंतु माणसामध्ये अहं नावाची एक दुष्ट वृत्ती असते. याच अहंमुळे माणूस सत्याचा इन्कार करतो. विरोधकांचेदेखील असेच झाले. त्यांनी विरोध कायम राखला.
इकडे ही घटना चर्चेत येत असतानाच दुसरीकडे काही विरोधक माननीय अबू बकर(र) यांच्याकडे गेले आणि म्हणाले, ‘‘तुमचे प्रेषित मुहम्मद(स) तर दावा करायला लागलेत की, त्यांनी एकाच रात्रीत ‘बैतुलमक्दस’चा प्रवास करून सकाळ होण्यापूर्वीच परतही आले. तुम्हाला विश्वास वाटतो का?’ यावर माननीय अबू बकर(र) उत्तरले, ‘‘जर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी दावा केला, तर निश्चितच हे खरे आणि सत्य आहे. कारण मीच काय, तुम्हीसुद्धा आणि संपूर्ण मक्कावासीयांनीसुद्धा प्रेषितांना खोटे बोलताना कधीच ऐकलेले नाही.’’
या ठिकाणी एक बाब विसरता येणार नाही ती अशी की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर खोटे बोलण्याचा आरोप लावण्यासाठी विरोधकसुद्धा धजावत नव्हते आणि अनुयायांबरोबरच विरोधकसुद्धा ही बाब निर्विवादपणे स्वीकारत असत की, आजपर्यंत मुहम्मद(स) कधीच खोटे बोलले नाहीत. अनुयायांची तर अशी परिस्थिती होती की, प्रेषितांच्या कोणत्याही गोष्टीवर त्यांच्या मनात साधी शंकादेखील येत नसे. प्रेषितांनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीच्या पुराव्याची त्यांना कधीच गरज भासली नाही.
परोक्षापलीकडील सत्य ज्याने पाहिले आणि संपूर्ण विश्वाचा स्वामी एकमेव ईश्वराच्या विशेष आयती (वाणी) आणि देदीप्यमान मार्गदर्शनाचे ज्याने अवलोकन केले आणि पारलौकिक जगाची एक झलक पाहिली असेल, त्याच्यासाठी या ऐहिक जगातील क्षणिक जीवन आणि क्षणभंगूर असणार्या जीवनातील आरिष्टांचे काय महत्त्व असणार? तसे पाहता आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची ईश्वरावरील धारणा सर्व जगातील लोकांच्या धारणांपेक्षा जास्त प्रबळ होती. शिवाय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या सेवेत ‘फरिश्ते’ हजर होत, दिव्यबोध त्यांना होत. मग एवढे सर्व काही डोळ्यांसमोर असताना विरोधकांचा त्रास आणि शिव्याशापांचे काय मोल असणार? एवढेच नव्हे तर ‘मेराज’च्या दैवी प्रवासाच्या माध्यमाने ईश्वराने त्यांना सर्व प्रकारच्या बाबींचे दर्शन घडविले आणि याच परोक्षाच्या पडद्याआड असलेल्या सत्याचा ते प्रसार व प्रचार मोठ्या जिद्द व चिकाटीने आणि अथक परिश्रम घेऊन करीत होते. म्हणूनच त्यांच्या आंदोलनाच्या मार्गात येणारा प्रचंड पर्वतदेखील त्यांना किरकोळ वाटत असे.
अशा प्रकारे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्यासमोर अतिशय उज्वल स्वरुपातील भविष्य दिवसेंदिवस जवळ येत होते.

अरेबिक भाषेमध्ये ‘इस्लाम’चा शब्दशः अर्थ होतो आज्ञाधारकता. परंतु जेव्हा धार्मिक रूपात या शब्दाचा वापर केला जातो तेव्हा त्याचा अर्थ होतो एकमेव अल्लाहचीच आज्ञाधारकता! अशा प्रकारे ‘मुस्लिम’ तोच जो अल्लाहची आज्ञाधारकता स्वीकारतो आणि त्याची अवज्ञा मुळीच करीत नाही.
इस्लाम धर्माचे आदेश दोन प्रकारचे आहेत. एक अनिवार्य (मौलिक) आदेश आणि दुसरे ऐच्छिक आदेश
अनिवार्य आदेश हे मूळतः नैसर्गिक स्वरुपाचे आणि टाळता न येण्यासारखे आहेत. एखाद्याला ह्या आदेशांचा भंग करता येत नाही, प्रत्येक सजीव अथवा निर्जीव निर्मितीला या आदेशांसमोर आपली मान तुकवावीच लागते. या आदेशांच्या विरोधात जाण्याचा अथवा त्यांना अमान्य करण्याचा हक्क जन्मतःच या निर्मितीकडून हिरावून घेतला जातो. उदाहरणार्थ सूर्याला ठराविक वेळेतच उदयास्त करण्याचा आदेश आहे. त्याला पृथ्वीपासून ठराविक अंतरावर राहूनच प्रकाश आणि उष्णता देण्याचा आदेश आहे. सूर्याला ह्या आदेशांचे तंतोतंत पालन करावेच लागते. सूर्य या आदेशांचे उल्लंघन करण्याचा अधिकार बाळगत नाही. तसेच हवा सजीवांना प्राणवायु पुरविण्याचे काम करीतच असते. याच प्रकारे पाण्याला तहाणलेल्यांची तहाण शमविण्याचा, अग्नीला जाळण्याचा, मनुष्याला त्याच्या जीभेने बोलण्याचा, कानाने ऐकण्याचा आणि नाकाने स्वास घेण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. यांच्यापैकी प्रत्येक ह्या आदेशांचे तंतोतंत पालन करीत आहे. अशा प्रकारचे हे अनिवार्य असे मौलिक आदेश आहेत. सामान्यतः त्यांना नैसर्गिक नियम म्हणून संबोधले जाते.
ऐच्छिक आदेश आदेश असे आहेत, की आपण त्यांचे पालन करण्यास बांधिल नाही. कारण ह्या आदेशात नैसर्गिकतः काही अनिवार्यता अल्लाहने ठेवलेली नाही. त्यामुळे अशा आदेशांना ऐच्छिक स्वरूपाचे आदेश असे म्हटले जाते. आपणास हे आदेश पाळण्याचा अथवा टाळण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य असते. उदाहरणार्थ- मनुष्याने एकच एक ईश्वराची भक्ती, उपासना आणि पूजाअर्चना करावयाची आहे. परंतु तो असे करण्यास अथवा न करण्यास स्वतंत्र आहे. एकेश्वरत्व अथवा अनेकेश्वरत्व या दोघांपैकी कुणाचेही तो पालन करेल. एक ईश्वराऐवजी अनेकानेक अशा हजारो लाखो ईश्वरांची तो उपासना त्या एका समवेत करेल अथवा नास्तिक बनून राहील. कारण या आदेशांमध्ये अनिवार्यता नाही, अशा आदेशांना ‘शरियत’ अशे म्हणून संबोधले जाते.
दोन्ही प्रकारचे आदेश हे समान्यतः पवित्र असे धार्मिक आदेश आहेत. अल्लाहची आज्ञाधारकता म्हणजेच इस्लाम आहे. म्हणून या दोन्ही प्रकारच्या आदेशांचे पालन करणे म्हणजेच इस्लाम आहे हे अगदी स्पष्ट आहे.
या सृष्टीत सजीव आणि निर्जीवांपैकी कोणीही नाही जो आपल्या निर्माणकर्त्याच्या आधीन नाही. सर्व त्याचे आधीन आहेत. मनुष्य त्याच्या आधीन आहे. जिन्न त्याच्या आधीन आहेत. सर्व त्याच्या आदेशाचे पालन करणारे आहेत.
इस्लाम तथा मुस्लिम फक्त माणसासाठीच नाही तर इस्लाम आणि मुस्लिमाने संपूर्ण विश्व व्यापून टाकले आहे. म्हणून इस्लाम एका विशिष्ट प्रकारच्या निर्मितीचाच धर्म नाही तर तो सर्वांचा असा वैश्विक धर्म आहे. म्हणजेच इस्लाम अशा वस्तूंचा (जडवस्तूंचा) सुध्दा धर्म आहे ज्यांना इच्छा, भावना आणि बुध्दीविवेकांपासून दूर ठेवण्यात आले आहे आणि ते फक्त भौतिक नियमांना बांधील आहेत. अशा निर्मिती त्या भौतिक नियमांना तंतोतंत पाळतात म्हणून त्या सर्व खरे मुस्लिम आहेत. सूर्य हा मुस्लिम आहे कारण तो घालून दिलेल्या नियमांचे आणि आदेशांचे तंतोतंत आणि काटेकोरपणे पालन करतो. तो भ्रमण करतो, उष्णता निर्माण करतो, प्रकाश देतो आणि उदयास्त नियमित होतो. चंद्र आणि तारे मुस्लिम आहेत कारण ते त्यांना घालुन दिलेल्या नियमांचे कधीच उल्लंघन करीत नाहीत. हवा मुस्लिम आहे कारण ती वाहते, ढगांना गोळा करते, झाडाझुडपांना वाढवते आणि सजीवांना जीवन देते आपल्याला दिलेल्या आदेशांचे पालन करूनच! पाणी मुस्लिम आहे कारण पाणी जमिनीला सुपीक बनवते, पीक वाढविण्यास मदत करते, तहान शमवते आणि जेव्हा गरम केले जाते तेव्हा बाष्फ बनते कारण हे कर्तव्य घालून दिलेले आहे त्यांच्या निर्माणकर्त्याने त्याच्या आज्ञापालनासाठीच! अशा प्रकारे हे विवादित आहे की अशा वस्तूंचा ज्यांना आशा, आकांक्षा आणि बुध्दीविवेक आणि स्वातंत्र्य बहाल करण्यात आलेले नाही त्या सर्वांचा धर्म इस्लाम आहे आणि ते सर्व मुस्लिम आहेत. हे सत्य फक्त बुध्दीविवेकावर अथवा सिध्दांतावरच आधारित नाही तर ह्याचे मूळ हे कुरआनच्या खालील संकेतवचनात दडून बसलेले आहे.
‘‘वास्तविक पाहता आकाश व पृथ्वीमध्ये जे जे काही आहे ते आपणहून किवा अपरिहार्यपणे अल्लाहला समर्पित झाले आहेत.’’ (कुरआन ३: ८३)
वरील कुरआनोक्तीनुसार हे सिध्द होते, की सर्व गोष्टी ज्या स्वर्गात आणि पृथ्वीवर आहेत त्या सर्व अल्लाहच्या आधीन आहेत आणि त्या सर्वांचा धर्म हा इस्लाम आहे. शिवाय त्या माणसांच्या आणि अदृश्य योनि (जिन्न) च्यापैकी जे या सत्यधर्माचा (इस्लाम) विरोध करतात, ते अल्लाहचे द्रोही आहेत.
खालील कुरआनोक्ती वरील संदर्भाला वेगळ्या शब्दांत वर्णन करीत आहे.
‘‘तुम्ही पहात नाही की जे काही आकाशात आहे आणि जे पृथ्वीवर आहे तसेच सूर्य, चंद्र, तारे, पर्वत आणि वृक्ष व जनावरे आणि बहुतेक लोक देखील अल्लाह समोर नतमस्तक होत आहेत.’’ (कुरआन २२: १८)
वरील संकेत वचनं या गोष्टीला स्पष्ट करीत आहेत की एक दोन प्रकारच्या निर्मितीच फक्त अल्लाहची भक्ती आणि उपासना करीत आहेत असे नाही तर सर्व सृष्टी, आकाश, पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारे, ग्रह, हवा, पाणी, झाडे, झुडपे, पशुपक्षी आणि मानव व जिन्न (योनि) इ. सर्व निर्मिती कणापासून ते सूर्यापर्यंत, लहान मोठी सजीव निर्जीव, विवेकी, अविवेकी असे सर्व अल्लाहचीच भक्ती, उपासना करीत आहेत आणि ते सर्व अल्लाहचेच दास म्हणजे ‘‘मुस्लिम’’ आहेत. ह्या आज्ञाधारकतेचा अगदी योग्य अर्थ हा आहे. ही सकल सृष्टी अल्लाहच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणारी आणि फक्त अल्लाहचीच निष्ठावंत आहे आणि चराचर सृष्टीची ही आज्ञाधारकता अल्लाहच्या आस्तित्वाचे आणि त्याच्या गुणवैशिष्टयांचा सबळ पुरावा आहे.
वरील संकेत वचनांवरून हे सत्य अगदी स्पष्ट होते की सृष्टीतील ह्या चराचर निर्मितींचा ज्यांना इच्छा आकांक्षा आणि अधिकारांपासून वंचित ठेवले आहे, अशा सर्वांचाच धर्म हा इस्लाम आहे. परंतु त्यांना भौतिक अशा आदेशांनी बांधलेले आहे की जे नैसर्गिक आणि जन्मजात आहेत. हे आदेश वैकल्पिक स्वरुपाचे मूळीच नाहीत म्हणून अशा सर्व निर्मितीस जन्मजात मुस्लिम म्हणून संबोधले जाते.
ऐच्छिक तथा पारिभाषिक इस्लाम: आता आपण अशा निर्मितीबद्दल विचार करु या की ज्यांना निर्माणकर्त्याने (अल्लाहने) आवडीचे आणि इच्छा आकांक्षाचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यांची जडणघडण अशा पध्दतीची आहे की काही बाबतीत ते लाचार आहेत जशी वरील प्रकारची निर्मिती लाचार आहे. परंतु काही बाबतीत या प्रकारची निर्मिती लाचार नाही. अशा बाबतीत त्यांना विचार, आचार आणि निवडीचे स्वातंत्र्य आहे, हा त्यांचा जन्मसिध्द हक्कच आहे. उदाहरणार्थ, काही धार्मिक (ईश्वरी) आदेश आहेत ज्यामुळे मनुष्य आपल्या डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो आणि जिव्हेने बोलतो. परंतु दुसरे काही ईशआदेश असे आहेत की ज्यामुळे मनुष्य काही गोष्टींना पाहू, ऐकू आणि बोलू शकतो आणि इतर काही गोष्टींना नाही. पहिल्या आदेशांचे (ईश्वरी) मनुष्याला पालन करावेच लागते, परंतु दुसऱ्या प्रकारच्या ईशआदेशाबद्दल मनुष्यावर सक्ती अथवा बळजबरी नाही. या दुसऱ्या प्रकारच्या आदेशांचे तो पालन करील अथवा करणार नाही हे त्याच्या आवडीनिवडीवर अल्लाहने सोडून दिले आहे. मनुष्य हे आदेश पालन करण्यासाठी अथवा त्याला नकार देण्यासाठी पूर्ण स्वतंत्र आहे. भौतिक नियमानुसार तथा नैसर्गिक नियमाने मनुष्य हा आज्ञाधारक आहे हे त्याच्या जन्मजात (मूळ) इस्लामचे उदाहरण आहे. दुसऱ्या प्रकारात जेथे मनुष्याला आपला अधिकार वापरण्याचे स्वातंत्र्य आहे, ईशआदेशांचे पालन करणे तेथे ऐच्छिक ठरविले आहे. म्हणजेच येथे या प्रकारात, ‘‘ऐच्छिक इस्लाम’’ आहे. परंतु जेथे धर्माचा संबंध आहे, तेथे जन्मजात अथवा ऐच्छिक हा शब्द प्रयोग केला जात नाही. ईशआदेश (दिव्य प्रकटन) तथा इस्लाम हाच शब्दप्रयोग उपयोगात आणला जातो, कारण अगदी स्पष्ट आहे की चराचर सृष्टीसाठी (निर्मिती) या दोन्ही प्रकारचे ईशआदेशांना ते बांधील आहेत. नैसर्गिक तथा भौतिक नियमांना (आदेशांना) आज्ञापालनाबाबत कमी लेखले जाते. ऐच्छिक इस्लाम म्हणजेच ऐच्छिक ईशआदेशांना येथे कार्यान्वित करणे हा खरा प्रश्न आहे. म्हणून आजकाल दोन्ही शब्दावलींचा म्हणजेच ‘जन्मजात इस्लाम’ आणि ‘इस्लाम’ यांना ऐच्छिक ईशआदेशांसाठी सर्रास वापरले जात आहे.
अशा परिस्थितीत ‘मुस्लिम’ हा शब्द त्यांच्यासाठी वापरला जाऊ नये जे ईशआदेशांचे तथा दिव्यप्रकटनांचे पालन करीत नाहीत. म्हणून अशा स्थितीत ते जरी नैसर्गिक तथा भौतिक नियमांचे पालन करतील तर ते जन्मजात मुस्लिम म्हणूनच संबोधले जातील. त्यांच्यामध्ये ऐच्छिक इस्लामसाठी स्थान नसल्या कारणाने मौलिक (मूळ) इस्लाम हा निरर्थक ठरतो. खऱ्या इस्लामला अशा स्थितीमध्ये काहीच स्थान उरत नाही. धार्मिक दृष्टीने त्या मनुष्याला मुस्लिम असे म्हटले जाते जो पुढे जाऊन नैसर्गिक इस्लामला पार करून स्वतःला स्वेच्छेने ऐच्छिक ईशआदेशांच्या (दिव्यप्रकटन) हवाली करतो. खऱ्या इस्लामला आपल्या जीवनात कार्यान्वित करण्याची ही सुरूवात आहे.

- डॉ. एम. ए. श्रीवास्तव
   
    जीवनाच्या सुगम, सार्थक व यशस्वी यात्रेसाठी अल्लाहचे अंतिम पैगंबर (स.) यांच्या शिकवणींना आत्मसात करून जीवन यापन केल्यास परलोकातील जीवनसुद्धा सफल होऊ शकते. आता हे उघड सत्य आहे की भारतीय धर्मग्रंथात ज्या अंतिम प्रेषिताच्या आगमनाची भविष्यवाणी आली आहे ती पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या बाबतीतच आहे.
    याच सत्यतेला जाहीर करण्याचा या पुस्तकाद्वारे प्रयत्न करण्यात आला आहे याचा उद्देश सत्याला समजणे आणि समजाविणे आहे.

    आयएमपीटी अ.क्र. 105      -पृष्ठे - 32    मूल्य - 18                आवृत्ती - 11 (2013)
      डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/mfz0sweoxnsrq8l2xsjio3rp39dvwo46

सामान्यतः दुर्बलांना आपले अधिकार मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. त्या शिवाय त्याला त्याचे नैतिक अधिकार तर मिळत नाहीतच परंतु मान्य सुद्धा केले जात नाहीत. वर्तमान काळात मोठ्या वाद-विवाद व कठोर प्रयत्नांअंती स्त्रिचे काही मूलभूत अधिकार मान्य करण्यात आले आहेत. हे उपकारच मानावे लागेल. खरे तर हे उपकार इस्लाम धर्माचेच आहेत. सर्व प्रथम विश्वामध्ये इस्लामनेच स्त्रिला ते अधिकार प्रदान केलेत ज्या अधिकारांची याचना स्त्रि खूप पूर्वी पासून करीत होती. हे सर्व अधिकार इस्लामने स्त्रिला यामुळे दिले नाहीत की ती अत्याचारित व पीडित होती व सर्व बाजूंनी या बाबतीत निषेध व्यक्त होत होता व तिचा पक्ष घेऊन प्रतिनिधीत्व करण्यात येत होते. तर यासाठी दिलेत की हे अधिकार स्त्रीचे नैसर्गिक व स्वाभाविक अधिकार होते जे तिला मिळायलाच पाहिजे होते. इस्लामने विवश होऊन हे अधिकार दिले नसून स्त्रि अत्याचारित व पिडीत होती आणि अत्याचारितांना न्याय देणे हे इस्लामचे परम-कर्तव्य होते, आहे व असणार.
या ठिकाणी काही अधिकारांचा उल्लेख करण्यात येत आहे जे इस्लामने स्त्रिला प्रदान केले आहेत. इस्लाम या अधिकारांचे वर्णन केवळ कायद्यांच्या भाषेत करून गप्प बसत नसून त्यास प्रोत्साहणाच्या माध्यमाने त्यांना प्रदान करण्याची तीव्र भावना निर्माण करतो.
१) जिवंत राहण्याचा अधिकार
स्त्रिची जी अवस्था संपूर्ण जगात होती तीच अरब देशात होती. अरबचे काही कबीले आपल्या मुलींना जिवंत पुरुन टाकायचे. दिव्य कुरआनच्या आदेशामुळे हा प्रकार थांबविण्यात आला. व तिला जिवंत राहण्याचा अधिकार दिला. आणि सांगितले की जी व्यक्ती तिचा जिवंत राहण्याचा अधिकार हिरावून घेईल. कयामत (महाप्रलय) च्या दिवशी त्यास याचा हिशोब द्यावा लागेल.
‘‘आणि स्मरण करा ती वेळ, जेव्हा जिवंत गाडलेल्या मुलीस विचारले जाईल की, ती कोणत्या अपराधा पायी ठार केली गेली.’’ (सूरह-ए-अलतकवीर ८:९)
एकीकडे निरपराध मुलींवर अत्याचार करण्यास नरकाच्या यातनामय जीवनाचे भय दाखविण्यात आले व दुसरीकडे त्या लोकांना आनंदाची खबर देण्यात आली ज्यांनी निरपराध मुलींवर अत्याचार न करता त्यांच्याशी सद्व्यवहार केला. आणि मुलींबरोबर सुद्धा तोच व्यवहार करतात जो मुलांबरोबर करतात. अर्थात मुलगा आणि मुलगी दोघांबरोबर समान वागणूक व वर्तन करतात. वा दोघांच्या वागणुकीत किचितही फरक करीत नाहीत. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन कथित करतात की प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘ज्या माणसाला मुलगी झाली, त्याने ना तिला जिवंत पुरावे, ना तिला अपमानास्पद वागणुक द्यावी व ना तिच्यावर आपल्या पुत्रास श्रेष्ठत्व द्यावे. तेव्हा ईश्वर त्याला जन्नत (स्वर्ग) मध्ये दाखल करील.’’ (अबुदाऊद, कीताबुल अदब)
या नैतिक शिक्षणाबरोबर इस्लामने पुरुषाप्रमाणे स्त्रिच्या जीवनाच्या सुरक्षेची शिकवण दिली. आणि तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा बदला घेण्याचा तिला अधिकार देण्यात आला. आणि यालाच इस्लामच्या भाषेत ‘कसास’ हा शब्द वापरण्यात आला. एवढेच नव्हे तर कोणी एखाद्याचा खुन केला तर मृताचे वारस खुन्याच्या बदल्यात जीव सुद्धा घेऊ शकतात. आणि हा कायदा स्त्रि व पुरुष दोघांसाठी समान आहे. दिव्य कुरआनात आहे की,
‘‘‘तौरात’ मध्ये मी (स्वयं ईश्वर) यहूदी (ज्यू) वर हा आदेश लिहीला की, प्राणाच्या बदल्यात प्राण, डोळ्याच्या बदल्यात डोळा, नाकाच्या बदल्यात नाक, कानाच्या बदल्यात कान,दाताच्या बदल्यात दात आणि जखमांच्या बदल्यात त्याच्या समान (जखम) मग त्याने कीसास माफ केला असेल तर ते त्याच्या साठी प्रायश्चित्त आहे. आणि जे लोक ईश्वराने अवतरित केलेल्या कायद्याप्रमाणे निर्णय करीत नाहीत तेच अत्याचारी आहेत.’’ (सूरह-ए-बकरा : ४५)
‘तौरात’ च्या या कायद्याचे इस्लामने पुनरुज्जीवन केले व तो इस्लामी शरीयत (विधी) चा एक भाग बनला. या कायद्याने केवळ स्त्रि वरच नव्हे तर प्रत्येक दुर्बलावर होणाऱ्या अत्याचारा वर विळखा कसला व त्यांना न्याय दिला.
२) पालन पोषणाचा अधिकार
इस्लाम शिकवण देतो की प्रत्येक जन्म घेणारे मुल हे नैतिक व कायदेशीर अधिकार घेऊनच जन्मास येते. जेणेकरून त्याच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यात याव्यात व त्यास मृत्यूच्या विळख्यात जाऊ न द्यावे. त्याचे संगोपन व पालन पोषण करावे. व हे कार्य कठीण कार्य आहे. सामान्यतः मुलाचे संगोपन जेवढया काळजीने केले जाते तेवढया काळजीपूर्वकपणे मुलीचे संगोपन होत नाही. इस्लाम धर्माने ही तफावत अजिबात पसंत केली नाही. तसेच मुलीच्या पालन पोषणास विशेष प्रोत्साहन दिले. व याला एक मोठे व परम कर्तव्य घोषित केले. प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले की,
‘‘कन्यादान देऊन जर ईश्वराने एखाद्या माणसाला आजमावले आणि जर त्या माणसाने आपल्या मुलींशी सद्व्यवहार केला. तर त्याचा हा मुलींप्रती सद्व्यवहार नरकाग्नी पासून बचावाचे साधन होईल.’’ (बुखारी व मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स) यांच्या या कथनामध्ये मुलीवर ‘एहसान’ व सद्व्यवहाराचा उल्लेख आहे. ‘एहसान’ म्हणजे पालन-पोषण, शिक्षण व प्रशिक्षण व त्यांच्याशी उत्तम व्यवहार व प्रेमळ वागणूक हे सर्व काही आहे. माननीय अनस (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन कथित केले की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘जो माणुस आपल्या दोन मुलींचे संगोपन त्या तरुण होई पर्यंत करील ‘कयामत’ च्या दिवशी (अंतीम निवाड्याच्या दिवशी) मी आणि तो असे असतील. हे सांगताना प्रेषित (स) यांनी आपली दोन बोटे जोडलीत.’’ (मुस्लिम)
याचे कायदेशीर स्वरूप पाहिल्यास लक्षात येईल की इस्लामी विधीनुसार ‘मुलांचा नान नफका’ अर्थात अन्न पाणी पुरविणे, पासून पोषण करणे या सर्व जबाबदाऱ्या पित्यावर आहेत. मग या मुलांमध्ये मुलगा असो वा मुलगी त्याच्या संगोपानात फरक करता येणार नाही किवा जबाबदारीतून कोणतेही कारण दाखवून परावृत्त होता येणार नाही. ‘रजाअत’ च्या बाबतीत कुरआनात आहे की,
‘‘मूल ज्याचे असेल (अर्थात पिता) त्याच्यावर दूध पाजणाऱ्या स्त्रिचे अन्न व वस्त्र कायद्याप्रमाणे (रीतसर) वाजिब (अनिवार्य) आहे.’’ (सूरह-ए-बकरा : २३३)
या बाबतीत इस्लामी विद्वानांनी भरपूर वर्णनात्मक माहिती उपलब्ध केली आहे. ‘हनफी’ विद्वानांनी लिहिलेत की पुत्रास अन्न पुरवण्याची जबाबदारी त्याच्या तरुणावस्थेत पोहोचण्यापर्यंत आहे. या नंतर पिता या जबाबदारीतून मुक्त होऊ शकतो. परंतु मुलगा अपंग नसावा. परंतु मुलीस अन्न पुरविण्याची जबाबदारी तिच्या तारूण्यानंतर सुद्धा (लग्नापर्यंत) जन्मदात्या पित्यावर आहे. काहींच्या मते हे की तरुणावस्थेत आल्यावर ही जबाबदारी माता व पिता या दोघांत विभागली जाते. या खर्चाच्या एकूण रकमेंपैकी दोन भाग वडीलावर आणि एक भाग आई वर असेल. अशा प्रकारे जी तरुण स्त्रि आहे परंतु तिला अन्न पाणी मिळत नाही, तिची जबाबदारी सुद्धा जवळच्या नाते वाईकावर आहे.
३) शिक्षणाचा अधिकार
मानवाचा विकास ज्ञानाशी जुळलेला आहे. जी व्यक्ती अथवा समूह विद्या व ज्ञानापासून वंचित राहील ते जीवनाच्या प्रवासात इतरांच्या तुलनेत मागे राहतील. अज्ञाना मुळे त्यांची विचारसरणी उंच भरारी घेऊ शकत नाही, तसेच भौतिक प्रगतीत ही त्याची पीछेहाट होत असते. हे सर्व काही असून सुद्धा इतिहासाचा एक मोठा काळ असा होता की स्त्रि करिता ज्ञानार्जनाची महत्वाची जाणीवच झाली नाही. ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रांत केवळ पुरुषांचीच मक्तेदारी समजली गेली. पुरुषांमध्ये सुद्धा काही विशेष वर्गच ज्ञानार्जन करीत असे. स्त्रि ज्ञानार्जनाच्या कल्पने पासून खितपत खूप दूर अज्ञानाच्या गर्ततेत चांचपडत होती.
इस्लाम ने ज्ञानार्जनाचे सर्व मार्ग स्त्रि व पुरुष दोघांकरिता उघडलेत. या मार्गातील प्रत्येक अडसर दूर करून प्रत्येक प्रकारची सवलत व सरळ पद्धती उपलब्ध करून दिली. इस्लामने विशेष करून मुलींच्या शिक्षण व प्रशिक्षणाकडे विशेष लक्ष केंद्रित कले. तिच्या शिक्षण व प्रशिक्षण कार्यास पुण्य कार्य घोषित केले. माननीय अबु सईद खदरी (र) प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन कथित करतात की प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘ज्याने तीन मुलींचे संगोपान केले, त्यांना शिक्षण दिले, त्यांचे विवाह केले, आणि लग्नानंतर सुद्धा सद-व्यवहार केला तर त्याच्यासाठी (निश्चितच) स्वर्ग आहे.’’ (अबुदाऊद)
इस्लाम धर्म स्त्रि व पुरुष दोघांना संबोधित करतो. त्याने प्रत्येक स्त्रि पुरुषास भक्ती, नैतिकता व शरीयतचे नियम यांच्या पालनाचा आदेश दिला. आणि ज्ञाना शिवाय या नियमांचे पालन शक्य नाही. स्त्री करिता पुरुषाशी संबंधाचा प्रश्न एक महत्वाचा प्रश्न आहे. हे संबंध अतिशय नाजुक व कीचकट असतात. यामध्ये स्त्रिचे अधिकार आणि जबाबदाऱ्या व कर्तव्य सुद्धा आले. आपले अधिकार मिळविणे आणि आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तिला ज्ञानार्जन करणे अत्यावश्यक आहे.
इस्लामी विद्वानांनी लिहिले की स्त्रि व पुरुष या दोघांसाठी कमीत कमी धर्माच्या मुलभूत नियमांचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. स्त्री या बाबतीत अज्ञानी असेल तर पतीचे कर्तव्य आहे की त्याने तिला याचे ज्ञान द्यावे अथवा अशी व्यवस्था करावी की तिला या बाबतीत शिक्षण मिळावे. किवा स्त्रिने स्वतःहून हे नियम शिकण्याचा व जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि हा तिचा कायदेशीर अधिकार आहे. या शिक्षणासाठी (नैतिक मर्यादांचे पालन करून) ती घराबाहेर पडू शकते. आणि पती तिच्यावर बंधन लादू शकत नाही. (या सखोल माहिती साठी माझे ‘‘इस्लामी समाजात स्त्रिचे स्थान’’ हे पुस्तक आवश्य अभ्यासावे)
या संपूर्ण गोष्टींचा परिणाम असा झाला की सुरुवातीच्या काळात ज्या प्रकारे पुरुषांत ज्ञानाचा सुकाळ झाला त्याच प्रकारे स्त्रिया सुद्धा विद्या-विभूषित झाल्या. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या सवंगड्यात कुरआन व हदीस (प्रेषिताची प्रवचने) चे ज्ञान असणाऱ्या प्रगल्भ स्त्रिया मुबलक प्रमाणात पाहावयास मिळतात. दिव्य कुरआन व प्रेषित कथनाच्या प्रकाशात प्रश्न सोडविणे व समस्यांचे निराकरण करणे हे एक कठीण व विद्वत्तापूर्ण कार्य आहे. या क्षेत्रात सुद्धा स्त्रियांची विद्वत्ता वाखाणण्या जोगी आहे. या प्रगल्भ स्त्रियांमध्ये माननीय आयेशा (र) माननीय उम्मे सलमा (र), माननीय उम्मे अतिया (र), माननीय सफया (र), माननीय उम्मे हबीबा (र), माननीय अस्मा बिन्त अबु बकर (र), माननीय उम्मे शरीफा (र), माननीय फातेमा बिन्त कैस (र), माननीय खौला बिन्तनवीत (र) उल्लेखनीय आहेत.
४) विवाहाचा अधिकार
स्त्रिला ज्या प्रमाणे जीवनातील महत्वाच्या व्यवहार व प्रश्नांबाबत ‘ब्र’ काढण्याचा अधिकार नव्हता, त्याच प्रमाणे विवाहाच्या बाबतीत ही तोंड उघडण्याचा अधिकार नव्हता. तिचे आईवडील वा परिवाराची बुजुर्ग मंडळी ज्या व्यक्ती बरोबर विवाह करतील त्या विरुद्ध एकही शब्द बोलण्याचा तिला अधिकार नसे. अर्थात आई वडील व परिवाराच्या निर्णया विरुद्ध आपला अभिप्राय देणे म्हणजे अतिशय कू-कर्म, महापाप समजले जाई व समाजात तऱ्हेतऱ्हेची चर्चा करण्यात येई. आपल्या भावी जीवन सवंगड्याच्या बाबतीत मत व्यक्त करणे. आणि परिवाराच्या निश्चित केलेल्या वरास नाकारणे या बाबींना व्यभिचार समजले जात असे.
हे पण म्हटले जाते की मुलीला तिच्या पसंतीचा वर निवडण्याचा अधिकार देणे हे तिच्याच स्वार्थाच्या विरोधात आहे. ती तिच्या अज्ञानामुळे आणि कच्च्या अनुभवामुळे चुकीचा वर निवडते. मुलीचे आई-वडील आणि परिजन तिच्या पेक्षा जास्त अनुभवी आणि व्यवहार ज्ञानी असल्या कारणाने तेच मुलीच्या बाबतीत योग्य निर्णय करू शकतात. तसेच ते मुलीचे शत्रू नसून शुभचितक असतात. आणि तिच्या भल्या-बुऱ्याची त्यांना पण खूप काळजी असते. म्हणून ते तिच्या भविष्याशी कधीच दगा करू शकत नाही.
हे दाही दिशा सत्य आहे की मुलीचे पालक व परिवारजन तिच्या करिता उत्तम वर निवडू शकतात. परंतु हे पण तेवढेच सत्य आहे की कधी-कधी वर निवडण्यात आई वडीला कडून सुद्धा अन्याय होतो. ते वैयक्तिक स्वार्थ साधण्याकरिता या संबंधांचा वापर करतात. कमीत कमी हे तर नाकारताच येत नाही की वर निवडणाऱ्या पालकांच्या समोर ते आदर्श नसतातच ज्यांना मुलगी महत्व देते. या परिस्थितीत मुलीच्या विवाहाचा अधिकार पूर्णपणे पालकांना देणे बरोबर असणार नाही.
हे एक कटू सत्य आहे की, कोणत्याही स्त्रि व पुरुषांचे विवाह-बंधनात बांधले जाणे एक अति महत्वाची घटना आहे, दोघेही या घटनेपासून जीवनाच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात करतात. करिता या संबंधांची प्रस्थापना दोघांच्या राजी-मर्जी ने व्हावी. ही गोष्ट कधीच योग्य होणार नाही की स्त्रिवर तिच्या आवडी विरुद्ध विवाहाचा निर्णय थोपविण्यात यावा.
इस्लाम धर्माने विवाहाच्या बाबतीत मुलीच्या पालकास महत्व अवश्य दिले,परंतु हे पण स्पष्ट केले की तिचा विवाह तिच्या परवानगीनेच व्हावा. स्त्री विधवा किवा घटस्फोटित असल्यास स्पष्टपणे आपली मर्जी कळवील आणि कुमारिका असल्यास गप्प बसणार व यालाच तिची परवानगी समजण्यात येईल. माननीय अबु हुरैरा (र) प्रेषिताचे कथन कथीत करतात की प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘विधवा आणि तलाक पीडित स्त्रिचा विवाह त्यांचे मत माहिती होई पर्यंत होणार नाही. तसेच कुमारीकेचा विवाह तिच्या परवानगी शिवाय होऊ शकत नाही.’’ (बुखारी व मुस्लिम)
यावर प्रेषित मुहम्मद (स) यांच्या तत्कालीन सोबत्यांनी विचारले की कुमारिका तर लाजत असल्यामुळे काहीच बोलणार नाही. मग तिची परवानगी कशी घ्यावी? तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले की तिचे मौन धरणेच परवानगी समजण्यात येईल. (अर्थात मौन स्वीकृती)
‘‘जर एखाद्या स्त्रिच्या पालकाने तिचा विवाह केला व त्या स्त्रिने या विवाहास मान्यता दिली नाही, तर हा विवाह ‘रद्द-बातल’ ठरणार. या बाबतीत माननीय खन्सा बिन्त खुद्दाम (र) चा विवाह तिच्या मर्जी विरुद्ध तिच्या वडिलांनी करून दिला तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांनी हा विवाह रद्द बातल ठरविला.’’ (बुखारी)
५) मेहेरचा अधिकार
इस्लामने पुरुषाला आदेश दिला की तो ज्या स्त्रिशी विवाह करील तिला मेहेर अवश्य देण्यात यावा. कारण पती तर्फे पत्नीस मेहेर दिल्या शिवाय विवाह होत नाही. इस्लाम च्या पूर्वी अज्ञानाच्या युगात ही पत्नीला पती तर्फे मेहेर देण्याची प्रथा होती. परंतु अरब वासीयांनी स्त्रिचा हा अधिकार हिरावून घेतला होता. याचे विविध स्वरूप होते. ते या प्रमाणे,
  1. स्त्रिचा पालक या मेहेरच्या राशीला स्वतःची मिळकत समजून त्यावर स्वतःच ताबा मिळवत असे. तसे पाहता मुलगी म्हटल्यावर तिला तो स्वतःप्रती अडसर समजत. तिच्या जन्म घेण्यावरच तो छाती बदडून घेत आणि दुःख व संताप व्यक्त करीत असे. या दृष्टीकोनाने तिच्या विवाहाच्या वेळी मिळणाऱ्या मेहेरच्या संपत्तीवर हक्क बजावयाचा आणि स्त्रि जन्माच्या दुःखाची या आनंदाने परत फेड करायचा. या कारणाने तो मुलीला ‘अलनाफेजा’ (संपत्तीत वाढ करणारी) या शब्दाने संबोधित करीत असे. तसेच तिच्या जन्म घेण्यावर ‘तुमच्या करिता संपत्तीत वाढ करणारी आली’ या शब्दात शुभ कामना स्वीकार करीत असे. मेहेर मध्ये ते उंट स्वीकारित असे अर्थातच मुलीच्या विवाहासमयी उंटाची संख्या वाढून संपत्तीत वाढ व्हायची.
  2. हे सुद्धा घडत असे की पतीच्या मृत्यूनंतर त्या विधवेचा सावत्र मुलगा अथवा नातेवाईक तिच्या अंगावर चादर टाकायचा आणि म्हणायचा की, मरणाऱ्याच्या संपत्ती प्रमाणेच मी या स्त्रीचा सुद्धा वारसदार झालो. यामुळे त्या विधवा स्त्रिवर त्याचा अधिकार स्थापित व्हायचा. मग कोणी दुसरा इसम तिच्या वर दावा करू शकत नसे व स्वतः त्या विधवा स्त्रिला पण त्याच्या विरोधात काहीही करता येत नसे. जर या नवीन तथाकथित वारसास त्या विधवेशी विवाह करायचा झाल्यास पूर्वीचाच ‘मेहेर’ ग्रहित धरून लग्न लावण्यात येई व नवीन ‘मेहेर’ देण्याची गरज नसायची. अथवा कोण्या दुसऱ्या इसमाशी तिचे लग्न करून दिल्यास त्या नवीन घरोब्या पासून मिळालेल्या मेहेर वर ताबा मिळवित असे. (तफसीरे कबीर)
  3. कधी-कधी तिच्या विवशतेचा व दौर्बल्याचा फायदा उचलून अत्यल्प मेहेर देण्यात येई. माननीय आयेशा (र) सांगतात असे की एखाद्या वडिल व आई वारलेल्या अनाथ मुलीचा पालक तिच्या सौंदर्यावर आणि संपत्ती वर भाळून स्वतः तिच्याशी विवाहाचा इच्छूक असल्यास दुसऱ्याशी तिचा विवाह न करता स्वतःच लग्न करायचा आणि एवढे ‘मेहेर’ सुद्धा देत नसे जेवढे ‘मेहेर’ दुसरा इसम देण्याकरिता तयार असायचा. दिव्य कुरआनने या प्रथे वर प्रतिबंध लावला. आणि म्हटले की या अनाथ मुलींशी जर विवाह करायचा असेल तर त्यांना पूर्ण मेहेर द्या ! नसता दुसऱ्या स्त्रियांशी विवाह करा. (बुखारी)
  4. अज्ञानाच्या (अर्थात इस्लाम पूर्व) काळात मेहर नष्ट करण्याची आणखी एक शक्कल होती. तिला प्रेषित वचनात ‘शिघार’ असा शब्द वापरण्यात आला आहे. याचा अर्थ असा होतो की, एक इसम आपल्या कन्येचा विवाह दुसऱ्या इसमाशी या अटीवर करतो की त्याच्या कन्येच्या मोबदल्यात त्याला आपली मुलगी विवाह करिता द्यावी आणि या साट्या-लोट्यात दोन्ही मुलींचा ‘मेहेर’ देण्यात येत नसे.
इस्लाम धर्माने ही पदभ्रष्ट प्रथा संपुष्टात आणली. प्रेषितांचे तत्कालीन सोबती माननीय अब्दुल्लाह बिन उमर (र) यांनी सांगतिले की,
‘‘प्रेषित मुहम्मद (स) यांनी शिधारची मनाई केली आहे.’’ (बुखारी व मुस्लिम)
इमाम बुखारी यांच्या प्रेषित कथनांच्या संग्रहात विनामेहेर कन्यांच्या अदला-बदली चा उल्लेख आहे. इमाम मुस्लिम यांच्या प्रेषित कथन संग्रहास बहिणींच्या अदला बदलीचा उल्लेख आढळतो. ही दोन्ही उदाहरणे आहेत. या व्यतिरिक्त ‘इमाम नूदी’ सांगतात की ‘इस्लामी विचारवंत सहमत आहेत की त्या काळात कन्या आणि बहिणीच्या व्यतिरिक्त पुतण्या, आत्या आणि चुलत बहिणी सुद्धा या साट्यालोट्यांत बळी पडत आणि इस्लामी पंडितांनी यावर सहमती व्यक्त केली की इस्लाम पूर्व काळातील या मार्गभ्रष्ट प्रथा इस्लामने मुळापासून नष्ट केल्या आहेत. मात्र या बाबतीत वाद आहे की या प्रकारच्या विवाहाच्या बाबतीत नेमका आदेश काय आहे ?
इमाम अबूदाऊदच्या कथन संग्रहात आहे की अब्दुल्लाह बिन अब्बास यांचे सुपुत्र अब्बास यांनी त्यांच्या कन्येचा विवाह अब्दुर्रहमान बिन हकमशी केला. आणि अब्दुर्रहमान बिन हकम यांनी त्यांच्या कन्येचा विवाह अब्बास यांच्याशी केला. आणि याच साट्या-लोट्यास ‘मेहेर’ साठी पर्याय ठरविला. माननीय मावियां (र) याना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांनी (ही गोष्ट माननीय मावियांच्याशासन काळातील आहे) मदिनाचा राज्यपाल ‘मरवान’ यास पत्र पाठविले की हा विवाह संपुष्टात आणण्यास फरमान जारी करावा. कारण या प्रथेलाच अंतिम प्रेषित मुहम्मद (स) यांनी ‘शिघार’ म्हटले आहे व प्रथा कायमची बंद केली आहे.
इमाम मालिक, इमाम शाफई व इमाम अहमद बिन हम्बल या इस्लामी विद्वानांच्या दृष्टिकोनांनुसार हा विवाह रद्द-बातल आहे. परंतु इमाम अबू हनीफा आणि सुफयान ‘सूरी’ यांच्या दृष्टिकोनांनुसार, हा विवाह तर झाला परंतु मेहेर अदा न करण्याचा अपराध त्यांच्या कडून घडला. जर त्यांनी मेहेर निश्चित करून अदा केला. तर हा विवाह अबाधित राहील. (मआलिमुस्सुनन)
अशा प्रकारे इस्लाम धर्माने ‘मेहेर’ ला केवळ मात्र विवाह करणाऱ्या एकट्या स्त्रीचाच अधिकार घोषित केला आणि या अधिकारांवर होणाऱ्या संपूर्ण बाधांना समूळ नष्ट करून स्पष्ट शब्दांत आदेश दिला की,
‘‘स्त्रियांचे मेहेर आनंदाने कर्तव्य समजून अदा करा.’’ (दिव्य कुरआन सुरह-ए-निसा : ४)
धर्म-पंडित अबु बकर जस्सास यांनी याचे वर्णन अशा शब्दांत केले की,
‘‘मेहेर पत्नीची स्व-संपत्ती असून केवळ तिचाच त्यावर अधिकार आहे. आणि तिच्या पालकाचा त्यावर कोणताच अधिकार नाही.’’ (एहकामुल कुरआन २-६९)
शरीयतने (अर्थात इस्लामी विधीने) मेहेरच्या राशी वा संपत्तीची कोणतीची मर्यादा निश्चित केली नाही. ती माणसाच्या अर्थिक क्षमतेच्या प्रमाणात कमी जास्त होऊ शकते. परंतु एवढे मात्र निश्चित की कोणत्याही व्यक्ती करिता त्याच्या ऐपती नुसार ‘मेहेर’ ची अदायगी कठीण होता कामा नये. इस्लामी कायदे तज्ञांच्या दरम्यान ‘मेहेर’ च्या रकमेच्या कीमान मर्यादेबाबतीत वाद आहे. हनफई कायदे तज्ञांच्या मतानुसार मेहेरची रक्कम कमीत कमी दहा दिरहम पेक्षा कमी नसावी.
अशा प्रकारे ही बाब स्पष्ट होते की ‘मेहेर’ ची राशी कमी असो वा जास्त असो शेवटी तो केवळ मात्र स्त्रिचाच कायदेशीर अधिकार आहे. इस्लामी कायद्याच्या नुसार तिला या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. काही वेळा ‘मेहेर’ ला स्त्रीच्या सम्माना विरुद्ध समजले जाते. आणि यावर आणखीन काही आक्षेप व हरकती आहेत. त्यावर सखोल चर्चा पुढील भागात करण्यात आली आहे.
६) नान व नफ्का चा अधिकार
लग्नापर्यंत मुलीच्या संगोपनाची जबाबदारी तिच्या पित्याची आहे. लग्नानंतर तिच्या ‘नान व नफ्क्यांची जबाबदारी पूर्णपणे तिच्या पतीची आहे. इस्लामी विधीनुसार पत्नी श्रीमंत असो अथवा गरीब तिच्या ‘नान-नफ्क्या’ ची पूर्तता करणे पतीचे परम कर्तव्य आहे. ‘हनफी फिक्ह’ मध्ये म्हटले गेले की पती आणि पत्नी जर दोघेही अर्थिक सबळ असल्यास पत्नीचा ‘नफ्का’ तिच्या आर्थिक दर्जानुसार असावा. पत्नी गरीब व पती श्रीमंत असल्यास त्यांचा ‘नफ्का’ गरीब व श्रीमंताच्या मधल्या दर्जाचा असेल. अर्थात श्रीमंता पेक्षा थोडा कमी आणि गरीबांपेक्षा थोडा जास्त असेल. परंतु जर पत्नी श्रीमंत आणि पती गरीब असल्यास पती त्याच्या आर्थिक ऐपती नुसार तिला लागणारा खर्च पुरवेल व बाकीची रक्कम त्याच्यावर कर्जाच्या स्वरूपात असेल व त्याची तो सवडीनुसार परत फेड करू शकतो.
पत्नी जर श्रीमंत असेल तर तिच्यासाठी नोकरचाकर सुद्धा पुरविण्यात यावे. पत्नी पतीच्या परिवारात किवा परिजनात किवा नातलगांसोबत राहण्यास तयार नसल्यास तिच्यासाठी वेगळ्या आवासाचा बंदोबस्त करण्यात यावा. हा तिचा वैधानिक अधिकार आहे. आणि त्या अधिकाराची पूर्तता करणे पतीचे कर्तव्य आहे.
या विषयांत हे स्पष्टीकरण करणे सुध्दा आवश्यक आहे की पतीची सेवा व घराचे काम-काज करणे पत्नी वर बंधनकारक नाही. किवा तिची जबाबदारी सुद्धा नाही. ती हे सर्व कांही करीत असल्यास तिचे ते उपकारच समजावे. परंतु पतीची सेवा व घरकाम करण्याकरिता तिच्यावर बळजबरी करता येणार नाही. (याचे तपशीलवार वर्णन हनफी फिकह मध्ये विस्तारित स्वरूपात आहे. संदर्भ - हिदाया २/४१७-४१९)
७) व्यवसाय आणि कार्य स्वातंत्र्याचा अधिकार
इस्लाम धर्माने स्त्रिला व्यवसाय आणि कार्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तिच्या करिता व्यापार, कृषी, देवाण-घेवाण, उद्योग व निर्मिती, नोकरी, ज्ञानदान, पत्रकारिता व लेखन या सर्व कार्यांची परवानगी आहे.या कार्यांसाठी ती घरा बाहेर पण जाऊ शकते. मात्र गोशा-पर्दाच्या सुरक्षेसहीत या सुरक्षात्मक बंधनांची दोन उद्दीष्टे आहेत. प्रथम हे की परिवार व्यवस्थेत कोणतीही ढवळा-ढवळ होऊ नये व त्याच्या स्थैर्यात बाधा येऊ नये. द्वितीय हे की स्त्रिने मानाने व अब्रु शाबुत ठेवून जीवन जगावे. व तिला अशा परिस्थितीत कोणी ढकलू नये की तिच्यासाठी नैतिक मर्यादा जपणे कठीण व्हावे. (या विषयावर विस्तारित वर्णनांकरिता ‘स्त्रि आणि आर्थिक समस्या’ या विषयावरील चर्चा अभ्यासावी)
८) धन संपत्तीचा अधिकार
जगातील कीती तरी राष्ट्रांमध्ये ‘स्त्री’ ला संपत्तीच्या अधिकारापासून वंचित केले. माता-पित्याच्या संपत्तीत तर तिचा वाटा नव्हताच या उलट तिने स्वतः काबाडकष्ट करून मिळविलेल्या पैशावर पती, मुले व बाप किवा इतर परिवारात किवा परिजन ताबा मिळवून फस्त करीत. इस्लाम धर्मात स्त्रिच्या मिळकतीस मान्यता देऊन तिच्या मिळकतीत ढवळा-ढवळ करण्यास प्रतिबंध करण्यात आला. तिने नैतिकरित्या कमावलेल्या संपत्ती वर ज्या प्रमाणे पुरुषांचा मिळकतीचा अधिकार आहे. त्याच प्रमाणे स्त्रिलाही हा अधिकार देण्यात आला. दिव्य कुरआनात म्हटले आहे की,
‘‘जे काही पुरुषांनी कमावले आहे त्या नुसार त्यांचा वाटा आहे आणि जे काही स्त्रियांनी कमावले आहे, त्या नुसार त्यांचा वाटा आहे.’’ (सुरह-ए-निसा : ३२)
स्त्रिला इस्लामी वैधानिक सुत्रानुसार माता-पिता पती अथवा संतती वगैरे पासून जी संपत्ती मिळते किवा तिच्या स्व प्रयत्नांनी जी संपत्ती मिळते तिच्यावर तिचा मालकी हक्क आहे. तिच्या वापराचा तिलाच पूर्ण अधिकार आहे. ती तिच्या स्वतंत्र आवडी-निवडी नुसार स्वतःवर, पती व मुलांवर, माता-पिता व परिवार जणांवर खर्च करू शकते व विधायक कार्यावर खर्च करू शकते. संपत्तीची खरेदी-विक्री व दान-धर्म चा अधिकार तिला आहे. तिच्या अधिकारांत ढवळा-ढवळ कोणीही करता कामा नये.
९) शील व अब्रू सुरक्षेचा अधिकार
मानसम्मान व अब्रू मानवाची अनमोल संपत्ती आहे. तिच्या अब्रूशी खेळ करणे वा तिचा मानभंग करण्याचा कोणालाही अधिकार नाही. स्त्रिच्या अब्रू व इज्जतीवर नेहमीच आक्रमणे होत असतात. ती तिच्या दुर्बलतेच्या कारणास्तव स्वःरक्षणात जास्त यशस्वी झालेली दिसत नाही. तिच्या वरील हल्ल्यांचे दोन स्वरूपे आहेत. प्रथम स्वरूप म्हणजे तिच्यावर व्यभिचाराचे आरोप लावून तिला मानसिक ताप देणे व दुसरे स्वरूप म्हणजे तिच्यावर लैंगिक अत्याचार करणे. इस्लाम धर्मात हे दोन्ही अपराध अति भीषण स्वरूपाचे आहेत. स्वतः प्रेषित मुहम्मद (स) यांनी माणसास जगातून नष्ट करणाऱ्या सात अपराधांपैकी एकाचा उल्लेख अशा प्रकारे केला की,
‘‘सत्शील, श्रद्धावंत आणि निरागस स्त्रियांवर आळ घेणे.’’ (मिश्कात, बुखारी व मुस्लिम)
इस्लाम धर्माने या भीषण अपराधांवर शक्तीशाली विळखा आवळला. तो अशा प्रकारे की जर कोण्या इसमाने एखाद्या स्त्रिवर व्यभिचाराचा आरोप लावला तर त्याला तब्बल ऐशी (८०) फटक्याची शिक्षा ठोठावली. व नंतर कोणत्याही प्रकरणांत त्याची साक्ष मान्य करण्यात आली नाही. कुरआनत सांगितले आहे,
‘‘आणि जे लोक मर्यादाशील स्त्रियांवर आळ घेत असतील, मग चार साक्षीदार घेऊन येत नसतील, त्यांना एेंशी फटके मारा. व त्यांच्या साक्षी कधी स्वीकारू नका, आणि ते स्वतःच अवज्ञाकारी आहेत. त्या लोकां व्यतिरिक्त जे आपल्या कर्मावर पश्चात्ताप करतील व सुधारणा घडवून आणतील. कारण ईश्वर अवश्य (त्यांच्या बाबतीत) क्षमाशील व परम दयाळू आहे.’’ (सूरह-ए-नूर : ४,५)
आता व्यभिचार आणि बलात्काराचा विषय चर्चेला घेऊया. इस्लामी विधी नुसार कोणत्याही इसमाने एखाद्या स्त्रिवर जबरी लैंगिक अत्याचार केल्यास अ-विवाहितास शंभर कोरड्यांची शिक्षा आणि विवाहितास ‘रजम’ म्हणजे समाजातील लोकांकडून त्याचा दगडाने ठेचून वध केला जाईल. तसेच स्त्रि व पुरुषाच्या राजी मर्जीने हे पातक घडल्यास दोघांना ही शिक्षा भोगावी लागेल.
१०) टीका आणि ‘जाब’ घेण्याचा अधिकार
हे खरे आहे की इस्लाम धर्माने स्त्रिला काही सामुहिक आणि राजनैतिक जबाबदाऱ्यांतून मुक्ती दिली. (या विषयावर आपण वेगळी चर्चा करूया) परंतु याचा अर्थ अजिबात असा होत नाही की ती या प्रकरणांशी बिल्कुल अलिप्त आणि सामुहिक व सामाकिड स्वार्थ व फायदे व तोट्यांशी तिला काहीच देणेघेणे नाही. दिव्य कुरआनने स्त्रि आणि पुरुष दोघांनाही ‘सत्याचा आदेश व वाईट कर्मांचा त्याग’ करण्याचा आदेश दिला. दिव्य कुरआनात ईश्वरीय आदेश आहे की,
‘‘श्रद्धावंत पुरुष व श्रद्धावंत स्त्रिया हे सर्व एक दुसऱ्यांचे मित्र आहेत. भलेपणाचा आदेश देतात व वाईट गोष्टींपासून रोखतात.’’ (सूरह-ए-तौबा : ७१)
‘सत्याची प्रस्थापना व दुष्कर्मांना आळा घालण्याचा विषय अतिशय विस्तृत आहे. या आदेशाच्या चौकटीत इस्लामचा प्रसार व प्रचार, समाज सुधारणेचे कार्य आणि शासनाच्या अयोग्य नीतीवर टीका व त्याचे परिक्षण हे सर्व काही आलेच. स्त्रिची जबाबदारी आहे की तिने तिच्या मर्यादा पाळून हे सर्व कार्य करावे. (याच्या तपशीलाकरिता माझे ‘मुस्लिम स्त्रीयांची जबाबदारी’ अवश्य अभ्यासावे)
इतिहासाने ठळक आणि स्पष्टपणे याची साक्ष दिली की इस्लामच्या प्रारंभी काळातील स्त्रियांनी हे कर्तव्य यशस्वीपणे व शौर्याने पार पाडले आहे.

- डॉ. मुहम्मद अहमद
   
    लोकांना पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी माहिती नसल्यामुळे पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्यामध्ये जो मधुर संबंध आहे त्याची लोकांना मुळीच जाणीव नाही. डॉ. मुहम्मद अहमद यांनी पैगंबर (स.) यांच्या पवित्र जीवनावर हा ग्रंथ लिहून फार मोठे कार्य केले आहे.
    या पुस्तकाच्या अध्ययनाने वाचकांना मानवतेचे उद्धारक अंतिम पैगंबर (स.) यांच्याविषयी सत्य माहिती प्राप्त होईल.

    आयएमपीटी अ.क्र. 104      -पृष्ठे - 128   मूल्य - 50                आवृत्ती - 4 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/dmxdhxc8t5u5qrgypn5kozss2mbhqqd6

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget