Latest Post

माननीय सहल बिन सअद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लोकसमुदायाचा प्रमुख त्या लोकसमुदायाचा सेवक असतो. अल्लाहच्या मार्गातील हौतात्म्यव्यतिरिक्त लोकांची सेवा करण्यात पुढाकार घेणाऱ्याच्या कर्मापेक्षा कोणतेही पुण्यकर्म श्रेष्ठ असत नाही.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
एखाद्या समूहाबरोबर प्रवास करणाऱ्या मनुष्याने त्या समूहातील लोकांची सेवा करावी, त्यांची गरजांची पूर्तता करावी आणि त्यांना प्रत्येक प्रकारचे साहाय्य करण्याचा प्रयत्न करावा, याचे  फार मोठे पुण्य आहे. या पुण्यापेक्षा श्रेष्ठ जर कोणते पुण्य असेल तर ते म्हणजे मनुष्याने अल्लाहच्या मार्गात युद्ध करताना हौतात्म्य पत्करणे होय.

माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, एकदा आम्ही प्रवासात असताना पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याजवळ एक मनुष्य उंटिणीवर स्वार होऊन आला, मग त्याने उजव्या  व डाव्या बाजूला वळून पाहण्यास सुरूवात केली, तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘ज्या मनुष्याकडे एखादे अतिरिक्त वाहन असेल त्याने ते वाहन नसलेल्या व्यक्तीला द्यावे आणि ज्या कोणाकडे  अतिरिक्त भोजन असेल त्याने ते ज्यांच्याकडे जेवणाचे पदार्थ नसलेल्याला द्यावे.’’

अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या मते पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आमच्याकडील अनेक प्रकारच्या सामानाचा अंदाज घेतला, त्यावेळी आम्हाला वाटले की एखाद्याच्या आवश्यकतेपेक्षा  अधिक सामानावर आमच्यापैकी कोणाचाही अधिकार नाही. (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
आलेल्या व्यक्तीने उजवीकडे व डावीकडे पाहिले कारण खरे तर तो गरजवंत होता, म्हणून लोकांनी त्याची मदत करावी अशी त्याची इच्छा होती.

माननीय सईद बिन अबू हिंद अन् अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘काही उंट शैतानाचा भाग असतात, काही घरे शैतानाचा भाग असतात,  शैतानांचे उंट मी पाहिले आहेत, तुमच्यापैकी कोणी आपल्याबरोबर अनेक उंटिणी घेऊन निघतो आणि त्यांना खूप  चारा-पाणी देऊन ताजेतवाणे करून ठेवले आहे आणि त्यांच्यापैकी  कोणत्याही एकावर तो स्वार होत नाही. जेव्हा तो आपल्या वाहन नसलेल्या बंधुजवळून जातो तेव्हा तो आपल्या उंटिणींवर बसवत नाही. शैतानांच्या घरांबाबत म्हणायचे झाले तर ते मी  पाहिलेले नाहीत. (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
‘शैतानांची घरे’ म्हणजे जी घरे लोक फक्त आपले मोठेपण दाखविण्यासाठी अनावश्यक निर्माण करतात. ते लोक स्वत: त्यात राहात नाहीत अथवा इतर गरजवंत लोकांना राहायला देतही नाहीत. इस्लाम संपत्तीच्या अशाप्रकारच्या देखाव्याला पसंत करीत नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अशी घरे पाहिलेली नाहीत. त्या काळात असे देखावा करणारे लोक नव्हते.  होय, नंतर आमच्या वाडवडिलांनी अशी घरे पहिली आणि आम्हीही आमच्या काळातील श्रीमंत मुस्लिमांची अशी दिखाऊ घरे पाहतो आहोत.

 अनेकेश्वरवादिता व पथभ्रष्टता मुळात कोठून निघते. पवित्र कुरआन आम्हाला सांगतो की हे  दुर्दैवी संकट येण्याचे तीन मार्ग आहेत

(१) मनाची गुलामी
पहिला मार्ग मानवाच्या स्वतःच्या मनाच्या इच्छा आहेत
"अर्थात त्याच्यापेक्षा मोठा पथभ्रष्ट कोण असू शकेल ज्याने अल्लाहच्या आदेशांच्याऐवजी आपल्या मनाच्या इच्छांचे अनुसरण केले?  अशा अत्याचारी लोकांना अल्लाह सन्मार्ग दाखवीत नाही."
- सूरतुल कसस : ५०
याचा अर्थ असा की सर्वात अधिक माणसाला मार्गभ्रष्ट करणारी गोष्ट माणसाच्या स्वतःच्या मनातील इच्छा आहे. जो मनुष्य  इच्छेचा गुलाम झाला तो अल्लाहचा दास बनणे कदापि शक्य नाही. जरी अल्लाहने त्याला मनाई केली तरी तो सदेव असेच पाहील  की मला कोणत्या कामात धन-प्राप्ती होईल, मला सन्मान व प्रसिद्धी कोणत्या कामात मिळेल, मला आमोद-प्रमोद व आनंद कोणत्या  कामात मिळेल; मला आराम व ऐश्वर्य कोणत्या कामात प्राप्त होईल. बस्स, या गोष्टी ज्या कामात असतील त्यांचाच तो अवलंब  करील. या गोष्टी ज्या कामात नसतील त्या तो कदापि करणार नाही, मग त्याची आज्ञा अल्लाहने का दिलेली असेना. तर मग याचा  अर्थ असा की अशा माणसाचा ईश्वर महान अल्लाह नसून त्याचा ईश्वर त्याचे मन आहे. त्याला सबुद्धी कशी मिळू शकेल? हीच  गोष्ट पवित्र कुरआनमध्ये अन्य

ठिकाणी अशाप्रकारे सांगितली आहे.
"हे पैगंबर! तुम्ही त्या मनुष्याच्या स्थितीवर विचार तरी केला काय की ज्याने आपल्या मनाच्या इच्छेला आपला ईश्वर बनविले  आहे? काय तुम्ही अशा माणसावर नजर ठेऊ शकता? काय तुम्हाला असे वाटते की या लोकांपैकी बरेचजण ऐकतात व समजतात?  कदापि नाही, हे तर जनावराप्रमाणे आहेत. नव्हे तर त्यांच्यापेक्षाही हीन दर्जाचे आहेत.'
सूरतुल फुरकान : ४३,४४
मनाचे गुलाम जनावरापेक्षा अधिक वाईट असणे एक अशी गोष्ट आहे ज्यात कोणत्याही शंकेला स्थान नाही. कोणतेही जनावर  आपणास असे आढळणार नाही जे अल्लाहने ठरवून दिलेल्या सीमेला सोडून पुढे जात असेल. प्रत्येक प्राणी तीच दप्तु खातो जी  अल्लाहने त्याच्यासाठी ठरवून दिलेली आहे. तितकीच खातो. जितक्या प्रमाणात ठरवून दिलेली आहे आणि जितके काम ज्या  प्राण्यासाठी ठरविले आहे तितकेच तो करतो. परंतु मनुष्य एक असा प्राणी आहे की जेव्हा हा आपल्या इच्छेचा गुलाम बनतो तेव्हां  तो असली-असली कृत्ये करतो की सैतानाला सुद्धा लाज वाटावी.

(२) वाड- वडिलांचे अंधानुकरण

हा तर मार्गभ्रष्टता येण्याचा पहिला रस्ता आहे. दुसरा मार्ग असा आहे की वाड-वडिलांपासून ज्या चालीरीती, ज्या श्रद्धा व विचार, ज्या  प्रकारचे वागणे चालत आलेले आहेत त्यांचा मनुष्य गुलाम बनतो आणि अल्लाहच्या आज्ञेपेक्षा त्यांना श्रेष्ठ समजू लागतो आणि त्या  उलट जर अल्लाहची आज्ञा त्याच्यासमोर प्रस्तुत केली गेली तर सांगतो की मी तर तेच करीन जे माझे वाड-वडील करीत असत  आणि जी माझ्या घराण्याची व टोळीची पद्धत आहे. जो मनुष्य असल्या रोगाने पछाडलेला आहे तो बरे अल्लाहचा दास कसा बनू  शकेल? त्याचे ईश्वर तर त्याचे वाड-वडील व त्याच्या घराण्याचे व टोळीचे लोक आहेत. त्याला हा खोटा दावा करण्याचा कोणता  अधिकार आहे की मी मुसलमान आहे? पवित्र कुरआनमध्ये सुद्धा यावर कठोरपणे खबरदार केले आहे.

.
"आणि जेव्हा जेव्हां त्यांना सांगितले गेले की जी आज्ञा अल्लाहने पाठविली आहे तिचे अनुसरण करा. तेव्हा त्यांनी हेच सांगितले की  आम्ही तर त्या गोष्टीचे अनसरण करू जी आम्हाला बाड-वडिलांकडून मिळाली आहे. जर त्यांच्या वाड-वडिलांना एखादी गोष्ट कळाली  नसेल आणि ते सरळ मार्गावर नसतील तरी सुद्धा हे त्यांचेच अनुकरण करीत राहतील काय?
- सूरतुल बकराह : १७०
दुसऱ्या ठिकाणी सांगितले आहे -
"आणि जेव्हां त्यांना सांगितले गेले की या फर्मानाकडे या जो अल्लाहने पाठविला आहे आणि या पैगंबर (स.) यांच्या पद्धतीकडे या.  तेव्हां त्यांनी सांगितले की आमच्यासाठी तर केवळ तीच पद्धत पुरेशी आहे ज्यावर आम्ही आपल्या वाड-वडिलांना पाहिले आहे. काय  हे वाडवडिलांचेच अनुकरण करीत राहतील. मग त्यांना कोणत्याही गोष्टीचे ज्ञान नसो आणि ते सरळ मार्गावर नसोत? हे  ईमानधारकांनो! तुम्हाला तरी स्वतःची काळजी असली पाहिजे. जर तुम्ही सरळ मार्गाला लागाल तर दुसऱ्या कुणाच्या मार्गभ्रष्टतेने  तुम्हाला नुकसान पोहचणार नाही, शेवटी तर सर्वाना अल्लाहकडे परत जावयाचे आहे. त्यावेळी अल्लाह तुम्हाला तुमच्या चांगल्या व  वाईट कृत्याविषयी सर्व काही सांगेल."
सूरतुल माइदाह : १०४,१०५
ही अशी पथभ्रष्टता आहे ज्यात जवळजवळ प्रत्येक काळातील अज्ञानी लोक गुरफटलेले आहेत आणि नेहमी अल्लाहच्या पैगंबरांचे  मार्गदर्शन स्वीकारण्यापासून हीच गोष्ट माणसाला रोखत असते. हजरत मूसा (अले.) यांनी जेव्हां लोकांना अल्लाहच्या शरीअतकडे  (कायद्याकडे, मार्गाकडे) बोलाविले होते तेव्हां देखील लोकांनी असेच म्हटले होते,"काय तू आम्हाला त्या मार्गापासून हटवू इच्छितोस  ज्यावर आम्ही आपल्या वाड-वडिलांना चालत असताना पाहिले आहे?"
-सूरह यूनुस : ७८
हजरत इब्राहीम (अलै.) यांनी जेव्हा आपल्या टोळीवाल्यांना

अनेकेश्वरवादापासून रोखले तेव्हा त्यांनी सुद्धा असेच सांगितले होते -
"आम्ही आपल्या वाड-वडिलांना याच ईश्वरांची उपासना करताना पाहिले आहे."
-सूरतुल अंधिया : ५३
थोडक्यात असे की अशाचप्रकारे प्रत्येक पैगंबरासमोर लोकांनी हाच मुद्दा सांगितला की तुम्ही जे म्हणता ते आमच्या वाड-वडिलांच्या  पद्धतीविरुद्ध आहे म्हणून ते आम्ही मान्य करीत नाही. पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे -
"म्हणजे असेच होत राहिले आहे की जेव्हा जेव्हा आम्ही एखाद्या वस्तीत भीती दाखविणारा म्हणजे पैगंबराला पाठविले तेव्हां तेव्हा  त्या वस्तीच्या सुखवस्तु लोकांनी असेच सांगितले की आम्ही आपल्या वाड-वडिलांना एका पद्धतीचा अवलंब करताना पाहिले आहे  आणि आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहोत. पैगंबरांनी त्यांना सांगितले की, जर मी याच्यापेक्षा चांगली गोष्ट  तुम्हाला सांगितली की ज्यावर तुमचे वाड-वडील चालत असता तुम्ही पाहिले आहे तर काय असे असून देखील तुम्ही तुमच्या वाड- वडिलांचे अनुकरण करीत रहाल? त्यांनी उत्तर दिले की, आम्ही ती गोष्ट मान्य करीत नाही जी तुम्ही घेऊन आला आहात. मग  जेव्हा त्यांनी असे उत्तर दिले तेव्हा आम्ही सुद्धा त्यांना खूप शिक्षा दिली आणि आता पहा की आमचे आदेश खोटे ठरविणाऱ्यांचा कसा शेवट झाला आहे."
-सूरतुज्जुखरुफ़ : २३-२५
हे सर्व काही सांगितल्यावर महान अल्लाह फर्मावितो की एक तर वाडवडिलांचेच अनुकरण करा अथवा आमच्या आदेशांचे पालन  करा. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होऊ शकत नाहीत. मुसलमान बनू इच्छिता तर सर्व काही सोडून केवळ तीच गोष्ट मान्य करा  जी आम्ही सांगितली आहे -
"म्हणजे जेव्हां त्यांना सांगितले गेले की त्या आज्ञेचे पालन करा जी अल्लाहने पाठविली आहे. तेव्हां ते म्हणाले की, नाही. जरी  शैतान आम्हाला नरकाच्या प्रकोपाकडे बोलावीत असला तरी सुद्धा आम्ही ती गोष्ट अवलंबू जिघा अवलंय आम्ही आमच्या वाड- वडिलांना करताना पाहिले आहे. जो कोणी स्वतःला पूर्णपणे अल्लाहच्या सुपुर्द करील आणि


सत्कर्म करणारा असेल त्याने तर दोरी मजबूत धरली आणि शेवटी सर्व बाबी अल्लाहच्या हातात आहेत आणि जो कोणी याचा इन्कार करील तर हे नबी, तुम्हाला त्याच्या इन्काराने दु:खी होण्याची गरज नाही. ते सर्व आमच्या कडे परत येणार आहेत. मग आम्ही त्यांन्या त्यांच्या कृत्यांचा परिणाम दाखवून देऊ."    - सूरह लुक़मान : २१-२३

(३) अल्लाहशिवाय इतरांच्या आज्ञेचे पालन

हा पथभ्रष्टता येण्याचा दुसरा मार्ग होता. तिसरा मार्ग पवित्र करआनने असा सांगितला आहे की मनुष्य जेव्हां अल्लाहची आज्ञा सोडून  दुसऱ्या लोकांची आज्ञा पाळू लागतो आणि असा विचार करतो की अमुक मोठा मनुष्य आहे अथवा अमुक माणसाच्या हातात माझी  रोजी आहे म्हणून त्याचे म्हणणे ऐकले पाहिजे. अमुक मनुष्य मोठा पदाधिकारी आहे म्हणून त्याची आज्ञा पाळली पाहिजे. अमुक महाशय आपल्या शापाने मला नष्ट करतील किंवा आपल्या बरोबर स्वर्गात घेऊन जातील म्हणून ते जे सांगतील तेच खरे आहे. अमुक  जात फार प्रगती करीत आहे. तिच्या पद्धती अवलंबिल्या पाहिजेत. तर असंल्या माणसासाठी सद्बुद्धी प्राप्त होण्याचा मार्ग बंद पडतो.

"जर तू पृथ्वीवर राहणाऱ्या त्या लोकांच्या आज्ञेचे पालन केले तर ते तुला अल्लाहच्या मार्गावरून पथभ्रष्ट करतील."
-सूरतुल अनआम : ११६

म्हणजे मनुष्य सरळ मार्गावर तेव्हां असू शकतो जेव्हां त्यांचा ईश्वर एक असेल, ज्याने शेकडो हजारो ईश्वर स्वीकारले असतील आणि  जो कधी या ईश्वराच्या म्हणण्यानुसार तर कधी त्या ईश्वराच्या म्हणण्यानुसार चालत असेल तर त्याला कसा मार्ग मिळू शकेल?

आता आपणास कळले असेल की पथभ्रष्टतेची प्रमुख कारणे तीन आहत १) मनाची गुलामी, २) वाड-वडील, घराणे आणि टोळीच्या  प्रथांची गुलामी, ३) सामान्यपणे जगातील त्या लोकांची गुलामी ज्यात श्रीमंत लोक, तत्कालीन शासक आणि भोंदू धर्मगुरु व पथभ्रष्ट जाती सर्व यात सामील आहेत.

या तीन मोठ्या मूर्त्या आहेत ज्या ईश्वराच्या दावेदार बनल्या आहेत. जो मनुष्य मुसलमान बनू इच्छितो त्याला सर्वप्रथम या तिन्ही  मूर्त्या फोडल्या पाहिजेत. त्यानंतरच खऱ्या अर्थाने तो मुसलमान बनेल, ज्याने या तिन्ही मूर्त्या आपल्या हृदयात बसविल्या असतील  तो ईश्वराचा दास बनणे कठीण आहे. तो दिवसात पन्नास वेळा नमाज पढून व दाखविण्यासाठी उपवास ठेऊन आणि मुसलमानाप्रमाणे चेहरा बनवून लोकांना फसवू शकतो. स्वतः आपल्या मनाला सुद्धा फसवू शकतो की मी पक्का मुसलमान आहे. परंतु तो अल्लाहला फसवू शकत नाही.

धर्म व जग एक असण्याचा हा अर्थ पूर्णत: चुकीचा आहे, जो बहुतेक धर्मपरायण लोक लावतात, की उपासना तर अल्लाहची करावी. अनिवार्य धार्मिक कृत्ये व पैगंबर मुहम्मद (स.) यांनी केलेली कामे तर अल्लाहच्या आज्ञेनुसार अदा केली जावीत. उरल्या जागतिक बाबी, जशा राजनीती, सामाजिकता, अर्थकारण, सामूहिकता वगैरे. तर या बाबतीत त्याचप्रमाणे कृती केली जावी जशी दुसरे लोक करतात. राजनीतीत तशाच प्रकारे भाग घेतला जावा जसा एखाद्या अन्य व्यक्तीचा सर्वसत्ताधिकार मानणारे घेतात आणि समाधान मानावे की, इस्लामी राजनीतिचा हक्क अदा झाला. जर हे बरोबर असेल तर ही गोष्ट या टोकापर्यंत पोचेल की, 'बिस्मिल्लाह' (आरंभ करतो, अल्लाहच्या नावाने) म्हणून उजव्या हाताने दारू पिणे, पैगंबर मुहम्मद (स.) च्या कृतीचे अनुकरण ठरेल. राजनीतिक व्यवस्था इस्लामी असो अथवा गैरइस्लामी त्याचा पाया घातला जातो सर्वसत्ताधिकाराने, पहिले पाऊल म्हणून सर्वसत्ताधिकाराची समस्या सोडविली जाते. कोणत्याही राजनीतिक व्यवस्थेसंबंधी पहिला प्रश्न असा असतो की, त्यात सर्वसत्ताधिकारी कोणाला मानले गेले आहे? या प्रश्नाच्या उत्तरानेच इस्लामी राजनीती दुसऱ्या राजनीतीपेक्षा भिन्न आहे हे स्पष्ट होते. इस्लाममध्ये रूपावर अधिक चर्चा नाही. सांस्कृतिक व वैचारिक उन्नतीने कोणतेही रूप धारण करावे. जर त्यात सर्वसत्ताधिकारी म्हणून अल्लाहला मानले असेल आणि त्यात नागरिकाची स्तिती वेसणरहित उंटाची नसेल. आपल्या स्वामीच्या इच्छेच्या अधीन एका सहाय्यकाची आहे, तर ती इस्लामी राजनीती होय. जर अल्लाहशिवाय कुणा दुसऱ्याचा सर्वसत्ताधिकार मानला जात असेल, तर ती इस्लामी राजनीती नव्हे. मग ती चालविणारी चाळीस दिवस जप-तप करण्यामध्ये लागलेली व्यक्ती असो अथवा हातात पवित्र कुरआन धारण करणारे धर्मपंडित असोत. कारण ज्या प्रकारे अल्लाहच्या उपासनेत इतर कोणाला सामील करणे अनेकेश्वरत्व आहे, तसेच त्याच्या सर्वसत्ताधिकारी असण्याच्या त्याच्या गुणात सामील करणे अथवा स्वत: सामील होणे अनेकेश्वरत्व व त्याच्याशी बंडखोरी आहे. "ला इलाहा इल्लल्लाहु"चा अर्थ जेथे अल्लाहशिवाय इतर कोणी उपास्य नाही असा आहे, तेथेच अल्लाहशिवाय अन्य कोणीही शासनकर्ता नाही असासुद्धा आहे. यापैकी एक मान्य करणे आणि दुसरे अमान्य करणे एकेश्वरत्वाच्या श्रद्धेच्याच काय बुद्धीच्यासुद्धा उलट आहे. जर हे अनेकेश्वरत्व आहे, तर हा मोठा अत्याचार आहे. “इन्नशिर्का लजुलमुन अजीम' अर्थात नि:संशय अनेकेश्वरत्व मोठा जुलूम आहे. या मोठ्या जुलमासह जर नकळत नसेल तर उपासना, नामस्मरण मी सांगू शकत नाही की, अल्लाहच्या तराजूत किती वजन प्राप्त करू शकतील. महान अल्लाह नि:संशय क्षमा करणारा व दयाळू आहे. परंतु जर तो तसाच भोळा-भाबडा असता, जसा की आमचे भोळे-भाबडे धार्मिक लोक त्याला समजतात, की केवळ तोंडी जमाखर्च करणाऱ्यांना तो आपल्या प्रामाणिक लोकांच्या समूहात सामील करून घेईल, तर किती चांगले झाले असते! पण वस्तुस्थिती अशी आहे की, एक मूर्ख मनुष्यदेखील जेव्हा एखाद्याला मित्र बनवितो तेव्हा त्याच्या सुंदर वर्णनशैली व दीर्घ वर्णनाने समाधानी होत नाही, तर त्याला विविध पद्धतीने तपासतो व पारखतो.
तर बंधुनो! “एकेश्वरत्व काय आहे?" चे हे उत्तर. याचा अर्थ असा की, महान अल्लाहच्या उपास्याच्या गुणाला व त्याच्या सर्वसत्ताधिकारीच्या गुणाला वेगवेगळे ठेवले जाऊ नये आणि असेही केले जाऊ नये की, त्याच्या उपास्याच्या गुणाला व्यावहारिकरीत्या मानले जावे आणि त्याच्या सर्वसत्ताधिकारीच्या गुणाला केवळ डोक्यात व पुस्तकात राहू दिले जावे. त्याचे व्यावहारिक स्वरूप असेच होऊ शकते की, आम्ही आपल्या उपासनेच्या भावनेला आणि आपल्या सर्वसत्ताधिकाराच्या आवश्यकतेला दुसऱ्या सर्वसत्ताधिकाराच्या दावेदाराकडून व आपल्या सर्वसत्ताधिकाराच्या दाव्याकडून तोंड फिरवून आणि एकाला दुसऱ्यात समाविष्ट करून आपल्या जुलूम करणाऱ्याला महाकोपी, शुचिर्भूत व पवित्र, अत्यंत मेहरबान व दया करणाऱ्या अल्लाहच्या हुजुरात सादर करावे. जर या दोघांना वेगवेगळे केले तर दोघे निर्जीव होतील. हा अल्लाहचा सर्वसत्ताधिकारदेखील एवढी मोठी कृपा आहे व त्यात इतकी विपुलता आहे की त्यांची गणना करणे अशक्य आहे, ज्याप्रमाणे त्याच्या अन्य बक्षिसांची गणना संभव नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अल्लाहचा सर्वसत्ताधिकार मान्य करवून त्याच्या आज्ञा लागू करण्याची शक्ती प्राप्त करण्यासाठी जी युद्धे केली, तह केले, करार केले आणि एक राज्यप्रमुख म्हणून ते सर्वकाही आपल्या विशिष्ट शैलीत व अत्यंत पावित्र्य व शुचिर्भूततेने केले, जे अन्य सर्वसत्ताधिकाराच्या दावेदारांचे प्रतिनिधी करतात. तर मग त्यांना शासनाची रूची आणि ऐश्वर्याचा शौक होता काय? मग हे सर्वकाही त्यांनी का केले? ही गोष्ट स्पष्ट आहे की, बालकाचे शिक्षण केवळ प्रेम व ममता आणि प्रलोभन व प्रोत्साहनाने होत नाही, तर तंबी व शिस्तपालनाचीसुद्धा गरज असते. अगदी तसेच प्रत्येक चिंतन कृतीची व्यवस्था आपल्या गरजेप्रमाणे लोक तयार करण्यासाठी शक्तीचा प्रयोग करतात. इस्लामसुद्धा हेच करतो. अल्लाहच्या आवडीची माणसे तयार करण्यासाठी जेथे धर्मावरील दृढ श्रद्धा व सदाचार, प्रलोभन व प्रोत्साहन आणि धार्मिक प्रवचन व उपदेश आवश्यक आहे, तेथे शक्तीचा सोटासुद्धा आवश्यक आहे. आता ही गोष्ट प्रकाशमान दिनाप्रमाणे स्पष्ट झालेली आहे की, शक्तीचा हा सोटा जर अल्लाहच्या सर्वसत्ताधिकारी असण्याशी व त्याच्या प्रसन्नताप्राप्तीशी जोडलेला असेल, तर ही अल्लाहची मोठी कृपा आहे. जर हा सोटा या गोष्टीपासून मुक्त होऊन अपात्र हातात गेला तर माणसासाठी तितकेच मोठे संकट ठरेल.
पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जीवनाचा अभ्यास या प्रकाशात करा. आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की, जर माणसांची एखादी जमात त्या सत्य उपास्यांच्या सेवेत निमग्न होऊन त्याच्याच सर्वसत्ताधिकाराची गुलाम बनल्यास तिला या जगात असा सन्मान व प्रतिष्ठा, अशी शांतता व पवित्र जीवन मिळेल जे एखाद्या अन्य पद्धतीने मिळू शकत नाही. अल्लाहचा गुलाम आणि तो निराश्रित असावा, हे कसे शक्य आहे? आणि अशातली गोष्ट नव्हे की कधी काळी असे घडले होते, तर -
'आज भी हो जो इब्राहीम सा ईमा पैदा।
आग कर सकती है अंदाजे गुल्सिता पैदा॥'
अर्थात - जर आजसुद्धा पैगंबर इब्राहीम (अ.) सारखी अढळ श्रद्धा निर्माण झाली तर पैगंबर इब्राहीम (अ.) यांना आगीत टाकले असता अल्लाहच्या कृपेने ती आग एका उद्यानात परिवर्तित झाली होती. तसला चमत्कार पुन्हा घडेल व आजदेखील आग उपवनात बदलेल.

इस्लामच्या जीवनपद्धतीमध्ये पवित्र व महत्त्वपूर्ण मानला जातो. पवित्र रमजानचे रोजे अर्थात उपवासाचे शुभागमन झाले आहे. चांद्रदर्शन झाल्यानंतर हा पवित्र महिना सुरू होतो. सर्वशक्तिमान परमकृपाळू, दयाळू ईश्वराकडून पवित्र रमजान महिन्याचे आगमन झाले आहे.
रमजान महिन्यात पवित्र कुरआन अवतरित झाले. जे मार्गदर्शन आहे अखिल मानवजातीसाठी आणि मार्गदर्शनाचे सुस्पष्ट प्रमाण आणि सत्य व असत्यादरम्यान फरक करणारी कसोटी आहे. पवित्र कुरआन ईश्वराकडून अखिल मानवजातीसाठी मोठी देणगी आहे. मानवी जीवन सुखी, समाधानी व आनंदी असावे हा कुरआनचा मुख्या उद्देश आहे. रमजान महिन्यात कुरआनचे अवतरण झाल्यामुळे या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मूळ अरबी भाषेतील कुरआनचे मराठी, इंग्रजी, हिंदीसह जगातील अधिकांश भाषांमध्ये अनुवाद उपलब्ध आहेत.
आपले आचारविचार व व्यवहार आपल्या निर्माणकर्त्या ईश्वराच्या इच्छेनुसार आयुष्य घडविण्याचा आणि अखिल मानव समूहामध्ये प्रेम, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणारा हा पवित्र रमजान आहे. या महिन्यात मानवाला सच्चरित्राचे प्रशिक्षण लाभते. मुस्लिम बांधवांकडून या महिन्यात पुण्यकर्म केले जाते. जणू एक पुण्यकर्म केले तर एक हजार पुण्यकर्म केल्याचे श्रेय मिळते. एक वेळची नमाज पठण कराल तर सत्तरपटीने त्याचे पुण्य ईश्वर देत असतो.
परमकृपाळू ईश्वराने रोजाची म्हणजेच उपवासाची आज्ञा दिली. इतर उपवासांपेक्षा या अनिवार्य उपवासाचे स्वरूप वेगळे आहे. उपवास फक्त पोटाचा नाही तर शरीरातील अवयवांचा आहे. डोळ्यांचा- कोणतीही वाईट गोष्ट पाहू नये, हाताने वाईट कृत्य करू नये, जिभेने वाईट संभाषण करू नये. कानाने वाईट शब्द ऐकू नये. पायाने वाईट मार्गावर चालू नये. अशा प्रकारे उपाशी राहून या पद्धतीने आचरण केले तर ईश्वराजवळ हा उपवास मंजूर होतो. उपवासामुळे अन्नपाण्याविना राहाव्या लागणाऱ्या वेदणेची जाणीव होते. भुकेलेल्यांना अन्नपाणी किती गरजेचे आहे कळते.
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘रमजान सहानुभूतीचा, आपुलकीचा, दु:खनिवारण करण्याचा महिना आहे. मानवाची सेवा करून पुण्य मिळवा. मानवांची सेवा हीच ईश्वराची सर्वश्रेष्ठ सेवा आहे. निराधार विधवा स्त्री, अनाथ मुले, वृद्ध आईवडिलांची सेवा करा, तुम्हाला स्वर्गात स्थान मिळेल.’
ईश्वराने श्रद्धावंतांवर जकात अर्थात कर अनिवार्य केला आहे. आपल्या उत्पन्नाच्या अडीच टक्के हिस्सा जकातीपोटी दान करावा. दानामुळे मानवी मनातील स्वार्थ आणि लालसेला पायबंद घालण्याचा प्रयत्न आहे. जकातीची रक्कम गोरगरीब, अडलेले, निराधार विधवा स्त्री, अनाथ मुलामुलींच्या कल्याणासाठी वापरावी. दीनदलितांचे दु:ख दूर करणे ईश्वराला प्रसन्न करण्याचा मार्ग आहे. जकात अशी द्या एका हाताने दिले तर दुसऱ्या हाताला कळू नये. जकात देण्याची ऐपत असेल अशा श्रद्धावंतांनी जकात द्यावी. परंतु सदका-ए-फित्र हे अनिवार्य दान कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडून पावणे दोन किलो गहू किंवा त्याची रक्कम गरजू व्यक्तीला द्यावी. सदकारूपी दान हे पवित्र रमजान महिन्यामध्येच दिले जाते.
कोरोना विषाणूच्या वैश्विक महामारीच्या या काळात पवित्र रमजान महिन्यात श्रद्धावंतांनी उपवास, नमाज, तरावीह ही आपापल्या घरीच करावे जेणेकरून कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये. केंद्र व राज्य शासनाचे आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून शासनाला सहकार्य करावे. अखिल मानवजातीला या महाभयंकर आजारापासून ईश्वर मुक्त करेल.
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ‘जर कुणी तुमच्याजवळ एखादी बातमी घेऊन आला तर तिची चौकशी करा. सत्यता पडताळा. अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या मानवबंधूचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका. कुणाचीही बदनामी करू नका. इतरांचे नुकसान करणारी व्यक्ती ईश्वराला अजिबात आवडत नाही.’
अखिल मानवजातीला ईश्वर कोरोनामुक्त करो, हीच प्रार्थना!

-जमीर नारदेकर,  कसबे डिग्रज, (जि. सांगली)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘गुलामाला अन्न व कपडे देणे आणि तो सहन करू शकेल इतकेच कामाचे ओझे त्याच्यावर टाकले जावे हा त्याचा अधिकार आहे.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
मूळ हदीस मध्ये ‘ममलूक’ हा शब्द आला आहे, त्याचा अर्थ गुलाम आणि सेविका आहे, जे इस्लामच्या पुनरुत्थानापूर्वी अरब समाजात आढळत होते. लोक त्या गुलामांशी आणि  सेविकांशी पशुपेक्षाही वाईट व्यवहार करीत होते. त्यांना व्यवस्थित जेवण देत नव्हते की त्यांना व्यवस्थित कपडे घालायला देत नव्हते आणि इतके काम करून घ्यायचे की त्यांना ते  असह्य व्हायचे. जेव्हा इस्लामचे पुनरुत्थान झाले तेव्हा हा वर्ग अस्तित्वात होता. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मुस्लिम समाजाला उपदेश दिला की त्यांच्याशी मानवतेचा व्यवहार करावा,  त्यांना तेच खायला व प्यायला द्या जे तुम्ही खाता-पिता आणि तेच कपडे घालण्यासाठी द्या जसे तुम्ही परिधान करता आणि त्यांना शक्य असेल तितकेच काम त्यांच्याकडून घ्या.
असाच व्यवहार तुमच्याबरोबर रात्रंदिवस राहणाऱ्या सेवकाशीदेखील करा. सेवकांशी कशी वागणूक असायला हवी हे जाणून घेण्यासाठी माननीय अबू कलाबा (रजि.) यांचे एक कथन पाहा.  अबू कलाबा (रजि.) यांच्या कथनानुसार, माननीय सलमान फारसी (रजि.) गव्हर्नर असताना त्यांच्याकडे एक मनुष्य आला. ते आपल्या हाताने पीठ मळत असल्याचे त्याने पाहिले.  त्याने विचारले, ‘‘हे काय?’’ सलमान फारसी (रजि.) म्हणाले, ‘‘मी माझ्या सेवकाला एका कामानिमित्त बाहेर पाठविले आहे आणि त्याच्यावर दोन्ही कामांचा भार टाकणे मला पसंत  नाही.’’

माननीय अबू हुरैरा यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सेविका व सेवक (गुलाम) तुमचे बंधु आहेत. त्यांना अल्लाहने तुमच्या ताब्यात दिले आहे. अल्लाहने ज्या भावाला तुमच्यापैकी एखाद्याच्या ताब्यात दिले असेल तर त्याने तेच खायला दिले पाहिजे जे तो स्वत: खातो आणि त्याच प्रकारचे कपडे नेसायला दिले पाहिजेत जे तो स्वत:  परिधान करतो आणि त्याच्यावर कामाचा इतका भार टाकू नये जो त्याच्या शक्तीच्या बाहेरचा असेल. जर त्याच्या शक्तीपेक्षा अधिक भार असलेले काम त्याला दिले गेले आणि ते  काम तो करू शकत नसेल तर त्याच्या कामात त्याची मदत करावी.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा तुमच्यापैकी कोणा एकाचा सेवक जेवण बनवून त्याच्याजवळ घेऊन येईल आणि स्थिती  अशी आहे की त्याने जेवण बनविताना उष्णता व धुराचा त्रास सहन केलेला आहे, तेव्हा मालकाने त्याला आपल्याबरोबर बसवून जेऊ घालायला हवे. जेवणाचे पदार्थ कमी असतील तर  एक घास अथवा दोन घास त्यामधून त्याच्या हातात ठेवावेत.’’ (हदीस : मुस्लिम)

माननीय अबू बक्र सिद्दीक (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘आपल्या गुलामांवर व सेवकांवर आपल्या अधिकारांचा वाईट वापर करणारा स्वर्गात  (जन्नतमध्ये) दाखल होणार नाही.’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! त्या लोकसमुदायात दुसऱ्या लोकसमुदायांच्या तुलनेत गुलाम व अनाथ अधिक असतील, असे आपणच  आम्हाला सांगितले नव्हते काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘होय, मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली आहे, तेव्हा तुम्ही लोकांनी आपल्या मुलाबाळांप्रमाणेच त्यांचे स्वागत करा आणि त्यांना तेच  जेवण द्या जे तुम्ही खाता.’’ (हदीस : इब्ने माजा)

माननीय अबू उमामा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माननीय अली (रजि.) यांना एक गुलाम दिला आणि म्हटले, ‘‘याला मारू नका, कारण मला नमाजीला  मारण्यापासून मनाई करण्यात आली आहे आणि मी याला नमाज अदा करताना पाहिले आहे.’’ (हदीस : मिश्कात)

इस्लाममध्ये सामुहिकतेला महत्त्व आहे. प्रत्येक बाबतीत सामुहिकतेला प्राधान्य देण्याकडे इस्लामचा कल असतो. नमाज घरामध्ये सुद्धा अदा करता येते परंतु ती मस्जिदमध्ये जाऊन सामुहिकरित्या अदा करण्याची ताकीद करण्यात आलेली आहे. नमाजप्रमाणेच जकातसुद्धा वैयक्तिकरित्या दिली जाऊ शकते आणि बहुतेक करून आजही वैयक्तिकरित्याच दिली जाते. मात्र जकातचा अगदी थोडा भाग आपल्या गरीब नातेवाईकांसाठी राखीव ठेवता येतो. बाकी सर्व जकात हा सामुहिकरित्या बैतुलमाल (सार्वजनिक निधी) मध्ये  द्यावा लागतो. मग एकत्रित झालेली जकातच्या राशीचा हिशोब करून त्या राशीचा कुरआनच्या सुरे तौबामधील आयत नं. 60 प्रमाणे 8 भागात विभागणी केली जाते व गरजवंतापर्यंत पोहोचविली जाते. ज्यावर्षी ज्या विभागामध्ये जास्त गरज असेल त्या विभागामध्ये समिती जास्त राशीची तरतूद करू शकते.
  
जकात कोणाला देते येते?
    सुरे तौबाच्या आयत क्र. 60 मध्ये म्हटलेले आहे की, ” हे दान तर खर्‍या अर्थाने फकीर आणि गोरगरीबांसाठी आहे आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईश्‍वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता आहे, एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्वकारी जाणणारा दृष्टा व बुद्धीमान आहे.”  
    1. फकीर 2. मिस्कीन म्हणजे सफेद पोश म्हणजे असे लोक जे वरकरणी सुस्थितीत वाटतात मात्र प्रत्यक्षात गरीब असतात. ते स्वत:च्या इज्जतीला भिऊन कोणासमोर हात पसरत नाहीत मात्र त्यांच्याकडे पाहून अंदाज येतो असे लोक. विशेषत: लॉकडाउनच्या काळात अशा लोकांची संख्या वाढलेली आहे. त्यांच्याकडे लक्ष देउन या निधीतून त्यांची मदत केली जाउ शकते. 3. जकात वसूल करण्यासाठी नियुक्त केलेले लोक 4. तालीफे कुलूब (दिलजमाई) म्हणजे असे लोक ज्यांच्या मनात इस्लाम मध्ये येण्याची तीव्र इच्छा आहे, मात्र त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत. इस्लाममध्ये आल्यामुळे त्यांचे काही आर्थिक स्त्रोत बंद पडण्याची शक्यता आहे. असे लोक. 5. प्रवासी - यात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय सुद्धा सामील आहेत. प्रवास करत असतांना अचानक कोणाला काही घातपात झाला, अपघात झाला, चोरी झाली किंवा आणखीन काही अभद्र घटना घडली आणि ते सधन असून सुद्धा द्रव्यहीन झाले तर अशा लोकांची सुद्धा जकात मधून मदत करता येते. 6. मान सोडविण्यासाठी - साधारणत: याच्यात निर्दोष मुस्लिम ज्यांच्या माना काही कारणाने तुरूंगामध्ये अडकलेल्या आहेत, अशांना मुक्त करण्यासाठी 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्‍वरीय मार्ग सुलभ करण्यासाठी जकातचा उपयोग करता येतो. 8. कर्जदारांना मदत करण्यासाठी. वरील प्रमाणे आठ विभागामध्ये जकातीतून खर्च केला जाऊ शकतो. याशिवाय, जकातीचा उपयोग अन्य कारणासाठी करता येऊ शकत नाही.
    आज साधारणपणे आपल्या देशात जकात ही सामुहिकपणे काढली जात नाही. त्यामुळे त्याची बरकतसुद्धा जाणवत नाही. छोट्या-छोट्या टुकड्यांमध्ये जकात दिली जात असल्यामुळे त्याचा फारसा लाभ कोणाला होत नाही. जकात एक सामुहिक-आर्थिक, इबादत आहे. प्रत्येक शहरामध्ये जकात एकत्रित करण्याची व्यवस्था तयार करणे अपेक्षित आहे. आदर्श स्थिती ही आहे की, प्रत्येक शहरामध्ये जबाबदार आणि अमानतदार लोकांची एक समिती गठित करण्यात यावी. त्या समितीकडे गावातल्या प्रत्येक साहेबे निसाब (जकात देण्यास पात्र) व्यक्तीने जकात जमा करावी. गोळा झालेल्या जकातीच्या रकमेचा अंदाज घेऊन मग समितीने वर नमूद आयातीमध्ये आठ विभागामध्ये आवश्यकतेप्रमाणे त्याची विभागणी करावी व गरजवंतांमध्ये त्याचे वितरण करावे.
    भारतामध्ये कुठलेही वर्ष असे जात नाही ज्यावर्षी कुठे ना कुठे दंगली होत नाहीत. दंगलीमध्ये होरपळून गेलेल्या लोकांना शासकीय मदत मिळत नाही. अशा वेळेस जकातीचा काही निधी राखीव ठेवला जावा व त्यातून या भरडल्या गेलेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे. शिवाय अनेकवेळेस अपघातामध्ये अनेक कुटुंबामधील कमावती लोकं दगावतात. अशा परिस्थितीत घरच्या परदानशीन महिला आणि मुलं उघड्यार पडतात. अशा लोकांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सुद्धा जकातच्या निधीचा उपयोग करता येईल. अनेक तरूण अनेक वर्षांपासून आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली तुरूंगामध्ये खितपत पडलेले आहेत. त्यांच्या घरातील सदस्यांना वार्‍यावर सोडून देण्यात आलेले आहे. समाजातील कोणीही त्यांची पुढे होवून मदत करण्यासाठी तयार नाही. अशा कुटुंबांच्या मुलभूत गरजा दूर करण्यासाठी व त्या तरूणांना तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा जकातीचा पैश्याचा सदुपयोग करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र असे घडत नाही. मुस्लिम समाजात अशिक्षितपणा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे संघटित होण्यासाठी ज्या दर्जाचा विचार समाजामध्ये रूजणे आवश्यक आहे तो गेल्या 70 वर्षात रूजलेला नाही. त्यामुळे असंघटित समाजाला ज्या यातना सोसाव्या लागतात त्या यातनांमधून हा समाज जात आहे. समाजातील बुद्धीवंत, उलेमा, प्रेस यांना याबाबतीत जनजागृती करता आलेली नाही. त्यामुळे घरासमोर जो जकात मागायला येईल, त्याला जकात देऊन जकात अदा केल्याचे समाधान मानण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. अनेक गैरसरकारी संस्था सुद्धा जकात गोळा करतात. मात्र कुरआनमध्ये सांगितलेल्या आठ विभागात त्याची विभागणी करून त्याचे वितरण काटकोरपणे करत असतील याची शक्यता कमीच आहे. जमाअते इस्लामी हिंद आणि काही मोजक्या संस्था अशा आहेत ज्या जकात जमा करण्याची आणि त्याचे काटकोरपणे वितरण करण्याची व्यवस्था बाळगून आहेत. या संस्थांच्या द्वारे स्वत:च्या आर्थिक व्यवहाराची सी.ए.कडून तपासणीसुद्धा केली जाते. एकूणच असंघटित जकात व्यवस्थेमुळे त्याचे हवे तसे परिणाम दिसून येत नाहीत. खरे तर आजकाल समाजमाध्यमांचा जमाना आहे.  जकात गोळा करणे व वितरीत करणे यासाठी या माध्यमाचा उपयोग करता येईल.
    जकात एक ईश्‍वरीय कर आहे. त्यामुळे त्याचे वैशिष्ट्यही वेगळे आहे. जगातील जेवढ्या काही कर व्यवस्था आहेत, त्या एकतर कमाईवर (इन्कम) किंवा विक्रीवर (सेल) कर लावतात. या दोन्ही प्रकारच्या कर व्यवस्थेमध्ये कराची चोरी करता येते. मात्र इस्लाममध्ये कमाईवरही टॅक्स लावला जात नाही आणि विक्रीवरही नाही. तुम्ही एका वर्षात एक कोटी कमाविले आणि एक कोटी खर्च केले तुमच्यावर कर शुन्य. इस्लाममध्ये कर बचतीवर लावण्यात आलेला आहे आणि बचत लपविता येत नाही. साधारणपणे बचतीवर एक वर्षे पूर्ण झाल्यावर 2.5 टक्के एवढी जकात देणे प्रत्येक साहेबे निसाब (सधन) व्यक्तीवर बंधनकारक आहे. भारतात सर्व प्रकारचे उदा. आयकर, विक्रीकर, जीएसटी, सेस इत्यादी कर देऊन सुद्धा सधन मुस्लिम स्वेच्छेने आपल्या बचतीवर 2.5 टक्के जकात अदा करतात आणि गरीबांची मदत करतात, ही आपल्यासाठी मान उंचावणारी आणि संतोषजनक बाब आहे.

लेखक - सय्यद अबुल आला मौदुदी

भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार


आयएमपीटी अ.क्र. ५१     पृष्ठे - ४०      मूल्य - 15          आवृत्ती - 3 (2011)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/dljf5pffxwov1ti0riyr0q1krdrrdke2

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget