Latest Post

मुस्लिम तर प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायी आहेतच. ते त्यांना महानतम व अंतिम ईशदूत मानतात. आणि ते त्यांच्या प्रत्येक वचन, प्रत्येक कार्य व प्रत्येक शिकवणीवर पूर्ण विश्वास ठेवतात. त्यांनी प्रेषितांवर (ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर) कितीही श्रद्धा ठेवली व त्यांची कितीही प्रशंसा केली तरी कमीच आहे. मुस्लिमेतर विद्वान प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासंबंधी काय म्हणतात?
या शृंखलेत केवळ भारत व युरोपातील मुस्लिमेतर विद्वानांची मते व त्यांचे कथन एकत्रित केलेले आहे.


प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात यहुदी (ज्यू) व इसाई (ख्रिश्चन) लोकांत ज्या वाईट समजुती व कुप्रथा पसरल्या होत्या त्यांचे वर्णन केल्यावर मिस्टर वास्वर्थ स्मिथ यांनी आपल्या पुस्तक 'मुहम्मद अँड मुहम्मदइज्म'मध्ये लिहिले आहे -
"प्रेषित मुहम्मद (स.) अशासाठी आले की त्या सर्व खोट्या गोष्टी त्यांनी पुसून टाकाव्यात. मूर्ती काय आहे? निव्वळ जैतूनच्या (ऑलिव्हच्या) लाकडाचे तुकडे, जे ईश्वर असल्याचा दावा करतात, त्यांची वास्तविकता काय आहे? भ्रमजनक दार्शनिक विचार जणू कोळ्याने विणलेले जाळे व अधर्म, हे सर्वदूर करावे. अल्लाह सर्वात महान आहे आणि त्याच्याशिवाय कोणीही महान नाही. हाच आहे मुस्लिमांचा धर्म इस्लाम म्हणजे माणसाने अल्लाहच्या मर्जीवर विश्वास ठेवावा आणि असे करण्यात अत्यंत प्रसन्नता प्राप्त करावी. हीच मुस्लिमांची जीवनप्रणाली होय. एक टीकाकार असा प्रश्न करू शकतो की या दोन्ही सिद्धान्तामध्ये ज्यांचा उल्लेख वर केला आहे त्यात अशी कोणती गोष्ट आहे जिला असे म्हणावे की ती नवीन होती किंवा केवळ प्रेषित मुहम्मद (स.) यांनाच सुचली होती? नि:संशय कोणतीही नवीन गोष्ट नव्हती तर या गोष्टी तितक्याच पुरातन होत्या जितका पुरातन आदरणीय मूसा (अ.) यांचा काळ, इतकेच नव्हे तर या गोष्टी तितक्याच प्राचीन होत्या जितके खुद्द आदरणीय इब्राहीम (अ.) होते. प्रेषित महम्मद (स.) यांनी वारंवार अत्यंत गंभीरपणे सांगितले आहे की मी अरबांसाठी एखादी नवीन गोष्ट घेऊन आलेलो नाही, तर आदरणीय इब्राहीम (अ.) यांच्या धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आलेलो आहे. हा धर्म सदैव येथे नांदत राहिला आहे. परंतु लोकांना याचा विसर पडलेला आहे अथवा याच्यापासून गाफील झालेले आहेत. जातीपासून वेगळे व शोकग्रस्त आणि अप्रसन्न. यहूदी लोक आपसात भांडणाऱ्या तीन ईश्वरांना मानणाऱ्या इसाई (ख्रिश्चन) आणि सर्व प्रकारच्या प्राणीपूजकांत एक उंट हाकणारा आला, अशसाठी नव्हे की त्याने त्यांना एखादी नवी गोष्ट शिकवावी तर ज्या जुन्या गोष्टी ते विसरून गेले आहेत, त्यांची आठवण त्यांना करून द्यावी. अरबस्थानच्या भूमीवर दोन हजार वर्षांपूर्वी एक अशा व्यक्तीला (आदरणीय मूसा (अ.)) जो जंगलात आपल्या वडिलांच्या (सासऱ्याच्या) शेळ्या चारीत होता, त्याला हा साधा परंतु चकित करणारा संदेश आला होता - 'मी तो आहे जो मी आहे. ऐक, हे इस्राईल! आमचा स्वामी अल्लाह एक आहे. म्हणून जा! मी तुझ्या जिभेबरोबर असेन आणि तुला जे सांगावयास पाहिजे, ते तुला मी शिकवीन.'

हे शब्द ऐकूनही सन्मानप्राप्त जात (बनीइस्राईल) आफ्रिका सोडून आशियात गेली. गुलाम मुक्त झाले आणि एक वंश एक जात बनले. त्याच अरबस्थानच्या भूमीवर आता पुन्हा तो आवाज एका अन्य शेळ्या चारणाऱ्याला आला जो पहिल्या आवाजापेक्षा काही कमी विचित्र अथवा सामान्यपणे जगाला लाभ पोचविण्याच्या दृष्टीने त्यापेक्षा काही कमी नव्हता, म्हणजे “अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मर्रसूलुल्लाह' हा संदेश देणाऱ्याचा स्वीकार केला व अल्लाहच्या संदेशाची घोषणा केली गेली आणि एका शतकात त्याचा आवा एडनपासून अन्ताकिया (आशियाई रोमन साम्राज्याचे केंद्र) पर्यंत व सेबील (स्पेनचा एक प्रांत व शहर) ते सरकंदपर्यंत पसरला आणि त्या सर्व देशांत त्याची सत्यता मान्य केली गेली.
-एजाजुत्तंजील, पृ. २८-२९

लेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही

भाषांतर : मुबारक हुसेन मनियार

एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म्हणून सर्व प्रथम हे आवश्यक आहे की आम्ही अनेकेश्वरवादाची व्याख्या करावी आणि त्यानंतर त्याचे प्रकार वकृतीशी संबंधित प्रश्नावर चर्चा केली जावी.
सदर पुस्तकाची रचना लेखकांच्या सामान्य पध्दतीनुसार नाही की एखादा विषय समोर आलेला असावा आणि केवळ बाह्य समानतेला समोर ठेऊन त्याच्याशी संबंधित कांही आयती (बोधवाक्ये) पवित्र कुरआनमधून एकत्र केली गेली असावीत आणि काही साहित्य इकडून-तिकडून एकत्रित केले गेले असावे आणि मग या सर्व साहित्याला एकत्रित करून एक पुस्तक बनविले असावे, तर या पुस्तकात जे विचार पवित्र कुरआनातील दूरदर्शीपणा संबंधाने प्रकट केले गेले आहेत त्यांचे मी वारंवार परीक्षण केले आहे. त्यातील दुर्बलता वसामर्थ्याची परीक्षा घेतली आहे आणि अनेक वर्षांच्या परीक्षण व शुध्दीकरणानंतर या दूरदर्शीपणाच्या गोष्टींची नोंद या विचाराने करून ठेवली होती की जेव्हा महान अल्लाहची इच्छा होईल तेव्हा माझ्या दृष्टीसमोर असलेल्या पवित्र कुरआनच्या टीकेत (भाष्यात) या नोंदीचे कथन योग्य प्रसंगी केले जाईल.

आयएमपीटी अ.क्र. 71       पृष्ठे - 172    मूल्य - 45          आवृत्ती - 1 (Feb. 2004)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/cer03h07exqzayxa4xwifg2353am0crm

Quran
अल्लाह आपल्या पवित्र ग्रंथात आदेश देतो,
“सांगा, माझी नमाज, माझ्या तमाम उपासनेच्या पद्धती, माझे जीवन व मरण, सर्वकाही समस्त विश्वांचा स्वामी अल्लाहसाठीच आहे. ज्याचा कोणीही भागीदार नाही. अशीच मला आज्ञा दिली गेली आहे आणि सर्वप्रथम आज्ञापालनात मान तुकविणारा मीच आहे."
(कुरआन-६:१६२-१६३) या आयतीचे स्पष्टीकरण प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या या कथनाने होते,
“ज्याने एखाद्याशी मैत्री व प्रेम केले तर ते अल्लाहसाठी आणि वैर केले तर अल्लाहसाठी आणि कुणाला दिले तर ते अल्लाहसाठी व एखाद्याला नकार दिला तर ते अल्लाहसाठी. अशा प्रकारे त्याने आपला ईमान पक्का केला म्हणजे तो पूर्णपणे मुस्लिम झाला."
जी आयत मी आपल्यासमोर प्रस्तुत केली त्यावरून असे कळते की इस्लामची अशी अपेक्षा आहे की माणसाने आपली उपासना आणि आपल्या जीवन व मृत्यूला केवळ अल्लाहसाठी विशिष्ट करावे आणि अल्लाहशिवाय कोणासही त्यात सहभागी करू नये, म्हणजे उपासना व त्याचे जीवन व त्याचे मरणे अल्लाहशिवाय अन्य कोणासाठी असू नये.
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या वाणीचे जे स्पष्टीकरण मी आपणास ऐकविले त्यावरून असे समजते की माणसाचे प्रेम व शत्रुत्व आणि आपल्या ऐहिक जीवनातील व्यवहारात त्याची देवाण-घेवाण केवळ अल्लाहसाठीच असणे ही ईमानची निकड आहे. त्याशिवाय ईमानला पूर्णत्व प्राप्त होत नाही, मग उच्च दर्जा प्राप्त होण्याची कवाडे खुली होण्याची गोष्टच कशाला? जितकी कमतरता यात या बाबतीत होईल तितकीच उणीव माणसाच्या ईमानमध्ये असेल. आणि जेव्हा अशा प्रकारे मनुष्य पूर्णपणे अल्लाहचा होईल तेव्हा कुठे जाऊन त्याचा ईमान पूर्ण होईल.
काही लोकांचा असा समज आहे की अशा प्रकारच्या गोष्टी केवळ श्रेष्ठ दर्जाचे द्वार उघडे करतात, नाहीतर ईमान व इस्लामसाठी माणसात ही स्थिती उत्पन्न होण्याची अट नाही. अन्य शब्दांत याचा अर्थ असा की या स्थितीशिवायदेखील मनुष्य मुस्लिम असू शकतो. परंतु हा चुकीचा समज आहे व हा चुकीचा समज उत्पन्न होण्याचे कारण असे आहे की सामान्यत: लोक (इस्लामी) धर्म शास्त्रीय व कायदेशीर इस्लाम आणि त्या वास्तविक इस्लाममध्ये जो अल्लाहच्या दृष्टीने विश्वसनीय आहे, फरक करीत नाहीत.

माननीय अबू मूसा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मुस्लिम मुस्लिमासाठी इमारतीसमान आहे जिचा एक भाग दुसऱ्या भागाला शक्ती प्रदान करतो.’’ मग पैगंबरांनी आपल्या एका हाताच्या बोटांना दुसऱ्या हाताच्या बोटांशी जुळवून दाखविले. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

या हदीसमध्ये मुस्लिम समाजाला इमारतीची उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे त्या इमारतीच्या विटा एकमेकांशी जुळलेल्या असतात त्याप्रमाणे मुस्लिमांना आपसांत जुळून राहिले पाहिजे आणि मग ज्याप्रकारे विटा एकमेकांना शक्ती व आधार देतात त्याप्रकारे त्यांनीदेखील एकमेकांना आधार दिला पाहिजे. ज्याप्रमाणे विस्कटलेल्या विटा एकमेकांना जुळून मजबूत इमारतीचे स्वरूप साकारतात त्याप्रमाणे मुस्लिमांच्या शक्तीचे रहस्य त्यांच्या आपसांत जुळण्यात आहे. जर त्या विस्कटलेल्या विटांसारखे राहिले तर त्यांना वाऱ्याची प्रत्येक झुळूक उडवून घेऊन जाईल आणि पाण्याची प्रत्येक लाट वाहून नेऊ शकते. शेवटी ही हकीकत एका हाताच्या बोटांना दुसऱ्या हाताच्या बोटांशी जुळवून स्पष्ट करून सांगितले.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मुस्लिम मुस्लिमचा आरसा आहे आणि मुस्लिम मुस्लिमचा भाऊ आहे. तो त्याला विनाशापासून वाचवितो आणि पाठीमागून त्याचे संरक्षण करतो.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण

‘एक मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमसाठी आरसा आहे.’ म्हणजे त्याच्या त्रासाला आपला त्रास समजतो. ज्याप्रमाणे तो आपल्या त्रासामुळे तडफडतो तसाच हादेखील तडफडेल आणि तो त्रास कमी करण्यासाठी बेचैन होईल.

‘‘तुमच्यापैकी प्रत्येकजण आपल्या बंधुचा आरसा आहे. जर तो संकटात असेल तर त्याचे संकट दूर करील.’’

स्पष्टीकरण
अशा प्रकारे जर त्याच्यात एखादी दुर्बलता पाहतो तेव्हा त्याला आपली दुर्बलता समजून ती नष्ट करण्याचा प्रयत्न करतो.
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तू आपल्या बंधुची मदत कर, मग तो अत्याचारी असो की अत्याचारपीडित.’’ तेव्हा एका मनुष्याने विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! अत्याचारपीडित असेल तर मी त्याची मदत करीन, परंतु तो अत्याचारी असेल तर मी त्याची कशाप्रकारे मदत करू शकेन?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तुझे त्याला अत्याचार करण्यापासून रोखणे हेच त्याला मदत होईल.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मुस्लिम मुस्लिमचा भाऊ आहे. तो त्याच्यावर अत्याचार करीत नाही आणि त्याला एकटे सोडत नाही आणि आपल्या भावाची आवश्यकता पूर्ण करील, अल्लाह त्याची आवश्यकता पूर्ण करील. जो मनुष्य एखाद्या मुस्लिमाची अडचण दूर करील, अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याची अडचण दूर करील. जो मनुष्य एखाद्या मुस्लिमचे दोष लपवील, अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याचे दोष लपवील.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीरकण : हदीसचे शेवटचे शब्दांचा अर्थ असा आहे की जर सदाचारी मुस्लिमकडून एखादी चूक घडली तर त्याला लोकांच्या नजेतून उतरविण्यासाठी ठिकठिकाणी सांगत फिरण्याऐवजी त्याच्या दोषांवर पडदा घाला, त्या मनुष्याच्या विपरीत जो उघडपणे अल्लाहची अवज्ञा करतो, तेव्हा त्याच्या दोषांना लपविण्याऐवजी त्याला उघडे पाडण्याचा पैगंबरांनी आदेश दिला आहे.

लोक समजतात अल्लाहव्यतिरिक्त इतरही शक्ती अन्नपुरवठा करतात, पालनपोषण करतात, आरोग्य व सुदृढ देहयष्टी देतात, म्हणून ते त्यांची उपासना करू लागलेत. मानवाने पालनकर्त्या अल्लाहचे पालनपोषणाचे श्रेय इतरांशी निगडीत केले, कारण ते त्यांना अनन्यसाधारण शक्ती व सामर्थ्यांचे धनी वाटतात. काही लोकांना देवदूत तर काहींना माणसे, काहींना ग्रह तर काहींना नक्षत्रे, जनावरे, वृक्ष मानवाचे हितकर्ते व मानवाच्या गरजा पुरविणारे वाटतात. काही तर माणसांनाच माणसाचे पालनकर्ते मानतात. सम्राट नमरुद इराकचा शासक होता, सर्व शक्ती त्याच्या हातात एकवटली होती. म्हणून तो स्वत:ला तेथील जनतेचा पालनकर्ता समजू लागला. म्हणून इब्राहीम (अ.) यांनी त्यास म्हटले की, माझा पालनकर्ता जीवनदाता आहे व जीवनाचा अंतही करणारा आहे. नमरुद उत्तरला, “मीही ज्याला हवे त्याला जीवित ठेवतो व नको असेल त्याला मारून टाकतो." मग इब्राहीम (अ.) यांनी सांगितले, “माझा अल्लाह पूर्वेकडून सूर्याचा उदय करतो, तू असे कर की सूर्योदय पश्चिमेकडून करून दाखव." नकारवादी नमरुद निरुत्तर झाला. त्याला ठाऊक होते की, तो स्वत: जगाचा पालनकर्ता नाही. तरीही त्याने लोकांचा पालनकर्ता असण्याचा हट्ट सोडला नाही.
याचप्रमाणे किंग फारोह (फिरऔन) ची कथा आहे. फारोहने जाहीर केले होते की, तो सर्वांत मोठा पालनकर्ता आहे. कारण त्याचे संपूर्ण इजिप्तवर वर्चस्व होते. मात्र एकेश्वरत्वात पालनकर्त्यांचा सहकारी किंवा भागीदार नसतो, म्हणून कुरआनात अल्लाहस बऱ्याच ठिकाणी 'पालनकर्ता' संबोधिले गेले आहे. उद्देश हाच की, मानवाच्या मनावर ही बाब खोलवर रुजविली जावी की, अल्लाहच सर्वांचा पालनकर्ता व आराध्य आहे व त्याच्याव्यतिरिक्त साऱ्या मानवजातीचा इतर कोणीही पालनकर्ता नाही व आराधनेस पात्रही नाही. निश्चितच याच दृढ श्रद्धाभावनेने संपूर्ण मानवजातीचे कल्याण व उत्कर्ष साधता येईल.

मुस्लिम तर प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायी आहेतच. ते त्यांना महानतम व अंतिम ईशदूत मानतात. आणि ते त्यांच्या प्रत्येक वचन, प्रत्येक कार्य व प्रत्येक शिकवणीवर पूर्ण विश्वास ठेवतात. त्यांनी प्रेषितांवर (ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर) कितीही श्रद्धा ठेवली व त्यांची कितीही प्रशंसा केली तरी कमीच आहे. मुस्लिमेतर विद्वान प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासंबंधी काय म्हणतात?
या शृंखलेत केवळ भारत व युरोपातील मुस्लिमेतर विद्वानांची मते व त्यांचे कथन एकत्रित केलेले आहे.

मिस्टर कारलायल लिहितात -
"प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या बाबतीत कदापि असा विचार करू शकत नाही ते केवळ एक लबाड व आत्महीन व्यक्ती होते आणि आम्ही त्यांच्यासंबंधी असेही सांगू शकत नाही की ते एक नीच, अधिकारलोभी व हेतूपुरस्सर उद्देश गाठणारे होते, त्यांनी जगाला जो कठोर संदेश दिलेला आहे तो पूर्णपणे एक सत्य व वास्तविक संदेश होता आणि जरी ते एक क्रमहीन कथन होता तरीसुद्धा त्याचा उगम तेच व्यक्तित्व (ईश्वर) होते, ज्याचा ठाव कोणासही मिळाला नाही. त्या व्यक्तीचे (प्रेषित मुहम्मद (स.)) कथन व कार्यही असत्य नव्हते आणि ते सत्यापासून रिक्त व कोणाची नक्कल व अनुसरणही नव्हते. वास्तविकत: ते अविनाशी जीवनाचे एक दैदिप्यमान व्यक्तित्व होते जे निसर्गाच्या विस्तृत वक्षस्थलावरून जगाला प्रकाशित करण्यासाठी निघाले होते आणि नि:संदेह त्याच्याकरिता ईश्वराला असाच आदेश होता.”
-- एजाजुत्तंजील, पृ. ५९, बहवाला हीरोज अँड हीरो वर्शिप', द्वितीय व्याख्यान, पृ. ४३

लेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी

भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली


 एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा' म्हणजेच 'बकरईद'च्या प्रसंगी करण्यात येणारी 'कुरबानी' (अर्थात पशुबळी) च्या सार्थकता आमि औचित्यासंबंध निर्माण झालेला अथवा करण्यात आलेला आहे. आपल्या मुस्लिमेतर बांधवांच्या मनात याविषयी असा प्रश्न निर्माण झालेला आहे की,
“ज्याअर्थी इस्लामने दया आणि प्रेमभावाची शिकवण दिली, त्याअर्थी मुक्या प्राण्यांवर निर्दयतेचा सुरा का ठेवण्यात येतो? ज्याअर्थी इस्लामने आपल्या अनुयायांना प्रत्येक कार्य 'असीम दयावान व कृपावान अल्लाह'चे नाव घेऊनच सुरुवात करण्याची शिकवण दिली, त्याअर्थी मुक्या आणि निरपराध प्राण्यांचा निष्ठूरपणे वध करण्याची परवानगी कसापोटी दिली? ज्याअर्थी स्वयं कुरआनानेच आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना अशी उपाधी दिली की ते समस्त सृष्टीकरिता साक्षात दया व कृपा आहेत, तर या
सृष्टीतील निष्पाप मुके पशुपक्षी दया व कृपा असलेल्या पैगंबरांच्या दया व कृपेला पात्र नाहीत काय? कारण स्वत: प्रेषितांनीच याची परवानगी दिली आणि स्वत:देखील कुरबानी केली. एवढेच नव्हे तर 'बकरईद'च्या महत्त्वपूर्ण सणाला अल्लाह आणि प्रेषित __मुहम्मद (स.) यांनी प्राण्यांच्या कुरबानीस (पशुबळीस) धार्मिक मान्यता देऊन टाकली. अल्लाहचे नाव घेऊन करण्यात येणारे कोणतेही वाईट कर्म हे चांगले कर्म ठरते काय?"
अशा प्रकारचे प्रश्न अथवा गैरसमज आपल्या देशबांधवांना त्रस्त करून सोडतात. त्यांचा मुस्लिम समुदायावर या गोष्टीचा पूर्ण अधिकार आहे की त्यांच्या शंका-कुशंका आणि गैरसमज दूर करण्याचा मुस्लिम समुदायाने पूर्ण प्रयत्न करावा. ही छोटीशी पुस्तिका याच अधिकारपूर्तीचा एक बाग आहे. शिवाय वाचकांचेसुद्धा हे कर्तव्य आहे की ही पुस्तिका पूर्वग्रहरहित होऊन वाचावी.

आयएमपीटी अ.क्र. 27  पृष्ठे - 15     मूल्य - 06          आवृत्ती - Oct. 2010

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/a5810k8hkg33zmm489wcv2saha482490

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget