Latest Post


सूरह यूनुसच्या आयतीचा मागील अंकात उल्लेख करण्यात आला आहे. ती पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर विश्वास बाळगणाऱ्यांच्या आणि ‘दीन’च्या मार्गात त्रास सहन करणाऱ्याच्या आणि ‘ईमानी’ (श्रद्धावंताच्या) जीवनासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या आणि अज्ञानतेच्या शासनाशी संघर्ष करणाऱ्यांच्या बाबतीत आहे. अल्लाह म्हणतो, ‘‘लहुमुल बुश्रा फ़िलहयातिद्दुनिया व फ़िल-आ़िखरति.’’ अर्थात- त्यांच्यासाठी शुभवार्ता आहे या जगातही आणि यानंतर येणाऱ्या जीवनातदेखील.

माननीय अबू अय्यूब अंसारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्यासाठी वैध नाही की त्याने आपल्या बंधुशी तीन रात्रींपेक्षा अधिक काळापर्यंत संबंध तोडून टाकले असावेत. दोघे रस्त्यात एकमेकांना भेटले असता तोंड फिरवितो आणि प्रथम सलाम करणारा त्या दोघांमध्ये उत्तम आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
अशी शक्यता आहे की दोन मुस्लिम व्यक्ती एखादवेळी एखाद्या गोष्टीवर एकमेकांवर नाराज व्हावेत आणि बोलणे बंद करावे, परंती तीन दिवसांपेक्षा अधिक त्यांनी या स्थितीत राहायला नको. सर्वसाधारणपणे असेच घडते की दोन मनुष्यांदरम्यान जर वितुष्टी निर्माण झाली आणि त्या दोघांना अल्लाहचे भय असेल तर दोन-तीन दिवसांनंतर त्यांच्यात एकमेकांना भेटण्याची आतुरता निर्माण होऊ लागते आणि शेवटी त्यांच्यापैकी एकजण प्रथम सलाम करून ती शैतानी वितुष्टी संपुष्टात आणतो. म्हणून सलाम करण्यात तत्परता दाखविणाऱ्याची उत्कृष्टता या हदीसमध्येदेखील सांगितली गेली आहे आणि याव्यतिरिक्त दुसऱ्या हदीसींमध्येदेखील.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्वत:ला वाईट शंकेपासून अलिप्त ठेवा; कारण वाईट शंकेसह सांगितलेली गोष्ट सर्वाधिक खोटी असते. दुसऱ्यांच्या बाबतीत माहिती प्राप्त करत फिरू नका, टेहळणी करू नका, आपसांत दलाली करू नका, दुसऱ्यांशी शत्रुत्व बाळगू नका, एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करू नका आणि अल्लाहचे भक्त व्हा, आपसांत भाऊ-भाऊ बनून जीवन व्यतीत करा.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
या हदीसमधील काही शब्दांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. (१) ‘तहस्सुस’ या शब्दाचा अर्थ आहे– ‘कान देऊन ऐकणे’ आणि ‘टक  लावून पाहणे’. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे की एखाद्याचे बोलणे ऐकण्यासाठी लपून-छपून उभे राहणे आणि मग त्याच्या वक्तव्याचा त्याच्याच विरोधात वापर करणे आणि त्याला लोकांच्या दृष्टीत तुच्छ सिद्ध करणे ईमान व इस्लामच्या विरूद्ध आहे. (२) ‘तजस्सुस’ या शब्दाचा अर्थ आहे– एखाद्याचे दोष शोधण्याचा प्रयत्न करणे’ की केव्हा त्याच्याकडून चूक घडते आणि केव्हा त्याची एखादी दुर्बलता त्याला माहीत पडते जेणेकरून लगेचच त्याची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी त्या दुर्बलतेचा इकडेतिकडे पैâलाव करत फिरणे. (३) ‘तनाजुश’ या शब्दाचा अर्थ आहे– जो खरेदी-विक्रीशी संबंधित आहे म्हणजेच ‘दलाली’. दलाल आणि व्यापाऱ्यादरम्यान ही गोष्ट निश्चित होते की दलाल चढ्या दराने बोली लावेल आणि त्याची इच्छा तो माल खरेदी करण्याची नसते तर फक्त ग्राहकांना फसविण्यासाठी तो असे करीत असतो. (४) ‘तदाबुर’ या शब्दाचा अर्थ आहे– ‘आपसांत शत्रुत्व बाळगणे’ विंâवा ‘संबंध तोडणे’.

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) प्रवचन मंचावर विराजमान झाले आणि अतिशय मोठ्या आवाजात म्हणू लागले, ‘‘हे त्या लोकांनो! ज्यांनी फक्त आपल्या वाचेने इस्लामचा स्वीकार केला आहे आणि ईमान तुमच्या हृदयात उतरलेले नाही, तुम्ही मुस्लिमांना त्रास देऊ नका आणि त्यांना लज्जित करू नका आणि त्यांच्या दोषांच्या मागे पडू नका. जे लोक आपल्या मुस्लिम बंधुंच्या दोषांच्या मागे पडतात, अल्लाह त्यांच्या दोषांच्या मागे पडेल आणि ज्या मनुष्याच्या दोषांच्या मागे अल्लाह पडतो त्याला अपमानित करतो, जर तो आपल्या घरात असेल. (हदीस : तिर्मिजी).

स्पष्टीकरण
धर्मद्रोही सच्चा व पवित्र मुस्लिमांना वेगवेगळ्या प्रकारचात्रास देतात आणि अज्ञानकाळात घडलेल्या त्यांच्या घराण्याच्या लज्जास्पद दोषांना त्या लोकांसमोर सांगतात, त्याच लोकांना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या हदीसमध्ये तंबी दिली आहे. काही दुसऱ्या हदीसींमध्ये कथन करण्यात आले आहे की हे भाषण देताना पैगंबरांचा आवाज इतका वाढला होता की आसपासच्या घरांपर्यंत हा आवाज पोहोचला आणि

एक ऐतिहासिक व्यक्तीमत्व : कणखर, शिस्तप्रिय, न्यायप्रिय, उग्र, राकट, धाडसी आणि शूर

Oasis
हजरत अबुबकर यांचे निधन 23 ऑगस्ट 634 रोजी झाले. निधनापूर्वी ते आजारी होते व आपण या जीवघेण्या आजारातून  उठू शकणार नाही, याची खात्री झाल्याने त्यांनी हजरत उमर रजि. यांना आपला उत्तराधिकारी निवडण्याचा विचार केला. याचे कारण असे होते की, प्रेषित सल्ल. यांच्या निधनानंतर सत्तेसाठी जी काही साठमारी झाली होती, त्याची त्यांना पूर्ण कल्पना होती. आपल्यानंतर पुन्हा सत्तेसाठी मुस्लिमांमध्ये मतभेद होऊन रक्तपात होऊ नये, या प्रामाणिक इच्छेतून त्यांनी आपला उत्तराधिकारी निवडण्याचा निर्णय घेतला. मात्र याची घोषणा अचानकपणे न करता त्यांनी या संबंधीची पूर्वतयारी अतिशय योजनाबद्ध  पद्धतीने केली.
सर्वप्रथम त्यांनी आशरा-ए-मुब्बशरामधील प्रसिद्ध सहाबी अब्दुरहेमान बिन औफ रजि., हजरत उस्मान रजि. आणि हजरत अली रजि. यांच्याशी याबाबतीत सल्लामस्सलत केली. या तिघांनीही हजरत उमर रजि. यांना खलीफा करण्याबद्दल सकारात्मक मत दिल्यानंतर त्यांनी हजरत उमर यांना बोलावून घेतले आणि त्यांना आपला निर्णय कळवला. त्यावर ह. उमर रजि. यांनी स्पष्टपणे सांगितले की, ’’एवढी मोठी जबाबदारी घेण्याची माझी अजीबात इच्छा नाही.’’ त्यावर हजरत अबुबकर यांनी सांगितले की, ’’तुमची इच्छा असण्या किंवा नसण्याचा इथे प्रश्न नाही. मला तुमच्यापेक्षा दूसरी योग्य व्यक्ती या पदासाठी दिसत नाही. म्हणून अपात्र व्यक्तीची निवड  करून मी अल्लाहला तोंड कसे दाखविणार? तुम्हाला या पदाची गरज नाही मात्र या पदाला तुमची गरज आहे. मी याबाबतीत सर्व महत्त्वाच्या व्यक्तींशी सल्लामसल्लत करून हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे सर्व लोक तुम्हाला खलीफा म्हणून स्वीकारण्यास अनुकूल आहेत, म्हणून तुम्हाला हे पद घ्यावेच लागेल.’’ तेव्हा नाईलाजाने हजरत उमर रजि. खलीफा होण्यास होकार दिला.
यानंतर हजरत अबुबकर रजि. यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा लोकांसमोर केली. त्यात त्यांनी सांगितले की, ’’मी माझ्या कुठल्याही नातेवाईकाला खलीफा म्हणून निवडलेले नाही. जो तुमच्यापैकी सर्वोत्कृष्ट आहे त्याचीच निवड मी केलेली आहे. कारण माझ्या दृष्टीने जनतेचे हित हेच सर्वोतोपरी आहे. मी हजरत उमर बिन खत्ताब रजि. यांना खलीफा म्हणून निवडलेले आहे. माझी ही निवड तुम्हाला मान्य आहे का?’’ त्यावर उत्स्फूर्तपणे उपस्थित लोकांनी त्यांच्या निवडीचे समर्थन केले. म्हणून अगदी सहज पद्धतीने सत्तांतर घडून आले. 23 ऑगस्ट 634 रोजी खलीफा अबुबकर रजि.यांचे निधन होताच 24 ऑगस्ट 634 रोजी त्यांनी खलीफा म्हणून शपथ घेतली व लगेच लोकांनी त्यांच्या हातावर हात ठेऊन एकनिष्ठतेची बैत (शपथ) घेतली.
हजरत उमर बिन खत्ताब रजि. हे एक अतिशय कणखर, शिस्तप्रिय, न्यायप्रिय, उग्र, राकट, धाडसी आणि शूर होते. दुरून पाहणाऱ्यांना त्यांची भीती वाटे परंतु ज्यांचा त्यांच्याशी संपर्क होई, ते त्यांच्यातील उमदेपणा पाहून भारावून जात.
 हजरत उमर रजि. यांचा खिलाफतीचा कालावधी अतिशय गाजलेला कालावधी आहे. त्यांच्या कालावधीत इस्लाम बळकट झाला आणि इस्लामच्या सीमांचा विस्तार झाला.  हजरत उमर रजि. यांचा जन्म इ.स. 580 मध्ये ’अदि ’ या कुळात झाला. हे कूळ मक्का शहरातील प्रतिष्ठित जरूर होते पण सामार्थ्यवान   नव्हते. धार्मिक दृष्ट्याही या कुळाला बनू हाशीम आणि बनू उम्मैय्या सारखे महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त नव्हते. मात्र हजरत उमर रजि. यांनी आपल्या अंगभूत कौशल्य आणि धाडसी स्वभावामुळे मक्का शहरामध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. अन्याय सहन करण्याची त्यांची तयारी नव्हती. ते लढाऊ प्रवृत्तीचे होते. न्यायासाठी लढण्यासाठी ते सदैव तत्पर असत. त्यांची एक कन्या हजरत हफ्सा रजि. ह्या प्रेषित सल्ल. यांच्या सुविद्य पत्नी होत. मक्कामध्ये जे मुठभर लोक साक्षर होते त्यात हजरत उमर रजि. यांचा समावेश होता. त्यांना हिब्रु भाषा येत होती म्हणून ज्यू लोकांशी त्यांची चांगली मैत्री होती.
ते प्रेषित सल्ल. यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होते व कट्टर मूर्तीपूजक होते. प्रेषित सल्ल. यांनी जेव्हा इस्लामची घोषणा केली होती तेव्हा त्यांचा विरोध करणाऱ्या लोकांपैकी ते एक होते. ते इस्लामचा आणि प्रेषितांचा दुस्वास करीत, परंतु त्यांचे शौर्य आणि धाडसी स्वभाव पाहून प्रेषित सल्ल. सातत्याने अल्लाहकडे दुआ करीत की, ऐ अल्लाह! उमरच्या मनामध्ये इस्लामबद्दल प्रेम उत्पन्न कर. शेवटी ही दुआ स्विकारली गेली. वयाच्या तिसाव्या वर्षी हजरत उमर रजि. यांनी इस्लामचा स्वीकार केला. इस्लामचा स्वीकार करण्याचा त्यांचा किस्साही रोमहर्षक असा आहे.
ही त्या काळातील गोष्ट आहे जेव्हा मक्का शहरामध्ये मुर्तीपूजक कुरैश हे इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा सर्व शक्तीनिशी विरोध करीत होते. तरीही हळूहळू लोक इस्लामचा स्वीकार करीतच होते. ह्या गोष्टीची हजरत उमर रजि. यांना चीड येत होती. त्यामुळे त्यांनी प्रेषित सल्ल. यांची हत्या करून हा विषय कायमचा संपविण्याचा निर्णय घेतला व एका दिवशी तलवार हातात घेऊन प्रेषित सल्ल. यांचा शोध घेत निघाले. रस्त्यात त्यांचा एक मित्र नईम बिन अब्दुल्लाह त्यांना भेटला. त्याने हजरत उमर रजि. यांचा अवतार पाहून विचारले, ’’ हे उमर एवढ्या त्वेषामध्ये कुठे निघालात?’’ त्यावर हजरत उमर रजि. उत्तरले, ’’ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा खून करण्यासाठी निघालो आहे.’’ आज त्यांचा आणि इस्लामचा नायनाट करूनच थांबेन. त्यावर त्यांचा मित्र हसून म्हणाला, ’’अगोदर आपल्या घराची काळजी घ्या’’ तुमची सख्खी बहीण ह.फातेमा रजि. आणि मेव्हणा ह.सईद रजि. दोघेही मुस्लिम झालेले आहेत.’’ हे ऐकताच हजरत उमर रजि. यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी थेट मोर्चा बहिणीच्या घराकडे वळविला. घराजवळ पोहोचताच त्यांच्या कानावर कुरआन पठणाचा ध्वनी आला. ह.उमर रजि. वादळासारखे बहिणीच्या घरात घुसले. त्यांचा उग्र अवतार पाहून कुरआन पठण करणाऱ्या खब्बाब रजि. कुरआनच्या आयाती लपवून ठेवल्या व लपून बसले. उमर यांनी मेव्हण्याला दरडावून विचारले ’’तुम्ही काय वाचत होते?’’ तेव्हा मेव्हण्यांनी काही उत्तर दिले नाही. म्हणून चिडून ह. उमर रजि. यांनी मेव्हण्याला मारहाण करायला सुरूवात केली. त्यांना सोडविण्यासाठी ह.फातेमा रजि. मध्ये पडल्या तर त्यांनाही जबर मारहाण केली. इतकी की त्यांचे डोके फुटून चेहरा रक्तबंबाळ झाला. त्यांच्या बहिणीने त्वेषाने हजरत उमर रजि. यांना उत्तर दिले की, ’’ हो! माझ्या शरीरातही खत्ताब यांचे रक्त आहे. मी आणि माझ्या पतीने इस्लामचा स्वीकार केलेला आहे. तुला काय करायचे ते कर, आम्हा दोघांना ठार मार. पण लक्षात ठेव इस्लामची घौडदौड तू मूळीच रोखू शकणार नाहीस.’’ बहिणीचा रक्तबंबाळ चेहरा आणि तिचे कणखर व आत्मविश्वासाने भरलेले बोलणे ऐकताच ह.उमर यांचा राग खर्रकण उतरला. ते शांत झाले व त्यांनी मेव्हण्याला तुम्ही काय वाचत होतात ते माझ्यासमोर वाचून दाखवा, अशी विनंती केली. तेव्हा बहिणीने सांगितले, तू अगोदर गुस्ल (स्वच्छ होणे) कर, पवित्र हो आणि नंतर कुरआन ऐक. त्यावर ह.उमर यांनी अंघोळ केली व कुरआन ऐकण्यासाठी निमुटपणे येवून बसले. तेव्हा लपून बसलेले हजरत खब्बाब रजि. बाहेर आले  त्यांनी त्यांच्या समोर कुरआनच्या आयातींचे खालीलप्रमाणे पठण केले. ’’ताहा ! आम्ही तुम्हांस कष्ट देण्यासाठी हे कुरआन अवतरलं नाही. पण जे भितात त्यांच्यासाठी मात्र हे बोध घडविण्यासाठी आहे. ज्यानं ही धरती आणि उंच-उंच आकाशं निर्माण केलीत त्याच्याकडून अवतरलेला. (जो) महान कृपावंत राजसिंहासनावर आरूढ आहे. आकाश आणि पृथ्वीत आणि त्यांच्या उभयंतात आणि जमिनीखाली सर्वकाही त्याच्याच मालकीचं आहे. तुम्ही मोठ्यानं बोलला तरी आणि जे काही गुप्त अथवा लपलंय ते सर्व त्यास ठाऊक आहे. अल्लाहशिवाय कुणी ईश्वर नाही. सारी सुंदर नावं त्याचीच आहेत.’’ (कुरआन - सुरे ताहा :आयत नं.1-8)
उमर यांनी सुरवातीच्या या आयाती ऐकल्या आणि ऐकतच राहिले. ह. खब्बाब रजि. यांनी दुसऱ्या आयातीचे पठण केले, ’’निश्तिच मीच अल्लाह आहे, माझ्याव्यतिरिक्त कुणी ईश्वर नाही. तेव्हा माझी आराधना करा आणि माझ्या आठवणीसाठी नमाज कायम करा.’’(कुरआन-सुरे ताहा : आयत नं.14)
या आयातींचा जादूसारखा परिणाम ह.उमर रजि. यांच्यावर झाला. ते म्हणाले, ’’निःसंशय हा ईश्वरीय कलाम (साहित्य) आहे’’ त्यांनी बहिण आणि मेव्हण्याची माफी मागितली आणि सरळ घराबाहेर पडले आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. ज्या ठिकाणी आपल्या अनुयायांना दर्स (मार्गदर्शन) देत बसले होते त्या घरासमोर गेले. दारावर तैनात सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत जाण्यास मनाई केली. त्यावर ह.उमर रजि. यांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना आपण भेटीला आल्याची बातमी देण्यास सांगितले. सुरक्षा रक्षकांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना तशी बातमी दिली. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्यांना आत बोलावून घेतले. प्रेषित सल्ल. म्हणाले, ’’ बोला उमर कसे काय आलात ? चांगल्यासाठी आलात का वाईट करण्यासाठी आलात?’’ त्यावर हजरत उमर रजि. नम्रपणे उत्तरले, ’’ हे प्रेषित सल्ल. मी आपला सच्चा अनुयायी बणून इस्लामचा स्विकार करण्यासाठी आलोय.’’ तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मुस्लिमांनी , ’’अल्लाहु अकबर!’’ (अल्लाह श्रेष्ठ आहे) च्या घोषणा दिल्या आणि हजरत उमर रजि. यांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या हातावर हात ठेऊन बैत घेतली आणि इस्लाम व प्रेषित सल्ल. यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निश्चय व्यक्त केला.
हजरत उमर रजि. यांनी ज्या दिवशी इस्लामचा स्विकार केला त्याच्या अवघ्या चार दिवसांपूर्वी हजरत हम्जा रजि. यांनी इस्लाम स्वीकारला होता. ते ही मक्केतील एक मोठे प्रस्थ होते. या दोन धाडसी लोकांनी इस्लाम स्वीकारल्याने इस्लाम मानणाऱ्यांच्या गटात चैतन्य पसरले तर कुरैशच्या गटामध्ये नैराश्य पसरले.
हजरत उमर रजि. यांच्या द्वारे इस्लाम स्विकारण्याच्या घटनेमुळे इस्लामी इतिहासाला कलाटणी मिळाली. इस्लाम स्वीकारताच त्यांनी त्याची जाहीर घोषणा केली. त्यांनी व हजरत हम्जा रजि. यांनी मुस्लिमांच्या एका गटाला घेऊन काबागृहामध्ये जावून तवाफ (काबागृहाला 7 प्रदक्षिणा घालणे)  केला आणि आपण मुस्लिम झाल्याची सार्वजनिकरित्या घोषणा करून टाकली. या दोन योद्धयांच्या इस्लाम स्विकारण्याच्या घटनेमुळे मूर्तीपूजक कुरैशच्या गटामध्ये खळबळ माजली. हजरत उमर रजि. यांच्या या धाडसी कृतीचा सन्मान म्हणून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ह. उमर रजि. यांना ’अल-फारूक’ (सत्य आणि असत्यामध्ये फरक करणारा) ही पदवी बहाल केली. त्यानंतर हजरत उमर रजि. हे हजरत उमर फारूख रजि. या नावाने ओळखले गेले आणि आजही ओळखले जातात.
जेव्हा मुस्लिमांनी मदिनामध्ये हिजरत केली तेव्हा ती गुप्तपणे केली होती. पण ह. उमर रजि.यांना अशी गुपचूप हिजरत मान्य नव्हती. प्रेषित सल्ल. यांनी जेव्हा त्यांना मदिना येथे जाण्याचा आदेश दिला. तेव्हा ते सर्वप्रथम काबागृहामध्ये गेले. तलवार उपसून काबागृहाचा तवाफ केला आणि उपस्थित कुरैश लोकांच्या दिशेने तलवार फिरवून म्हणाले की, ’’तुमचा सर्वनाश होओ! मी मदिनेला जात आहे. कोणाला आपल्या पत्नीला विधवा करायचे असेल तर त्याने समोर येऊन मला थांबवावे.’’ त्यांना अडविण्याची कोणीच हिम्मत केली नाही आणि ते छाती पुढे करून ऐटित काबागृहातून निघाले ते थेट मदिनेला पोहोचले.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याकडे त्यांच्या शब्दाला फार मान होता. ह. अबुबकर रजि. यांच्यानंतर प्रेषितांकडे त्यांचे स्थान होते. त्यांनी प्रेषित सल्ल. यांना जे-जे सल्ले दिले होते त्यापैकी 21 सल्ले असे होते, ज्यांचे समर्थन दस्तुरखुद्द कुरआनच्या आयातींच्या मार्फत झाले. ते प्रेषितांवर जीवापाड प्रेम करीत होते. एकदा अशी घटना घडली की, त्यांच्या घरी एक ज्यू आणि एक मुस्लिम व्यक्ती आले व त्यांनी आपली गाऱ्हाणी त्यांच्यासमोर मांडली. त्यांच्यापैकी ज्यू व्यक्तीने गयावया करत ह. उमर रजि. यांना सांगितले की, ’’प्रेषित सल्ल. यांनी आमची गाऱ्हाणी ऐकूण माझ्यातर्फे निर्णय दिलेला आहे.’’ त्यावर हजरत उमर यांनी त्या मुस्लिम व्यक्तीला विचारले की, ’’हा सांगतोय ते बरोबर आहे का? ’’ त्याने सांगितले की हो बरोबर आहे पण मला तुमच्याकडून न्याय हवा. तेव्हा हजरत उमर रजि. रागाने बेभान झाले आणि म्हणाले, ’’ठीक आहे. दोन मिनिटे थांब. मी न्याय देतो.’’ ते आत गेले, तलवार आणली आणि एका झटक्यात त्या मुस्लिम व्यक्तीचे डोके धडावेगळे केले. या घटनेवरून त्यांच्याकडे प्रेषित सल्ल. यांच्या शब्दाला किती मान होता, याचा अंदाज येतो.
त्यांनी इस्लामपूर्व काळात तीन विवाह केले होते. इस्लाम स्विकारल्यानंतर त्यांच्यापैकी एकाच पत्नीने इस्लाम स्विकारला होता. तेव्हा त्यांनी इस्लाम न स्विकारणाऱ्या दोन पत्नींना घटस्फोट देऊन टाकला. त्यांना एकदा कळाले की, प्रेषित सल्ल. यांच्या पत्नींमध्ये काही कारणांमुळे इर्ष्या निर्माण झाली असून, त्यात त्यांची मुलगी हफ्सा सुद्धा सामील आहे. तेव्हा त्यांनी तिचे मुंडके छाटण्याचा इरादा प्रेषित सल्ल. यांच्यासमोर व्यक्त केला होता. तसेच त्यांनी हफ्सा मार्फत प्रेषितांच्या अन्य पत्नींकडेसुद्धा तीव्र शब्दात त्यांच्या इर्ष्यात्मक वर्तनाबद्दल नापसंती व्यक्त केली होती. त्यामुळे प्रेषित सल्ल. यांच्या अन्य पत्नीसुद्धा त्यांना वचकून असत.
दि. 24 ऑगस्ट 634 रोजी द्वितीय खलीफा म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी ह. अबुबकर रजि. यांचा सन्मान म्हणून स्वतः खलीफा हे बिरूद लावण्याचा इन्कार केला. तेव्हापासून लोकांनी त्यांना ’अमीरूल मोमीनीन’ म्हणजे मुस्लिमांचा नेता म्हणून हाक मारण्यास सुरूवात केली. शपथ गृहण केल्यानंतर त्यांनी जे भाषण केले ते खालीलप्रमाणे, ’’ हे श्रद्धावानहो अबू बकर रजि. आता आपल्यात नाहीत. दोन वर्ष नेतृत्व देऊन ते अल्लाहकडे परत गेले आहेत. ते अत्यंत समाधानी असतील की, त्यांनी अथांग सागरात तुफान वादळात सापडलेली मुस्लिम राज्याची नौका सुरक्षितपणे वल्हवीत किनाऱ्याला नेली. धर्मत्यागाविरूद्धचे युद्ध त्यांनी यशस्वी करून दाखविले. त्यांना धन्यवाद असोत. आता अरबभूमीत इस्लाम सर्वोच्च झालेला आहे. तो आता पुढच्या मार्गावर आहे. आता बायझॅन्टाईन व पर्शिया या बलाढ्य साम्राज्यविरूद्ध अल्लाहच्या नावाने आपला जिहाद चालू आहे...’’
’’ह.अबू बकर रजि. नंतर खलीफापदाचे दायित्व माझ्यावर येऊन पडलेले आहे. मी या पदाची आकांक्षा कधीही धरलेली नव्हती. मी आश्वासन देतो की, या पदामुळे माझ्यावर पडलेल्या अनिवार्य जवाबदाऱ्या व कर्तव्य इस्लामच्या आज्ञेनुसार व माझ्या कुवतीनुसार पार पाडण्याचा मी प्रामाणिक व अहर्निश प्रयत्न करीत राहीन.’’
’’ या माझ्या कार्यात मी पवित्र ग्रंथाचे मार्गदर्शन घेईन व प्रेषितांनी व पहिल्या खलीफांनी घालून दिलेल्या परंपरांचे अनुसरण करीन... जर मी या मार्गापासून विचलित झालो, तर मला दुरूस्त करा.’’ (28-116).
कठोर बनव, मृदू बनव !
यानंतर त्यांनी पुढील प्रार्थना म्हटली व प्रत्येक वेळी ’आमीन’ (तथास्तु) असे म्हणण्यास लोकांना सांगितले :
’’हे अल्लाह! मी कठोर आहे. सत्याच्या प्रस्थापनेसाठी,
तुझ्या आज्ञा अमलात त्यांच्याविरूद्ध मला कठोर बनव...
’’ हे अल्लाह ! मला दांभिकतेपासून मुक्त ठेव. माझा दृढनिश्चय वाढव, जेणेकरून मी जे काही करीन ते केवळ तुझ्या प्रसन्नतेसाठीच असेल...
’’हे अल्लाह ! माझे हृदय श्रद्धावानांसाठी दयाळू बनव, जेणेकरून त्यांच्या गरजांकडे मी समर्पणबुद्धीने लक्ष देऊ शकेन...
’’ हे अल्लाह ! तुझ्या आज्ञापालनात मी कमी पडल्यास मला कार्यप्रवण कर व माझी श्रद्धा वृद्धिंगत कर.. आत्मपरीक्षण करण्याची मला शक्ती दे...’’
हे अल्लाह ! मला कुराणाचा अर्थ समजण्याची बुद्धी व त्यानुसार वागण्याचे सामर्थ्य प्रदान कर..’’ सदरच्या भाषणाचा संदर्भ : चार आदर्श खलीफा, लेखक : डॉ. शेषराव मोरे, पान क्र. 155).

- एम.आय.शेख

Kabah Sharif
मुस्लिम तर प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायी आहेतच. ते त्यांना महानतम व अंतिम ईशदूत मानतात. आणि ते त्यांच्या प्रत्येक वचन, प्रत्येक कार्य व प्रत्येक शिकवणीवर पूर्ण विश्वास ठेवतात. त्यांनी प्रेषितांवर (ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर) कितीही श्रद्धा ठेवली व त्यांची कितीही प्रशंसा केली तरी कमीच आहे. मुस्लिमेतर विद्वान प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासंबंधी काय म्हणतात?
या शृंखलेत केवळ भारत व युरोपातील मुस्लिमेतर विद्वानांची मते व त्यांचे कथन एकत्रित केलेले आहे.


प्रत्येक विषयाच्या मुळाशी पोचण्याची नैसर्गिक प्रवृत्ती 'इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका'च्या रचनाकारांनी लिहिले आहे -
"प्रेषित मुहम्मद (स.) जरी पूर्णपणे अशिक्षित होते व अरबी भाषेच्या काव्यकलेपासून इतके अनभिज्ञ होते की कोणत्या न कोणत्या त्रुटिशिवाय एक शेर (काव्याच्या दोन ओळी) देखील ते सांगू शकत नव्हते. तरीसुद्धा स्वभावतः प्रत्येक विषयाच्या मुळापर्यंत पोचण्याची त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती होती. या गोष्टीचा संकेत देताना पवित्र- कुरआनच्या एका सुप्रसिद्ध सूरह (पवित्र कुरआनचे एक प्रकरण) मध्ये त्यांना संबोधून असे म्हटले गेले आहे -
"प्रेषित महम्मद (स.) यांना काव्य-विद्या प्रदान करण्यात आली नसून त्यांनी कवी असणेदेखील आवश्यक नाही."
ही गोष्ट सर्वसिद्ध आहे की प्रेषित मुहम्मद (स.) (यांच्यावर ईश्वराची दया आणि कृपा असो) यांना लिहिणे-वाचणे अजिबात येत नसे आणि हेदेखील एक ऐतिहासिक सत्य आहे की ते प्रेषित होईपर्यंत कोणत्याही धर्माचा कोणताही ग्रंथ त्यांच्यापर्यंत पोचला नव्हता. याशिवाय विचारणीय गोष्ट अशी आहे की अशा विद्या व ज्ञानशून्य देश व जातीत जन्म घेऊन व त्याच वातावरणात तरूण होऊनदेखील त्यांनी इतक्या महान सार्वभौम व विश्वव्यापी धर्माचे प्रवर्तन केले. एका देशात एवढी मोठी क्रांती निर्माण केली. त्यांनी प्रवर्तीत केलेल्या धर्माने जगातील सर्व देशांवर. सर्व जाती व सर्व सभ्यतांवर वेळोवेळी प्रभाव टाकला. भारतासारखा धर्म, संस्कृती, विद्या व ज्ञानाने परिपूर्ण व संपन्न देशदेखील इस्लामच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकला नाही आणि त्यांच्यानंतर आजतागायत कोणताही इतका महान धर्म-नेता जन्माला आला नाही. सर्व पैलूंचा विचार केल्यानंतर हे मान्य करणे भाग पडते की ते ईश्वराचे प्रेषित होते आणि त्यांचे ज्ञान हे ईशज्ञान होते."
अत्यंत तेजस्वी पुरुष एक ख्रिश्चन विद्वान मिस्टर मुल्लर प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रेषित न मानणाऱ्या लोकांना प्रश्न करतो -
"हे कसे शक्य आहे की एक धार्मिक ज्वाला जी जरी एका जंगलात प्रज्वलित झाली होती, परंतु जिने इतक्या अल्पावधीत आश्चर्यजनक रीतीने संपूर्ण आशिया खंडात अग्नीचा डोंब उठविला, ती अशा हृदयातून निघालेली असेल ज्यात त्याची काहीही उष्णता अस्तित्वात नसेल?" 
- (एजाजुत्तंजील, पृ.१२४, बहवाला 'इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका - विषय : प्रेषित मुहम्मद (स.) व त्यांचा धर्म)

मुस्लिम तर प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायी आहेतच. ते त्यांना महानतम व अंतिम ईशदूत मानतात. आणि ते त्यांच्या प्रत्येक वचन, प्रत्येक कार्य व प्रत्येक शिकवणीवर पूर्ण विश्वास ठेवतात. त्यांनी प्रेषितांवर (ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर) कितीही श्रद्धा ठेवली व त्यांची कितीही प्रशंसा केली तरी कमीच आहे. मुस्लिमेतर विद्वान प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासंबंधी काय म्हणतात?
या शृंखलेत केवळ भारत व युरोपातील मुस्लिमेतर विद्वानांची मते व त्यांचे कथन एकत्रित केलेले आहे.


मिस्टर टॉम्स कार्यालय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर खोटे दोष लावणाऱ्या लोकांचा खरपूस समाचार घेताना लिहितो -
“होय, असे कदापि नाही, हा तीक्ष्ण दृष्टीचा मनुष्य जो जंगली देशात जन्मला होता, जो मनमोहक काळे डोळे व प्रफुल्ल, शिष्टतापूर्ण व विचारशील स्वभावाबरोबर आपल्या मनात मान-सन्मानाच्या इच्छेविरुद्ध काही अन्य विचार बाळगत होता, तो एक शांतिमय आणि असामान्य शक्तिशाली आत्मा होता आणि त्या लोकांपैकी होता जे सत्यवान असण्याशिवाय अन्य काही असूच शकत नाहीत. ज्याला स्वत: निसर्गाने खरा व सत्यप्रिय म्हणून जन्मास घातले होते. या काळात अन्य लोक अंधविश्वास व संस्कारांचे पालन करीत होते आणि त्यावरच संतुष्ट होते. हा मनुष्य त्या विश्वास व संस्कारांचे पालन करू शकत नव्हता व आपला आत्मा व पदार्थांच्या तथ्यांच्या ज्ञानाविषयी तो अन्य लोकांपेक्षा भिन्न होता. जसे की मी वर्णन केले आहे की, सर्वशक्तिमानाचे रहस्य आपल्या प्रताप व सौंदर्यासह त्यावर प्रकट झाले होते आणि या तथ्यावर ज्याचे वर्णन करण्यास वाक्शक्ती असमर्थ आहे आणि ज्याने आपल्यासाठी 'मी येथे आहे' म्हणून प्रयोग केला. प्राचीन कथा त्यावर पडदा घालू शकल्या नाहीत
आणि असले सत्य ज्यास एखादे पर्यायी श्रेष्ठतर शब्द न मिळाल्यामुळे आम्ही 'सत्य' नाव ठेवले आहे, ते वास्तविकत: ईशचिन्हांपैकी एक चिन्ह आहे. अशा माणसाचे कथन एक वाणी आहे जी एखाद्या संबंधाविना थेट ईशप्रकृतीच्या हृदयातून निघते, जी मानव ऐकतात आणि जी ऐकण्यासाठी व वस्तूंच्या तुलनेसाठी अधिक लक्ष देण्याची गरज आहे, कारण याच्या तुलनेत जे काही आहे तुच्छ आहे. सुरवातीपासूनच त्याच्या हृदयात हजप्रसंगी व दररोज इकडे-तिकडे भ्रमण करताना त्यांच्या मनात विभिन्न प्रकारचे हजारो विचार येत असत. उदाहरणार्थ - "मी काय आहे? लोक ज्याला जग म्हणतात व ज्यात मी राहतो ही अथांग गोष्ट काय आहे? जीवन काय आहे? मृत्यू काय आहे? मला कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे व काय केले पाहिजे?" ज्याचे उत्तर

(मक्काच्या) हिरा व (सीरियाच्या) सीना पर्वताच्या मोठमोठ्या दगडांच्या ढिगाऱ्यांची व निर्मम निर्जन वाळवंटाने व जंगलाने काहीही दिले नाही आणि डोक्यावर गुपचूप प्रदक्षिणा घालणाऱ्या आकाशानेसुद्धा आपल्या निळा प्रकाश देणाऱ्या नक्षत्रांसह काहीही सांगितले नाही. परंतु जरी कणी सांगितले असेल तर केवळ त्याच्याच आत्म्याने व ईश्वरी ज्ञानाने सांगितले जे त्याच्यात होते."
- (एजाजुत्तंजील, पृ.१२५-१२६)

- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी 

    या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फातिहा जो प्रारंभीचा अध्याय आहे, त्यास सुद्धा या अंतिम अध्ययाच्या सुरवातीला घेतले आहे. कारण सूरह अल् फातिहा नमाजमध्ये सतत पठण होणारा अध्याय आहे.
    कुरआनच्या भाग 30 मध्ये जो अध्ययन 78 ते अध्यायन 114 पर्यंतचे आकाराने लहान अध्यायांचा समावेश झालेला आहे. यातील बहुतांश अध्याय मक्का कालीन आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 67   पृष्ठे - 352    मूल्य - 175     आवृत्ती - 2 (2014)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/13khpzryq1t7xyiupfc46l1b2bk8ggrj

muslims
आंशिक मुस्लिम
एका प्रकारचे मुस्लिम ते आहेत जे अल्लाह व प्रेषितांचा स्वीकार करून इस्लामला आपला धर्म म्हणून मान्यता देतात, परंतु आपल्या या धर्माला आपल्या संपूर्ण जीवनाचा केवळ एक अंश आणि एक विभाग म्हणून ठेवतात.
या विशिष्ट अंश व विभागात तर इस्लामवर श्रद्धा असते. उपासना असते. जप जाप्य व मुसल्ला (ज्यावर नमाज पढली जाते ते कापड) असतो, अल्लाहचे नामस्मरण असते, खाण्या-पिण्यात व काही सामाजिक बाबतीत संयम पाळला जात असतो आणि ते सर्वकाही असते ज्याला धार्मिक कार्यप्रणाली म्हणून संबोधले जाते, परंतु या विभागाशिवाय त्यांच्या जीवनातील इतर सर्व बाबी ते मुस्लिम असल्याचे दर्शवीत नाहीत. ते प्रेम करतील तर आपल्या मनासाठी किंवा आपल्या लाभासाठी किंवा आपल्या देश, जात अथवा दुसऱ्या कुणासाठी करतील. ते शत्रुत्व करतील आणि कुणाशी युद्धही करतील तेसुद्धा अशाच एखाद्या भौतिक अथवा मानसिक कारणामुळेच. त्यांचे कारभार, देवाण-घेवाण, त्यांचे जीवनव्यवहार व संबंध, त्यांचा त्यांच्या मुलाबाळांशी, त्यांच्या घराण्याशी, त्यांच्या समाजाशी व ज्यांच्याशी व्यवहार केला जातो अशा लोकांशी त्यांची वागणूक विशेषकरून धर्मापासून मुक्त व भौतिकतेवर अवलंबून असते. एक जमीनदार म्हणून अथवा एक व्यापारी, एक शासक, एक शिपाई, एक धंदेवाईक म्हणून त्यांचा काही दर्जा असू शकेल. परंतु त्यांचा मुस्लिम म्हणून कोणताही दर्जा असत नाही. याशिवाय अशा प्रकारचे लोक एकत्र येऊन सामूहिकरीत्या ज्या सांस्कृतिक, शैक्षणिक व राजनीतिक संस्था स्थापन करतील, त्यासुद्धा मुस्लिमांच्या संस्था म्हणून म्हटल्या जातील अथवा त्यांच्यावर आंशिक इस्लामी प्रभावसुद्धा असेल, परंतु वास्तविकत: त्यांचा इस्लामशी काडीचाही संबंध नसेल.

परिपूर्ण व सच्चे मुस्लिम

दुसऱ्या प्रकारचे मुस्लिम ते आहेत जे आपले संपूर्ण व्यक्तित्व व आपले संपूर्ण अस्तित्व इस्लामसाठी समर्पित करतात. त्यांच्या सर्व योग्यता त्यांच्या मुस्लिम असण्याच्या योग्यतेत विलुप्त होतात. ते पिता असतील तर मुस्लिम म्हणून, पती अथवा पत्नी असतील तर मुस्लिम म्हणून, व्यापारी, जमीनदार, मजूर, नोकर अथवा धंदेवाईक असतील तर मुस्लिम म्हणून. त्यांच्या भावना, त्यांच्या इच्छा, त्यांचे दृष्टिकोन, त्यांचे विचार, त्यांची मते, त्यांची घृणा व आवड, त्यांची पसंती-नापसंती, सर्वकाही इस्लामच्या अधीन असेल. त्यांच्या हृदय व बुद्धीवर आणि त्यांच्या शरीर व प्राणावर इस्लामचा पुरेपूर ताबा असेल. त्यांचे प्रेम व शत्रुत्व इस्लामपासून मुक्त नसेल. ज्यांची भेट घेतील ती इस्लामसाठी घेतील आणि ज्यांच्याशी लढतील ते इस्लामसाठी लढतील. एखाद्याला काही देतील तर अशासाठी देतील की इस्लामची मागणी अशीच आहे की त्याला दिले जावे आणि जर एखाद्याला दिले नाही तर ते अशासाठी दिले नाही की इस्लाम असेच म्हणतो की त्याला दिले जाऊ नये. त्यांची ही कार्यपद्धती केवळ व्यक्तीपर्यंत मर्यादित नसते तर त्यांचे सामुदायिक जीवनसुद्धा पूर्णत: इस्लामी जीवनपद्धतीच्या अधीन असते. एक समुदाय म्हणून त्यांचे अस्तित्व केवळ इस्लामसाठी असते आणि त्यांचे संपूर्ण सामुदायिक वर्तन इस्लामी जीवनव्यवस्थेच्या तत्त्वावर आधारित असते.

अल्लाहला अपेक्षित असलेला मुस्लिम

हे दोन प्रकारचे मुस्लिम जरी विधिवत एकाच प्रेषिताचे व धर्माचे अनुयायी (उम्मत) आहेत व दोघासाठी मुस्लिम हा शब्द समान रूपाने लागू होतो, तरीसुद्धा वास्तविकत: ते एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत. पहिल्या प्रकारच्या मस्लिमाची कोणतीही कामगिरी इस्लामच्या इतिहासात उल्लेखनीय अथवा अभिमानास्पद नाही. वास्तविकत: त्यांनी कोणतेही असले कृत्य केले नाही की ज्याने जागतिक इतिहासावर इस्लामी जीवपद्धतीची छाप सोडली असेल. पृथ्वीने असल्या मुस्लिमांचे ओझे कधीही सहन केले नाही. इस्लामला जर अवनती प्राप्त झाली असेल तर अशा लोकांमुळेच झाली. अशाच प्रकारच्या मुस्लिमांचे बाहुल्य मुस्लिम समाजात असण्याचा परिणाम असा दिसून आला की जगाच्या जीवनव्यवस्थेची लगाम अनेकेश्वरवादीच्या ताब्यात गेली आणि मुस्लिमांना त्यांच्या अधीन राहून केवळ एका सीमित धार्मिक जीवनाच्या स्वातंत्र्यावर समाधान मानावे लागले. अल्लाहला असले मुस्लिम कदापि अपेक्षित नव्हते. त्याने आपल्या प्रेषितांना जगात अशाकरिता पाठविले नव्हते आणि आपले ग्रंथसुद्धा अशासाठी उतरविले नव्हते की केवळ अशा प्रकारचे नावापुरते मुस्लिम जगात बनविले जावेत, असले नावापुरते मुस्लिम नव्हते तेव्हा मौल्यवान असलेल्या कोणत्याही वस्तूची जगात उणीव नव्हती की जिची पूर्तता करण्यासाठी वही (ईशसंदेश) व प्रेषित्वाचा क्रम सुरू करण्याची अल्लाहला गरज भासली असती.
वास्तविकत: जे मुस्लिम अल्लाहला अपेक्षित आहेत, ज्यांना तयार करण्यासाठी प्रेषितांना पाठविले गेले व ग्रंथ उतरविले गेले आणि ज्यांनी इस्लामी दृष्टिकोनाने कधी एखादे नावाजण्याजोगे कार्य केले आहे अथवा आज करू शकतात; ते केवळ दुसऱ्याच प्रकारचे मुस्लिम आहेत.

उपरोक्त संक्षिप्त वर्णनाने हे सिद्ध होते की, एकेश्वरत्व, प्रेषितत्व, पवित्र ग्रंथ कुरआन व मरणोत्तर जीवन या ईशदत्त तत्त्वांच्या आधारे, जगातील लोकांना देश, समाज, वंश, वर्ण, भाषा इत्यादी बाबींनी निर्माण होणारे भेदभाव विसरून, एक जागतिक समाज निर्माण करता येतो. इस्लामने ईशआराधनेच्या ज्या पध्दती प्रदान केल्या आहेत, त्यांचा स्वीकार केल्यास समाजात निश्चितच एकतेचे वातावरण निर्माण होते. अल्लाहने अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) व अंतिम ग्रंथ कुरआनद्वारे सर्व मानव समाजाला अशी परिपूर्ण जीवन व्यवस्था प्रदान केली आहे की, मानवाला कोणत्याही काळात व कोणत्याही स्थळी आपल्या कोणत्याही समस्येचे समाधान करण्यासाठी इतरत्र कोणतेच मार्गदर्शन प्राप्त करण्याची निश्चितच गरज भासणार नाही.

मग सत्याचा इन्कार का?
ही अतिशय दुर्दैवाची व शरमेची बाब आहे की, ज्या जनसमूहाला अल्लाहने इतका परिपूर्ण व सर्वंकष जीवनमार्ग दिला होता आणि समता व सामाजिक एकता स्थापित करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती, तसेच इस्लामचा प्रसार करून संपूर्ण मानव समाजास एकत्रित आणण्याचे कार्य दिले होते, तोच जनसमूह त्याला सोपविलेल्या कर्तव्यांची पायमल्ली करून आपल्या एकतेला छिन्न-विच्छिन्न करण्याचे दुष्कर्म करीत आहे. जगातून उच्च-नीच, स्पृश्यास्पृश्यता, परस्पर द्वेष व तिरस्काराची तुच्छ भावना नष्ट करून पृथ्वीवरील अन्याय व अत्याचाराचे वातावरण संपुष्टात आणावे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगण्यात आली होती. अल्लाहाच्या एकत्वाच्या सत्य मार्गाचा अवलंब करून लोकांत विश्वबंधुत्वाची भावना जागृत करावी, असे कार्य त्यांना सोपविण्यात आले होते, जेणेकरून जुलुमाऐवजी न्याय, युध्दाऐवजी शांती, द्वेष व शत्रुत्वाऐवजी हितचिंतन व आपुलकीचे वातावरण निर्माण व्हावे व त्यांनीही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासारखे दयावान व कृपाळू-करुणामय सिध्द व्हावे असे अपेक्षित आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget