Latest Post


माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे,

‘‘अल्लाहच्या पैगंबरांचे चारित्र कुरआन होते.’’ (हदीस : मुस्लिम) 


स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) कुरआनला अभिप्रेत मणुष्याचे पूर्ण आदर्श होते. कुरआन शिकवणींनुसार ज्या उच्च दर्जाचा मनुष्य अपेक्षित आहे, त्यानुसार पैगंबर मुहम्मद (स.) पूर्ण आदर्श  मानव होते. कुरआनमध्ये ज्या महान नैतिक शिकवणी आल्या आहेत त्या सर्वांना पैगंबरांच्या चरित्रात आणि व्यक्तिमत्त्वात तुम्ही पाहू शकता. पैगंबर मुहम्मद (स.) कुरआन  शिकवणीचे एक जिवंत व पूर्ण आदर्श होते. कुरआनरूपात ईशआदेशच फक्त कयामतपर्यंत सुरक्षित करण्यात आले नाही तर यासोबत पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवनसुद्धा कुरआनद्वारा कयामतपर्यंत सुरक्षित झाले आहे. पैगंबरांच्या पवित्र जीवनावरील सर्व ग्रंथ हरवले तरी तुम्ही त्यांचे पवित्र जीवनचरित्र व व्यक्तिमत्त्वाला कुरआनमध्ये पाहू शकता.



पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या दृष्टीने या सूरहचे अतिमहत्त्व आहे. म्हणूनच ते या सूरहचा विषय लोकांपर्यंत पोहचविण्याचा अनेकदा प्रयत्न करीत असत. या सूरहवर विचारपूर्वक मनन चिंतन केल्याने त्याचे महत्त्व कळून येते.

हा सूरह पारलौकिक जीवनाशी संबंधित आहे. मृत्यूपश्चात सर्व लोकांना पुन्हा जिवंत केले जाईल यावर मक्कावासी अचंबित होत होते. त्या जगातील आपल्या कार्याचा हिशेब द्यावा लागेल यावर त्यांचा विश्वास नव्हता. सदाचारी त्यावेळी जन्नतमध्ये आणि दुराचारी जहन्नममध्ये जातील, हे ऐकून ते आश्चर्यचकित होत असत.  

आयएमपीटी अ.क्र. 227   -पृष्ठे - 36     मूल्य - 18  आवृत्ती-1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/bgn53pv9ulk0v9uhhfsk65ksfvmxr9q2



माननीय बराअ (रजि.) यांचे कथन आहे,  ‘‘पैगंबर मुहम्मद (स.) सर्वांपेक्षा अधिक सुंदर व सर्वांपेक्षा जास्त सुशील स्वभावी होते. ते अतिउंच नव्हते की उंचीने लहानसुद्धा नव्हते.’’  

(हदीस : बुखारी)


स्पष्टीकरण

अल्लाहने पैगंबर मुहम्मद (स.) यांना आंतर्बाह्य दोन्ही प्रकारचे सद्गुण प्रदान केले होते. चेहरेपट्टीनुसारच ते सुंदर नव्हते तर त्यांचा स्वभाव व चारित्र्यसुद्धा अतिसुंदर तसेच उच्च व  श्रेष्ठ होते. कुरआनमध्ये पैगंबरांना संबोधन करण्यात आले आहे,

‘‘आणि नि:संशय तुम्ही महान नीतिमत्तेच्या उच्च दर्जावर आहात.’’ (दिव्य कुरआन, ६८:४)


Madina

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ज्ञानाविषयी आयती अवतरीत झाल्या. त्या अशा, ”आपल्या विधात्याच्या नावाने वाचा, ज्याने माणसाची निर्मिती गोठलेल्या रक्तापासून केली. तुमचा विधाता उपकार करणारा आहे. त्याने लेखणीद्वारे ज्ञान दिले आणि आजवर माणसाला जे माहीत नव्हते ते ज्ञान दिले.”

याचा अर्थ, अल्लाहने प्रेषितांकरवी सुरुवातीपासूनच ज्ञानाचे महत्त्व सांगितले आहे. माणसाची निर्मिती कशापासून झाली हा विज्ञानाचा विषय आहे. म्हणजेच अल्लाहने प्रेषितांना पाठवून त्या माहिती नसलेल्या विज्ञानाची सुरुवात केली.

प्रेषितांनी मुस्लिमांना सांगितले आहे की, ज्ञान संपादन करणे हे प्रत्येक मुस्लिम पुरुष स्त्रीला बंधनकारक आहे. ते अनिवार्य कर्तव्य आहे. जगातील आजवर उदयास आलेल्या कोणत्याही संस्कृती, सभ्यता किंवा अगदी जवळच्या काळातील विचारधारा विकसित झालेल्या फ्रेंच रेनेसांपर्यंत शिक्षणाला इतके महत्त्व प्राप्त झालेले नव्हते विशेष म्हणजे ज्ञान संपादन करण्यासाठी पुरुषांबरोबरच स्त्रियांचाही स्वतंत्र व आवर्जुन उल्लेख इतर कुठेही आढळत नाही. उलट स्त्री जातीला शिरण घेण्यास बंदीच असल्याची उदाहरणे सर्वत्र आहेत.

दुसरीकडे प्रेषितांनी सांगितले आहे की, शिक्षण प्राप्त करण्यासाठी जरी तुम्हाला चीनपर्यंत जावे लागले तर जरूर जा. ते ज्ञान संपादनासाठी आवश्यक आहे. त्यांचा म्हणण्याचा उद्देश एकच की, ज्ञान मिळवण्यासाठी किती लांबचा प्रवास करावा लागला, कितीही कष्ट सहन करावे लागले, आपले घरदार सोडून द्यावे लागले तरी हरकत नाही. ज्ञानासाठी सर्व सुखसोयी सोडून कष्ट घ्या. प्रसंगी घरातून बाहेर निघा.

कुरआनात एके ठिकाणी उल्लेख आहे की, अल्लाह ज्यास बौद्धिक ज्ञान देतो, त्याला जणू सर्वगुणसंपन्न करतो. माणसांनी आपली बुद्धी आणि वाचारशक्तीचा वापर करून कुरआनातील आयतींचा अर्थ लावावा आणि अल्लाहने विश्वात जे जे निर्माण केले आहे त्याचा अभ्यास करावा. अशा आयती कुरआनात सगळीकडे आढळतात. अल्लाह म्हणतो, मी केलेल्या निर्मितीच्या खुणा सर्वत्र पसरलेल्या आहेत. त्यांचा अभ्यास करा.

पवित्र कुरआनच्या पहिल्या आयती अवतरीत झाल्या तेव्हापासून ज्ञान-विज्ञानाच्या युगास सुरुवात झाली. ज्या वेळी प्रेषितांच्या शकवणुकीचा प्रसार झाला, त्या वेळी धार्मिक व ऐहिक ज्ञान वेगवेगळे नव्हते. मशिदी शिक्षणाची केंद्रे होती. प्रेषितांनी ज्ञान-विज्ञानाला तेवढेच महत्त्व दिले जेवढे धार्मिक विधी-धार्मिक ज्ञानाला दिले होते.

पवित्र कुरआनात म्हटले आहे की, अल्लाहने प्रेषित इब्राहीम (अ.) यांच्या संततीला बौद्धिक ज्ञान, ग्रंथ व त्याचबरोबर राज्य गाजवण्यासाठी भला मोठा भूप्रदेश दिला आहे. तर आणखी एक उल्लेख आला आहे, त्यात अल्लाहने एका साधारण व्यक्तीला बनी इसराइल समुदायाचा बादशहा बनवले, तेव्हा लोकांनी आक्षेप घेत सांगतले की, आमच्यापेक्षा फाटकातुटका माणूस आमच्यावर कसे राज्य करणार? अल्लाहने उत्तर दिले, मी त्याला ज्ञान व ऐहिक शक्ती देईन. याचा अर्थ असा की, या जगात आपला दरारा, आपले राज्य गाजवण्याची गुरुकिल्ली म्हणजे नुसते ज्ञान किंवा ऐहिक, शारीरिक शक्तीच नव्हे तर दोन्ही अनिवार्य आहेत.

प्रेषित म्हणायचे, अज्ञान आणि इस्लाम एकत्र येऊच शकत नाहीत. प्रेषितांचे एक विधान आहे की, अल्लाहची निर्मिती असलेल्यांचा अभ्यास करण्यासाठी क्षणभरही खर्च केला तरी तो ऱर्षभराच्या उपासनेपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. प्रेषितांच्या या शिकवणुकीचा प्रभाव इतका झाला की त्यांच्यानंतर जेव्हा अरब लोकांनी जगभर इस्लामचा प्रसार केला तेव्हा त्यांनी फक्त धार्मिक विधी, परंपरा यांचाच प्रसार केला नाही तर त्यांनी ज्ञान-तंत्रज्ञानाकडे अभूतपूर्व लक्ष दिले. आधुनिक ज्ञानाचे कोणतेही क्षेत्र असे नाही, ज्याचा पाया अरबांनी घातला नसेल. रसायनशास्त्र, असो, भौतिकशास्त्र असो किंवा बीजगणित (अलजेब्रा), अभियांत्रिकी, खगोलशास्त्र, वैद्यकीयशास्त्र, भूगोल याच्यासह कला, साहित्य याचाही पाया रचला. म्हणजे मानवी जीवनाच्या कोणत्याही क्षेत्राला त्यांनी सोडले नाही. आज संगणक ज्या तंत्रावर निर्माण केले गेले आहे, त्याचे मूळ लॉगॅरिथम हे गणिताच्या शाखेत आहे. ते अरब विद्वानांनी विकसित केले. त्याचबरोबर इतिहास लेखन, काव्यलेखन, तत्त्वज्ञान आदी सर्व क्षेत्रांत मोठे योगदान दिले. मुस्लिम बादशाहांनी जगभर ज्या इमारती वांधल्या त्यामागची अभियांत्रिकी, कला, त्यांचे सौंदर्य आजही आश्चर्यात टाकणारे आहे.


- सय्यद इफ्तिखार अहमद
मो.: ९८२०१२१२०७


दिव्य कुरआन अध्याय क्रमांक 36 (सूरह यासीन) चे हे मराठीतील भाष्य आहे. या अध्यायात ईशभय सप्रमाण अधिक स्पष्ट करण्यात आले आहे.

एकेश्वरत्वाविषयी सृष्टीतील निशाण्या प्रमाणस्वरूप देण्यात आल्या. तसेच पारलौकिक जीवनाविषयी सृष्टीतील निशाण्या आणि मनुष्याच्या स्वत:च्या अस्तित्वात सापडणाऱ्या निशाण्यांना प्रमाणस्वरूप येथे प्रस्तुत केले आहे. हा अध्याय कुरआनचे हृदय आहे.

मुहम्मद (स.) यांच्या प्रेषित्वाच्या सत्यतेला स्पष्ट करून ह्या पुराव्यांद्वारे चेतावणी व तंबी प्रभावीपणे पुन्हा पुन्हा देण्यात आली आहे. कुरआन आवाहनास हा सूरह अत्यंत प्रभावीपणे मांडतो ज्यामुळे विचारांचा साचलेपणा नष्ट होऊन आत्मा जागृत होतो.  

आयएमपीटी अ.क्र. 226     -पृष्ठे - 48    मूल्य -22             आवृत्ती - 1 (2014)


डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/gasaj3fz8i9gcedwazn4mv1sbyhssoi2



माननीय अब्दुल्लाह बिन औफ (रजि.) यांचे कथन आहे, ‘‘अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) ईशस्मरणात अधिक मग्न होत असत. ते व्यर्थ व अनावश्यक गोष्टी बोलत नसत. नमाज  अदा करताना अधिक वेळ आणि अभिभाषणासाठी कमी वेळ खर्च करीत असत. विधवा व गरिबांसोबत चालण्यात त्यांना लाज वाटत नसे आणि त्यांच्या गरजा ते पूर्ण करत असत.’’  (हदीस : नसई, दारमी) 

स्पष्टीकरण

‘व्यर्थ व अनावश्यक गोष्टी बोलत नसत’ अरबीत ‘कलील’ हा शब्द ‘अगदी स्पष्ट निषेध’च्या अर्थात वापरला जातो. उदा. कुरआनमध्ये आले आहे, ‘‘ते बिल्कुल ईमानधारक नव्हते.’’ काही  टीकाकारांनी अनुवाद केला, ‘‘ते व्यर्थ गोष्टी कमी प्रमाणात बोलत.’’ येथे व्यर्थ गोष्टींशी त्यांना तात्पर्य भौतिक गोष्टी आहेत. परंतु भौतिकतेशी संबंध ठेवणाऱ्या आवश्यक गोष्टींना व्यर्थ  म्हटले जाऊ शकत नाही. परंतु ईशस्मरणाच्या तुलनेत उपलक्षत: त्यांना व्यर्थ म्हटले जाते. अन्यथा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या तोंडून व्यर्थ गोष्टी कधीच निघत नसत. पैगंबरसोबती  (साथीदार) विषय कुरआनोक्ती आहे, ‘‘जे व्यर्थ गोष्टींपासून अलिप्त राहतात.’’ अशा स्थितीत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी कोणी व्यर्थ गोष्टीची कल्पनासुद्धा करू शकत नाही.



“उजाड, वैराण, वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद

जगातल्या दीन दु:खीतांचा अखेरचा आसरा मुहम्मद”

कवीवर्य – सुरेश भट.

वरील ओळींवरून प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) यांची महती लक्षात येते. जगातील कुठल्याही जाती – धर्माच्या विचारी माणसांना प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) भुरळ पाडली होती. ज्यानी इस्लाम स्विकारला केवळ त्यांच्याच मनात मुहम्मदांविषयी (स.अ.व.स) आदर भाव होता असे नव्हे – तर आपल्या स्वत:च्या धर्माशी थोडीही प्रतारणा न करता जगातील बहुतेक साऱ्याच सुशिक्षित आणि विचारी माणसांनी त्यांचे मोठेपण मान्य केलेले आहे. मायकल हार्ट या ख्रिश्चन लेखकाने जगाच्या जडणघडणीवर ज्यांचा विषेश प्रभाव पडला अशा आजपर्यंतच्या 100 महान व्यक्तींवर एक पुसतक लिहले आहे. – ‘द हंड्रेड’ (The Hundred). त्यात त्यांनी या व्यक्तींच्या प्रभावानुसार त्यांची क्रमावारी लावलेली आहे. या क्रमवारीत प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) यांना प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे. आपल्या पुस्तकात पैगंबरांना सर्वप्रथम क्रमांक देण्यामागचे कारण सांगतांना मायकल हार्ट म्हणतात की, मुहम्मद (स.अ.व.स) हे धार्मिक व संसारिक या दोन्ही क्षेत्रांमध्ये समान रुपाने यशस्वी आहेत. त्यांनी आध्यात्मिक व नैतिक दृष्ट्या अतिशय मागासलेल्या व दरिद्री समाजामध्ये इस्लामच्या शिकवणीला प्रारंभ करून त्याला एका जागतिक पातळीवरील महान धर्मामध्ये रुपांतरीत केले. त्यांचं व्यक्तीत्व डबक्यासारखं मर्यादित न राहता एखा़द्या खळाळणाऱ्या झऱ्यासारखं होतं. म्हणूनच कवीवर्य सुरेश भट त्यांचा उल्लेख “खळाळणारा झरा मुहम्मद” असा करतात.

प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) तत्कालीन वर्तमानाशी तर झुंजलेच पण त्यांनी दिलेल्या तात्विक व नैतिक बळावर इस्लाम आजही अज्ञान व अत्याचाराच्या अंधाराशी झुंजतो आहे. ज्या मरुक्षेत्रातील सृष्टी पुर्णत: पराभूत होती आणि अंतरआत्मे हारलेले होते. तेथेसुध्दा प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) जिंकले. जन्मत: ज्यांच्या नशीबी मरण केवळ नोंदलेले होते अशा मुलींसाठी ते मुक्तीदाता जाहले. ह्या जगात चांगल्यांना तर सारेच मान देतात पण मुहम्मद (स.अ.व.स) उद्धटांशीसुध्दा नम्रतेने वागले. म्हणूनच ते साऱ्या जगाला भावले. परंतु अंधश्रध्दांवर आधारीत ज्यांची धर्मविक्रीची दुकाने बंद झाली होती, अशांना ते झोंबले सुध्दा !

प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) इस्लामचा प्रसार तात्विक आणि नैतिक बळावर केला. एक गैरसमज नेहमीच इस्लामबद्दल पसरवला जातो की हा धर्म तलवारीच्या बळावर पसरवल्या गेला. कुराण अध्याय २: वचन २५६ मध्ये स्पष्ट बजावतो, “धर्माच्या बाबतीत कोणतीही जबरदस्ती नाही.” याच गोष्टीला अधिक स्पष्ट करतांना कुराण अध्याय १० : वचन ९९ मध्ये सांगतो, “धर्म स्विकारण्याकरीता कोणालाही भाग पाडल्या जाऊ शकत नाही.” त्याच अध्यायात सांगितले आहे, “आमचे हे कर्तव्य आहे की आम्ही इमानधारकांना वाचवावे.” त्यासाठी म्हणून प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) हाती खडग धरले होते. त्यांनी तर इतर धर्मीय व इतर उपास्यांना मानणाऱ्यांबद्दल सुद्धा सन्मान ठेवण्यासाठी आपल्या अनुयायांना आज्ञा केली होती. अध्याय ६: वचन १०८ मध्ये स्पष्ट केलेले आहे, “(हे मुस्लीमांनो), हे लोक अल्लाह शिवाय ज्यांचा धावा करतात त्यांचा उपहास करू नका.” परंतु दुर्देवाने सध्याच्या काळात सहिष्णुतेची परंपरा असणाऱ्या भारतासारख्या राष्ट्रात सुद्धा इस्लाम बद्दल गैरसमज निर्माण करून हेतुपुरस्सररित्या द्वेष पासवल्या जात आहे.

प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) यांनी आयुष्यभर जगाला शांतीचा संदेश दिला. अरबी भाषेत ‘इस्लाम’ या शब्दाचा अर्थच मुळी ‘शांती’ असा आहे. त्यामुळे आतंकवाद, नक्षलवाद सारख्या द्वेषाधारित गोष्टींना प्रेषित मुहम्मदांच्या (स.अ.व.स) ठायी मुळीच थारा नाही. कुराण आपल्या अध्याय २: वचन ८४ मध्ये म्हणतो “आपसांत एकमेकांचे रक्त सांडू नका. एकमेकांना आपल्या घरापासून बेघर करू नका. तुमच्यापैकी जे लोक असे करतील त्यांना ऐहिक जीवनामध्येही कठोर यातनांकडे नेले जाईल आणि निवाड्याच्या दिवशी त्यांना यापेक्षाही कठोर शिक्षेच्या दिशेने नेण्यात येईल.” कुराण अध्याय ५: वचन ३२ मध्ये असे म्हणतो, “ज्याने एखाद्या माणसाला विनाकारण ठार केले तर त्याने जणु काही सर्व मानवांना ठार केले.” 

भारतीय संविधानाने भारतातील सर्व नागरीकांना, मग ते कुठल्याही जाती-धर्माचे असोत आपल्या कर्तव्याचे पालन करत असतांनाच आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु आजकाल असं करणं म्हणजे जणुकाही देशद्रोहच आहे, असं जाणीव पूर्वक सर्वसामन्य जनतेच्या मनावर बिंबवण्याचा य्रयत्न केल्या जात आहे. विशेषत: हक्कांसाठी संघर्ष करणारी व्यक्ती जर मुस्लीम असेल तर तिच्याकडे ती व्यक्ती देशद्रोहीच आहे की काय अशा नजरेने पाहिल्या जाते. वस्तुस्थिती तर ही आहे की प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) देशद्रोहापासून मुस्लीमांना दूर राहण्याबद्दल सक्त ताकीद दिलेली आहे. ज्या देशात ते राहतात तो देश व तेथील प्रशासन यांच्याशी निष्ठा बाळगण्याचे आदेश त्यांनी दिलेत, मग तो देश इस्लामीक असो की नसो. कुराण अध्याय ४: वचन ५९ मध्ये म्हणतो, “हे मुस्लीमांनो, आज्ञापालन करा त्या लोकांचे जे तुमच्यापैकी आज्ञाधिकारी असतील.” याचा अर्थ असा नव्हे की नागरीकांनी गुलामांप्रमाणे रहावे. याच वचनात पुढे म्हटल्या गेले आहे, “लोकांना शासक व शासन यांच्याशी मतभेद करण्याचा अधिकार सुद्धा आहे आणि आम्ही संवैधानिक पद्धतीने आपल्या हक्कांसाठी लढू शकतो.”

प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) आवश्यकता पडल्यास लढण्याचा जरी आदेश केला असला तरी दोन देशांमधील तहाला फार महत्व दिले आहे. दोन देशांमध्ये जर तह झालेला असेल तर इस्लामिक देशाला कुराण म्हणतो, “संधीचा करार असतांना तुम्ही गैरइस्लामिक देशात राहणाऱ्या मुसलमानांना त्यांनी मागीतल्यावर सुद्धा त्यांची सहाय्यता करू शकत नाही.” (८ : ७२). इस्लाम पुढं कुराणच्या माध्यमातून असं म्हणतो, “जे तुमच्याशी लढतात आणि तुमच्या शत्रूंची मदत करतात त्यांच्या सेाबत मित्रता होऊच शकत नाही.” (६० : ९). ह्या कुराण वचनांवर एक दृष्टीक्षेप टाकल्यावर आपल्या लक्षात येईल की कोणताही खरा मुसलमान अशा कुठल्याही मुस्लीम देशाशी (मग तो पाकिस्तान असो की दुसरा कोणताही) केवळ तो देश मुस्लीम आहे म्हणून आपल्या देशाशी गद्दारी करून मैत्री करूच शकत नाही. भारतीय मुस्लीमांवर कोणीही त्यांच्याबद्दल भय निर्माण करून त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करूच शकत नाही. देशद्रोह प्रेषित मुहम्मदाच्या (स.अ.व.स) शिकवणीत बसतच नाही.

प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) हे खरे स्त्रिवादी होते. इस्लाम हा जगातील पहिला धर्म आहे, ज्याने स्त्रियांना शिक्षण आणि वडिलोपार्जित संपत्तीत अधिकार दिला. प्रेषित मुहम्मदांच्या (स.अ.व.स) आधी अरबस्तानात मुलीने जन्म घेताच तिला जमिनीत जीवंत पुरण्याची क्रूर प्रथा होती. या अमानवीय प्रथेच्या विरोधात प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) बंड पुकारून ही प्रथा बंद पाडली आणि तेथील लोकांना भृणहत्या करण्यापासून परावृत केले, कुराण म्हणतो, “गरीबीच्या कारणास्तव आपल्या संततीला मारून टाकू नका.” प्रेषित मुहम्मदांच्याच (स.अ.व.स) प्रेरणेने संपूर्ण इस्लामी जगतात स्त्रिशिक्षणाचा प्रसार झाला. एकच उदाहरण पुरेसे होईल: जगातील पहिले महिला विद्यालय इ. स. ८५९ मध्ये मोरोक्को येथे फातिमा अल फीहरी या मुस्लीम महिलेने स्थापन केले. विधवा-विवाहाची परवानगी देणारा इस्लाम हा जगातील बहुतेक पहिला धर्म असावा. प्रेषित मुहम्मदांनी वयाच्या २५ व्या वर्षी एका ४० वर्षाच्या विधवेशी लग्न करून आपल्या अनुयायांच्या समोर एक उदाहरण ठेवले. समाजातील गरीब, विधवा, परित्यक्ता, गुलाम, स्त्रियांच्या भरणपोषणाची जबाबदारी प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) तत्काली शासन कर्त्यांवर टाकली होती.

साडे चौदाशे वर्षे लोटलेली असली तरीही मुहम्मद (स.अ.व.स) नावाचा ‘खळाळणारा झरा’ अजूनही कोट्यावधी लोकांच्या हृदयात खळाळतो आहे. म्हणूनच कवीवर्य कलीम खान सर्वशक्तीमानाला एक मागणी मागतात.

“बुद्धीस दे विज्ञान पण हृदयामध्ये कुरआन दे

माझा मुहम्मद वेगळा, त्याची फकीरी शान दे.”


- समीना खालीक शेख (यवतमाळ)

७३५०२४८२३८

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget