Latest Post


- नसीम गाझी

ही पत्ररुप पुस्तिका आहे. जवळपास दहा वर्षापूर्वी एका पुत्राने इस्लाम स्वीकारल्यानंतर आपल्या मातेशी केलेला हा हृदयस्पर्शी पत्रव्यवहार आहे. इतरांना यापासून प्रेरणा मिळावी म्हणून हा व्यिक्तगत पत्रव्यवहार प्रकाशित करण्यात येत आहे.

मार्गभ्रष्ट आत्म्यांनी सत्यधर्माच्या सत्यप्रकाशाने उजळून निघावे आणि जीवनाप्रति गंभीर निर्णय घेण्यास त्यांना साहस व हिंमत प्राप्त व्हावी याच उद्देशाने हे पत्र प्रकाशित करण्यात येत आहे.

आयएमपीटी अ.क्र. 246    -पृष्ठे - 12     मूल्य - 10  आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/4a05owbepl3hw0qq8n7h02x0fesdh3tk










अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या सोबत्यांना आणि समस्त अनुयायांना निकाह अर्थात विवाहाप्रसंगी तसेच इतर महत्त्वाच्या प्रसंगी हे भाषण उद्घृत करण्याची शिकवण दिली आहे. या भाषणालाच इस्लामी परिभाषेत `खुतबा-ए-निकाह' असे म्हणतात. म्हणून निकाह आणि इतर महत्त्वाच्या प्रसंगी या खुतब्याचे वाचन करावे म्हणजे हे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अनुकरण होईल. या भाषणाच्या माध्यमाने इस्लामच्या मौलिक शिकवणी आत्मसात करणेदेखील शक्य होईल. हा `खुत्ब-ए- मसनूना' खालीलप्रमाणे आहे.....

अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या या प्रवचनाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात अंतिम पैगंबरांचे कथन असून त्याचा मराठीत अनुवाद देत आहोत...

``महिमा आणि कृतज्ञता अल्लाहसाठीच आहे. आम्ही त्याचे आभार मानतो. त्याच्यासमोर मदतीची याचना करतो, (झालेल्या चुका आणि अपराधांची त्याच्या दरबारी) क्षमा मागतो आणि आपल्या इच्छा अभिलाषांच्या तसेच वाईट कर्मांच्या वाईट परिणामापासून रक्षण होण्यासाठी त्याच्या अभयछत्राखाली येतो. तो ज्याला मार्ग दाखवील त्याला कोणीही मार्गभ्रष्ट करू शकत नाही आणि तो ज्याला मार्ग दाखविणार नाही, त्यास कोणीही मार्गदर्शन करू शकत नाही. मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूजा अगर उपासनेस पात्र नाही आणि मुहम्मद (स.) त्याचे दास आणि पैगंबर आहेत.''

यानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी कुरआनच्या चार आयतींचे पठण केले, त्याचा अनुवाद अशा प्रकारे आहे.

``लोकहो, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याचे जोडपे बनविले आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर रहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.'' (दिव्य कुरआन , ४ :१)

``हे श्रद्धावंतांनो! अल्लाहचे भय बाळगा जसे भय बाळगले पाहिजे आणि तुम्हाला अशा अवस्थेत मृत्यू यावा की तुम्ही अल्लाहचे आज्ञाधारक असावे.'' (दिव्य कुरआन , ३:१०२) 

``हे श्रद्धावंतांनो! अल्लाहच्या कोपाचे भय बाळगा आणि सत्य व रास्त गोष्टकरीत जा. अल्लाह तुमचे आचरण सुधारील आणि तुमचे अपराध क्षमा करील. जो अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या (स.) आज्ञांचे पालन करील, त्याला महान यश मिळेल.'' (दिव्य कुरआन , ३३:७०- ७१)


माननीय इब्ने मसऊद (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘माझ्या साथीदारांपैकी कोणी माझ्यापर्यंत कोणासंबंधी वाईट गोष्टीला सांगू नये कारण मला माझे मन साफ असलेले आवडेल जेव्हा मी तुमच्याजवळ येईन.’’

(हदीस : अबू  दाऊद)


स्पष्टीकरण

म्हणजे कोणी माझ्याजवळ दुसऱ्याविषयी वाईट बोलून माझ्या मनात गैरसमज निर्माण करू नये. एखाद्या साथीदारात तुम्हाला कमतरता आढळल्यास सहानुभूती व भले कृत्य हे असावे की त्याला एकांतात त्याविषयी सांगावे. त्याच्यातील वाईटाचा प्रचार करू नये. मी तुमच्याशी भेटलो तर कोणाविषयी माझ्या मनात नाराजीची भावना नसावी, हेच मला प्रिय आहे.

एखाद्याच्या मामल्यास वाढविणे आणि त्यास जबाबदार लोकांपुढे मांडण्याचा मामला सर्वांत शेवटचा आहे. जेव्हा सुधारणा करण्याचे सर्व प्रयत्न संपुष्टात आले असतील आणि मामलासुद्धा असा असेल की त्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात एखाद्या मोठ्या बिघाडाची व धोक्याची शंका असेल.



लेखक - न्या. एस. ए. रहमान

भाषांतर - मुहम्मद शफी अन्सारी

इस्लामनुसार खरा शरियत ज्ञाता अल्लाहच आहे. त्याने वही (दिव्यप्रकटन) द्वारे धर्मप्रणाली म्हणजेच जीवनप्रणालीविषयी मार्गदर्शन केले आहे. अल्लाहच विधीविधाता आहे. या पुस्तिकेत कायद्याशी अभिप्रेत मदीना येथील ते सर्वकष व आवश्यक कायदे आहेत ज्यांचे पालन सुसंस्कृत समाजासाठी आवश्यक आहे.

या पुस्तिकेत कायद्याचा अर्थ, कुरआनी कायद्याचे वैशिष्ट्य, कायदेशीर स्वरुपाची हदीस वचनं, वचन-कराराचे पालन, शासकाचे गुणविशेष, व्याजाची मनाई, भेदभाव विरहीत व्यवस्था व कसोटीपूर्ण स्वातंत्र्य इ. विषय चर्चिले आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 245     -पृष्ठे - 24 मूल्य - 16      आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/s2knhedl313i6vcbacktz7o3myyo0u7y





हजरत    अबुबकर,    इस्लामचे   दुसरे खलीफा. यांच्या काळात अमरो  बिनुल  आस   हे पॅलेस्टाईनचे राज्यपाल होते. पॅलेस्टाईनच्या इतर शहरांवर विजय मिळविल्यानंतर बैतुलमुकद्दसकडे ते निघाले. तिथे ख्रिस्ती किल्लाबंद होऊन  त्यांच्याशी   लढत  देत राहिले. त्यांचा धीर खचल्यानंतर त्यांनी समेट घडवण्याचा प्रस्ताव सादर केला. अमरो बिनुल आस यांचे सहकारी अबु  उबैदा  यांना  पत्र पाठवून कळविले की बैतुलमुकद्दस जिंकण्यासाठी आपली प्रतिक्षा होत आहे. ह. उमर (र.) यांनी आपल्या इतर सहकऱ्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय केला. ह. उस्मान यांनी म्हटले की ख्रिस्ती लोकांचे मनोबल   खचले  आहे.  जर  आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्याशी करार केला नाही तर ते आणखीनच खचून जातील आणि  मुस्लिम लोक त्यांना मान देत नाहीत. त्यांना तुच्छ समजतात अशी त्यांची धारणा होऊन ते कोणत्याही अटी न घाल ता स्वतःच पराभूत होतील. ह. अली (र.) यांनी त्या उलट दुसरा विचार मांडला. उस्मान (र.) यांनी तो स्वीकारला. ह. उमर भले मोठे लष्कर आणि शस्त्रास्त्रे घेऊन बैतुलमुकद्दसच्या दिशेने निघतील असा कयास लोकांनी बांधला होता. भव्यदिव्य लष्कर तर सोडाच ते निघाले त्या वेळी त्यांचयाकडे तंबू उभारण्यासाठीही काही सामग्री नव्हती. एक घोडा होता पण ह. उमर यांच्या स्वारीची वार्ता सर्वत्र पोहोचली. जिथं जिथं ही बातमी पोहोचली तिथल्या लोकांचे धाबे दणाणले. शासकीय अधिकाऱ्यांना आधीच कळवले गेले होते. त्यांनी जाबिया या ठिकाणी येऊन त्याची भेट घेतली. यझीद बिन अबी सुफियान आणि खालिद बिन वलीद यांनी याच ठिकाणी त्यांचे स्वागत केले.

सीरिया या देशात रेशिम असल्याने त्यांच्या अधिकारीवर्गामध्ये  अरबांसारखे  साधेपण  गायब झाले होते. ह. उमर (र.) यांना भेटायला हे लोक आले तेव्हा त्यांनी रेशिमची वस्त्रे परिधान केलेली होती. आपल्या हावभावाने हे लोक बिगर अरबांसारखे दिसत होते. ह. उमर  यांना  ही    अवस्था  पाहून  राग  आल ा. ते घोड्यावरून खाली उतरले आणि जमिनीवरील खडे हातात   घेऊन   त्यांच्या   दिशेने  भिरकावल े. म्हणाले की एवढ्या लवकर तुम्हाला अरबांच्या साधेपणाच्या जीवनाचा विसर पडला?

जाबिया या ठिकाणी  बराच  काळ  ते थांबले होते. याच ठिकाणी बैतुलमकद्दसचा करार संमत झाला. त्या लिखित करारावर सर्वांच्या सह्या घेतल्या गेल्या. करार संमत झाल्यावर ह. उमर (र.) बैतुलमकद्दसकडे   निघाले.  त्यांच्या  घोड्याचे  नाल झिजले होते, म्हणून घोडा एकेका पावलावर थांबत होता. उमर (र.) घोड्यावरून खाली उतरले आणि  पायीच निघाले. बैतुलमकद्दसच्या जवळ अबु उबैदा आणि इतर अधिकारी त्यांच्या  स्वागतासाठी  पुढे आले. तिथल्या मुस्लिम लोकांना लाज वाटल्यासारखे झाले. एवढ्या बलाढ्या अधिराज्याचा अधिपती अशी वस्त्रे परिधान करतो हे त्यांना पसंत नव्हते. त्यांनी त्यांच्यासाठी तुर्की देशाचा एक घोडा आणि आलिशान वस्त्रे परिधान करण्यासाठी उपलब्ध करून दिली. ते घेण्यास नकार देत ह. उमर (र.) म्हणाले की आम्हाला मानसन्मान मिळाला तो इस्लाम धर्मामुळे मिळाला आहे आणि तोच सन्मान आम्हाला पुरेसा आहे.

(संदर्भ – अल-फारुक, अल्लामा शिबली नोमानी) 

संकलन – सय्यद इफ्तिखार अहमद


 


माननीय उमर (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही माझी प्रशंसा अति करू नका, ज्याप्रमाणे खिश्चन लोकांनी मरयमपुत्र ईसा (अ.) यांच्या प्रशंसेत अतिशयोक्ती केली. मी तर अल्लाहचा एक दास आहे. म्हणून तुम्ही मला अल्लाहचा दास आणि अल्लाहचा पैगंबर म्हणत चला.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

‘‘पदप्रतिष्ठेतील अंतराला दृष्टीसमोर ठेवून असणे आवश्यक आहे. सामान्यत: लोक आपल्या थोरांची प्रशंसा करण्यात अतिशयोक्ती करतात. याच कारणाने ईसा मसीह (अ.) यांच्या अनुयायींनी ईसा मसीह (अ.) यांना ईशपुत्र घोषित करून टाकले, आणि भक्तीच्या (बंदगी) पंक्तीत प्रेषित्वाला सामील केले. यहुदी (ज्यू) लोकांनी आदरणीय उजैर (अ.) यांना ईश्वरपुत्र म्हटले. खरे तर ईश्वराच्या ईशत्वात कोणीही भागीदार बनू शकत नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी लोकांनी त्यांची प्रशंसा करताना अतिशयोक्तीने काम घेण्यास रोखले.  साक्षवचन (कलमे शहादत) अर्थात ‘‘मी साक्ष देतो की अल्लाहशिवाय दुसरा कोणी पूज्य नाही. तो एकमेव आहे, त्याचा कोणी भागीदार नाही आणि मी साक्ष देतो की मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि त्याचे पैगंबर आहे.’’ या वाक्यातील शब्द ‘अब्दुहु व रसूलुहु’ (त्याचे दास व त्याचे पैगंबर) निरंतर स्मरण करून देतात की पैगंबर व रसूल अल्लाहचा एक दास असतो जरी ते श्रेष्ठत्व व पूर्णत्वप्राप्त व्यक्ती असतात. अशा प्रकारे इस्लामने अनेकेश्वरत्वाला समूळ नष्टकेले आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget