Latest Post


``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.''

दोन प्रकारच्या साक्षीचे हे दोनच शब्द आहेत, मात्र यावर इस्लामची पूर्ण भव्य इमारत उभी आहे आणि यापासून त्या वृक्षाची निर्मिती होते, ज्यासंबंधी कुरआनात म्हटले आहे,

``अल्लाहच्या या कलिम्याचे (धर्मसूत्राचे) उदाहरण एका अत्यंत पवित्र वृक्षासम असून त्याचे मूळ अत्यंत मजबूत आणि त्याच्या फांद्या आसमंतात सर्वत्र विस्तारलेल्या आहेत. तो आपल्या पालनकर्त्याच्या कृपेने प्रत्येक क्षणी चांगली फळे देतो. अल्लाह या उदाहरणाच्या आधारे श्रद्धावंतांना वर्तमान आणि परलोकी जीवनात स्थैर्य प्रदान करतो.''

याच कलिम्यासंदर्भात पैगंबर मुहम्मद (स.) यांनी उघड आवाहन दिले आहे,

``लोकहो या कलिम्याचा स्वीकार करा. अरब आणि बिगरअरबांचे पूर्ण नेतृत्व तुमच्या हाती येईल.''

आणि इतिहास साक्षी आहे की ज्यांनी या धर्मसूत्राचा स्वीकार केला, ते समस्त जगाचे शासक बनले. अल्पसंख्येत असूनही रोम आणि पर्शियासारख्या साम्राज्यांना गुलामी पत्करावी लागली. कारण या धर्मसूत्राचा चमत्कारच असा आहे की माणूस समस्त प्रकारची गुलामगिरी झुगारून देतो आणि एकाच अल्लाहची गुलामी स्वीकारतो. या धर्मसूत्रामागे एकमेव अल्लाहची प्रचंड शक्ती असून जगात यामुळे अद्वितीय क्रांती घडली. म्हणूनच हा कलिमा प्रत्येकाच्या मानसिकतेत रूजावयास हवा. यासाठीच मूल जन्मताच त्याच्या कानात हे शब्द उच्चारून त्यास याचे बाळकडू पाजण्यात येते. प्रत्येक नमाजीत याच विचारधारेचे स्मरण करून देण्यात येते आणि प्रत्येक भाषणात आणि लग्न प्रवचनात याची साक्ष देण्यात येते. हे यासाठी की, आम्हाला सतत स्मरण राहावे की आम्ही प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक वेळी अल्लाहचे दास आहोत आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अनुयायी आहोत.



माननीय अबू  हुरैरा (रजि.) यांचे निवेदन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहव्यतिरिक्त दुसरा कोणीही पूज्य प्रभु नाही. तो एकमेव आहे. त्याने आपल्या सेनेला प्रभावी बनविले आहे आणि त्याच्या दासाची मदत केली आणि विधर्मिय दलाला पराभूत केले. तो एकमेव आहे. त्याच्यानंतर काहीही नाही.’’

स्पष्टीकरण

स्पष्ट आहे की वरील शब्द पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या तोंडून श्रद्धावंतांना जेव्हा विधर्मियांवर विजय प्राप्त झाला तेव्हा निघाले असतील. या विजय व सफलतेवर फुलून न जाता पैगंबरांनी यास ईशकृपा व ईश्वराचे उपकार घोषित केले. या विजयास त्यांनी स्वत:च्या प्रयत्नाचे फळ समजले नाही आणि श्रद्धावंतांच्या सेनेला स्वत:ची सेना न मानता पैगंबरांनी त्यास अल्लाहची सेना म्हटले आहे. तसेच पैगंबरांनी स्वत:ला एक ईशदास व आज्ञाधारक दास घोषित केले आहे.

‘‘तो एकमेव आहे, त्याच्यानंतर काहीही नाही.’’ याचा अर्थ एक अल्लाहनंतर काहीही शिल्लक राहात नाही की ज्यामुळे ते आमच्या संबंधांचे केंद्र बनावेत. अल्लाहव्यतिरिक्त जे काही आहे ते काहीही नसल्याचा पर्याय आहे. याच वास्तवास कुरआनने या शब्दांत स्पष्ट केले आहे,



- डॉ. फजलुर्रहमान फरीदी

हे एक भाषण आहे, डॉ. फजलुर्रहमान फरीदी यांचे या सभेत मुस्लिम तसेच मुस्लिमेतर बांधवसुद्धा मोठ्या संख्येत उपस्थित होते. या भाषणात सांगितले गेले की ही सिद्धांतवादी संघटना असून तिचा संदेशसुद्धा सैद्धान्तिक आहे. ही संघटना समस्त मानवजातीला संबोधन करते.

जमाअत मानवजातीला स्मरण करुन देत आहे की केवळ अल्लाह त्यांचा प्रभु, निर्माता व पालक आहे. त्याने मानवासाठी त्याच्या सर्व गरजांच्या पूर्तीची व्यवस्था केली, तसेच त्याला एक जीवनप्रणाली दिली जेणेकरुन त्याने विवेकपूर्ण जीवन जगावे.

आयएमपीटी अ.क्र. 250     -पृष्ठे - 16 मूल्य - 10        आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/24vytz5jp4mr0swfkwy6yvllvzw8zq14








`अल्लाहचा सच्चा दास नेहमीच अल्लाहच्या अभयछत्राची आशा बाळगतो. तो आपल्या अहंकार आणि स्वैर अभिलाषांच्या विलोभणीय बाहूपाशात अडकून पडण्याच्या कुपरिणामांची तीव्र जाणीव ठेवतो आणि त्याला याचीही जाणीव असते की, अल्लाह ज्याला सत्यमार्ग दाखवितो त्यास कोणीही मार्गभ्रष्ट करू शकत नाही आणि जर अल्लाहनेच एखाद्यास मार्गभ्रष्ट केले तर मग त्यास कोणीही सत्यमार्ग दाखवू शकत नाही'. हा मजकूर मुळात आज्ञाधारक दास अल्लाहचा आश्रय का घेतो हे दर्शवितो. अल्लाहने प्रदान केलेल्या अनुग्रहांपैकी सत्य मार्गदर्शन हा त्याचा सर्वांत महान अनुग्रह होय आणि याची माणसाला सर्वांत जास्त गरज आहे. कारण जर माणसाला सत्यमार्गाची ओळख नसेल तर तो सत्यमार्गावर चालू शकत नाही. यावर ईह आणि परलोकी जीवनाचे यश अवलंबून आहे. हे मार्गदर्शन अल्लाहने कुरआनच्या माध्यमाने मानवजातीस प्रदान केले आहे. म्हणून जे लोक पैगंबरांवर (अ.) ईमान धारण करतात आणि अल्लाहने प्रदान केलेल्या या मार्गाचा अवलंब करतात आणि ईशमार्गापासून रोखणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीचा ईशमदतीच्या आधारे मुकाबला करतात, ते निश्चितच अल्लाहच्या अभयछत्रात येण्याची कामना करतात. ते सत्यमार्ग प्राप्त करतात आणि त्यावर चालून आपल्या पालनकर्त्याची भेट घेतील. याउलट ज्यांनी अल्लाहच्या अभयछत्राची कामना न करता जीवनाची वाटचाल केली, ते निश्चितच दुष्ट प्रवृत्तीच्या मोहपाशात अडकून आपले जीवन उद्ध्वस्त करतात. हे जाणून आज्ञाधारक दास स्वत:ला ईशहवाली करून टाकतो आणि शैतानाच्या व मनोकामनांच्या अरिष्टांपासून अल्लाहचा आश्रय मागतो.



माननीय उम्मुल आला (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहशपथ! मला माहीत नाही की (अल्लाहजवळ) माझ्याविषयी कोणता मामला होईल, जेव्हा की मी अल्लाहचा पैगंबर आहे.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

एका दीर्घ हदीसकथनाचा हा एक भाग आहे. माननीय उस्मान बिन म़जऊन (रजि.) यांच्या निधनानंतर उम्मुल आला (रजि.) यांनी त्यांना संबोधन करून सांगिले, ‘‘हे अबू साएब, तुम्हावर अल्लाहची कृपा. मी साक्ष देतो की अल्लाहने तुम्हाला अनुग्रहित  केले आहे.’’

यावर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे तुम्हाला कसे माहीत झाले की अल्लाहने त्यांना अनुग्रहित केले?’’

माननीय उम्मुल आला (रजि.) म्हणाल्या, ‘‘माझे माता-पिता तुमच्यावर कुर्बान! मला माहीत नाही की (त्यांना अनुग्रहित केले जाणार नाही). तर कोण आहे ज्यावर अनुग्रह होईल?’’

पैगंबर म्हणाले, ‘‘उस्मानचे तर निधन झाले, त्यांच्याविषयी चांगले विचार व इच्छा माझ्या मनातसुद्धा आहे.’’

यानंतर पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहशपथ! मला माहीत नाही की (अल्लाहजवळ) माझ्याविषयी कोणता मामला होईल जेव्हा की मी अल्लाहचा पैगंबर आहे.’’

अर्थात, अल्लाहचा प्रताप व महानतेची निकड आहे की आम्ही त्याची भीती (ईशभय) बाळगावे, अल्लाहची पकड आणि अल्लाहच्या प्रकोपाविषयी आम्ही कधीही बेफिकीर राहू नये. ईश्वराशी चांगल्या आशा-आकांक्षा बाळगू शकता, परंतु खात्रीने कोणाविषयी काही सांगणे योग्य नाही.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget