Latest Post


यानंतर  पैगंबर मुहम्मद (स.) यांनी कुरआनच्या चार आयती पठण केल्या. या चारही आयतीत अशी शिकवण आहे,

``अल्लाहचे भय बाळगा आणि त्याची अवज्ञा करू नका.'' अर्थात अल्लाहचे भय हे जीवनाच्या म्हणजे इहलोकी आणि परलोकी जीवनाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी वारंवार याचे स्मरण करून दिले आणि प्रामुख्याने लग्नसमारंभाच्या आनंदाच्या प्रसंगी. माणूस आनंदाच्या भरात अल्लाहची अवज्ञा करण्याची जास्त शक्यता असते. वस्तुस्थिती अशी आहे की माणूस हा अल्लाहच्या तुलनेत शून्य आहे. तो अन्न-पाणी आणि एकेका श्वासासाठी अल्लाहवरच अवलंबून आहे. मात्र संपत्ती आणि सामथ्र्याच्या झिंगेत त्याला अल्लाहचा विसर पडतो आणि कधी-कधी तर संपत्ती आणि सामर्थ्य नसतानादेखील तो आपला विवेक हरवून बसतो. वाटेल ते करीत राहतो. आपल्या इच्छा-आकांक्षाची पूर्तता करताना अल्लाहच्या आज्ञांची पायमल्ली करीत जातो. मात्र एक दिवस असा येतो की त्याचे सर्वकाही नष्ट होते. त्याची संपत्ती आणि सामर्थ्य त्याच्याकडून हिरावून घेण्यात येते. याच दुष्प्रवृत्तीमुळे मोठमोठी राष्ट्रे नष्ट पावली. मनुष्य हा मुळात अतिशय दुर्बल आणि परावलंबी आहे. तो आत्मबळावर काहीही करू शकत नाही. त्याने अल्लाहस शरण राहूनच जगावयास हवे. त्याचे दास्यत्व पत्करून आणि त्याच्या अभयछत्रात राहून जगावयास हवे. एके दिवशी समस्त मानवांना त्याच्या न्यायालयात हजर होऊन आपल्या कर्मांचा जाब द्यावा लागणार आहे. अल्लाहच्या आज्ञांचे पालन करून जीवन जगणाऱ्यांसाठी निश्चितच स्वर्गाची प्राप्ती होईल आणि अवज्ञाकारीसाठी भयावह नरकाग्नीच्या उग्र ज्वाला पेटविण्यात आलेल्या आहेत. धन्य ते लोक ज्यांनी ईशपरायणशील व आज्ञाधारकतेने जीवन व्यतित केले आणि सुखदु:खाच्या कोणत्याही स्थितीत त्याना आपल्या कामगिरीचा जाब अल्लाहला धावा लागेल याचा विसर पडत नाही.



माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे निवेदन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘कोणालाही त्याच्या स्वत:च्या कर्माने स्वर्गात जाता येणार नाही.’’

पैगंबरांना लोकांनी विचारले, ‘‘आपणाससुद्धा नाही हे अल्लाहचे पैगंबर?’’

सांगण्यात आले, ‘‘नाही, मलासुद्धा नाही. परंतु अल्लाहने त्याच्या कृपेने व दयेने आच्छादित केले तर. म्हणून तुम्ही दृढता व सुनीती स्वीकारा आणि सान्निध्य स्थापित करा, तसेच तुमच्यापैकी कोणी मृत्युची कामना करू नये. कारण तो सत्कर्मी असेल तर त्याच्या सत्कर्मांत वृद्धी करेल आणि जर तो दुष्कर्मी आहे तर कदाचित तो पश्चात्ताप करून (तौबा करून) अल्लाहला प्रसन्न करील.’’

स्पष्टीकरण

एक हदीसकथन आहे, ‘‘जाणून असा की तुमच्यापैकी कोणीही स्वकर्माने मुक्ती प्राप्त करू शकणार नाही.’’

कुरआनमध्ये आले आहे,

‘‘आणि त्यांना विचारले जाईल : हा स्वर्ग (जन्नत) आहे ज्याचे तुम्हाला वारस बनविले आहे, त्या कर्मांच्या मोबदल्यत जी तुम्ही करीत होता.’’

(दिव्य कुरआन, ७:४३) कुरआन आणि हदीसवर्णनात कसलीही विसंगती सापडत नाही. स्वर्गाचे महान उत्तराधिकारीचे स्थान तर ईश्वरकृपा व दयेनेच प्राप्त होईल. मनुष्याची सत्कर्मे तर निमित्तमात्र असतील. सत्मार्गांनी तर हीच आशा केली जाऊ शकते की ईश्वर दया होईल. स्वर्गप्रवेशाचे वास्तविक कारण ईशकृपा व दयेव्यतिरिक्त अन्य काहीही नाही. ईशकृपा व दयेविना मनुष्यकर्मांचे महत्त्व व स्थिती नगण्य आहे.

अल्लाह कोणा जीवावर त्याच्या सामर्थ्यानुसारच दायित्वाचा भार टाकत असतो.(कुरआन, २:२८६) म्हणून सुनीती आणि सुदृढता स्वीकारा, परंतु मध्यममार्गाला नेहमी तुम्ही दृष्टीसमोर ठेवा ज्यामुळे संतुलित मार्गावर मार्गस्थ होणे तुमच्यासाठी सुकर होईल. जर स्वत:वर अतिरेक कराल तर हे जास्त काळ चालणार नाही. यात शंका आहे की कर्मध्येय तुम्ही विसरून जाल. हे लक्षात ठेवा, ‘‘अल्प जे शिल्लक आहे त्या अधिकपासून श्रेष्ठ आहे जे शिल्लक राहात नाही.’’ सुदृढता, अनुसरण व सान्निध्य त्या मध्यममार्गाला म्हणतात ज्यात अतिरेकाने काम घेतले जात नाही की अत्यल्पतेनेसुद्धा घेतले जात नाही.

एखाद्यास सत्कर्माची संधी प्राप्त होत नसेल तरी त्याने मृत्युची कामना करू नये. जीवनात शक्य आहे की त्याला पश्चात्ताप करण्याचा सुअवसर प्राप्त होईल आणि ईशप्रकोपापासून तो गृहस्थ सुरक्षित होईल.

‘‘अल्लाहव्यतिरिक्त अन्य सर्वकाही नष्टप्राय आहे.’’



- सय्यद जलालुद्दीन उमरी

या पुस्तिकेत कुरआन व हदीसच्या प्रकाशात सय्यद जलालुद्दीन उमरी यांनी या विषयाची उत्तमरित्या मांडणी केली आहे. संपूर्ण समाजासाठी बालकाचे अतिमहत्त्व आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे. पाश्चिमात्य राष्ट्र प्रत्येक चांगल्या कार्याचे श्रेय स्वत:कडे घेतात. बालकल्याणाच्या प्रयत्नांना ते स्वत:चीच कामगिरी मानतात.

याविषयी इस्लामची शिकवण काय आहे, बालहत्येचा निषेध, मातापित्याच्या विशुद्ध भावनेचा आदर, नवजात शिशु, तहनिक, उत्तम नाम, अकिका, बालसंगोपण, शिक्षण-प्रशिक्षण, इ. विषयांवर या पुस्तिकेत विवेचन आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 251        -पृष्ठे - 16   मूल्य - 10      आवृत्ती - 1 (2014)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/smuz0bplvmrqtrrsm586jrz2hfa23p62







``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.''

दोन प्रकारच्या साक्षीचे हे दोनच शब्द आहेत, मात्र यावर इस्लामची पूर्ण भव्य इमारत उभी आहे आणि यापासून त्या वृक्षाची निर्मिती होते, ज्यासंबंधी कुरआनात म्हटले आहे,

``अल्लाहच्या या कलिम्याचे (धर्मसूत्राचे) उदाहरण एका अत्यंत पवित्र वृक्षासम असून त्याचे मूळ अत्यंत मजबूत आणि त्याच्या फांद्या आसमंतात सर्वत्र विस्तारलेल्या आहेत. तो आपल्या पालनकर्त्याच्या कृपेने प्रत्येक क्षणी चांगली फळे देतो. अल्लाह या उदाहरणाच्या आधारे श्रद्धावंतांना वर्तमान आणि परलोकी जीवनात स्थैर्य प्रदान करतो.''

याच कलिम्यासंदर्भात पैगंबर मुहम्मद (स.) यांनी उघड आवाहन दिले आहे,

``लोकहो या कलिम्याचा स्वीकार करा. अरब आणि बिगरअरबांचे पूर्ण नेतृत्व तुमच्या हाती येईल.''

आणि इतिहास साक्षी आहे की ज्यांनी या धर्मसूत्राचा स्वीकार केला, ते समस्त जगाचे शासक बनले. अल्पसंख्येत असूनही रोम आणि पर्शियासारख्या साम्राज्यांना गुलामी पत्करावी लागली. कारण या धर्मसूत्राचा चमत्कारच असा आहे की माणूस समस्त प्रकारची गुलामगिरी झुगारून देतो आणि एकाच अल्लाहची गुलामी स्वीकारतो. या धर्मसूत्रामागे एकमेव अल्लाहची प्रचंड शक्ती असून जगात यामुळे अद्वितीय क्रांती घडली. म्हणूनच हा कलिमा प्रत्येकाच्या मानसिकतेत रूजावयास हवा. यासाठीच मूल जन्मताच त्याच्या कानात हे शब्द उच्चारून त्यास याचे बाळकडू पाजण्यात येते. प्रत्येक नमाजीत याच विचारधारेचे स्मरण करून देण्यात येते आणि प्रत्येक भाषणात आणि लग्न प्रवचनात याची साक्ष देण्यात येते. हे यासाठी की, आम्हाला सतत स्मरण राहावे की आम्ही प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक वेळी अल्लाहचे दास आहोत आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अनुयायी आहोत.



माननीय अबू  हुरैरा (रजि.) यांचे निवेदन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहव्यतिरिक्त दुसरा कोणीही पूज्य प्रभु नाही. तो एकमेव आहे. त्याने आपल्या सेनेला प्रभावी बनविले आहे आणि त्याच्या दासाची मदत केली आणि विधर्मिय दलाला पराभूत केले. तो एकमेव आहे. त्याच्यानंतर काहीही नाही.’’

स्पष्टीकरण

स्पष्ट आहे की वरील शब्द पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या तोंडून श्रद्धावंतांना जेव्हा विधर्मियांवर विजय प्राप्त झाला तेव्हा निघाले असतील. या विजय व सफलतेवर फुलून न जाता पैगंबरांनी यास ईशकृपा व ईश्वराचे उपकार घोषित केले. या विजयास त्यांनी स्वत:च्या प्रयत्नाचे फळ समजले नाही आणि श्रद्धावंतांच्या सेनेला स्वत:ची सेना न मानता पैगंबरांनी त्यास अल्लाहची सेना म्हटले आहे. तसेच पैगंबरांनी स्वत:ला एक ईशदास व आज्ञाधारक दास घोषित केले आहे.

‘‘तो एकमेव आहे, त्याच्यानंतर काहीही नाही.’’ याचा अर्थ एक अल्लाहनंतर काहीही शिल्लक राहात नाही की ज्यामुळे ते आमच्या संबंधांचे केंद्र बनावेत. अल्लाहव्यतिरिक्त जे काही आहे ते काहीही नसल्याचा पर्याय आहे. याच वास्तवास कुरआनने या शब्दांत स्पष्ट केले आहे,



- डॉ. फजलुर्रहमान फरीदी

हे एक भाषण आहे, डॉ. फजलुर्रहमान फरीदी यांचे या सभेत मुस्लिम तसेच मुस्लिमेतर बांधवसुद्धा मोठ्या संख्येत उपस्थित होते. या भाषणात सांगितले गेले की ही सिद्धांतवादी संघटना असून तिचा संदेशसुद्धा सैद्धान्तिक आहे. ही संघटना समस्त मानवजातीला संबोधन करते.

जमाअत मानवजातीला स्मरण करुन देत आहे की केवळ अल्लाह त्यांचा प्रभु, निर्माता व पालक आहे. त्याने मानवासाठी त्याच्या सर्व गरजांच्या पूर्तीची व्यवस्था केली, तसेच त्याला एक जीवनप्रणाली दिली जेणेकरुन त्याने विवेकपूर्ण जीवन जगावे.

आयएमपीटी अ.क्र. 250     -पृष्ठे - 16 मूल्य - 10        आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/24vytz5jp4mr0swfkwy6yvllvzw8zq14







statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget