Latest Post

 


अल्पसंख्याकांना अभय, हे लोकशाहीचे भूषण मानले जाते. हजरत मुहम्मद (सल्ल.) यांच्या लोकसत्ताक राज्यात अनेक अल्पसंख्यांक जमाती होत्या. त्या सर्व जमातींना हजरत पैगंबरांनी कायद्यान्वये अभय दिले. अल्पसंख्यांकाचा धर्म, त्यांची संस्कृती अबाधित ठेवण्याकरिता त्यांनी वेळोवेळी जाहीर फर्माने काढली आहेत. केवळ मुस्लिम बहुसंख्यांक म्हणून त्यांचेच राज्य आहे असे अल्पसंख्यांकांना वाटू नये, या विषयी प्रेषित मुहम्मद सल्ल. फार दक्षता घेत. एखाद्या लहान अल्पमतवाल्या जमातीला देखील राज्याविषयी आपुलकी व विश्वास वाटेल असे वर्तन ठेवण्याबद्दल त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली होती.  

समाजात सर्व साधारणपणे अशी कल्पना स्थापित आहे कि धर्म आणि राजकारण हे दोन वेगवेगळे विषय आहेत. राजकारण घाणेरडं आणि धर्म पवित्र मानला जातं. धर्म ही प्रत्यकाची वैयक्तिक बाब आहे असाही समज आहे. धर्म, पूजा पाठ आणि काही कर्मकांडाशी संबंधित आहे म्हणून ते आपल्या घरापर्यंत मर्यादित ठेवायला पाहिजे हा ही समज व्यापक प्रमाणात समाजात रूजलेला आहे. राजकारण हे देशाचे शासन चालविण्यासंबंधीची विचारधारा आहे. राजकारणाचा धर्माशी काही एक संबंध नाही. इतर धर्मांच्या बाबतीत ही धारणा जरी खरी असली तरी इस्लामच्या बाबतीत ही धारणा बरोबर नाही कारण इस्लाममध्ये धर्म आणि राजकारण यांना वेगळे करताच येत नाही. उलट धर्माच्या उच्च नीति मुल्यांच्या पायावर राजकारणाची इमारत उभी करावी लागते. 

पल्या देशात साधारणपणे अध्यात्मिक प्रवृत्तीच्या सज्जन लोकांनी राजकारणांत पडू नये असा सल्ला दिला जातो. मुस्लिमांमध्येही उलेमांनी राजकारणात भाग घेऊ नये, असा एक विचार प्रवाह अलिकडे प्रबळ झालेला आहे. भारतीय परिपेक्षात जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ती ही की, धर्मापासून राजकारणाला दूर ठेवा म्हणणारी मंडळी सत्ता प्राप्त करण्यासाठी मात्र धर्माचा केवळ आधारच घेत नाहीत तर त्याचा  दुरुपयोग देखील करतात. 

काही जण म्हणतात इस्लामचे दोन प्रकार आहेत; एक सुफी इस्लाम आणि दुसरा राजकीय इस्लाम. सुफी इस्लाम हे भारतीय संस्कृतीशी निगडित आहे आणि राजकीय इस्लाम परकीय व आक्रमक आहे, असा भ्रम पसरविला गेला आहे. वास्तविक पाहता इस्लाम एकाच आहे. पैगंबर मुहम्मद (सल्लम.) यांनी आपल्या आयुष्यात धार्मिक, सामाजिक व राजकीय सुधारणा एकाच वेळी अत्यंत यशस्वीपणे करून दाखविल्या. धार्मिक आणि सामाजिक सुधारणाप्रमाणेच राजकीय सुधारणा करण्यात पैगंबरांना संपूर्ण यश मिळाले. मानव्य हे त्यांच्या राजकारणाचे अधिष्ठान आहे. दडपशाही, भ्रष्टाचार, जुलूम, लाच लुचपत, अत्याचार, द्वेष, तिरस्कार, ध्रुवीकरण यापासून त्यांनी आपल्या राजकारणास दूर ठेऊन राजकारण केले होते. ज्यात सहकार्य, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मानवी मुल्यांचा समावेश होता. त्यांचे राजकारण म्हणजे या उच्च नीति मुल्यांचे प्रात्यक्षिकच होय.

 आजची पाश्चात्य राष्ट्रे ज्या लोकशाहीचा मोठा अभिमान बाळगून आहेत, ती लोकशाही प्रस्थापित करण्याचे पहिले श्रेय हजरत मुहम्मद सल्ल. यांच्याकडे जाते. त्यांनी ज्या काळात अरबस्तानात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली त्या काळात पाश्चात्य राष्ट्रांमध्ये बेबंदशाही बोकाळलेली होती, पाश्चात्य राष्ट्रांचे जंगली युग अजून संपलेले नव्हते किंबहुना आजही संपलेले नाही. फक्त त्यांच्या जंगली व्यवस्थेवर आधुनिक सभ्यतेचा बुरखा त्यांनी घातलेला आहे. हजरत पैगंबरांच्या लोकशाही नंतर 1000 वर्षांनी पाश्चात्य राष्ट्रात लोकशाहीच्या संकल्पना लोकांच्या मनात मूळ धरू लागल्या. इसवी सन 1641 साली राजा व प्रजा यामधील यादवीस तोंड फुटून त्याचे पर्यावसान 1688 सालाच्या फ्रेंच क्रांतीमध्ये झाले. लोकशाहीच्या गोंडस नावाखाली वाटेल त्याला धिंगाणा घालण्याची त्यांनी ही एक सोय करून ठेवली आहे. ज्यामुळे लोकशाही म्हणजे ‘उचल्यांचा बाजार’ न वाटता सुखाचे राज्य वाटावे, अशी त्यांच्या लोकशाहीची रचना आहे.

पैगंबरांच्या लोकशाहीत कोणत्याही एका गटाचा वरचष्मा नव्हता. सर्वाना त्यांच्या योग्य ते प्रमाणे राज्यकारभारात स्थान मिळे. त्यामुळे कोणत्याही कर्तबगार लोकांस महत्वाचे स्थान मिळत असे. त्यांच्या प्रशासनातील अधिकारी मंडळी फक्त स्वजातीयांच्या किंवा आप्तेष्टांच्या कल्याणाकरिता न झटता साऱ्या राष्ट्राच्या कल्याणाकरिता झटत असत. सरकारी अधिकाऱ्यांनी कसे वागावे यासंबंधी पैगंबर म्हणतात,’ त्यांनी (अधिकाऱ्यांनी ) आपली राहणी साधी ठेवली पाहिजे. गरजूंना त्यांना सहज भेटता आले पाहिजे. जे बेकार आहेत, जे आपले जीवन जगण्यास असमर्थ आहेत त्यांना सहाय्य देता आले पाहिजे. मुस्लिमेतर नागरिकांना जे हक्क आहेत ते अबाधित ठेवता आले पाहिजेत.’

समता 

हजरत मुहम्मद पैगंबर सल्ल. प्रणित लोकशाहीचे वैशिष्ट्य म्हणजे समता. समता ही खरी लोकशाहीची द्योतक असते. ज्या राष्ट्रात काळा-गोरा हा भेदभाव केला जातो, वर्णावर योग्यता ठरविली जाते, उच्चनीचपणा दाखविला जातो, धनिक आणि गरीब असे कप्पे पडले जातात त्या राष्ट्रांनी आपल्या लोकशाहीचा कितीही डांगोरा पिटला तरीही ती लोकशाही आदर्श  अशी कधीच होणार नाही. इतकेच नव्हे तर ते लोकशाहीचे विडंबन आहे असे मानले जावे. लोकशाही म्हटली की त्या ठिकाणी स्पृश्यास्पृश्यता, भेदभाव, उच्चनीचपणा किंवा तुष्टीकरण असता कामा नये. सगळ्यांना सारखे स्वातंत्र्य, सारखा न्याय, सारख्या सवलती म्हणजेच खरी लोकशाही होय. पैगंबरांच्या लोकशाहीत श्रीमंतापासून ते गरिबांपर्यंत सर्व नागरिक समतेने राहात होते. त्या ठिकाणी अरब, निग्रो असा भेदभाव नव्हता. मुस्लिमाना एक कायदा आणि ज्यू लोकांना एक कायदा असा पंक्ती प्रपंच दृष्टीस पडत नव्ह्ता. पैगंबरांचे लक्ष व्यक्तीच्या कर्तबगारीवर व योग्यतेवर होते. त्यांच्या लोकशाही मध्ये सैन्याचा सर्वाधिकारी झैद रजि.  नावाचे गुलाम होते. त्याचप्रमाणे मुख्य मशिदीत अजान देण्याचा बहुमान बिलाल रजि. नावाच्या काळ्या निग्रो या सहाबींना  देण्यात आला होता. हजरत पैगंबरांच्या राज्यात मालक व नोकर यामध्ये देखील आदर्श अशी समता होती. स्वतःला पंचपक्वान्ने आणि नोकरास कोंडाभाकर असा प्रकार तेथे दृष्टीस पडत नसे. आपण खातो तेच अन्न आपल्या नोकरास द्या, अशी हजरत पैगंबरांची आज्ञा असल्यामुळे मालक जे अन्न खाई तेच अन्न नोकरास मिळत असे. त्याप्रमाणेच नोकरास वाजवी पेक्षा जास्त काम कधीच देण्यात येत नसे. एखाद्या वेळी नोकरास कामाचा जास्त ताण पडला तर खुद्द मालक त्याच्या मदतीस जात असे. मालक व नोकर यामध्ये हजरत पैगंबर सल्ल. यांनी घालून दिलेला समतेचा उपक्रम त्यांच्या अनुयायांनी किती इमाने इतबारे चालू ठेवला हे पुढील उदाहरणावरून सिद्ध होण्यासारखे आहे. 

एकदा असे झाले की, इस्लामी लष्कराने जेरूसलम जिंकले व पराभूत ख्रिश्चन शासकांसोबत वाटाघाटीसाठी अमिरूल मोमेनीन हजरत उमर फारूख रजि. (द्वितीय खलीफा) यांना पाचारण केले. ते तहाच्या वाटाघाटीसाठी जेरुसलेमकडे निघाले. निघताना त्यांनी फक्त एक नोकर सोबत घेतला होता. बसावयास फक्त एकच उंट असल्यामुळे हजरत उमर रजि. व त्यांचा नोकर आळीपाळीने उंटावर बसून जेरुसलेमकडे मार्गक्रमण करू लागले. हजरत उमर रजि. उंटावर बसले की त्यांचा नोकर पायी चालत असे, काही अंतर गेल्यावर हजरत उमर नोकरास उंटावर बसवीत व आपण पायी चालत. ज्यावेळी जेरुसलेम शहर जवळ आले त्यावेळी नोकराची उंटावर बसण्याची पाळी आली होती. शहर जवळ आले म्हणून तो नोकर उंटावर बसावयास संकोच करू लागला. पण हजरत उमर यांच्या आग्रहामुळे त्याला उंटावर बसावे लागले. नोकर उंटावर व हजरत उमर पायी चालत जेरुसलेमच्या वेशी जवळ आले. हजरत उमर यांचा सर सेनापती अबू उबेद रजि. हे त्यावेळी वेशीजवळ स्वागताकरिता उभे होते. नोकर उंटावर व राजा पायी चालत असलेला पाहून जेरुसलेम चे लोक तुच्छतेने हसतील अशी त्यांच्या सेनापतीने हजरत उमर यांना कळवून त्यांना उंटावर बसण्याचा आग्रह केला. त्यावर हजरत उमर म्हणाले, ’तुमच्या सारखी सूचना मला आतापर्यंत कोणी केली नाही. आपली ही सूचना मुस्लिमांची नाचक्कीच करील. आता पर्यंत आपली अधोगती झाली होती व आपला सगळीकडे धिक्कार होत होता. परंतु आपल्या इस्लाम धर्मामुळे आम्हां सर्वांस सारखा मान मिळाला आहे. आपण सांगता त्या प्रमाणे मी वागेन तर पुन्हा आपली पूर्वीप्रमाणे अधोगती झाली आहे हे सिद्ध होईल.’ आणि हजरत उमर रजि. जमिनीवर व नोकर उंटावर अशा अवस्थेतच ते जेरूसलम शहरामध्ये दाखल झाले. त्यांचा हा निर्णय जेरूसलम वासियांना चकीत करून गेला. जेरूसलमवासी हजरत उमर रजि. यांच्या न्यायप्रिय व समानतेच्या या प्रात्यक्षिकाला पाहून भाराहून गेले. वरील उदाहरणावरून इस्लामच्या लोकशाहीत मालक व नोकर यामध्ये किती समता होती हे स्पष्टपणे दिसून येईल. 

स्वातंत्र्य

हजरत मुहम्मद पैगंबर सल्ल. प्रणित लोकशाहीत प्रत्येक नागरिकास पूर्ण स्वातंत्र्य होते. कोणीही सर्वसाधारण नागरिक राज्यप्रमुखास        -(उर्वरित पान 23 वर)

बेडरपणे जाब विचारीत असे. एकदा एका नागरिकाने खलिफा उमर यांना भर सभेमध्ये एका गोष्टीचा जाब विचारला. त्या बरोबर काही लोकांनी त्या नागरिकास गप्प बसविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून खलिफा म्हणाले, ’त्याला मोकळेपणाने बोलू द्या. नागरिकांनी जाब विचारून आम्हास जाणीव करून दिली तर त्यांनी आपले कर्तव्य योग्य रीतीने पार पाडले असेच मी म्हणेन.’ हजरत मुहम्मद (सल्ल.) यांनी  काढलेली राजकीय फर्माने पाहिली म्हणजे परधर्मीयांच्या आचार व विचार स्वातंत्र्याबद्दल ते किती दक्ष होते हे सहज दिसून येते. त्यांच्या राज्यात ज्यू लोकांचे फार मोठे प्रस्थ होते. त्यांचा प्रमुख व्यवसाय व्याज होता. त्यामुळे गरीबांचे जरी शोषण होते तरी ज्यूंच्या हातात धन खेळत होता. आपला धर्म प्रसार त्यांनी नेटाने चालू ठेवला होता. मुसलमानांचा ते उघड हेवा करीत, पण, हजरत मुहम्मद सल्ल. यांनी राजकीय अधिकाराच्या जोरावर त्या लोकांची मुस्कटदाबी करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही किंवा त्यांची संपत्ती जप्त करून टाकली नाही. आपल्या धर्माविरुद्ध वाटेल त्या खोट्या नाट्या कंड्या पिकवितात म्हणून त्यांनी ज्यू लोकांस जरब दाखविली नाही किंवा मुसलमानांचा उघड-उघड द्वेष करतात म्हणून त्यांचे खून पडले नाहीत. आपल्या राज्यात प्रत्येक व्यक्तीला किंवा समूहाला इतके स्वातंत्र्य दिल्याची उदाहरणे आपणास फारच थोडी सापडतील. 

अल्पसंख्याकांना अभय

अल्पसंख्याकांना अभय, हे लोकशाहीचे भूषण मानले जाते. हजरत मुहम्मद (सल्ल.) यांच्या लोकसत्ताक राज्यात अनेक अल्पसंख्यांक जमाती होत्या. त्या सर्व जमातींना हजरत पैगंबरांनी कायद्यान्वये अभय दिले. अल्पसंख्यांकाचा धर्म, त्यांची संस्कृती अबाधित ठेवण्याकरिता त्यांनी वेळोवेळी जाहीर फर्माने काढली आहेत. केवळ मुस्लिम बहुसंख्यांक म्हणून त्यांचेच राज्य आहे असे अल्पसंख्यांकांना वाटू नये, या विषयी प्रेषित मुहम्मद सल्ल. फार दक्षता घेत. एखाद्या लहान अल्पमतवाल्या जमातीला देखील राज्याविषयी आपुलकी व विश्वास वाटेल असे वर्तन ठेवण्याबद्दल त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली होती.  

सरकारी नोकर म्हणजे जनतेचा सेवक, त्याने आपली जात किंवा धर्म याचा विचार न करता न्यायाने वागले पाहिजे असा दंडक घालण्यात आला होता. अल्पसंख्यांक असलेल्या ख्रिश्चन जमातीशी एक मुस्लिम अधिकाऱ्याने उद्धट व बेजबाबदार वर्तन केले म्हणून त्याला राजीनामा देण्यास खलिफा हजरत उमर रजि. यांनी भाग पाडले. न्याय धर्माकडे पाहून दिला जात नव्हता किंवा पैशा आधारे विकला जात नव्हता. गरीब असो, श्रीमंत असो, नोकर असो कोणीही मुसलमान असो किंवा परधर्मीय असो, सर्वांना हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या राज्यात सर्वांना सारखा न्याय मिळत असे. 

न्याय

एकदा त्यांच्या समोर मुस्लिम विरूद्ध ज्यू असा एक तंटा आला असतांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मुस्लिम व्यक्तीला दोषी ठरविले. पवित्र कुरआनाच्या आज्ञेप्रमाणे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी न्यायास अत्यंत श्रेष्ठ स्थान दिले आहेत. कुरआनमध्ये न्यायाच्या महत्वाला अधोरेखित करताना परमेश्वराने म्हटले आहे की, ’’हे श्रद्धावंतांनो! न्यायावर दृढ राहा आणि अल्लाहसाठी साक्षीदार बना, यद्यपि तुमच्या न्यायाचा व तुमच्या साक्षीचा आघात तुम्हा स्वतःवर अथवा तुमच्या आई-बापावर व नातेवाईकांवर जरी होत असेल तरी देखील! मामल्यातील पक्षकार मग तो श्रीमंत असो अथवा गरीब, अल्लाह तुमच्यापेक्षा जास्त त्यांचा हितचिंतक आहे. म्हणून आपल्या मनोवासनेच्या अनुकरणात न्यायापासून दूर राहू नका आणि जर तुम्ही पक्षपाताची गोष्ट बोललाच अथवा सत्याला बगल दिली तर समजून असा की जे काही तुम्ही करता अल्लाहला त्याची माहिती आहे.’’ (सुरे निसा : आयत नं. 135) 

हजरत मुहम्मद सल्ल. प्रणित  लोकशाहीचे लक्षात ठेवण्यासारखे एक वैशिष्ट्ये म्हणजे अधिकाराचा सदुपयोग होय. अलिकडे राजकारण हाती घेतले की ते यशस्वी करण्याकरिता अत्याचाराच्या कित्येक वेळा अवलंब करावा लागतो, असे नामुष्कीचे उद्गार काढणाऱ्या मुत्सद्यांच्या तोंडास हजरत पैगंबरांनी चांगलीच पाने पुसली आहेत. अधिकाराचा दुरूपयोग करून केले जाणारे अत्याचारी राजकारण जगाच्या इतिहासात अत्यंत लांछनास्पद समजले जाते. अत्याचाराचा वारंवार आश्रय घ्यावा लागणे हे कमकुवतपणाचे लक्षण आहे. राजकारणातून सत्ता मिळते आणि अधिकारातून सत्ता मिळते आणि हे अधिकार ही राजकारणामधील एक प्रचंड शक्ती आहे. उत्कृष्ट राजकारणाचा दाखला म्हणून आपणास राजकीय अधिकारांच्या सदुपयोगाकडे बोट दाखविता येईल. याच गोष्टीचा पैगंबर मुहम्मद सल्ल. यांनी अवलंब केला होता. 

राजकारण यशस्वी करण्याकरिता त्यांनी अत्याचाराचा भस्मासुर कधीही निर्माण होवू दिला नाही. त्यांनी लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवल्यापासून एकंदर राजकारणाचा विचार केला म्हणजे अत्याचाराचे अनेक प्रसंग त्यांनी मोठ्या शिताफीने टाळले होते हे लक्षात यावयास फारसा वेळ लागणार नाही. उदाहरणादाखल म्हणून आपणास एका प्रसंगाचा उल्लेख करता येईल. एकदा हजरत मुहम्मद सल्ल. यांना बदनाम करण्याकरिता व त्यांचे लोकशाही शासन उलथून टाकण्यासाठी काही ज्यू लोकांनी एक भयंकर कट रचला होता. पण हा कट ऐनवेळी उघडकीस आल्यामुळेे ज्यू लोकांचा बेत सपशेल फसला. न्यायासनासमोर त्यांची चौकशी होऊन त्यांना योग्य त्या शिक्षा झाल्या. पण तेवढ्यामुळे जनतेचे समाधान झाले नाही. ज्यांनी हा कट करून राष्टास धुळीस मिळविण्याचा प्रयत्न केला त्यांचीच काय पण ‘ एकजात सर्व ज्यू लोकांची कत्तल करा’ अशा गर्जना शहराच्या कानाकोपऱ्यातून ऐकू येऊ लागल्या. तुमच्या हातून झाले नाही तर आम्हास परवानगी द्या, आम्ही त्यांची कत्तल करतो असे काही लोक हजरत मुहम्मद सल्ल. यांना उघडपणे बोलू लागले. दहा बारा ज्यू लोकांनी चूक केली म्हणून त्यांचे प्रायश्चित सर्व ज्यू लोकांना देणे म्हणजे धडधडीत त्यांच्यावर अत्याचार होय असे हजरत मुहम्मद सल्ल. यांना वाटल्यामुळे त्यांनी ज्यू लोकांच्या हत्याकांडास संमती दिली नाही किंवा त्यांच्यावर कडक नियंत्रणही घातले नाही. जेव्हा आस बिन जबल रजि. यांची यमनचे गव्हर्नर म्हणून त्यांनी नेमणूक केली. त्यावेळी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांना पुढीलप्रमाणे उपदेश केला, ’’ तुम्ही प्रजाजनांस अत्यंत दयाळूपणाने व विचाराने वागविले पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी कठोरपणाने वागता कामा नये किंवा त्यांची संपत्ती लुटता काम नये. त्रस्त लोकांचे सुस्कारे परमेश्वर दरबारी लवकर रुजू होतात, या गोष्टीची आठवण असू द्या.’’ वरील लोकशाही मुल्यांचा निःपक्षपातीपणे विचार केल्यावर अशी आदर्शभूत लोकशाही प्रस्थापित करणारे प्रेषित हजरत मुहम्मद (सल्ल.) श्रेष्ठ दर्जाचे राजकीय धुरंधर होते व त्यांनी स्थापित केलेली राजकीय मुल्ये प्रलयाच्या दिवसापर्यंत  मानवजातीला आदर्श राजकारण कसे करावे, याचे मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहेत, यात शंका असण्याचे कारण नाही. 



सभ्यतांच्या उदय आणि ऱ्हासाबद्दल काही विचार या आधीच्या लेखात मांडले आहेत. आणखीन काही गोष्टींचा या संदर्भात तपास करताना असे दिसून येते की सभ्यतांचा विस्तार होत असताना किंबा एका ठराविक स्थितीस पोहोचल्यानंतर त्यांना ज्या समस्यांशी तोंड द्यावे लागते, ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते त्याचे प्रत्युत्तर देण्याची त्यांची क्षमता असते किंवा नाही. मुळात सभ्यतांचा जन्म कठीण प्रसंगातून होतो. अशा कोणत्याही सभ्यतेच्या अनुयायांमध्ये समोरील आव्हानांना तोंड देण्याची मानसिक तयारी नसेल तर त्या सभ्यतांचे भवितव्य धोक्यात आल्याशिवाय राहात नाही. कोणत्याही सभ्यतेचा प्रवास सतत सुरू असावा लागतो. एक व्यक्ती असो की समाज अथवा त्यापासून उदयास आलेली सभ्यता हे सर्व या विश्वाचे (Universe) घटक आहेत. ज्या प्रकारे धरती इतर ग्रह, धरतीवरील प्रत्येक सजीव आणि निर्जीव अस्तित्व या विश्वाचे घटक आहेत. हे ब्रह्मांड निर्मितीनंतर स्थिर नसून आपल्या प्रवासाच्या प्रत्येक बिंदूवर सदैव विस्तारत आहे. एका व्यक्तीपासून जसे कुटुंब जन्माला येते, त्यापासून समाज, संस्कृती; तसेच या जगातील सर्व सभ्यता विस्तारत आहेत. हा सृष्टीचा नियम आहे. जर काही कारणाने विश्वातील एखादे अस्तित्व या सृष्टीच्या नियमाविरूद्ध जात असते तर मग त्याचा मृत्यू अटळ आहे. अशाच प्रकारे सभ्यतांना विस्तारायला हवे. त्या सभ्यतेमध्ये विस्तारासाठी पूरक तत्त्वे असायला हवीत. कोणत्याही संस्कृती-सभ्यतेमध्ये विभाजनाला थारा नसतो. यासाठी ती सभ्यता साऱ्या मानवजातीला आकर्षित करणे गरजेचे असते. जर मानवजातीला वेगवेगळ्या निकषांवर विभागले जात असेल तर ही प्रक्रिया सृष्टीच्या नियमांविरूद्ध जात आहे असे समजले जावे आणि नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्याचबरोबर त्या सभ्यतेची नैतिक मूल्ये सर्वसमावेशक असायला हवेत. जर समाजातील मानवांना निरनिराळ्या निकषांवर विभागले गेले तर मग संस्कृतीचे वेगवेगळ्या परंपरेत विभाजन होईल. याचा अर्थ संस्कृतीचे रूपांतर परंपरेत होईल. परंपरा कोणत्याही मानवी समूहासाठी प्रगतीची दारे उघडत नाही. प्रगतीचे दार बंद झाले की ती संस्कृती स्वतःहून आपला विनाश ओढवते. तसेच सभ्येमध्ये संतुलन असणे गरजेचे आहे. म्हणजे त्या त्या सभ्यतेतील माणसामाणसांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये. वंश, वर्ण, जात अशा प्रकारचे भेदभाव जर माणसामाणसांमध्ये केले जाऊ लागले तर ती संस्कृती स्वतःच विभाजनाकडे जाते. अशा संस्कृतीवर आधारित सभ्यतादेखील मग एक सभ्यता म्हणून शिल्लक राहात नाही.

जगात ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माने मानवजातीची विभागणी केली, पण ही विभागणी वर्ण, वंश, जात या निकषांवर नाही. ख्रिस्ती धर्माने मानवजातीला ख्रिस्ती आणि बिगर ख्रिस्ती अशी विभागणी केली, तर दुसरीकडे इस्लाम धर्माने सकल मानवजातीची विभागणी श्रद्ध आणि अश्रद्ध अशी केली. म्हणजे ही बिभागणी अटळ नाही. आज जे लोक ख्रिस्ती नाहीत उद्या ते ख्रिस्ती धर्मात प्रवेश करू शकतात. तसेच ज्या लोकांनी इस्लाम धर्मावर आज श्रद्धा ठेवलेली नाही ते उद्या श्रद्धा बाळगू शकतात.

कोणतीही वैश्विक सभ्यता ज्या धर्मावर ती आधारित असेल त्या धर्माची विचारधारा देखील वैश्विक असायला हवी. म्हणजे वैश्विक नियमांशी सुसंगत असायला हवी. त्याच्या शिकवणी एखाद्या विशिष्ट समाज-समूहासाठी, भौगोलिक क्षेत्रातील रहिवाशांसाठी, विशिष्ट जाती-समुदायासाठी नव्हे तर साऱ्या मानवजातीसाठी असायला हवी. त्याचे संबोधन साऱ्या मानवजातीला असायला हवे. या निकषांवर जगातील दोन सभ्यतांमध्ये बरेच साम्य आहे. एक ख्रिस्ती आणि दुसरे इस्लाम. या दोन्ही सभ्यता ज्या धर्मावर आधारित आहेत त्यांच्या शिकवणी साऱ्या मानवजातीसाठी आहेत. यासाठी ईश्वराची कल्पना एकत्वाची असावी. इस्लाम धर्मात एकमेव ईश्वराची कल्पना असल्याने सारी मानवजात समान आहे. समानता ज्या सभ्यतेत नसेल ती सदोष असेल आणि दीर्घकाळानंतर त्या सभ्यतेत विभागनाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. एकाच ईश्वराने साऱ्या मानवजातीला एक पुरुष आणि एका स्त्रीच्या जोडप्याद्वारे जन्म दिला असल्याने सारे मानव एकसमान आहेत. जर मानसामाणसांत भेदभाव केला गेला तर तो धर्माच्या शिकवणींविरूद्ध असल्याने त्याला महत्त्व उरत नाही. ख्रिस्ती धर्मात ईश्वराचे तीन रूप मानले जात असल्याने काही प्रमाणात त्या धर्माच्या अनुयायांमध्ये समानतेचा अभाव आढळतो. एका प्रख्यात इतिहासकाराने असे म्हटले आहे की पाश्चिमात्य राष्ट्रवादाने राष्ट्रवादाच्या विषाणूला जन्म दिला म्हणून ख्रिस्ती सभ्यता एकसंघ राहू शकली नाही. आज ज्या सभ्यतेला ख्रिस्ती सभ्यता म्हणतात ती खऱ्या अर्थाने पाश्चिमात्य सभ्यता आहे.

आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही सभ्यतेने मानवजातीच्या विकासात योगदान द्यायला हवे. आज जगात पाश्चात्य सभ्यतेला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. याचे कारण असे की मानवी जीवनाचा एकही पैलू त्यांनी असा सोडला नाही ज्याच्या विकासात पाश्चात्य विचारवंतांनी आपले योगदान दिले नसेल. विज्ञानाचे क्षेत्र असो की मानवजातीच्या आरोग्याचे तंत्रज्ञान असो की इतर कोणतेही क्षेत्र, या सर्वांमध्ये पाश्चिमात्यांनी भरीव योगदान दिलेले आहे. पण त्याचबरोबर जगातील इतर राष्ट्राचा नाश करण्यात देखील पाश्चात्य सभ्यताच सर्वांत अग्रेसर आहे. त्याचे हे कर्तृत्व सृष्टीच्या नियमांविरूद्ध असल्याने त्याला याचे परिणाम आज ना उद्या भोगावे लागणार आहेत हेदेखील निश्चित. ख्रिस्ती धर्मियांच्या आधी मुस्लिम शास्त्रज्ञांनी विद्वानांनी जगभर ज्ञानाचा प्रसार केला. ते विज्ञानाचे क्षेत्र असो की तंत्रज्ञानाचे मुस्लिम वैज्ञानिकांनी बरेच शोध लावलेले आहेत. बरेच तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचबरोबर समाजशास्त्र, इतिहास, वाड्मय आणि इतर ज्ञानाच्या साऱ्या स्रोतांची सुरुवात मुस्लिमांनी केली. नंतरच्या काळात यूरोपियनांनी हा वारसा पुढे चालवतच इतर नवनवीन शोध लावले आणि तंत्रज्ञानाचा विकास केला, जो आम्ही सध्या पाहात आहोत. खगोलशास्त्र आणि अंतरिक्ष विज्ञान या क्षेत्रांमध्येदेखील मुस्लिमांनी बरेच संशोधन केले. जगातली पहिली नासासारखी वेधशाळा तुर्कीमध्ये होती.

इस्लामी शिकवणींची सुरुवातच मानवजातीच्या भल्यासाठी योगदान देण्याच्या आदेशाने होते. कोणतीही मुस्लिम व्यक्ती जोपर्यंत मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत असत नाही तोवर तो सदाचारी होऊ शकत नाही. कोणत्याही सभ्यतेला धर्माचा, धार्मिक ग्रंथाचा मुलाधार नसेल तर ती सभ्यता जास्त काळ टिकू शकत नाही. धर्माशी बंड करून जगात कम्युनिझमची विचारधारा विकसित करण्यात आली. त्या विचारधारेवर आधारित राष्ट्र सभ्यतेची निर्मिती करताना रशिया, चायना वगैरे देशांमध्ये २-४ कोटी लोकांची हत्या केली गेली. मानवजातीचे रक्त सांडून जी सभ्यता जगात रुजविण्याचे प्रयत्न केले गेले ती जेमतेम ५० वर्षे टिकली नाही. चायनाने उघडपणे जरी कम्युनिझमशी फारकत घेतली नसली तरी त्या राष्ट्रात ती नष्ट झाली आहे. नावापुरता कम्युनिस्ट पक्ष जीवंत ठेवला आहे, ते जगाला दाखवण्यासाठी. निधर्मी सभ्यता असो की निधर्मी राज्यसत्ता मानवजातीने त्यांना कधीही महत्त्वाचे स्थान दिलेले नाही. सभ्यतेचा आधार नेहमी धार्मिक शिकवण, आचारविचार, नीतीशास्त्र, धार्मिक विधी राहिला आहे.

पण या धार्मिक शिकवणींचा आधार कोणता? प्रत्येक धर्मात धर्मग्रंथ असतात ज्यांना धर्माचे, धार्मिक शिकवणींचे मूळ समजले जाते. पण हे धार्मिक ग्रंथ कशाच्या आधारवर आहेत? ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माचे धर्मग्रंथ मानवाने रचलेले, साकारलेले नाहीत, तर ते एकमेव ईश्वराने पाठवलेले आहेत. या ग्रंथांमध्ये ज्या शिकवणी आहेत त्या बुद्धिमत्तेला आव्हान देणाऱ्या नाहीत तर बुद्धिमत्ताच या शिकवणींचा मुलाधार आहे, असे जाहीरपणे घोषणा करतात. शिवाय धर्मग्रंथामधील शिकवणी शंकास्पद नसायला हव्यात. कुरआनातील शिकवणींची सुरुवातच अशी होते की हा धर्मग्रंथ अल्लाहने पाठविलेला आहे यात शंका नाही आणि त्याबरोबर या धर्मग्रंथातील कोणतीही गोष्ट अशी नाही जी शंकास्पद असेल. जगाने कितीही ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास केला असला तरी आजदेखील इस्लामचा धर्मग्रंथ कुरआनातील कोणत्याही गोष्टींना विज्ञानाने आव्हान दिलेले नाही.

सांगायचे तात्पर्य हे की कोणत्याही सभ्यतेच्या शिकवणींचा मुलाधार भक्कम असणे गरजेचे आले. जर यात त्रुटी आढळत असतील तर मग एक तर तो ग्रंथ मानवाने रचलेला आहे किंवा यातील मजकुरामध्ये मानवांनी आपल्या आवडीनिवडीनुसार ढवळाढवळ केलेली असेल.


- सय्यद इफ्तिखार अहमद




इस्लामने आवश्‍यकतेपेक्षा अधिक धन जमा करण्यास निषिद्ध ठरविलेआहे. इस्लामची अपेक्षा आहे की जो काही माल आपल्याजवळ आहे एक तर त्याला आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यावर खर्च करा अथवा दुसऱ्यांदा द्या. ते आपल्या गरजेच्या वस्तू विकत घेतील आणि अशा प्रकारे पूर्ण संपत्ती समाजात फिरत राहील एका ठिकाणी जामा राहणार नाही.परंतु तुम्ही जर असे करत नाही आणि जमा करण्याची जिद्द करता तर आपल्या त्या जमा केलेल्या संपत्तीतून कायद्याप्रमाणे अडीच टक्के रक्कम प्रति वर्ष काढून घेतली जाईल आणि तिला त्या लोकांच्या सहय्यतेत खर्च केले जाईल जे आर्थिक संघर्षात भाग घेण्याच्या योग्य नाहीत किंवा संघर्ष अथवा प्रयासाव्यतिरिक्त जे आपला पूर्ण वाटा मिळण्यापासून वंचित आहेत याचे नाव जकात आहे. याच्या प्रबंधाची पद्धत इस्लामने प्रस्तुत केली आहे. जकात समाजाच्या संयुक्त कोषात जमा केली जाते. कोषागार त्या सर्व लोकांच्या गरजांचा जबाबदार बनून जातो ज्यांना मदतीची गरज आहे ही समाजासाठी विम्याची अतिशय चांगली पद्धत आहे. यामुळे त्या सर्व बिघाडांचे उच्चाटन होऊन जाते जी सामूहिक मदत आणि सहयोगाला समुचित प्रबंधन असल्याने निर्माण होत असतात. भांडवलदारी व्यवस्थेत जी वस्तू लोकांना संपत्ती जमा करण्यावर आणि तिला लाभदायक कामांमध्ये लावण्यावर विवश करीत असते आणि जिच्या कारणास्तव जीवन विमा आदींची गरज असते ती ही आहे की प्रत्येक व्यक्ती जीवन व्यवस्थेत आपल्या साधनावरच निर्भर असते. ती वृद्ध झाली आणि काहीही शिल्लक ठेवले नसेल तर उपाशी मरेल. मुलाबाळांसाठी काही सोडल्याविनाच जर कोणी व्यक्ती मेली तर ते दारोदार भटकतील आणि भिकेचा तुकडा ही मिळवू शकणार नाहीत. आजारी पडल्यावर शिल्लक नसेल तर उपाय सुद्धा करू शकणार नाही.

घर जळाले अथवा व्यवसायात तोटा झाला किंवा कोणती आणखी आपत्ती आली तर कुठूनही त्याला साह्यता मिळण्याची आशा नाही. याचप्रकारे भांडवलदारी व्यवस्थेमध्ये जी वस्तू श्रमिक वर्गाच्या लोकांना भांडवलशाहीचा गुलाम बनण्यावर आणि त्याच्या अटीवर काम करण्यासाठी विवश करून टाकत असते. जो काही कष्टाचा मोबदला भांडवलदार देतो त्याला गरीब माणूस जर घेणार नाही तर उपाशी राहिल. भांडवलशाहीच्या इनामा पासून तोंड फिरवून त्याला दोन वेळची भाकरी मिळणे कठीण आहे. मग हा मोठा तिरस्कार जो आज भांडवलदारी व्यवस्थेच्या जग विळख्यात आहे की, एकीकडे लाखो करोडो माणसे वंचितावस्थेत आहेत आणि दुसरीकडे जमिनीची उपज आणि कारखान्यात बनलेल्या सामानाचे ढीग लागलेले आहेत. परंतु त्याला विकत घेतले जाऊ शकत नाही. लाखो टन गहू समुद्रात फेकला जातो आणि भुकेल्या मानवांच्या पोटापर्यंत पोहोचत नाही. याचे कारण हेच आहे की वंचित लोकापर्यंत जीवन सामग्री पोहोचविण्याचा कोणताही प्रबंध नाही. या सर्वामध्ये क्रयशक्ती निर्माण केली जावी आणि ती आपली गरज आणि इच्छेनुसार वस्तू विकत घेणे योग्य होऊन जावेत. सारांश हा की व्यापार उद्योग आणि कृषी अशा प्रत्येक उद्योगाची प्रगती व्हावी इस्लाम जकात आणि बैतुलमाल अर्थात सरकारी खजिना याद्वारे सर्व बिघडाना दूर करतो. बैतूलमाल प्रत्येक वेळी आपल्या मागे सहाय्यकाच्या भूमिकेने हजर आहे. आपणास काळजी करण्याची गरज नाही. आपणास गरज असेल तेव्हा बायतुल माल मधून आपला हक्क घेऊन यावा. मग बँक डिपॉझिट आणि जीवन विमा पॉलिसीची काय गरज. आपण आपल्या मुलाबाळांना सोडून समाधानाने जगाचा निरोप घेऊ शकता. आपल्या मागे सरकारी खजिना त्यांचा जवाबदार आहे. आजारपण वृद्धत्व आणि प्राकृतिक संकटे मग ती आसमानी असो वा जमिनी प्रत्येक परिस्थितीत बैतुलमाल आपला स्थाई सहाय्यक आहे. भांडवल शाही आपणास आपल्या अटीवर काम करण्यासाठी विवश करू शकत नाही. बैतूलमाल अस्तित्वात असताना आपणास भूक, निवारा आणि निर्धनतेचे कोणतेही भय नाही. बैतूलमाल धन कमविण्यात पूर्णतः असमर्थ अथवा कमी निर्मिती करणाऱ्या लोकांना गरजेचे सामान विकत घेण्यास सक्षम बनवून टाकतो. या प्रकारे मालाचे उत्पादन आणि त्याची खपत यामध्ये निरंतर संतुलन बनून राहते. आता याची आवश्यकता उरत नाही की आपण आपल्या दिवाळखोरीपणाला जगभरातील लोकांच्या डोक्यावर थोपवावे आणि शेवटी दुसऱ्या ग्रहापर्यंत पोहोचण्याची गरज पडावी. जकात व्यतिरिक्त दुसरा उपाय जो एका ठिकाणी साठलेल्या संपत्तीला फैलावण्यासाठी इस्लामने अवलंबिला आहे तो वारसा हक्काचा कायदा आहे. इस्लाम शिवाय अन्य कायद्यांचा झुकाव याकडे आहे की जी संपत्ती एका व्यक्तीने साठविली आहे ती त्याच्या मृत्यूनंतरही साठवलेली राहावी. इस्लाम या विपरीत हि पद्धत अवलंबवीत की ज्या संपत्तीला एक व्यक्ती साठवूण -साठवून एका ठिकाणी कैद करत राहिला होता, तो मरताच ती वाटून दिली जावी. इस्लामी कायद्यात मुले -मुली ,आई वडील, भाऊ बहिण आणि पत्नी सर्व एका व्यक्तीचे वारस आहेत. आणि एका नियमानुसार सर्वांमध्ये पैतृक संपत्तीचे वाटणे जरुरीचे आहे. जवळचे नातेवाईक अस्तित्वात नसतील तर लांबचे नातेवाईक शोधले जातील आणि त्यांच्यामध्ये ही संपत्ती वाटण्यात येईल. कोणी नातेवाईकच नसतील तेव्हा सुद्धा व्यक्तीला कोणास आपल्या जीभेने म्हटलेला मुलगा मानण्याचा हक्क नाही. या स्थितीत पूर्ण समाज त्याचा वारस आहे. त्याची साठवलेली सर्व संपत्ती बैतुलमाल मध्ये जमा केली जाईल या प्रकारे मग कोणी व्यक्ती करोडो अथवा अब्जावधीची संपत्ती जमा करो, त्याच्या मृत्यूनंतर दोन-तीन पिढ्यांमध्ये ती सर्व लहान लहान तुकड्या मध्ये वाटून दिली जाईल आणि संपत्तीचा प्रत्येक साठा क्रमशः वितरित होत राहील.

मी येथे इस्लामच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थांचा उल्लेख केलेला नाही. पृथ्वीचा प्रबंध औद्योगिक विवाद त्यांचे जे नीपटारे तथा उद्योग धंद्यासाठी धन गोळा करण्याच्या ज्या पद्धती इस्लामच्या सिद्धांतानुसार अवलंबिल्या जिऊ शकतात आणि ज्यांच्यासाठी इस्लामी कायद्यात पूर्ण संभावना सुद्धा ठेवली गेलेली आहे. त्यांना या संक्षिप्त लेखात प्रस्तुत करणे कठीण आहे. मग इस्लामने ज्याप्रकारे आयात-निर्यातीचा कर आणि देशाचे व्यापारी माल आणण्यावर आणि घेऊन जाण्याच्या प्रतिबंधाना हटवून गरजेच्या सामानांचा स्वतंत्र विनिमयाचा मार्ग अवलंबिला आहे. त्याचा मी उल्लेख करू शकलो नाही. या सर्वापेक्षा हे सांगण्याची संधी सुद्धा मिळाली नाही की प्रशासनिक व्यवस्था सिविल सेवा आणि सेनेच्या खर्चांना संभावित सीमेपर्यंत घटवून आणि न्यायालयाच्या स्टॅम्प ड्युटी ला पूर्णपणे हटवून इस्लामने समाजावरुन त्या आर्थिक ओझ्याला इतके हलके केले आहे की, करांना आर्थिक प्रशासनाच्या सीमेहुन वाढलेल्या खर्चामध्ये खपून टाकण्याऐवजी समाजाच्या सुख सुविधा आणि फायद्यासाठी खर्च करण्याची संधी प्रदान केलेली आहे. यामुळे इस्लामची अर्थव्यवस्था मानवासाठी किती मोठी कृपा बनून जाते. पक्षपात सोडून दिला जावा आणि वाडवडिलांपासून अज्ञांतापूर्ण संकीर्णता वारसाहक्कात मिळालेली आहे तसेच गैर सलामी शासनयंत्रणेने आपले प्रभुत्व जमविल्याने जो प्रभाव बुद्धीवर पडला आहे, त्याला दूर करून स्वतंत्र अन्वेक्षणात्मक दृष्टीने या व्यवस्थेचे अध्ययन केले जावे. आशा, आहे की एकही न्यायप्रिय व्यक्ती असा भेटणार नाही की जे मानवाच्या आर्थिक हितासाठी या व्यवस्थेला सर्वात अधिक उपयोगी, योग्य आणि बुद्धीसंगत स्वीकार करणार नाही. परंतु जर कोणाला हा गैरसमज असेल की इस्लामच्या संपूर्ण धोरणात्मक नैतिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेतून फक्त तिच्या आर्थिक प्रणालीस घेऊन सफलतेने चालविले जाऊ शकते तर मी त्याला निवेदन करीन की कृपया या गैरसमजाला मनातून काढून टाकावे. या आर्थिक व्यवस्थेचा घनिष्ठ संबंघ इस्लामच्या राजनैतिक, न्यायिक, कायदेविषयक, सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवस्थेशी आहे. मग या सर्व गोष्टीचा पाया इस्लामच्या नैतिक व्यवस्थेवर कायम आहे आणि ती नैतिक व्यवस्था ही स्वतःवर कायम नाही तर ती पूर्णपणे या गोष्टीवर टिकून आहे की आपण एका सर्वशक्तिशाली आणि सर्वज्ञ अल्लाहवर श्रद्धा ठेवावी आणि स्वतःला त्याच्यासमोर उत्तरदायी समजावे. मृत्यूनंतर पार लोकिक जीवनाला मानावे आणि हे सुद्धा स्वीकार करावे की परलोकात अल्लाच्या न्यायालयासमोर जीवनाच्या सर्व कामांना परखले जाईल आणि तपासणी नुसार बक्षीस अथवा शिक्षा मिळेल. हेही मानावे लागेल की पैगंबर मुहम्मद सल्लम यांनी जे नियम आणि कायदे आपल्यापर्यंत पोहोचले आहेत, त्याचा एक भाग आर्थिक व्यवस्था सुद्धा आहे, ती पूर्णतः अल्लाहच्या आदेशावर आधारित आहे, यावर दृढ विश्वास ठेवा जर या धारणा, नैतिक व्यवस्था आणि संपूर्ण जीवन प्रणालीस आपण जसेच्या तसे स्वीकारले नाही तर केवळ इस्लामी अर्थव्यवस्था एक दिवसहि आपल्या योग्य आत्म्याने चालू शकणार नाही आणि न तुम्ही तिच्यापासून कोणतेही उल्लेखनीय लाभ उठवू शकाल.

(भाग - ४ समाप्त)

- अब्दुल मजीद खान

नांदेड, Mob. 9403004232


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget