Latest Post

अल्लाहची भक्ती (उपासना, पूजा) हा मानवनिर्मितीचा एकमेव उद्देश आहे. यासाठी प्रेषितांची नियुक्ती केली. असे कार्य (अल्लाहची भक्ती) अनिश्चित आणि अपरिपक्व स्वरूपाचे असू शकतच नाही. हे फक्त पूजापाठ अथवा उपासनापध्दतीपर्यंतच मर्यादित नाही किवा फक्त आज्ञाधारकतेपुरतेच मर्यादितसुध्दा नाही. बुध्दीविवेक आणि कुरआननुसार हे सिध्द आहे. हे बुध्दीविवेकास धरून आहे की ज्या ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तोच ईश्वर मालक, पालक आणि शासक आहे आणि तोच एकमेव ईश्वर मानवासाठी पूजनीय आहे. सर्व प्रकारची भक्ती आणि उपासना फक्त त्या एकमेव ईश्वर (अल्लाह) साठीच आहे. कुरआनचा स्पष्ट निर्णय आहे की त्याच्या अनुयायींना ईशभक्ती आणि ईशआज्ञाधारकता एकसारखी आहे. कुरआन आयती मुस्लिमांना (आज्ञाधारकांना) स्पष्ट आदेश देत आहेत की त्यांनी एकाच ईश्वरापुढे (अल्लाह) नतमस्तक व्हावे. त्याचीच प्रशंसा आणि गुणगान करावे. त्याचेच श्रेष्ठत्व स्वीकारावे आणि उपासना त्याच्यासाठीच असावी. त्याच एकमेव ईश्वर (अल्लाह) ची मदत मागावी आणि नियमित त्याचे कृपाभिलाषी बनावे. कुरआन अशा एकमेव ईश्वरलाच फक्त शासक मानतो, तोच विधीनियमांचा आणि हुकूम देणारा शासक आहे. त्याचीच आज्ञा पाळली जावी आणि त्याच्या आदेशानुसारच जीवनयापन मनुष्याने करावे. अल्लाहने घालून दिलेल्या नियमांचेच पालन व्हावे. अल्लाहने वैध ठरविलेले आणि अवैध ठरविलेले आपल्यासाठीसुध्दा मनुष्याने तेच ठरवावेत. म्हणून भक्तीचा अर्थ कुरआननुसार तेव्हाच परिपूर्ण होतो जेव्हा मानवनिर्मितीचा एकमेव उद्देश आणि प्रेषितांच्या नियुक्तींचा उद्देश साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न मनुष्य करतो. अशा प्रकारे कुरआनप्रणित भक्ती (पूजा, उपासना) मध्ये भक्ती आणि आज्ञाधारकता दोघांचाही समावेश आहे. आपण हा मुद्दा आणखी स्पष्ट होण्यासाठी दुसऱ्या पध्दतीने त्याचे आकलन करू या. कुरआनने मानवनिर्मितीचा उद्देश स्पष्ट करताना खालील शब्दांचा उल्लेख केला आहे.
‘‘ज्याने मृत्यू आणि जीवन निर्माण केले जेणेकरून तुम्हा लोकांना अजमावून पाहावे की तुमच्यापैकी कोण अधिक चांगले कृत्य करणारा आहे.’’ (कुरआन ६७: २)
दुसऱ्या ठिकाणी स्पष्टोक्ती आहे,
‘‘जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ‘‘मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (कुरआन २: ३०)
मानवनिर्मितीचा उद्देश स्पष्ट करताना, निर्मात्याने भक्तीबरोबरच ‘‘अधिक चांगले कृत्य करणारा’’ आणि खलीफा (निर्मात्याचा प्रतिनिधी) हे शब्दप्रयोगसुध्दा केले आहेत. हे जरी वेगवेगळे शब्द आहेत तरी त्यांचा मतितार्थ (खरा अर्थ) एकच आहे. कुरआननुसार अल्लाहची भक्ती, अधिक चांगले कृत्य करणे (सदाचरण) आणि निर्मात्याचे प्रतिनिधित्व करणे (खलीफा) हे एकाच ध्येयाची व उद्देशाची वेगवेगळी स्पष्टीकरणे आहेत. म्हणून तिन्हींचा मिळून भक्तीचा खरा अर्थ होतो. सदाचरण आणि निर्मात्याचे प्रतिनिधित्वाला सोडून भक्ती कुरआनच्या दृष्टीने अपूर्ण आहे. फक्त आज्ञाधारकता (भक्तीविना) हे सदारचण नव्हे. तसाच प्रकार निर्मात्याचे (अल्लाहचे) प्रतिनिधित्व करण्यासाठी आहे. येथे आज्ञाधारकता जरी अपेक्षित आहे तरी भक्तीचा त्यात समावेश आवश्यक आहे. भक्तीच्या इस्लामी संकल्पनेत या दोन्ही गोष्टींचा (आज्ञाधारकता-पूजा) समावेश होतो आणि कोणतीही धार्मिक बाब यातून सुटूच शकत नाही.
इमाम इब्ने तैमिया खालील कुरआनोक्तीचे स्पष्टीकरण देताना म्हणतात,
‘‘लोकहो, उपासना (भक्ती) करा आपल्या पालनकर्त्याची ज्याने तुम्हाला आणि तुमच्या पूर्वीच्यांनाही निर्माण केले.’’ (कुरआन २: २१)
‘‘भक्ती हा व्यापक शब्द आहे. त्यात जाहीर आणि गुप्त गोष्टी आणि अल्लाहच्या आवडत्या आणि प्रसन्नतेशी निगडीत शिकवणींचा समावेश आहे. उदा. उपासना (नमाज) रोजा, हज, चांगुलपणा, विश्वासुपणा, दयाळुपणा, आईवडिलांची सेवा, सदाचाराचा प्रसार आणि दुराचाराचा प्रतिकार, अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा, शेजारधर्म, अनाथांची सेवा, कुरआन पठण, इ. भक्तीचेच अंग आहेत. त्याच प्रकारे अल्लाहशी प्रेम, अल्लाहच्या कोपचे भय, प्रेषितांशी प्रेम, ईशपरायणता, इ. गुप्त गोष्टीसुध्दा भक्तीचेच अंग आहेत.’’ (अल अबुदियात - २)
याच भाषणात ते पुढे म्हणतात, ‘‘भक्तीमध्ये धर्म व त्याच्या सर्व अंगांचा समावेश होतो. सर्व प्रेषित भूतलावर मानवाला ईशधर्माचे धडे देण्यासाठीच आलेले होते. या वस्तुस्थितीचा कुरआनमध्ये अनेक ठिकाणी उल्लेख आला आहे. प्रत्येक प्रेषिताने ‘ईश्वरभक्ती करा’ ही शिकवण दिली. यावरून हे स्पष्ट होते की धर्म आणि भक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.’’
यावरून हेच स्पष्ट होते की पूर्ण धर्मपालन म्हणजेच भक्ती होय. धर्माच्या एका अंगास भक्ती आणि दुसऱ्या अंगास भक्तीपासून दूर ठेवणे अशक्य आहे. धर्म हा एक घटक आहे त्याचे अनेक घटक करणे अशक्य आहे. ज्याप्रमाणे मानवी शरीर एक पूर्ण घटक आहे त्यास विविध घटकांत आपण विभागू शकत नाही.

नागपूर (डॉ. एम. ए. रशीद)-
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मानवतेअंतर्गत आपल्या विभिन्न कामांत जनसेवेला प्राधान्य दिले होते. त्याचप्रमाणे जमा़अत ए इस्लामी हिंद ईशग्रंथ पवित्र कुरआन आणि अंतिम पैगंबर  मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीनुसार कार्य करत आहे. जनसेवा हे कार्य असे आहे जसे की रात्रभर ईश्वराची (अल्लाहची) उपासना करणे, असे विचार ऱफी़कुर्रहमान खान यांनी टेकाच्या  सिद्धार्थनगर येथील मोठी मस्जिदजवळ संघटनेच्या कार्यालयात मोफत मेडिकल कॅम्पच्या उद्घाटन समारंभात सादर केले.
हे मोफत आरोग्य शिबीर जमा़अत ए इस्लामी हिंद नॉर्थ, मेडिकल सर्विस सोसायटी ऑ़फ इंडिया शाखा नागपूर, नागपूर महानगरपालिका तसेच क्रिसेंट हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित करण्यात आले होते. रफीकुर्रहमान पुढे म्हणाले की इस्लामवरील आरोपांद्वारा दहशतवादाचे नाव दिले जाते, जे अगदी चुकीचे आहे. इस्लाममधे मानवतेशी संबंधित जनसेवा  आणि त्यात जीवन जगण्याची पद्धती सांगितली आहे. इस्लाममधे उपासनाच नाही तर जनसेवेला सर्वश्रेष्ठ कार्य सांगितले आहे.
मेडिकल सर्विस सोसायटी आफ इंडिया (एम एस एस) नागपूर जिल्हा अध्यक्ष डॉ. नईम निया़जी यांनी आपल्या संघटनेचा परिचय करून दिला. त्यांनी सांगितले की एम एस एस विभिन्न शासकीय योजना अंतर्गत निर्धनांचे उपचार तसेच हृदय ऑपरेशन करवीत आहे. आज या शिबिरात छावनीच्या ईवर फी़जियो थेरपीच्या टीममधे सर्वेश मालू, आषुतोष, महवश सय्यद यांनी संबंधित रुग्णांची फी़जियो थैरेपी केली. ते पुढे म्हणाले, या शिबिरामध्ये ७० रुग्णांची ईसीजी, १०० रुग्णांची शुगर तपासणी व ३० रुग्णांचे एक्स रे काढण्यात आले आणि  रुग्णांना मोफत औषधेही वितरित केली गेली. या शिबिरात २०० पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला. संचालन शह़जाद नवैद यांनी केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी नागपूर महानगरपालिका हेल्थ केअरचे सूर्यदीप आणि इंदिरा अवलकर, क्रीसेंट हॉस्पिटलचे डॉ. हसनुल बन्ना, सलीम का़जी, जुबैर अहमद व श़गु़फ्ता जुबैर त्याचबरोबर जेआईएच नॉर्थचे अध्यक्ष  इरशादुर्रहमान खान, फार्मासिस्टच्या टीममधे शाबा़ज अंसारी, मोहसिन अंसारी, वसीम अंसारी व उवैस अंसारी समाजसेवक का़जी शफी़क अहमद आदींचे महत्वपूर्ण योगदान लाभले.

खुरिम बिन फातिक (रजी.) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फजरची नमाज पढविली, आणि लोकांकडे रोख फिरविला तर बसून राहण्याऐवजी प्रेषित (स.) सरळ उभे राहिले आणि तीनदा सांगितले, ‘‘खोटी साक्ष देणे आणि शिर्क (अल्लाहसोबत इतरांना- उपासना व आज्ञापालनायोग्य) करणे, दोन्ही कृत्ये समान दर्जाचे अपराध आहेत.’’ नंतर प्रेषित  (स.) यांनी पठण केले, ‘‘तर तुम्ही नापाकी (अस्वच्छता, अशुद्धता) अर्थात मूर्ती वगैरेपासून दूर रहा, आणि असत्य (खोटे) बोलण्यापासून दूर रहा, आणि ईश्वरांशी एकचित्त व्हा. अनेक  ईश्वरोपासना सोडून एकेश्वरवादाचा अंगीकार करा.’’ (हदीस - अबू दाऊद)

भावार्थ- वरील हदीस कथन करताना, प्रेषितांनी ‘सूरह हज’च्या आयातीचे पठण केले, ज्याचा अर्थ - असत्य कथन सर्वत्र सदैव वाईट आहे असा होतो. असत्य कथन, मग न्यायालयात  ‘साक्ष’ देताना असो वा अन्य एखाद्या ठिकाणी. यावरून लक्षात येते की, खोटी साक्ष किती मोठा अपराध, गुन्हा आहे. परंतु मुस्लीमांच्या दृष्टीने हा गुन्हा आता गुन्हा राहिला नाही,  किंबहूना एक कलानैपुण्य बनला आहे. त्यांच्या मते ते लोक मूर्ख ठरतात जे न्यायालयात आपल्या जागृत ईमानामूळे खरी साक्ष देतात. 

पृथ्वीची साक्ष- माननीय अबु हुरैरा (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी एके दिवशी कुरआनची ही आयत पठण केली, ‘‘यौ मइ़िजन तु हद्दिसु अखबाराहा’’ व नंतर  लोकांना विचारले की, ‘‘पृथ्वीचे समाचार वर्णन करण्याचा अर्थ काय?’’ लोक म्हणालेत की, ‘‘ईश्वर व त्याचे प्रेषितच (स.) जाणतात.’’ प्रेषित (स.) यांनी सांगितले की, ‘‘कयामतच्या  दिवशी पृथ्वीचे समाचार वर्णन करण्याचा अर्थ असा की, ईश्वरासमोर पृथ्वी, स्त्री आणि पुरुषांच्या संपूर्ण कर्माची साक्ष देईल.’’ (हदीस - तऱगीब व तरहीब)

शारिरिक अवयवांची माणसांविरूद्ध साक्ष- माननिय अनस (र.) सांगतात की, आम्ही सगळे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याजवळ बसलो होतो की, प्रेषितांना (स.) हसु फुटले, आणि
आम्हांस प्रश्न केला की, ‘‘तुम्हाला माहित आहे काय, मी का हसलो?’’ आम्ही म्हणालो की ईश्वर आणि प्रेषित (स.) यांनाच माहीत. प्रेषितांनी सांगितले की, ‘‘मला हसु यामुळे आले  की, कयामतच्या दिवशी एक अपराधी मनुष्य ईश्वरांस म्हणेल की ‘‘हे ईश्वरा! आज माझ्यावर अन्याय तर होणार नाहीना?’’ ईश्वर म्हणेल की, ‘‘होय! आज तुझ्यावर कुठलाच अन्याय  होणार नाही.’’ यावर तो म्हणेल की, आज मी कोणालाही आपल्याविषयी साक्ष देण्याची परवानगी देणार नाही. मी स्वत:च माझी साक्ष देईन. ईश्वर सांगेल की, ‘‘आज तू स्वत: आपला  हिशोब चुकता करण्यासाठी आणि तुझे कर्म-पत्र तयार करणारे फरिश्ते (देवदूत) साक्षीसाठी पुरेसे आहेत.’’ यानंतर त्याची वाचा बंद करून शरिराच्या संपूर्ण अवयवांना आदेश देण्यात  येईल की, तुम्ही याच्या कर्माची साक्ष द्या. यावर त्याचे अवयव त्याच्या एकूण- एक कर्माची साक्ष देतील. नंतर त्याची वाचा उघडून बोलण्याची शक्ती परत करण्यात येईल. यावर ती  व्यक्ती आपल्या अवयवांना धिक्कारत म्हणेल की, ‘‘तुमच्यावर ईश्वराचा धिक्कार असो, फटकार असो. जीवनामध्ये मी तुमचा कैवार घेत असे. आणि तुमच्या खातर मी सर्वकाही  करीत असे, आणि आज तुम्ही माझ्याच विरूद्ध साक्ष दिली.’’ अर्थात तो म्हणेल, जगांमध्ये अवयवांना सशक्त करण्यासाठी, आराम व मनोरंजनासाठी वाटेल तसे वागलो. हराम, हलाल,  बरे, वाईटाची पर्वा केली नाही. व तुम्ही ऐन वेळेवर दगाबाजी करून माझी साथ सोडली. 

जमाअत-ए-इस्लामी हिंद देशहितासाठी काम करणारी व जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात  नैतिकतेचा अट्टहास धरणारी एक महत्वाची संघटना आहे. देशात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदार आणि राजकीय पक्षांसाठी जमाअतने एक जन-घोषणापत्र तयार केलेले आहे. ते वाचकांच्या माहितीसाठी खालीलप्रमाणे सादर.

भारत एक स्वायत्त, संप्रभू, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रधान देश आहे. देशाच्या घटनेने भारतासंबंधी अशी कल्पना केलेली आहे की, या देशासाठी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधूत्व हे पायाभूत मुल्य असतील. जेथे प्रत्येक नागरिकाशी समान व्यवहार केला जाईल आणि सर्वांना समान संधी प्राप्त होतील. संविधानाच्या अनुच्छेद 38 मध्ये एका कल्याणकारी राष्ट्राची कल्पना सादर करून याला सरकारचे कर्तव्य असल्याचे घोषित केलेले आहे. यात असेही म्हटलेले आहे की, देशात केवळ नागरिकांमध्येच नव्हे तर विभिन्न समुदायामध्ये असलेल्या सामाजिक आणि आर्थिक असमानतेला कमी करण्याचे प्रयत्न करणे ही सरकारची जबाबदारी असेल.
    ऐतिहासिक दृष्टीने भारत एक बहुलतावादी देश राहिलेला आहे. जेथे अनेक धर्म, जाती, भाषा आणि संस्कृतीचे लोक आपापल्या सीमेमध्ये सद्भावनेने राहत आलेले आहेत. म्हणून संसदेने भारतीय समाजाच्या या विविधतेचे प्रतिनिधीत्व जपायला हवे. भारताने जरी विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण इत्यादी क्षेत्रामध्ये भरपूर विकास केलेला आहे तरी आजही आपल्या देशातील एक मोठी जनसंख्या या विकासाच्या लाभापासून वंचित आहे. देशात झालेल्या या असंतुलित विकासामुळे सामाजिक आणि आर्थिक अन्याय आणि असमानतेचा प्रश्‍न आजही जसचा तसा उभा आहे.
    देशात चालू आणि पुढच्या महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. यापूर्वी म्हणजेच 2014 साली सार्वत्रिक निवडणुकानंतर जे सरकार मागच्या पाच वर्षात देशात राहिलेले आहे, त्या सरकारने राज्य घटनेच्या मूलभूत संकल्पनांना सर्वात जास्त हानी पोहोचविलेली आहे. भांडवलशहांसोबत राजकीय नेत्यांची झालेली अभद्र युती एव्हाना मजबूत झालेली आहे. आणि या युतीने देशात एका अशा आर्थिक व्यवस्थेला उभारी दिलेली आहे, जिच्यात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वेगाने वाढत आहे. यामुळे असमानतेच्या आधारावर आज आपला देश जगातील वाईट देशांच्या यादीमध्ये सामील झालेला आहे. बेरोजगारी शिखरावर पोहोचलेली आहे आणि सामान्य लोकांना मिळणारे फायदे भांडवलशाहांच्या दारापर्यंत पोहोचलेले आहेत.
    कमकुवत गट आणि अल्पसंख्यांकांच्या मध्ये भीती आणि असुरक्षेची भावना आज जेवढी आहे तेवढी कधीही नव्हती. दलित सुद्धा स्वतःला असुरक्षित समजत आहेत. आदिवासींच्या जमीनी आता जास्त मोठ्या प्रमाणात भांडवलवाद्यांच्या षडयंत्राला बळी पडत आहेत. शेतकरी आजपावेतोच्या सर्वात मोठ्या कृषी संकटाचा सामना करीत आहेत. देशातील सर्वात मोठा अल्पसंख्यांक समुदाय असलेल्या मुस्लिमांचे जीव स्वस्त झालेले आहेत. सच्चर समितीच्या शिफारशीनंतर त्यावर अंमलबजावणी करण्याचे जे प्रयत्न ज्या संथगतीने सुरू होते तेही हळूहळू बंद पडत चाललेले आहेत. आतातर मुस्लिमांचा व्यक्तिगत कायदा, त्यांची संस्कृती, धार्मिक ओळख आणि त्यांचे पायाभूत धार्मिक अधिकार हेच संकटात सापडलेले आहेत.
    भ्रष्टाचार मिटविणे हा या सरकारच्या मुख्य घोषणांपैकी एक घोषणा होती. मात्र त्याने आता एका अनियंत्रित दानवाचे स्वरूप प्राप्त केलेले आहे आणि देशाच्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये आपले स्थान बळकट केलेले आहे.
    सर्वात मोठा प्रश्‍न हा आहे की, देश आणि देशातील लोकशाही संस्था फॅसिस्ट प्रवृत्तीच्या लोकांच्या नियंत्रणात आहेत. संस्थांची स्वायत्तता जी की, कुठल्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये जीवन वाहिनी सारखी असते ती आज अत्यंत वाईट स्थितीत आहे. सीबीआय, सीव्हीसी, रिझर्व्ह बँक सारख्या संस्थाच्या पुढे जावून आता तर निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्वातंत्र्यावरही संशय गडद होत चालला आहे, जो की लोकशाही देशासाठी संकटाची नांदी ठरू शकेल.
    वर नमूद केल्या प्रमाणे काळजी करण्यासारखी परिस्थिती असली तरी भारतात सामुहिकरित्या कधी अराजकता येणार नाही. आम्हाला आशा आहे की, ह्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर असे लोक केंद्रात सत्तेवर येतील, ज्यांचा लोकशाही आणि घटनात्मक मुल्यांवर विश्‍वास असेल. आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की, त्यांनी या मुल्यांची केवळ रक्षाच करू नये तर त्यांना अधिक बळकट करण्यासाठी होतील तितके प्रयत्न करावेत आणि भविष्यात त्यांना नेत्यांच्या हस्तक्षेपापासून वाचवावे.
    ईशभय, नैतिकता आणि अध्यात्मिकता ही अशी मुल्य आहेत की जी शाश्‍वत आहेत. आणि एका मजबूत आणि परिपूर्ण समाजाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका वठवतात. दुर्भाग्याने आपल्या देशात धर्माचा उपयोग बहुतकरून आपसातील मतभेदांना वाढविण्यासाठी, समाजामध्ये असमानता वाढविण्यासाठी आणि गरीबांचे शोषण करण्यासाठी होत आलेला आहे. हीच परंपरा राहिलेली आहे. वास्तविक पाहता धर्माचे खरे स्वरूप समोर आणले गेले तर तो भारताच्या धार्मिक समाजामध्ये नैतिक आणि अध्यात्मिक मुल्यांची वाढ करून एक आदर्श सामाजिक क्रांती आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका साकार करू शकतो.
    जमाते इस्लामी हिंद हे एका ईश्‍वराच्या उपासनेकडे आमंत्रित करणारे आंदोलन आहे. आम्ही देशातील लोकांना, सर्व राजकीय पक्षांना आणि सामान्य जनतेचे प्रतिनिधीत्व करणार्‍या उमेदवारांना, आपल्याला जन्माला घालणार्‍याच्या उपासनेकडे आमंत्रित करतो आणि   त्याच्यासमोर आपण उत्तरदायी असल्याची भावना आपल्यामध्ये जीवंत ठेवण्याकडे लक्ष केंद्रीत करतो. आमची अशी धारणा आहे की, ही जबाबदारीची भावना मत मागणार्‍यांमध्येही आवश्यक आहे आणि मतदान करणार्‍यांमध्येही आवश्यक आहे. या भावनेमुळेच देशात खरी मानवता, न्याय आणि खर्‍या                                                                                                                                             बंधुत्वामध्ये वाढ होऊ शकते.  ईश्‍वराची उपासना ही मानवामध्ये न्याय प्रस्थापित करण्याचा एकमात्र जामीन आहे.
    जमाते इस्लामी हिंदला सदरचे जनघोषणापत्र नागरिकांच्या आणि राजकीय पक्षांच्या समोर ठेवताना आनंद होत आहे. हे घोषणापत्र एकीकडे जनतेच्या मनाची हाक आहे तर दूसरीकडे राजकीय पक्षांसाठी सत्तासंचलनाचे एक चार्टरसुद्धा आहे. जमाते इस्लामी हिंद जरी देशात होणार्‍या निवडणुकांमध्ये सरळ भाग घेत नसली तरी उच्च नैतिक व मानवी मुल्य, सामुदायिक सद्भावना, बंधुभाव आणि सर्वच समाज घटकांच्या विकास आणि न्यायावर आधारित सत्तासंचलनाला सुनिश्‍चित करण्यामध्ये आपली भूमिका वठवत आलेली आहे.
    आम्हाला     जागृत राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून या जनघोषणापत्राच्या समर्थनाची अपेक्षा आहे. याशी सहमत होऊन ते जर निवडणुकीत भाग घेत असतील तर त्यांना जनतेचे समर्थन मिळू शकेल आणि देशाला योग्य दिशेकडे घेऊन जाण्यात ते निश्‍चितच यशस्वी होतील.
    सरकारचे दायित्व
    बहुलतावादी, प्रगतीशील आणि सर्वसमावेशी भारताच्या संकल्पनेला व्यवहारिक रूप देण्यासाठी खाली नमूद मुद्दे प्रत्येक गंभीर राजकीय पक्षांच्या उद्देशांमध्ये सामिल असायला हवेत.
    1) सर्व नागरिकांसाठी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि गौरवशाली जीवनाची हमी आणि न्यायिक प्रगतीच्या संकल्पनेवर आधारित कल्याणकारी राष्ट्राची स्थापना.
     2) अत्याचार, अतिवाद, धार्मिक उन्माद, झुंडी व राजकीय हिंसा आणि जातीय दंग्यांचे प्रभावी निवारण, गरीब, महिला, मुस्लिम आणि देशातील अन्य असुरक्षित घटकांच्या सुरक्षेला सुनिश्‍चित करणे.
    3) अनुसूचित जाती, जनजाती, मुस्लिम समाजाचे अन्य वंचित घटक, ग्रामीण भागाचा चौफेर विकास आणि त्यांचे सशक्तीकरण याकडे विशेष लक्ष देऊन देशाच्या वातावरणामध्ये सकारात्मक परिवर्तन आणने.
    4) अल्पसंख्यांक आणि सांस्कृतिक व भाषीय गटांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांची सुरक्षा, त्यांच्या व्यक्तिगत कायद्याची सुरक्षा, त्यांच्या प्रार्थनास्थळांची सुरक्षा, त्यांची धार्मिक ओळख आणि त्याच्या प्रतिबिंबाची सुरक्षा तसेच त्यांच्याविरूद्ध कोणत्याही प्रकारच्या उन्मादाचे कठोर निदान करणे.
    5) भ्रष्टाचार, अश्‍लिलता, लैंगिक गुन्हे, घराणेशाही, राजकारणात गुन्हेगार तत्वांचा प्रवेश, भेदभाव सारख्या वाईट प्रवृत्तीविरूद्ध परिणामकारक पावले उचलणे. प्रामाणिक अस्मिता आणि दूरदृष्टी सारख्या मुल्यांमध्ये वाढ करणे, प्रत्येक समाजाची ओळख आणि त्यांचा आदर करणे तसेच राजकीय व्यवस्थेला नैतिक मुल्यांच्या कक्षेत आणने.
    नीति निर्धारक उपाय
    ज्या राजकीय पक्षांना जनतेचे समर्थन हवे, आम्ही त्यांच्याकडून अशी मागणी करतो की वर दिल्या गेलेल्या उद्देशांच्या प्राप्तीसाठी निम्नलिखित कायदेशीर व नीतिवर आधारित 18 मुद्यांवर आधारित एक कार्यक्रम लागू करण्याचा त्यांनी वायदा करावा.
    1. जीवनासाठी आवश्यक अधिकार, जसे घटनेच्या भाग तीन मध्ये योग्य सुधारणा केल्या जाव्यात. ज्यामुळे सर्व देशवासियांच्या जीवनाच्या आवश्यकता निर्धारित केल्या जातील.
    2. सगळ्या जगात संरक्षण आणि सकारात्मक कार्यवाही म्हणून वंचित आणि कमकुवत समाज घटकांच्या उत्थानासाठी आरक्षण एक नीति म्हणून वापरली जाते. मुस्लिमांच्या चौफेर मागासलेपणाला दूर करण्यासाठी हे आवश्यक झालेले आहे की, त्यांच्यासाठी आता आरक्षण देण्याची नीति अवलंबिली जावी. त्यासाठी न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा कमिटीच्या शिफारशी स्विकारल्या जाव्यात. शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये अल्पसंख्यांकांना आरक्षण दिले जावे. ज्यात दोन तृतीयांश कोटा हा मुस्लिम अल्पसंख्यांकासाठी आरक्षित ठेवला जावा.
    3. लोकशाहीला मजबूत करणार्‍या संस्थांची स्वतंत्रता आणि त्यांना अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक ती ठोस पावले उचलली जावीत. या संस्थांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे की, यांच्या संबंधित नियुक्त्यावर सरकारी नियंत्रण हटविले जावे. माध्यमांची स्वतंत्रता आणि जबाबदार आचरणासाठी चुकीच्या बातम्या व दिशाभूल करणार्‍या कार्यक्रमांना रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल केले जावेत आणि प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाला अधिक अधिकार प्रदान केले जावेत. लोकपालच्या अधिकार क्षेत्रामध्ये राजकीय पक्ष आणि मोठ्या व्यावसायिक संस्थांनाही आणले जावे. सर्व शासकीय कामात संपूर्णपणे पारदर्शीता आणण्यासाठी ई-गव्हर्नन्स लागू करण्यात यावे.
    4. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये सुधारणा करून या योजनेअंतर्गत काम करणार्‍या मजुरांना वर्षाच्या 365 दिवस रोजगाराची हमी दिली जावी. खाजगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीच्या नीतिसाठी कायदा करून खाजगी क्षेत्राला ग्रामीण क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांचा चांगल्या प्रमाणे उपयोग करण्यात यावा.
    5. देशाच्या अर्थव्यवस्थेची अशा पद्धतीने पुनर्रचना केली जावी की, ज्यात धनवृद्धीही होईल आणि त्याचे न्याय्य वाटपही होईल. यासाठी कृषी अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्था, उत्पादन आणि लघू उद्योगांना प्रोत्साहित केले जावे. घरेलू आणि अन्य क्षेत्रातील पारंपारिक स्थानीय कला आणि कलाकारांच्या व्यवसायांना सुरक्षित आणि यशस्वी करण्यासाठी कायदेशीर तरतुदी केल्या जाव्यात. महत्त्वाच्या विभांगामध्ये मोठ्या वैश्‍विक कंपन्यांचा प्रवेश आणि प्रत्यक्ष गुंतवणुकीवर नियंत्रण आणावे. बेलगाम खाजगीकरणाला चाप लावण्यात यावा. एसईझेड अर्थात खास आर्थिक क्षेत्रा संबंधीच्या कायद्यामध्ये सुधारणा करून त्यात गरीब, शेतकरी आणि मजूर यांच्यासाठी अनुकूल अशा तरतुदी करण्यात याव्यात. सार्वजनिक भांडवलाद्वारे बँका आणि भांडवलदारांना होणारा अवैध पतपुरवठा तसेच सरकारी कामांसाठी विशेष करून संरक्षणासंबंधी प्रकरणामध्ये तसेच सरकार धार्जिण्या भांडवलशहांना बेकायदेशीररित्या केल्या जाणार्‍या मदतीच्या वाढत्या घटनांना रोखण्यासाठी योग्य ती नीति निर्धारित करण्यात यावी.
    6. कृषी विभागाला बळकटी आणण्यासाठी ठोस अशी नीति निर्माण करून त्याला लागू करण्यात यावे. राष्ट्रीय किसान आयोग (एस.एस. स्वामीनाथन कमिशन)च्या तरतुदी लागू करण्यात याव्यात. विशेषतः कृषी उत्पादनावर उत्पादन मुल्याच्या कमीत कमी दीटपट                                                                                                                                          आधारभूत किंमत देण्यात यावी. आणि कृषी भूमीच्या विक्री आणि तीच्या हस्तांतरणासंबंधी कमिशनने सुचविलेल्या कायद्याला तात्काळ लागू करण्यात यावे. कार्पोरेट शेतीला हतोत्साहित केले जावे आणि पिकाच्या नुकसानीच्या वेळी शेतकर्‍यांच्या मदतीसाठी क्लायमिटी फंड स्थापित करण्यात यावा.
    7. सामाजिक आणि मानवीय यशस्वीता  आणि प्रगती मध्ये सरकारची भूमीका वाढविण्यासाठी व आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक त्या आर्थिक सुधारणा केल्या जाव्यात. श्रीमंत लोकांवर अधिक कर लावण्यात यावा. अप्रत्यक्ष कराच्या तुलनेमध्ये प्रत्यक्ष कराच्या टक्क्यामध्ये वृद्धी केली जावी. जीएसटीमध्ये संशोधन केले जावे आणि ते अधिक सुलभ करण्यात यावे. लघू व्यावसाय आणि सामान्य लोकांच्या आवश्यकतेच्या वस्तू निर्माण केल्या जाव्यात. पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेले अनावश्यक कर कमी करण्यात यावेत आणि सकल रूपाने कराच्या व्यवस्थेचे असे नवनिर्माण करण्यात यावे की, वर्तमान कार्पोरेट आणि भांडवलशाही समर्थित व्यवस्थेच्या तुलनेत ही व्यवस्था अधिकाधिक जनहितांच्या जवळ होईल.
    8. अल्पसंख्यांकांविरूद्ध होणारी निरंतर हिंसा थांबविण्यासाठी एक असा कायदा असायला हवा ज्याद्वारे झुंडीद्वारा केली जाणारी हिंसा आणि झुंडीला उत्तेजित करणार्‍यांची ओळख करून त्यांना अटक करून कडक शिक्षा केली जाईल. त्याचप्रमाणे केंद्रीय सल्लागार समितीतर्फे विभिन्न गटांद्वारे केल्या जाणार्‍या हिंसेविरूद्धही महत्वपूर्ण प्रावधान या कायद्यात असायला हवेत. हिंसेला संपविण्यासाठी सामाजिक बहिष्कारासंबंधीच्या सुद्धा कलमांचा त्यात समावेश असायला हवा. विशेषकरून घृणा पसरविणारे, भडकाऊ भाषण देणारे, चुकीच्या बातम्या पेरणार्‍यांविरूद्ध प्रतिबंध करण्याची त्यात चेतावनी दिली गेली असली पाहिजे.
    9. अल्पसंख्यांकच्या धार्मिक व सांस्कृतिक अधिकारांच्या संरक्षणाची हमी दिली जावी. ट्रिपल तलाक विधेयक राज्यसभेमधून तात्काळ परत घेण्यात यावे आणि मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही, असे आश्‍वासन दिले गेले पाहिजे. अल्पसंख्यांकांच्या शिक्षण संस्था, विशेषतः अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि जामीया मिलीया इस्लामियाच्या अल्पसंख्यांक दर्जाचे रक्षण केले जावे. विभिन्न राज्यांमधील धार्मिक कार्याचे (इबादतींचे) स्वातंत्र्य, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार, आपली संस्कृती आणि धार्मिक ओळखीनुसार शिक्षणप्राप्त करणे, हिजाब आणि आपल्या इच्छेनुसार वस्त्र परिधान करणे इत्यादींमध्ये वेळोवेळी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत राहिलेला आहे, अशा सर्व समस्येचे समाधान व्हायला हवे.
    10. पोलिसांना व्यावसायिक आणि मानवीय बनविण्यासाठी राष्ट्रीय पोलीस आयोगाच्या शिफारशिंना लागू करण्यात यावे आणि पोलीस व्यवस्थेमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या जाव्यात. पोलीस दलामध्ये सर्वांचे प्रतिनिधीत्व राहील, यासाठी अल्पसंख्यांकांना 25 टक्के आरक्षण त्यात दिले जावे. अल्पसंख्यांकांच्या संबंधीच्या शिफारशींना लागू करण्यात यावे.
    11. सच्चर समितीच्या अहवालातील डायव्हर्सिटी इंडेक्स कन्सेप्टला सरकारी आणि खाजगी विभागांमध्ये लागू करण्यात यावे. जेणेकरून दलित, मुस्लिम आणि इतर मागासवर्गीय लोकांना चांगल्या संधी मिळू शकतील. सर्व सरकारी आणि खाजगी कार्य, डायव्हर्सिटी इंडेक्स कन्सेप्टवर आधारित असायला हवेत. सर्वांना समान संधी मिळण्याच्या घटनात्मक तरतुदींचे कायद्यात रूपांतर केले जावे. त्याने मुस्लिम आणि विभिन्न वर्गांच्या समस्यांचे समाधान होईल. यासाठी खाजगी क्षेत्रातही त्यांना प्रतिनिधीत्व मिळू शकेल. सच्चर समितीच्या शिफारशिंना प्रत्यक्षात लागू करण्यात यावे. सर्वच सरकारी योजनांमध्ये मुस्लिमांच्या भागीदारीलाही सामील करण्यात यावे.
    12. नवीन शिक्षण नीतिचे मुल्यांकन केले जावे आणि तिच्या आकलनाच्या आधारावर समाजातील विभिन्न वर्गांचा सहभाग सुनिश्‍चित करण्यात यावा. विशेषतः शैक्षणिक नीति आणि अभ्यासक्रमाच्या निर्मितीमध्ये विशेषतः सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांकडे लक्ष देण्यात यावे आणि ठोस नीतिच्या आधारावर त्यांची निर्मिती केली जावी. शिक्षणावर जीडीपीची कमीत कमी 8 टक्के रक्कम खर्च करण्यात यावी. मुलभूत शिक्षणावर खर्चाची टक्केवारी निरंतर कमी होत आहे. त्यात बदल केला जावा. मुस्लिमांसह शिक्षणाच्या दृष्टीकोणातून कमकुवत वर्गांच्या शैक्षणिक विकासासाठी विशेष प्रकारच्या नीति निर्धारित केल्या जाव्यात.
    13. केंद्रातील कायदे उदा. एएफएसपीए, युएपीए, एनएसए आणि याच प्रकारचे राज्यस्तरावरील कायदे उदा. आय.टी.अ‍ॅक्ट 2000, भारतीय दंड विधान आणि इतर वेगवेगळ्या कायद्यामध्ये बदल करण्यात यावे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय कराराच्या आधारावर राजकीय आणि नागरी अधिकार इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑफ सिविल अँड पोलिटीकील राईटच्या नियमानीशी समांतर केले जावे. त्याच प्रमाणे शोषणाच्या विरूद्ध कन्व्हेन्शन अगेन्स्ट टॉर्चर अँड ऑदर क्रुयल इनह्युमन ऑर डिग्रेडिंग ट्रिटमेंट ऑर पनिशमेंट आणि त्याच्याद्वारे नियंत्रित प्रोटोकॉल म्हणजेच इंटरनॅशनल कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ ऑल पर्सनन्स फ्रॉम एन्फोर्स्ड डिसअ‍ॅपीयरन्सला वाढ दिली जावी आणि कन्व्हेन्शनर्सच्या सल्ल्यानुसार कायद्यात बदल करण्यात यावेत.
    14 . एका स्वतंत्र न्यायिक आयोगाची स्थापना करण्यात यावी. ज्याच्याद्वारे कट आणि आतंकवाद तसेच झुंडीद्वारे केल्या जाणार्‍या हिंसक घटना आणि आरोपांची निरपेक्ष स्वरूपात चौकशी होईल. या घटनांशी संबंधित खटले चालविण्यासाठी वेगवान न्यायालयांच्या स्थापनेचा प्रयत्न केला जावा. अनावश्यक कायदे आणि हस्तक्षेपाने पीडित लोकांसाठी न्याय आणि नुकसानभरपाईची व्यवस्था केली जावी आणि खोट्या आरोपाखाली खटले दाखल करून निरपराधांना अडकावणार्‍यांना शिक्षा दिली जावी. त्यासाठी संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक त्या कलमांचा समावेश केला जावा. नागरिक कायद्यामध्ये बदल करणारे विधेयक जे की, लोकसभेमध्ये मंजूर झालेले आहे, तात्काळ परत घेण्यात यावे. हे विधेयक देश आणि देशाच्या घटनेच्या आत्म्याच्या विरूद्ध धार्मिक भेदभाव वाढविणारा आहे. त्याचप्रमाणे एनआरसी (राष्ट्रीय नागरिक रजिस्टर)च्या नावाखाली ज्या लोकांना त्रास देण्यात येत आहे तो तात्काळ थांबविण्यात यावा. जे देशाचे नागरिक नाहीत त्यांची ओळख पटविण्यासाठी दुसरी कुठलीतरी उचित व्यवस्था केली जावी. आणि त्या व्यवस्थेला सर्व वर्गांच्या सहमतीनंतर लागू करण्यात यावे. त्याचप्रमाणे जम्मूकश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंसा आणि अत्याचाराच्या साखळीला तात्काळ रोखण्यात यावे. आणि त्या ठिकाणच्या जनप्रतिनिधींकडे संचलनाची जबाबदारी देऊन नागरी प्रकरणांमध्ये सैन्याच्या भूमीकेला कमी करण्यात यावे.
    16. बँकींग क्षेत्रात व्याज विरहीत व्यवहारांचा परिचय लोकांना करून देण्यात यावा. डॉ.रघुराम राजन यांच्या नेतृत्वाखाली प्लॅनिंग कमिशनने फायनान्सीयल सेक्टर रिफॉर्म्सच्या आर्थिक क्षेत्रासंबंधी दिलेल्या सल्ल्यानुसार संबंधित समिती आणि विभिन्न समित्यांच्या शिफारशीनुसार अल्पसंख्यांक आणि गरीब वर्गाच्या उन्नतीसाठी व देशाच्या आर्थिक विकासासाठी व्याज विरहीत भागीदारीवर आधारित कामकाज करण्याची बँकांना परवानगी दिली जावी. स्टेटबँक ऑफ इंडियाने शरियतवर आधारित ज्या इक्विटी फंडला सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, त्याला तात्काळ लागू केले जावे आणि इन्शोरन्स विभागात कार्य करण्याची परवानगी दिली जावी.
    17. वक्फ अ‍ॅक्ट 2013 मध्ये संशोधन करून ज्वॉईंट पार्लमेंट्री कमिटीच्या सर्व शिफारशींना त्यात सामील केले जावे. विशेष करून या कायद्याला राज्याच्या रेंट कंट्रोल अधिनियम आणि महसूल कायद्यावर वरियता द्यावी, नियमित वेळेवर सर्व्हेक्षण करण्याचे बंधन टाकावे. सर्व्हेक्षण अहवाल इंटरनेटवर उपलब्ध करावा. सीईओला कब्जे हटविण्याच्या संबंधात मॅजिस्ट्रीयल अधिकार देण्यात यावे. कब्जा हटविण्यामध्ये अयशस्वी ठरलेल्या सरकारी अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी. कुठल्याही एका निरपेक्ष व्यक्तीला वक्फ काउन्सिलचा प्रमुख बनविण्यासारख्या शिफारशींना वक्फ अ‍ॅक्टमध्ये सामील करण्यात यावे. वक्फच्या संपत्तीला सरकारी संपत्तीप्रमाणे सुरक्षा उपलब्ध करून देण्यासंबंधीचे विधेयक ’द वक्फ प्रॉपर्टीज (इव्हीक्शन ऑफ अनअथोराईज्ड अकुपन्टस्)’ बिल 2014 प्रलंबित आहे. त्याला तात्काळ मंजुरी दिली जावी आणि सच्चर समितीच्या शिफारशींप्रमाणे युपीएससी अंतर्गत एक वेगळी नॅशनल वक्फ सर्व्हीस स्थापन करण्यात यावी.
    18. राज्य घटनेत संभाव्य सुधारणेच्या माध्यमातून एक गोष्ट निश्‍चित केली जावी, की कुठल्याही आंतरराष्ट्रीय करार लागू करण्यापूर्वी किंवा विदेशनीतिमध्ये व्यापक बदल करण्यापूर्वी संसदेच्या मंजुरीला अनिवार्य बनविण्यात यावे, असे करणे यासाठी आवश्यक आहे की, देशाची विदेशनीति स्वतंत्र व निष्पक्ष असावी. लोकशाही आणि मानवी मुल्यांवर आधारित असावी. या नीतिचा परिणाम शेजारील देशांशी मधूर संबंध स्थापित करण्यामध्ये व्हावा. दक्षीण क्षेत्राचा (साऊथ-साऊथ कोऑपरेशन) चा मार्ग प्रशस्त व्हावा. आपली विदेशनीति आणि घटनात्मक मुल्य यात कुठलाही विरोधास नसावा.

हिंदीतून मराठी भाषांतर
उपसंपादक बशीर शेख,
एम.आय.शेख

इस्लामने धार्मिक ज्ञानाची मोठी महत्ता वर्णिली आहे. ते शिकणे व शिकवण्याची खूप प्रेरणा दिली आहे आणि त्याला हर प्रकारे प्रोत्साहन ही दिले आहे. त्याचा परिणाम असा झाला की, लवकरच धार्मिक ज्ञानाची सर्वत्र चर्चा होऊ लागली आणि फार मोठे ज्ञानी व्यक्ती उठून समोर आले. त्यात पुरुषही होते व स्त्रियासुद्धा होत्या. येथे काही विशेष महत्त्वाच्या महिलांचा उल्लेख केला जात आहे.
महिला सहाबी (प्रेषितांचे सोबती) मध्ये माननीय आयेशा (र) यांचे ज्ञानविषयक सर्वोच्च स्थान आहे. काही मोजक्याच पुरुष सहाबींना हे स्थान प्राप्त होते. त्यांच्या ज्ञान-प्रतिष्ठा व दूरदर्शितेचे श्रेष्ठत्व त्या काळातील विद्वानांनी मान्य केले आहे. त्यांचे खास शिष्य व भाचे उर्वा बिन जुबैर म्हणतात,
‘‘मी माननीय आयेशा (र) यांच्या सान्निध्यात राहिलो. मला त्यांच्यापेक्षा जास्त कुरआन आयती उतरण्याची पार्श्वभूमि समजणारा अनिवार्य बाबी (फराईज), सुन्नत (हदीस), काव्य व साहित्य, अरबस्तानचा इतिहास आणि टोळ्यांच्या वंशावळ्या वगैरे आणि खटल्यांचे निकाल, येथपावेतो की वैद्यकीय ज्ञान असणारा कोणताही अन्य पाहिला नाही.’’
ते म्हणतात, मी विचारले, ‘‘मावशी ! आपण वैद्यकीय ज्ञान कसे घेतले ?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘जेव्हा कधी मी अथवा एखादी दुसरी व्यक्ती आजारी पडत असे, तेव्हा त्यावरील उपचार सांगितला जात असे. त्याचप्रमाणे लोक एक दुसऱ्याला उपचार सांगत असत आणि मी ते स्मरणात ठेवीत असे.’’ (सियरु आलामिन्नबलाइ - २ : १२८-१२९)
इमाम जुहरी म्हणतात,
‘‘जर सर्व लोकांचे ज्ञान एकत्र केले गेले आणि मग प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पवित्र पत्नींच्या ज्ञानाची त्यात भर घातली गेली, तरीसुद्धा माननीय आयेशा (र) यांचे ज्ञान अधिक व्यापक ठरेल.’’ (मुस्तदररक, हाकिम - ४ : ११)
अता बिन अबी रिबाह (र) म्हणतात -
‘‘माननीय आयेशा (र) लोकांत सर्वांत मोठ्या धर्म-शास्त्री, सर्वाधिक ज्ञानी आणि सर्वसामान्य लोकांसाठी सर्वांत चांगले मत ठेवणाऱ्या होत्या.’’ (मुस्तरक हाकिम - ४ : १५)
इमाम जहबी म्हणतात -
‘‘प्रेषित मुहम्मद (स) यांच्या अनुयायांमध्ये एवढेच नव्हे तर सर्वच स्त्रियांमध्ये त्यांच्याइतके अधिक ज्ञान असणारी स्त्री मला माहीत नाही.’’ (सियरू आलामिन्नुबलाइ - २ : १०१)
ज्या सहाबींनी सर्वांत जास्त प्रेषित मुहम्मद (स) यांच्या हदीस (वचने) चे कथन कले आहे, त्यात माननीय आयेशा (र) यांचीसुद्धा गणना होते. ही हदीस वचने त्यांनी प्रत्यक्षपणे प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडून उध्दृत केली आहेत. काही हदीस वचने माननीय अबू बकर (र), उमर (र), फातिमा (र), साद बिन अबी वक्कास (र), हमजा बिन अमरुलअस्लमी (र), जुजामा बिन्ते वहब (र) यांच्याकडूनसुद्धा ऐकून कथन केली आहेत. त्यांनी कथन केलेल्या हदीसची एकूण संख्या २२१० आहे. यांच्यापैकी १७४ हदीस ‘मुताफक अलैहि’ आहेत. म्हणजे बुखारी व मुस्लिम या हदीसच्या दोन्ही ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. त्याशिवाय ५४ हदीस बुखारीमध्ये व ६९ मुस्लिममध्ये उल्लेखित आहेत. उरलेल्या अनेक हदीस अन्य हदीसच्या ग्रंथांत आहेत. (सियरू आलामिन्नुबलाइ - २ : १०१)
उम्मुलमोमिनीन माननीय उम्मे सलमा (र) यांनीसुद्धा अनेक हदीसी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडून सरळसरळ व काही हदीस माननीय अबू सलमा (र) आणि फातिमा (र) यांच्याकडून परोक्ष रूपाने कथन केल्या आहेत आणि ३५ पेक्षा अधिक सहाबी व ताबईन (सहाबींचे शिष्य) यांनी (ज्यात पुरुष व स्त्रिया दोन्ही सामील आहेत.) त्यांच्याकडून हदीसींचे कथन केले आहे. (तहजीबुत्तहजीब - १२ : ४५६)
त्यांनी कथन केलेल्या हदीसींची संख्या ३७८ आहे. त्यातील १३ कथने बुखारी व मुस्लिम दोन्हींमध्ये आहेत. त्याशिवाय ३ बुखारी आणि १३ मुस्लिमग्रंथातमध्ये आढळतात. (सियरु आलामिन्नबलाइ - २ : १४३)
माननीय उम्मे सलमा (र) यांचे धर्मशास्त्रात विशेष स्थान होते. इमाम जहबी (र) म्हणतात -
‘‘सहाबींमध्ये जे धर्मशास्त्रपंडित होते, त्यांत यांची गणना होत होती.’’ (सियरु आलामिन्नबलाइ - २ : १४३)
उम्मुलमोमिनीन माननीय हफ्सा (र) या माननीय उमर (र) यांच्या सुपुत्री होत्या. त्यांनी प्रेषित मुहम्मद (स) व माननीय उमर (र) यांच्याकडून हदीसचे कथन केले आहे. त्यांच्याकडून हदीसचे कथन करणाऱ्यांपैकी त्यांचे बंधु माननीय अब्दुल्लाह बिन उमर (र) त्यांचे सुपुत्र हमजा, त्यांच्या पत्नी सफया, उम्मे बिशरल अन्सारिया, मुत्तलिब बिन विदाआह, हारिसा बिन वहब वगैरे १२ पेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश आहे. (तहजीबुत्तहजीब - १२ : ४११)
माननीय हफ्सा (र) यांनी ६० हदीसींचे कथन केले आहे. त्यांच्यापैकी ४ हदीस बुखारी व मुस्लिम या दोन्ही ग्रंथांत व ६ हदीस केवळ मुस्लिममध्ये उध्दृत आहेत. (सियरु आलामिन्नबलाइ - २ : १६४)
उम्मुलमोमिनीन उम्मे हबीबा (र) या माननीय अबू सुफियान (र) यांच्या कन्या होत. त्यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडून ६५ हदीसींचे कथन केले आहे. त्यांच्यापैकी २ बुखारी व मुस्लिम या दोन्हींत समाविष्ट आहेत. एक मुस्लिममध्ये उध्दृत आहे. त्यांच्याकडून त्यांची कन्या हबीबा (र), त्यांचे बंधु माननीय मुआविया (र), त्यांचे पुतणे अब्दुल्लाह बिन उत्बा, उर्वा बिन जुबैर, सफिया बिन्ते शैबा व जैनब बिन्ते अबू सलमा वगैरेंनी हदीसने कथन केले आहे. (सियरु आलामिन्नबलाइ - २ : १५५, तहजीबुत्तहजीब - १२ : ४१९)
माननीय अस्मा (र) माननीय अबू बकर (र) यांच्या सुकन्या आणि माननीय जुबैर (र) यांच्या धर्मपत्नी होत्या. त्यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडून अनेक हदीसींचे कथन केले आहे. त्यांच्याकडून ज्या सहाबी व सहाबींच्या अनुयायीनीही हदीसी दुसऱ्या लोकांपर्यंत पोचविल्या आहेत. त्यांच्यापैकी काहींची नावे अशी आहेत. त्यांचे चिरंजीव अब्दुल्लाह बिन जुबैर (र) त्यांचे पुत्र अब्दुल्लाह बिन उर्वा, इबाद बिन अब्दुल्लाह, माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र), सफिया बिन्ते शैबा, फातिमा बिन्ते मुंजिर, त्यांनी मुक्त केलेले गुलाम अब्दुल्लाह बिन, कैसान, त्यांचे पूत्र उब्बाद बिन हमजा वगैरे. (सियरु आलामिन्नबलाइ - २ : २०८)
त्यांनी कथन केलेल्या हदीसींची संख्या ५८ आहे. त्यांच्यापैकी १३ बुखारी व मुस्लिम दोन्हींमध्ये आहेत. याव्यतिरिक्त केवळ बुखारीत ५ आणि मुस्लिममध्ये ४ हदीसी आहेत. (सियरु आलामिन्नबलाइ - २ : २१४)
खौला बिन्ते हकीम (र) यांच्यासंबंधी अल्लामा इब्ने अब्दुलबर्र म्हणतात -
‘‘त्या एक सदाचारी आणि विद्वान महिला होत्या.’’ (अल-इस्ती आब - ४ ‘ २९०)
माननीय उमर बिन अब्दुल अजीज (र) त्यांच्याकडून एका हदीसचे कथन करतात -
‘‘खौला बिन्ते हकीम ज्या एक सदाचारी महिला होत्या त्यांनी म्हटले आहे.’’ (तिर्मिजी (अबवाबुल बिर्रिवस्सिला))
यावरून स्पष्ट होते की त्यांचा सदाचार व ज्ञान-प्रतिष्ठा सर्वमान्य होती.
माननीय उस्मान (र) यांनी आपल्या खिलाफतच्या काळात एका महिला सहाबींच्या कथनांच्या आधारे एका प्रश्नावर निर्णय दिला.
जैनब बिन्ते कअब बिन अजिरा म्हणतात की, माननीय अबू सईद खुदरी (र) यांच्या भगिनी फरीआ बिन्ते मालिक (र) यांनी त्यांना सांगितले की, ‘‘माझ्या पतीच्या निधनानंतर मी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे गेले आणि म्हणाले की, मला माझ्या कुटुंबियात इद्दत (म्हणजे पतीच्या निधनानंतर ४ महिने १० दिवस शोक पाळण्याची मुदत. या मुदतीत दुसरा विवाह करणे अवैध आहे.) घालविण्याची परवानगी देण्यात यावी. कारण की पतीचे स्वतःचे घर नव्हते.’’ परंतु प्रेषित मुहम्मद (स) यांनी असे असूनदेखील आदेश दिला की, ‘‘जेथे तुम्हाला आपल्या पतीच्या निधनाची बातमी मिळाली आहे, तेथेच इद्दतचा काळ व्यतीत करा.’’ माननीय उस्मान (र) यांच्या खिलाफत-काळात हाच प्रश्न समोर आला, तेव्हा लोकांनी त्यांच्यासमोर माझ्या या घटनेचा उल्लेख केला. त्यांनी मला बोलविले. मी तेथे पोचले तेव्हा ते काही लोकांत बसले होते. त्यांनी माझ्याकडून ती घटना जाणून घेतली. जेव्हा मी घटना सांगितली, तेव्हा त्यांनी ज्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता, तिला कळविले की, तिने इद्दतचा काळ त्याच ठिकाणी पुरा करावा जेथे तिला आपल्या पतीच्या निधनाची बातमी मिळाली आहे. (अबु दाऊद (किताबुत्तलाक), तपशीलासाठी पाहा तबकात इब्ने साद - ८ : ३६७)
कोणत्याही काळातील ज्ञानविषयक व चितनात्मक स्थितीची खरी कल्पना येण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तीबरोबरच अप्रसिद्ध व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणेसुद्धा आवश्यक आहे. यावरूनच त्या काळाचे खरे चित्र समोर येऊ शकते. यासंबंधीच्या एक-दोन घटना खाली दिल्या जात आहेत.
माननीय उम्मे वरकासंबंधी उल्लेख आहे की, त्यांनी पवित्र कुरआन एकत्रित केला होता. अन्य एका कथनात उल्लेख आहे की, त्यांनी पवित्र कुरआनचे शिक्षण घेतले होते.
प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना सांगितले होते की, त्यांनी आपल्या कुटूंबियांचे नमाजमध्ये नेतृत्व (इमामत) करावे. त्यांच्यासाठी एका मुअज्जिन (अजान देणारा बांगी) ची सुद्धा नेमणूक केली होती. (तबकात इब्ने साद - ८ : ४५७, अल इसाबाफी तमईजिस्सहाबा - ४ : ५०५.)
प्रेषित मुहम्मद (स) यांनी एका वृद्ध महिलेला सांगितले की, ‘‘कोणतीही म्हातारी स्वर्गात जाणार नाही.’’ तिने प्रश्न केला, ‘‘का बरे जाणार नाही ?’’ माननीय अनस (र) म्हणतात की, त्या म्हातारीने कुरआनचे शिक्षण घेतले होते (म्हणून) प्रेषित मुहम्मद (स) यांनी तिला सांगितले,
‘‘तुम्ही कुरआनचे पठन करीत नाही का ? अल्लाहने त्यात सांगितले आहे. की, ‘आम्ही त्या स्त्रियांना विशेष उत्थापनावर जन्म दिला आहे आणि त्यांना कुमारिका बनविले आहे.’ अर्थात - या म्हाताऱ्या स्त्रिया तरुण होऊन स्वर्गात जातील.’’ (मिश्कातुल मसाबीह (किताबुल आदाब, रजीनच्या प्रमाणाने))
प्रेषित मुहम्मद (स) यांनी माननीय अली (र) यांना राहता नामक दासी प्रदान केली होती. असे कथन आहे की, माननीय अली (र) यांनी तिला कुरआनचे अल्पसे शिक्षण दिले होते. (असादुल गाबा - ५, अल इसाबा फी तमईजिस्सहाबा - ४ : २९९)
आता आम्ही सहाबींच्या शिष्यांच्या काळातील काही महिलांचा उल्लेख करू, ज्यांचे ज्ञान-प्रतिष्ठेत आपले विशेष स्थान होते.

हे विश्व, एका भल्या मोठ्या पुस्तकासमान आपल्या समोर पसरलेले आहे, परंतु हे एक अजब पुस्तक आहे ज्याच्या कोणत्याही पृष्ठावर त्याचा विषय अथवा त्याच्या लेखकाचे नाव लिखित स्वरुपात नाही, तरीही या पुस्तकाचा एकेक शब्द बोलत आहे, की त्याचा विषय काय असू शकतो आणि त्याचा लेखक कोण आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती डोळे उघडते आणि पाहते की ती एका विशाल, भव्य विश्वामध्ये उभी आहे, तेव्हा स्वाभाविकपणे त्याच्या मनमस्तिष्कात प्रश्न उद्भवतो की, ‘‘मी काय आहे, कोण आहे आणि ही सृष्टी म्हणजे काय?’’ तो स्वतःला आणि विश्वाला समजून घेण्यास अस्वस्थ होतो. आपल्या प्रकृतीत समाविष्ट संकेतांचे वाचन करण्याचा प्रयत्न करतो, जगात ज्या परिस्थितीना त्याला तोंड द्यावे लागते, त्यामागील वास्तविक कारणांचा शोध घेण्याचे तो इच्छितो. त्याच्या मनमस्तिष्कात अगणित प्रश्न निर्माण होतात. त्यांची उत्तरे माहित करून घेण्याकरिता तो अस्वस्थ असतो, परंतु त्याची उत्तरे त्याला सापडत नाहीत.
हे प्रश्न केवळ दार्शनिक अथवा तत्वज्ञानात्मक स्वरुपाचे नाहीत, तर मानवी स्वभाव, प्रकृती आणि परिस्थितीचा तो स्वभाविक परिणाम आहे. हे असे प्रश्न आहेत, जे जगातील जवळपास प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी भेडसावत असतात. त्याची उत्तरे न मिळाल्याने कोणी वेडा होतो, कोणी आत्महत्या करून घेतो, कोणाचे उभे आयुष्य अस्वस्थतेत संपते आणि कोणी आपल्या ‘वास्तविक’ प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने संसारिक जीवनाच्या मनोरंजनात गुरफटून जातो आणि त्यामध्ये गुंग होऊन सदर मानसिक दगदगीतून सुटका प्राप्त करण्याचे इच्छितो. तो जे काही प्राप्त करू शकतो, प्राप्त करण्याच्या प्रयत्नात त्याला त्याचे विस्मरण होते जे तो प्राप्त करू शकला नाही.
सदर प्रश्नाला आपण मोजक्या शब्दामध्ये ‘अंतिम सत्याचा शोध’ म्हणून संबोधू शकतो परंतु याचे आपण विश्लेषण केले तर हा बर्याच प्रश्नांचा संग्रह असल्याचे दिसून येईल. ते प्रश्न कोणते आहेत? वेगवेगळ्या अंगानी ती प्रश्ने विचारली जाऊ शकतात परंतु सोयीकरिता मी खालील प्रमाणे तीन शीर्षकात त्यांची विभागणी करू इच्छितो.

  1. सृष्टिकर्त्याचा शोध
  2. उपास्य (माबूद - ईश्वर) चा शोध
  3. आपल्या अंतिम परिणामाचा शोध
माझ्या मतानुसार ‘सत्याचा शोध’ खरे पाहता नामाभिदान आहे त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचे. कोणत्याही शब्दात तुम्ही ते प्रश्न मांडा, वस्तुतः ते त्यांचेच परिवर्तीत स्वरुप असेल आणि याच तिन्ही सदराखाली त्यांना एकत्र केले जाणे शक्य असेल.
वर वर पाहता हे प्रश्न असे आहेत ज्याबाबत आपणास काहीही कल्पना नाही. अथवा एखाद्या पर्वताच्या माथ्याशी एखादा असा फलक लावलेला दृष्टीस पडत नाही जेथे या प्रश्नांची उत्तरे लिहून ठेवलेली असतील. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की प्रश्नातच त्याचे उत्तरही सामावलेले आहे. विश्व आपल्या वास्तवतेकडे स्वतः संकेत करीत आहे. ते आपणास निश्चित ज्ञानापर्यंत पोहचवत नसले तरी हा संकेत व इशारा अगदी स्पष्ट व अंतिम आहे. कोणत्याही प्रकारे आपणास वास्तविकतेचे ज्ञान प्राप्त झाले तर आपले अंतःकरण, खरोखर हेच सत्य आहे, याखेरीज विश्वाची अन्य काहीही वास्तवता असणे शक्य नसल्याचे कबूल करील.

  1. सृष्टिकर्त्याचा शोध
  2. सृष्टीला पाहता क्षणीच सर्वप्रथम हा प्रश्न पडतो की हिचा निर्माणकर्ता कोण आहे आणि तो कोण आहे जो या भव्य कारखान्यास चालवित आहे. जुन्या काळात लोकांचा असा समज होता की बर्याच अदृश्य शक्ती या सृष्टीरूपी कारखान्याचे स्वामी आहेत. एका मोठ्या ईश्वराच्या देखरेखीत बरेचसे लहान सहान ईश्वर त्याची व्यवस्था पहात आहेत. आज देखील बरेच जण अशाच प्रकारची विचारप्रणाली बाळगतात. परंतु युक्तिवाद आणि सिध्दांताच्या जगात आता या विचारांना मान्यता नाही. आजमितीस हा एक सजीव नव्हे तर निर्जीव दृष्टिकोन आहे.
    वर्तमान जगात जे लोक स्वतःला प्रगतीवादी, सुसंस्कृत म्हणवून घेतात आणि स्वतःला नवयुगाचा मानव म्हणून संबोधितात, ते ‘शिर्क’ अर्थात अनेकेश्वरवादाऐवजी नास्तिकता आणि संयोग सिध्दांताचे समर्थक आहेत. त्यांच्या मतानुसार हे विश्व एखाद्या विवेकी आणि जागृत अस्तित्वाची निर्मिती नाही तर आकस्मिक अपघाताचा परिणाम आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की जेव्हा एखादी घटना आकस्मिक घडते तेव्हा परिणामस्वरूप आणखी प्रतिघटना अस्तित्वात येतात. अशा प्रकारे कारण आणि कार्याची एक लांबलचक श्रृंखला सुरु होते, आणि हीच श्रृंखला ते कारण आहे जिने संपूर्ण विश्वाला गतिमान केले आहे. या विचारप्रणाली मध्ये दोन मूलभूत गोष्टी आहेत. एक ‘योगायोग’ आणि दुसरी कार्यकारण सिध्दांत ( law of Causation )
    या विचारप्रणालीनुसार आजपासून जवळजवळ दोन लाख अरब वर्षा -पूर्वी या विश्व वा सृष्टीचे अस्तित्व नव्हते. त्या समयी ना तर तारे होते ना तर ग्रह परंतु वातावरणात जड पदार्थ अस्तित्वात होता. हा जड पदार्थ त्यावेळी स्थायी स्वरुपात नव्हता. त्याचे स्वरूप इतके जटिल नव्हते तर आपल्या सरळ आणि प्रारंभिक अवस्थेत होता. अर्थात हा पदार्थ इलेक्ट्रान आणि प्रोटानच्या रुपात संपूर्ण आकाशात वा संपूर्ण वातावरणात समानरित्या पसरला होता.
    दुसर्या शब्दात सांगावयाचे झाल्यास ही संपूर्ण सृष्टी, हे पूर्ण विश्व अगदी छोट्या छोट्या कणांमध्ये अथवा सूक्ष्म परमाणूंच्या धुळीच्या धूसर लोटा समान होते. त्या समयी पदार्थ अगदी समतोल अवस्थेत होता. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया, कोणत्याही प्रकारची गती नव्हती.
    गणिताच्या दृष्टीने पाहिल्यास हा समतोल असा होता की जर त्यामध्ये एखाद्याने थोडासा जरी विघ्न निर्माण केला, तर ते स्थिर राहणे शक्य नसावे, अस्थिरतेची ती श्रृंखला सुरुच रहावी. जर त्या प्रथम हालचालीस - व्यत्ययास गृहीत धरले तर त्या दृष्टिकोनानुसार तद्नंतरच्या सर्व घटना गणिती पद्धतीने सिद्ध होतात.
    असो, मग असे झाले की पदार्थरूपी या आभाळात किचितशी हालचाल झाली जसे एखाद्या हौदातील पाणी कोणी हात घालून हलवावे तसे. विश्वाच्या या शांततामय दुनियेत हा विघ्न व गती कोणी उत्पन्न केला, याबाबत काही माहिती नाही, परंतु हालचालीची क्रिया घडली आणि त्यात वृध्दी होतच गेली. गतीची एक श्रृंखला अविरत सुरु झाली. परिणामतः पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित गोळा होणे सुरु झाले. हाच तो एकत्रित जमलेला पदार्थ होय ज्यास आपण तारे, ग्रह आणि नक्षत्रे म्हणतो.
    सृष्टीसंबंधी सदर व्याख्या विज्ञानाने प्रस्तुत केली होती परंतु हा युक्तीवाद कमकुवत व ठिसूळ आहे, हे सत्य आहे. कारण स्वतः वैज्ञानिकांची मनःस्थितीही यावर टिकू शकली नाही. ही विचारप्रणाली, विश्वाला सर्वप्रथम कोणी क्रियाशील केले, यापासून स्वतःच अनभिज्ञ असण्याची वास्तविकता स्वीकारते आहे. तरीही सदर विचारधारा प्रस्तुत करणार्यांचा, सृष्टीला सर्वप्रथम गती देण्याच्या बाबतीत माहिती प्राप्त केल्याचा दावा आहे. त्यांच्या मतानुसार या पहिल्या क्रियेला जन्म देणार्याने नाव अपघात वा योगायोग आहे.
    प्रश्न असा उद्भवतो की जेव्हा विश्वाच्या पोकळीत केवळ एक निष्क्रीय आणि गतिहीन पदार्थाचे अस्तित्व होते, त्याखेरीज अन्य एखादी वस्तू अस्तित्वात नव्हती, तर हा विचित्र योगायोग मध्येच कोठून टपकला ज्याने संपूर्ण सृष्टीला गतिमान करून टाकले. ज्या घटनेचे कारण ना त्या पदार्थात होते, ना त्या पदार्थाबाहेर, मग ही घटना घडली तरी कशी?
    या विचारप्रणालीचा हा एक अत्यंत मजेशीर विरोधाभास आहे की त्यामध्ये प्रत्येक घटनेच्या आधी एक घटना, प्रत्येक प्रतिक्रिये आधी एक क्रिया असण्याचे आवश्यक मानले जाते, जे नंतर घटित अथवा जारी असणार्या घटनांचे कारण बनू शकेल, परंतु या विचारप्रणालीचा आरंभ एका अशा घटनेद्वारे होतो, ज्याच्या आधी त्याचे कारण अस्तित्वात नाही. हाच तो बिनबुडाचा विचार ज्याच्या पायावर विश्वाच्या आकस्मिक जन्माच्या सिद्धांताची इमारत उभी करण्यात आली आहे.
    या विश्वाची निर्मिती योगायोगाने वा आकस्मिक झाली असेल तर मग अनिवार्यतः काय त्या दिशेचाच अवलंब करण्यास त्या घटना विवश होत्या ज्या दिशेचा त्यांनी अंगिकार केला? याव्यतिरिक्त अन्य काही घडणे शक्य नव्हते काय? काय हे संभव नव्हते की तारे परस्परात टक्कर होऊन नष्ट व्हावेत? तथाकथित पदार्थामध्ये हालचालीची क्रिया निर्माण झाल्यानंतर, ती क्रिया त्यापुरतीच मर्यादित न राहता एक विकसनशील क्रिया बनली. आणि एका आश्चर्यजनक श्रृंखलेचा आरंभ होवून सर्व क्रमबध्दता वर्तमान विश्वाला साकार करण्याकरिता गतिमान झाली, काय हे आवश्यक होते?
    शेवटी तो कोणता तर्क, कोणता लॉजिक की ज्याने तार्यांच्या निर्मिती - नंतर त्यांना अनंत अवकाशात शिस्तबद्धरित्या पद्धतशीरपणे फिरावयास लावले. मग ते कोणते लॉजिक होते ज्याने सृष्टीच्या एका उपयुक्त ठिकाणी सूर्यमालेला अस्तित्वात आणले व त्याचे स्थान निश्चित केले? तद्नंतर तो कोणता युक्तीवाद होता ज्यामुळे आपल्या पृथ्वीवर ते चमत्कारिक परिवर्तन घडले, ज्याच्या परिणामस्वरुप येथे जीवसृष्टी निर्माण होणे शक्य होऊ शकले? आणि त्या परिवर्तनांचा आजपावेतो सृष्टीतील असंख्य जगतापैकी एका जगातही थांगपत्ता लागू शकला नाही? मग तो कोणता युक्तीवाद, तर्क होता, जो एखाद्या विशिष्ट अवस्थेत पोहचून निर्जीव पदार्थापासून सजीव प्राण्यांच्या जन्मास कारणीभूत ठरला? काय या गोष्टीची एखादी न्यायोचित व्याख्या करणे शक्य आहे की पृथ्वीवर जीवन का आणि कशा प्रकारे अस्तित्वात आले? आणि ते नियमानुसार का सातत्याने निर्माण होत चालले आहे?
    मग तो कोणता तर्क होता, ज्याने विश्वाच्या एका छोट्याशा भागात चमत्कारिकरित्या त्या सर्व वस्तू निर्मिल्या, जे आपल्या जीवन, आपल्या विकास आणि आपल्या संस्कृतीकरिता आवश्यक होत्या? मग तो कोणता तर्क आहे, ज्याने ही स्थिती आपल्याकरिता शाबूत ठेवली आहे? काय निव्वळ एक योगायोग - अपघात घडणे या गोष्टीस पुरेसे कारण होते की या सर्व घटना, इतक्या सुरेख पद्धतीने आणि अगदी क्रमबध्दरित्या निरंतरपणे घडत जाव्यात आणि कित्येक अरब, खरब वर्षानुवर्षे तो क्रम सुरू रहावा आणि त्यात कोणताही फरक आढळू नये?
    मग, योगायोगाने घडणार्या घटनामध्ये हे परस्पर सहकार्य - ताळमेळीचे वैशिष्टय कोठून आले? इतक्या चमत्कारिकपणे निरंतर विकास साधणेची प्रवृत्ती त्यामध्ये कशी काय आली, या गोष्टीची खरोखर एखादी व्याख्या केली जाऊ शकते का?
    या विश्वाची निर्मिती कशी झाली? या प्रश्नाचे हे उत्तर होते. तद्नंतर हा प्रश्न उद्भवला की या सृष्टीला चालविणारा कोण आहे? तो कोण आहे जो या महान व विशाल कारखान्यास इतक्या व्यवस्थितरित्या गतिशील ठेवित आहे? तत्संबंधी व्याख्या अशा प्रकारची आहे की दोन ईश्वराखेरीज त्याचे काम चालत नाही, कारण प्रारंभिक अवस्थेत हालचालीची क्रिया अथवा गतिला योगायोग म्हटले जाऊ शकते, परंतु तद्नंतरच्या निरंतर गतीला कोणत्याही परिस्थितीत योगायोग वा संयोग म्हटले जाणे अशक्य आहे. सदर व्याख्येनुसार दुसर्या ईश्वराचा शोध घेतला पाहिजे.
    हा पेच सोडविण्याकरिता कार्यकारण सिद्धांत (Principle of Causation) प्रस्तुत करणेत आला. याचा अर्थ असा की पहिल्या हालचालीच्या क्रियेनंतर विश्वामध्ये कारण आणि कार्याची एक श्रृंखला सुरु झाली आहे. त्यानुसार एका पाठोपाठ घटना घडत चालल्या आहेत, अगदी त्याप्रमाणे जसे बालकांनी अनेक विटा रचाव्या, एखादी मधली वीट पाडावी आणि तद्नंतर सर्व विटा आपोआप कोसळू लागाव्यात. ज्या घटना घडतात, त्याचे कारण विश्वाच्या बाहेर कोठे अस्तित्वात नाही तर अनियंत्रित नियमांतर्गत त्या आधीच्या घटनांचाच तो अपरिहार्य परिणाम तसेच त्या आधीच्या घटना देखील त्यांच्या तत्पूर्वीच्या घटनांचा अपरिहार्य परिणाम होत.
    अशा प्रकारे विश्वामध्ये कारण आणि कार्य व क्रिया - प्रतिक्रियेचा एक अखंड क्रम सुरु झाला आहे येथपावेतो की ज्या स्वरुपात सृष्टीच्या इतिहासाचा प्रारंभ झाला, त्यांने भावी घटनांचीही निश्चिती करून टाकली. जेव्हा विश्वाचे प्राथमिक स्वरुप एकदा निश्चित झाले तेव्हा निसर्ग देखील एकाच मार्गावर भ्रमण करण्यास विवश होते. अर्थात विश्व ज्या दिवशी जन्मले, त्याच दिवशी त्याच्या भावी दिनाची निश्चिती झाली.
    उपरोक्त सिध्दांताला निसर्गाचा पायाभूत नियम ठरविणे सतराव्या शतकातील सर्वात मोठी घटना होती. या अनुषंगाने संपूर्ण सृष्टीला एक यंत्र सिद्ध करण्याच्या आंदोलनास सुरूवात झाली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या आंदोलनाने आपली चरम सीमा गाठली. हा काळ वैज्ञानिक इंजिनिअरांचा काळ होता. शास्त्रज्ञ, निसर्गाचे यांत्रिक मॉडेल बनवू पहात होते. त्याच समयी हेल्म होल्टज् (Helm Holtz) ने म्हटले होते, ‘‘सर्व प्राकृतिक विज्ञानांचे अंतिम ध्येय स्वतःला यांत्रिकी (चशलहरळिली) मध्ये रुपांतरित करणे आहे.’’ जेव्हा की या नियमांतर्गत विश्वातील सर्व वस्तूंच्या व्याख्या निश्चित करण्यात अद्याप वैज्ञानिकांना यश प्राप्त झाले नव्हते, तरी विश्वाची व्याख्या यांत्रिक पध्दतीने केली जाऊ शकते, यावर त्यांचा विश्वास होता. त्यांना वाटत होते की केवळ थोड्याशा प्रयत्नांची गरज आहे, तद्नंतर संपूर्ण विश्व एक चलत यंत्र सिद्ध होईल.
    मानवी जीवनाशी उपरोक्त गोष्टींचा संबंध पूर्णतः स्पष्ट होता. कार्यकारण सिद्धांत आणि विश्वाची यांत्रिक व्याख्या पाहता मानव लाचार ठरतो, मानवाची शक्ती आणि त्याच्या सामर्थ्यावर विश्वास बाळगणे कठिण होते. जर हा नियम पूर्णतः निसर्गावर आच्छादलेला असल्यास मानवी जीवन त्यापासून कसे सुरक्षित राहू शकते?
    उपरोक्त विचारसरणीने सतराव्या व अठराव्या शतकातील यांत्रिक तत्वज्ञानाला जन्म दिला. जेव्हा सजीव पेशी (Living Cell) देखील निर्जीव पदार्थाप्रमाणे केवळ रासायनिक तत्वानी बनले असल्याचा शोध लागला तेव्हा प्रश्न उद्भवला की ज्या विशिष्ट मूलतत्वानी आपले शरीर व मेंदू बनले आहे, ते या कार्यकारण सिध्दांताच्या कक्षेबाहेर असणे कसे काय शक्य आहे ?
    शेवटी असा अनुमान लावला गेला किबहुना जोरदारपणे दावा करणेत आला की जीवन देखील एक यंत्र आहे. एवढेच नव्हे तर न्यूटन, बाख (Bach) आणि माइकल एंजिलो (Michel Angelo)यांच्या मेंदू आणि छपाई मशीन मध्ये फारसा फरक नव्हता याखेरीज की त्यांच्या मेंदूची संरचना कमी जास्त प्रमाणात अधिक गुंतागुंतीची होती आणि बाह्य प्रेरणांचे पूर्णतः उत्तर देण्याचेच केवळ त्यांचे कार्य होते, असेही म्हटले गेले.
    परंतु विज्ञान अशा प्रकारच्या अत्यधिक व समतोल सिध्दांताना आज मान्यता देत नाही. सापेक्षता सिध्दांत (Theory of Relativity) सदर नियमा - (कार्यकारण नियम) स एक धोका संबोधितो. यास तो भ्रम (Illusion) ची उपमा देतो. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटास, निसर्गातील बर्याच गोष्टी विशेषकरून प्रकाश आणि गुरुत्वाकर्षण, सृष्टीच्या यांत्रिक व्याख्येचे उच्चाटन करीत असल्याचे विज्ञानाला पटले होते. काय एखादे असे यंत्र बनविणे शक्य आहे ज्याद्वारे न्यूटनचे चितन, ‘बाखची भावनिकता आणि माइकल एंजिलोच्या कल्पना शक्तीचे पुनरुज्जीवन करता यावे, या चर्चा अद्याप झडत होत्या, तरी दिव्याचा प्रकाश आणि सफरचंदाचे खाली पडणे, याची पुनरावृत्ती मशीन करू शकत नाही, यावर वैज्ञानिकांचा जलद गतीने विश्वास बसत चालला होता.
    प्राचीन विज्ञानाने संपूर्ण विश्वासानिशी घोषित केले होते की निसर्ग, केवळ एकाच मार्गाचा अवलंब करू शकते, जो प्रथम दिनापासून कार्यकारणच्या निरतंर श्रृंखले अंतर्गत अंतापर्यंत निश्चित झालेला आहे, परंतु सरतेशेवटी विश्वाचा भूतकाळ इतक्या अटळपणे त्याच्या भविष्याचे कारण नव्हे, जसे पूर्वी समजले जात होते, हे विज्ञानाला स्वतः मान्य करणे भाग पडले. आता बहुतेक वैज्ञानिकांचे नव्या माहिती आधारे, आमचे ज्ञान आम्हास एका अयांत्रिकी (Non-Mechanical Reality) सत्याकडे नेत असल्याच्या गोष्टीवर एकमत आहे.१
    विश्वाचा जन्म आणि त्याच्या गती बाबत हे दोन्ही दृष्टीकोन ज्यांचा विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच जन्म झाला होता, आजपावेतो खात्रीलायक मर्यादा गाठू शकले नाहीत. नवनवीन शोध त्यांचा पाया भक्कम करण्याऐवजी आणखी कमकुवत करीत आहेत. अशा प्रकारे विज्ञान स्वतःच उपरोक्त दृष्टिकोनाचे खंडन करीत चालले आहे. आता माणूस पुनश्च त्या उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे, जे त्यज करून त्याने आपला प्रवास सुरु केला होता. आमच्या पुढ्यात पुनश्च हा प्रश्न आहे की विश्वाला कोणी निर्माण केले आणि कोण त्याचा चालक आहे?


  3. उपास्य (माबूद) चा शोध
  4. ही होती सृष्टीकर्त्याच्या शोध विषयक समस्या. यानंतर दुसरी गोष्ट जो मनुष्य जाणू इच्छितो, ती ही की ‘माझा उपास्य कोण आहे? तो कोण आहे ज्याच्यापुढे मी माझे सर्वकाही समर्पण करावे?’
    जीवनात एक प्रकारची पोकळी, शून्यत्व असल्याची आपणास स्पष्टरित्या जाणीव होत असते. परंतु ही पोकळी वा शून्यत्व कशा प्रकारे भरून काढायचे हे आपणास माहित नाही. याच पोकळीच्या जाणीवेस मी ‘उपास्य (माबूद) चा शोध’ म्हटले आहे. सदर पोकळीची अनुभूती दोन प्रकारे होत असते.
    आपले अस्तित्व आणि बाह्य जगताचे जेव्हा आपण निरिक्षण करतो तेव्हा दोन तीव्र स्वरुपाच्या भावना आपल्या अंतर्मनातून प्रकट होतात. पहिली आभार व कृतज्ञतेची आणि दुसरी दुबळेपणा व विनम्रतेची.
    जीवनात आपण जेथे कोठेही दृष्टिक्षेप टाकतो, तेव्हा आपले जीवन कोणाच्या तरी उपकाराने आच्छादले असल्याचे स्पष्टरित्या आपणास दिसून येते. हे पाहून ते प्रदान करणार्याच्या प्रती आपल्या अंतर्मनात अथांग कृतज्ञता व आभाराची भावना ओसंडू लागते आणि आपण आपल्या सर्व अमूल्य श्रद्धा - धारणा आपल्या उपकारकर्त्याच्या प्रती व्यक्त करू इच्छितो.
    याचा शोध, आपल्याकरिता केवळ एका तत्वज्ञानाची गोष्ट नाही तर आपल्या मानसशास्त्राशी त्याचा घनिष्ट संबंध आहे. हा प्रश्न केवळ एका बाह्य समस्या निराकरणा संदर्भातला नाही तर ती आपल्या अंतर्मनाची तहान आहे. आपले पूर्ण अस्तित्व त्या प्रश्नाचे उत्तर मिळवू इच्छिते.
    जरा विचार करा, मनुष्याच्या स्व-प्रयत्नांचा कोठेही अंतर्भाव नसतानाही तो या विश्वामध्ये स्थायी घटनेच्या रुपात उपस्थित आहे, या सत्यतेकडे एक सूज्ञ व्यक्ती डोळेझांक करू शकते का? मनुष्य स्वतःला एका अशा शरीरात पहात आहे ज्याची त्याहून उत्कृष्ट शरीराची तो कल्पना देखील करू शकत नाही, जेव्हा की शरीराची निर्मिती त्याने स्वतः केली नाही. त्यास अशा चमत्कारिक बौद्धिक क्षमता दिल्या गेल्या आहेत, ज्या अन्य प्राणीमात्रांना प्राप्त नाहीत.यद्यपि त्या क्षमता प्राप्त करण्याकरिता त्याने काहीच केलेले नाही वा करू शकत नाही. आपले अस्तित्व खासगी नव्हे तर ती एक भेट वस्तू आहे. ही भेटवस्तू कोणी दिली आहे ? त्या महान उपकारकर्त्याचे आभार प्रदर्शन करता येणे शक्य व्हावे याकरिता मानवी अंतर्मन त्या प्रश्नाचे उत्तर शोधते.
    आता आपल्या शरीराबाहेर डोकावून पहा. जगात आपण या अवस्थेत जन्मतो की आपल्यापाशी स्वतःचे असे काहीच नसते, ना तर विश्वावर आपला एखादा अधिकार चालतो की ज्यायोगे आपल्या आवश्यकतेनुसार त्यास बनविणे शक्य व्हावे. आपल्या हजारो प्रकारच्या गरजा आहेत परंतु एखादी गरज सुद्धा आपणहून पूर्ण करू शकत नाही. या जगात आश्चर्यकारकरित्या आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्याची व्यवस्था केली गेली असल्याचे आपण पाहतो. असे वाटते जणू विश्व आपल्या सर्व साधनानिशी मनुष्य जन्माची प्रतिक्षा करीत असावे जेणेकरून त्याच्या सेवेत रूजू होता यावे. उदाहरणार्थ ध्वनी घ्या ध्वनीच्या माध्यमाने आपण आपले म्हणणे दुसर्यापर्यंत पोहचवतो. हे कसे शक्य झाले की आपल्या मस्तिष्कात निमार्ण होणारे विचार जिव्हेचे स्पंदन रूपाने दुसर्याच्या कानापर्यंत पोहचावेत आणि त्याने समजण्यायोग्य ध्वनी रूपात त्यास ऐकू शकावे? याकरिता आपल्या अंतर्गत व बाह्य जगतात असंख्य व्यवस्था करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक मधले माध्यम आहे ज्यास आपण हवा म्हणतो. आपण जे शब्द उच्चारतो, ते ध्वनी विशिष्ट लहरींच्या रूपात हवेवर, जसे पाण्याच्या पातळीवर लहरी उत्पन्न होत असतात व त्याचे प्रसरण होत असते, त्याप्रमाणे तरंगत असतात.
    माझ्या तोंडून निघालेला ध्वनी तुम्हापर्यंत पोहचण्याकरिता दोहोदरम्यान हवा उपस्थित असणे गरजेचे आहे. हवेचे हे माध्यम दोहोदरम्यान नसल्यास तुम्ही माझ्या ओंठाची हालचाल पहाल परंतु माझा आवाज ऐकू शकणार नाही. उदाहरणार्थ एका काचेच्या बंद कंदिलात विद्युत बेल ठेवून वाजवली गेली तर त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येईल परंतु त्या कंदिलातील हवा पूर्णतः काढून टाकल्यास व नंतर बेल वाजविल्यास काचेच्या आत घंटी वाजत असल्याचे तर तुम्ही पहाल परंतु त्याचा आवाज काहीच ऐकू येणार नाही. कारण घंटी वाजल्याने जे स्पंदन निर्माण होते, ते ग्रहण करून तुमच्या कानापर्यंत पोहचविण्याकरिता कंदिलात हवेचे अस्तित्व नाही.
    परंतु हे माध्यम देखील पुरेसे नाही कारण हवेच्या माध्यमाने तर आपला ध्वनि पाच सेकंदात केवळ एक मैलाचे अंतर कापतो. याचा अर्थ असा की हवेचे माध्यम केवळ निकटच्या वातावरणात बोलणीकरिता उपयुक्त - गुणकारी असते. ते आपला आवाज दूरपर्यंत पोहचवू शकत नाही. जर ध्वनी निव्वळ हवेच्या माध्यमाने पसरला असता तर त्यास एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहचविणे शक्य झाले नसते. याकरिता निसर्गाने आपणास एक अत्यंत द्रूतगतीचे साधन उपलब्ध करून दिले आहे. ते साधन म्हणजे प्रकाश अथवा विद्युत तरंग होय, ज्याची गती एक लाख श्याएशी हजार मैल प्रति सेकंद आहे. बिनतारी (Wireless) संदेश माध्यमात याच साधनांचा उपयोग केला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती आकाशवाणी केंद्रात लावण्यात आलेल्या माइक्रोफोन समोर आवाज करते तेव्हा माइक्रोफोन तो ध्वनी ग्रहण करून त्याचे विद्युत लहरी मध्ये रूपांतर करतो आणि तारेद्वारे तो प्रसारण यंत्र वा ट्रान्समीटरपर्यंत धाडतो. ट्रान्समीटर कंपन पावून वायूमंडलात तेच कंपन निर्माण करते. अशा प्रकारे पाच सेकंदात एक मैलाचा पल्ला गाठणारा ध्वनी, विद्युत लहरीत रूपांतरित होऊन जवळपास दोन लाख मैल प्रति सेकंदाची गती प्राप्त करतो आणि क्षणार्धात संपूर्ण जगात प्रसरण पावतो. याच बिनतारी लहरीना आपल्या रेडिओ संचातील मशीन ग्रहण करते आणि स्पष्ट आणि उच्च स्वरात तिचा पुनरुच्चार करते. मग हजारो मैल अंतरावरून बोलण्यात आलेल्या आवाजास आपण त्या क्षणीच ऐकू लागतो.
    हे त्या अगणित व्यवस्थापैकी एक होय. त्याचे वर्णन मी केलेले नाही तर केवळ नावापुरता उल्लेख केला आहे. जर त्याचे आणि अन्य बाबींचे तपशीलवार वर्णन करावयाचे झाल्यास त्याकरिता हजारो पाने कमी पडतील आणि तरीही त्याचे वर्णन संपणार नाही.
    हे उपकार आणि सुख सुविधा ज्याचा मनुष्य प्रत्येक समयी उपभोग घेत आहे, याविना भूतलावर मानवी जीवन आणि संस्कृतीची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. हे सर्व त्याच्याकरिता कोणी उपलब्ध केले आहे, हे जाणून घेण्याची मानवाची इच्छा आहे. प्रत्येक क्षणी जेव्हा तो एखाद्या उपकार वा देणगीने लाभान्वित होतो तेव्हा त्याच्या अंतर्मनात आभार व कृतज्ञतेच्या भावना निर्माण होतात आणि आपल्या उपकारकर्त्याला भेटून स्वतःला त्याच्या चरणी झोकून द्यावे असे त्याला मनापासून वाटते. उपकारकर्त्याचे उपकार मानणे, त्याला आपल्या हृदयात खोलवर स्थान देणे आणि आपल्या उदात्त व श्रेष्ठतम भावना त्याच्यासमोर समर्पित करणे, ही मानवी प्रकृतीची शुध्द व उदात्त भावना आहे. मानवी स्वभावातील ही सभ्य भावना आहे. प्रत्येक मनुष्य जो आपल्या जीवन आणि या जगतावर विचार चितन करतो, त्याच्या अंतर्मनात ही भावना तीव्रतेने उत्पन्न होते. मग काय या भावनांचे उत्तर काहीच असू नये? काय या विश्वात मनुष्य एक अनाथ बालक आहे,ज्याच्या अंतःकरणात उत्पन्न होणार्या प्रेम आणि समर्पणाच्या भावना तृप्तीकरिता एखादे अस्तित्व उपस्थित नसावे ? काय हे असे विश्व आहे, जेथे उपकार व देणग्या तर असाव्यात परंतु उपकारकर्त्याचा थांगपत्ता नसावा, जेथे भावना आहेत, परंतु भावनांच्या तृप्तीचे एखादे साधन नसावे?
    उपास्याचा शोधासंबंधीचा हा एक पैलू आहे. मानवाचे स्थान व त्यास संबंधित परिस्थितीची निकड आहे की या सृष्टीमध्ये त्याचा एखादा आधार असावा, हा दुसरा पैलू होय. डोळे उघडून पाहिले तर या जगात आपण अगदी क्षुद्र व लाचार प्राणी असल्याचे आढळेल. जरा त्या अवकाश पोकळीची कल्पना करा, ज्यामध्ये आपली ही पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करीत आहे. तुम्हास माहित आहे की पृथ्वीचा वर्तुळाकार सुमारे पंचवीस हजार मैल एवढा आहे, आणि एखाद्या उसळणार्या भोवर्यासमान तो आपल्या आसाभोवती निरंतर अशा प्रकारे भ्रमण करीत आहे की प्रत्येक चोवीस तासात त्याची एक प्रदक्षिणा पूर्ण होते. अर्थात पृथ्वीची गती जवळपास एक हजार मैल प्रति तास आहे. त्याचबरोबर ती सूर्याभोवती अठरा करोड साठ लाख मैल लांबच्या कक्षेत अत्यंत द्रूतगतीने भ्रमण करीत आहे.
    अवकाश पोकळीत इतक्या द्रूतगतीने भ्रमण करणार्या पृथ्वीवर आपले अस्तित्व टिकविण्याकरिता पृथ्वीच्या गतीला एका विशिष्ट प्रमाणबद्धतेत ठेवण्यात आले आहे. असे जर नसते तर पृथ्वीतलावर मनुष्याची अवस्था एका चालत्या चक्रावर बारीक खडी ठेवण्या समान झाली असती. त्याचबरोबर दुसरी सोय ही करण्यात आली आहे की पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आपणास धरून ठेवले आहे आणि वरून हवेचा प्रचंड दाब आहे. हवेद्वारे जो दबाव पडत आहे. तो शरीराच्या प्रतिवर्ग इंचावर पंधरा पौंड इतका आहे, अर्थात एका सर्वसाधारण मनुष्याच्या संपूर्ण शरीरावर सुमारे २८० मनाचा दबाव आहे. या चमत्कारीक व्यवस्थेने आपणास अवकाशात निरंतर भ्रमण करणार्या पृथ्वीवर प्रत्येक बाजूनी टिकवून ठेवले आहे.
    मग जरा सूर्या संबंधी विचार करा. सूर्याचा गोलाकार आठ लाख पासष्ट हजार मैल आहे, याचा अर्थ असा की तो आपल्या पृथ्वीच्या मानाने दहा लाख पटीने मोठा आहे. हा सूर्य ज्वालांचा धगधगता समुद्र आहे. त्याच्या जवळपास कोणतीही वस्तू स्थायी स्वरूपात राहू शकत नाही. पृथ्वी आणि सूर्या दरम्यान सद्य समयी सुमारे साडे नऊ करोड मैलाचे अंतर आहे. यदाकदाचित तो याच्या निम्म्या अंतरावर असता तर सूर्याच्या उष्णतेने वस्तू पाघळण्यास सुरुवात झाली असती, अथवा तो चंद्राच्या ठिकाणी म्हणजे दोन लाख चाळीस हजार मैल अंतरावर आला तर पृथ्वी पाघळून बाष्पात तिचे रूपंातर होईल. हाच तो सूर्य आहे, ज्याच्या मेहरबानीने पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. या हेतुकरिता त्यास एका विशिष्ट अंतरावर ठेवण्यात आले आहे. जर तो दूर गेला तर जमीन बर्फ बनून राहील आणि जवळ आला तर आपल्या सर्वांची राखरांगोळी होऊन जाईल.
    मग विश्वाचा विस्तार व फैलावाकडे नजर टाका. आणि त्या गुरुत्वाकर्षण शक्तीकडे पहा जिने या महान विश्वाला सांभाळून ठेवले आहे. विश्व एक अमर्याद विशाल कारखाना आहे. प्रकाशाचा वेग एक लाख श्याएशी हजार मैल प्रति सेकंद आहे. विश्वाला चोहोबाजूनी एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यात कित्येक अरब वर्षे लागतील, असा खगोल शास्त्रीय दृष्टिकोनाने विश्वाच्या विशालतेचा अनुमान आहे. ही सूर्यमाला ज्यामध्ये आपली पृथ्वीही समाविष्ट आहे, दिसण्यात प्रचंड मोठी असल्याचे वाटते परंतु संपूर्ण विश्वाच्या मानाने तिचे स्थान नगण्य आहे. विश्वामध्ये याहूनही मोठमोठाले असंख्य तारे असीम विस्तारित स्वरूपात पसरले आहेत. ज्यापैकी बरेच इतके मोठे आहेत की आपली संपूर्ण सूर्यग्रहमाला त्याच्यावर ठेवली जाऊ शकते. ज्या गुरुत्वाकर्षण शक्तीने या अगणित जगतांना सांभाळून ठेवले आहे, तिच्या महानतेची कल्पना अशा प्रकारे केली जाऊ शकते की सूर्य ज्या अभूतपूर्व शक्तीनिशी पृथ्वीला स्वतःकडे खेचत आहे आणि तिला अनंत अवकाशात पडून नष्ट होण्यापासून रोखत आहे, ती अदृश्य शक्ती इतकी प्रचंड शक्तीशाली आहे की जर या हेतुकरिता एखाद्या भौतिक वस्तूने पृथ्वीला बांधावे लागले असते तर गवत जसे जमिनीला आच्छादून टाकते तसे धातूंच्या तार्यांनी पृथ्वीचे भूतल झाकोळून गेले असते.
    आपले जीवन पूर्णतया अशा शक्तीवर निर्भर आहे ज्यावर आपले प्रभुत्व नाही. मानवी जीवनाकरिता जगामध्ये ज्या व्यवस्था व सोयी आहेत आणि ज्या नसल्याने मानवी जीवनाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही, त्या इतक्या उच्च पातळीवर होत आहेत आणि त्या अस्तित्वात आणण्याकरिता इतक्या असाधारण शक्ती हव्यात की मनुष्य स्वतः त्या अस्तित्वात आणण्याची कल्पना देखील करू शकत नाही. सृष्टिकरिता जी कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे ती निश्चित करणे तर दूर राहो, त्याचे नियंत्रण करणे देखील मनुष्याच्या आवाक्याबाहेर आहे. विश्वातील अन्यसाधारण शक्ती त्याचेशी ताळमेळ सहकार्य केल्या नाहीत तर तो जमिनीवर टिकूच शकणार नाही, मग जमिनीवर एका सुसंस्कृत जीवनाची निर्मिती तर दूरवरची गोष्ट आहे, हे तो पाहतो आहे.
    अशा एका विश्वात जेव्हा मनुष्य आपल्या तुच्छ अस्तित्वाला पाहतो तेव्हा स्वतःला तो इतका जास्त लाचार अनभवु लागतो जसे समुद्राच्या लाटामध्ये एक मुंगी स्वतःचा जीव वाचविण्याकरिता धडपडत असते. या अथांग विश्वात त्याचा आधार बनू शकणारा कोणी असावा, अनायासे तो इच्छितो. तो एका अशा अस्तित्वाचा आश्रय शोधू इच्छितो, जे विश्वाच्या शक्ती पेक्षाही उच्चतर असेल आणि ज्याच्या आश्रयाखाली आल्यानंतर तो स्वतःस सुरक्षित अनभवु शकेल.
    या दोन भावना आहेत, ज्याना मी ‘उपास्य (माबूद) चा शोध’ हे नाव दिले आहे. उपास्याचा शोध वस्तुतः एक स्वाभाविक भावना आहे, ज्याचा अर्थ एका अशा अस्तित्वाचा शोध आहे जे मानवाच्या प्रेम आणि श्रद्धेचे केंद्र बनू शकेल. आधुनिक युगात मानवाच्या या तहानेला उत्तर म्हणून राष्ट्र - लोकसमुह, देश आणि राज्याला प्रस्तुत केले गेले आहे. आपले राष्ट्र, आपला देश आणि आपल्या राज्याला तुमच्या श्रद्धा-निष्ठेच्या केंद्रस्थानाचा दर्जा द्या असे नवीन संस्कृती सांगते. तसेच त्यानाच तुमच्या आत्मीयतेचा आधार बनवा, असे म्हणते. या गोष्टींना उपास्याच्या नावाखाली प्रस्तुत केले जात नाही. परंतु व्यवहारात त्याना जे स्थान प्राप्त आहे, ते जवळजवळ तसेच आहे जसे वास्तविकपणे एका उपास्याकरिता असले पाहिजे.
    परंतु उपरोक्त गोष्टींना उपास्याचे स्थान बहाल करणे म्हणजे अगदी तसेच आहे जसे एखाद्याला जीवन साथी हवा असेल आणि त्याच्या हाती तुम्ही एक दगडशिला सोपवून टाकावी. मानवामध्ये शोधाची जी भावना डोके वर काढते, त्याची कारणे मानवी अंतःकरणात अगदी खोलवर रूजली आहेत, हे स्पष्ट आहे. तो एका अशा अस्तित्वाच्या शोधात आहे ज्याने संपूर्ण विश्व व्यापले असावे. सदर इच्छेचे उत्तर एखाद्या भौगोलिक सीमाक्षेत्रात मिळणे अशक्य आहे. राष्ट्रभक्तीच्या या गोष्टी जास्तीत जास्त एका समाज निर्मितीकरिता सहाय्यक असू शकतात परंतु मानवाच्या उपास्या संदर्भातील असणार्या त्या तहान व भावनेची त्या तृप्ती करू शकत नाहीत. त्याकरिता एका विश्वव्यापी अस्तित्वाची गरज आहे. आपल्या श्रद्धा व प्रेमभावनेचे केंद्ररूपात मानवाला एक असे अस्तित्व हवे आहे ज्याने जमीन व आकाश निर्मिले आहे. स्वतःच्या आश्रयाकरिता त्याला एका अशा शक्तीचा शोध आहे, जी कोणाची गरजू-मोताद नसावी, जी संपूर्ण सृष्टीची सत्ताधीश असावी. जोपर्यंत मनुष्याला असे एखादे अस्तित्व भेटत नाही, तोपर्यंत त्याच्यातील शून्यत्व - पोकळी वा एकांतवास यथावत शिल्लक राहील, कोणत्याही अन्य गोष्टीने ते भरून निघणार नाही.

  5. अंतिम परिणामाचा शोध
  6. सत्याच्या शोधासंदर्भात तिसरा भाग आहे आपला शेवट अथवा आपल्या अंतिम परिणामाचा शोध. आपण कोठून आलो आहे व कोठे जाणार आहोत हे जाणून घेण्याची मानवाची इच्छा आहे. आपल्या अंतःकरणात अनेक इच्छा आकांक्षा, अनेक अभिलाषा तो बाळगतो. या इच्छा आकांक्षा आणि या अनंत अभिलाषा कशा प्रकारे पूर्ण होतील, हे तो जाणू इच्छितो. या वर्तमान मर्यादित जीवनाव्यतिरिक्त एक दीर्घकालीन जीवन त्यास हवे आहे परंतु ते कोठे भेटेल याबद्दल तो अनभिज्ञ आहे. त्याच्या आतमध्ये बर्याच नैतिक भावना आणि मानवी संवेदना आहेत ज्याना या जगात वाईट प्रकारे पायदळी तुडविले जात आहे. काय आपण आपल्या पसंतीची दुनिया कधीच प्राप्त करू शकणार नाही ? असा प्रश्न त्याच्या अंतर्मनात निर्माण होतो. हे आणि अशा प्रकारचे प्रश्न मानवी अंतर्मनातून कशा प्रकारे उसळत असतात आणि विश्वाचे निरीक्षण अध्ययन कशा प्रकारे त्याच्या मनमस्तिष्कात हे प्रश्न उभे करतात, याचे या ठिकाणी थोडे तपशीलवार वर्णन करणे उचित ठरेल.
    जीवशास्त्रज्ञांच्या मतानुसार मनुष्य, आपल्या सद्य रूपात तीन लाख वर्षापासून पृथ्वीवर अस्तित्व करून आहे. याच्या तुलनेने विश्वाचे आयुष्य हे फार जास्त आहे, अर्थात दोन लाख अरब वर्षे. या आधी विश्व, विद्युत कण रूपी एका धुळीच्या धूसर लोटासमान होते, तद्नंतर त्यामध्ये हालचालीची क्रिया घडली आणि पदार्थ वाह्त जाऊन भिन्न भिन्न ठिकाणी साचण्यास सुरुवात झाली. हाच तो साठलेला पदार्थ आहे ज्यास आपण तारे, ग्रह वा नक्षत्र संबोधितो. पदार्थाचे हे अवशेष गॅसरूपी भयानक गोळ्याच्या रूपात अगणित युगानुयुगे आकाशात भ्रमण करीत राहिले. सुमारे दोन अरब वर्षापूर्वी असे घडले की विश्वामधील कोणता तरी मोठा तारा भ्रमण करीत करीत सूर्याच्या जवळ येऊन ठेपला, जो त्या समयी आजच्या पेक्षा आकाराने फार मोठा होता. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे ज्याप्रमाणे समुद्रात उंचच्या उंच लाटा निर्माण होतात, तसे त्या दुसर्या तार्याच्या आकर्षणाने आपल्या सूर्यावर एक फार मोठे वादळ निर्माण झाले, जबरदस्त लाटा निर्माण झाल्या, ज्या हळूहळू जास्त उंच होत गेल्या आणि या आधी की तो तारा सूर्यापासून दूर हटू लागावा, त्याची आकर्षण शक्ती इतकी जास्त वाढली की सूर्याच्या त्या प्रचंड गॅसरूपी लाटा पैकी काही भाग विलग होऊन एका झटक्यासरशी अवकाशात दूरवर निघून गेला. नंतरच्या काळात थंड झाल्यानंतर हेच सूर्यमालेचे सदस्य बनले. सद्य समयी हे सर्व निखळलेले भाग सूर्याभोवती परिभ्रमण करीत आहेत आणि त्यापैकीच एक आपली पृथ्वी होय.
    सुरुवातीस पृथ्वी एका ज्वालाग्रही रूपात सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत होती, तद्नंतर वातावरणात निरंतर उष्मा सोडल्याने थंड होण्यास सुरुवात झाली. ही प्रक्रिया करोडो वर्षापर्यंत चालू राहिली. सरतेशेवटी पृथ्वी अगदी थंड झाली. तरीही सूर्याची उष्णता पृथ्वीवर पडत असल्याने वाफा निर्माण होण्याची क्रिया सुरु झाली आणि ढगांच्या स्वरुपात वायू मंडलावर ती वाफ आच्छादली गेली. तद्नंतर या ढगांचा वर्षाव सुरु झाला आणि पृथ्वी पाण्याने भरून गेली. पृथ्वीच्या पृष्ठभाग तर थंड झाला होता. परंतु तिचा आतील भाग अद्यापही उष्ण - गरम होता. त्याचा असा परिणाम निघाला की पृथ्वी आकुंचन पावू लागली. परिणामस्वरुप पृथ्वीच्या तळातील उष्ण वायुरूपी द्रव्यावर दबावात वाढ झाली आणि ते बाहेर पडण्यास उतावीळ झाले. थोड्या थोड्या अवधीने जमीन दुभंगू लागली. ठिकठिकाणी भेगा पडू लागल्या. अशा प्रकारे सागरी वादळे, भयानक भूकंप आणि आगी ओकणारे स्फोट यामध्ये हजारो वर्षे निघून गेली. याच भूकंपामुळे पृथ्वीचा काही भाग वरती उसळून आला आणि काही भाग खाली दाबला गेला. दबलेल्या खालच्या भागात पाणी साचले आणि ते समुद्र बनले. वरती आलेल्या पृष्ठ भागानी द्वीप आणि महाद्वीपांचे रूप धारण केले. कोठे कोठे तर हे उंचवटे इतके वरती आले की जणू उंचच्या उंच लाटा निर्माण झाल्या असाव्यात. जगातील ही पहिली पर्वते होत.
    भूगर्भशास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनानुसार एक अरब तेवीस करोड वर्षापूर्वी प्रथमतः पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पत्ती झाली. लहान सहान जंतूंच्या रूपात पाण्याच्या किनार्यावर यांचा जन्म झाला. तद्नंतर भिन्न भिन्न प्रकारचे जीवजंतू जन्मत राहिले व नष्ट होत गेले. कित्येक हजार वर्षापर्यंत जमिनीवर केवळ पशू प्राणी यांचे अस्तित्व राहिले. त्यानंतर समुद्री रोप आढळू लागले आणि जमिनीवरही गवत पसरण्यास सुरुवात झाली. अशा प्रकारे दीर्घ कालावधीपर्यंत असंख्य घटना घडत राहिल्या येथपर्यंत की मानवी जीवनाकरिता अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आणि भूतलावर मनुष्याचा जन्म झाला.१
    उपरोक्त विचारसरणीनुसार मानवी जीवनाचा आरंभ गेल्या तीन लाख वर्षापूर्वी झाला आहे. हा अवधि अत्यंत कमी आहे. वेळ कालावधीचा जो दीर्घ पल्ला सृष्टीने गाठला आहे, ते पाहता मानवाचा इतिहास डोळ्याच्या पापण्या लवविण्यापेक्षाही जास्त लांबचा नाही. मग व्यक्तिशः एका मानवाकडे पाहिल्यास एका मनुष्याच्या आयुष्याची सरासरी शंभर वर्षापेक्षाही जास्त नसल्याचे दिसून येईल. एकीकडे हा प्रसंग डोळ्यासमोर ठेवा आणि मग या विश्वामध्ये मानवापेक्षा श्रेष्ठतर अशा एखाद्या अस्तित्वाचा शोध लागू शकलेला नाही, ही सत्यता पहा.
    पृथ्वी आणि आकाशाच्या कित्येक अरब खरब वर्षांच्या कालानंतर जी उत्कृष्ट निर्मिती अस्तित्वात आली आहे, ती म्हणजे मानव होय. परंतु हे चमत्कारिक अस्तित्व मानव ज्याचे जगात सर्वोच्च स्थान आहे, जो जगातील सर्व विद्यमान वस्तूंपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे, त्याचे आयुष्य हे मोजक्या वर्षाचेच आहे. ज्यांचे अस्तित्व जड पदार्थानी बनले आहे, त्यांचे आयुष्य कित्येक करोडो वर्षांचे असावे आणि आपल्या मृत्यूनंतरही ते शिल्लक रहावेत, परंतु या आधि - भौतिक जड पदार्थांच्या संयोगाने ज्या श्रेष्ठ अस्तित्वाची निर्मिती होते, तिचे आयुष्य केवळ शंभर वर्षे असावे. सृष्टीचा जो सार, परिणाम आहे, सृष्टीपेक्षाही त्याचे वय कमी आहे. विश्वाच्या दीर्घकालीन इतिहासात असंख्य घटना, क्रिया - प्रतिक्रिया काय एवढ्याकरिताच घडल्या होत्या की एका मानवाला काही दिवसाकरिता जन्म देऊन नष्ट करून टाकले जावे?
    पृथ्वीवर आजमितीस जेवढी माणसे आढळतात, त्यापैकी प्रत्येक माणूस सहा फूट उंच, अडीच फूट रूंद आणि एक फूट जाड धरला तर या संपूर्ण जनसंख्येला एका अशा पेटीत जी लांबी रूंदी व जाडीने एक मैल असल्यास, सहजरित्या बंद केले जाऊ शकते. हे सगळे अजब वाटते परंतु हेच सत्य आहे. मग या पेटीला एका समुद्र किनारी नेऊन सावकाशरित्या ढकलून दिल्यास ती पेटी पाण्यात खोलवर जाऊन पडेल. शतके लोटतील. मानववंश आपल्या कफनात निरंतरपणे पडून राहील. मानव या नावाच्या एखाद्या वंशाची येथे वस्ती होती, हे कोणासही माहित पडणार नाही. समुद्रसपाटीवर अशाच प्रकारे नित्यनेमाने वादळांचे आगमन होत राहील, सूर्य अशाच प्रकारे चकाकत राहील, पृथ्वी आपल्या आसाभोवती नित्याप्रमाणे परिभ्रमण करीत राहील, सृष्टीच्या अमर्याद फैलावातील अगणित जग या इतक्या मोठ्या अपघाताला एका सामान्य घटनेपेक्षा जास्त महत्व देणार नाहीत. कित्येक शतकानंतर एक उंच मातीचा ढिगारा शांतपणे साक्ष देत उभा असेल की हे मानवजातीचे थडगे आहे, ज्यात शतकानुशतकापूर्वी एका लहानश्या पेटीत तिला दफन केले गेले होते.
    काय मानवाचे केवळ इतकेच मूल्य आहे, इतकेच त्याचे महत्व आहे? पदार्थाला कांडप करा, दळा वा जाळा, काहीही करा ते नष्ट होत नाही. प्रत्येक स्थितीत ते आपले अस्तित्व कायम राखते (मग ते धातू रूपात असो, द्रव रूपात असो वा वायू रूपात) परंतु मनुष्य जो पदार्थापेक्षा श्रेष्ठतर प्राणी आहे. काय त्याच्याकरिता अमरत्व नसावे ? हे जीवन जे संपूर्ण विश्वाचे सार आहे, काय इतके अवास्तव व मिथ्या आहे की इतक्या सहजतेने त्यास संपुष्टात आणले जाऊ शकते? मानवाने एका भूभागावर मोजक्या दिवसाकरिता जन्म घ्यावा आणि नंतर नष्ट होऊन जावे, काय मानवी जीवनाची हीच सर्वथा कहाणी आहे ? संपूर्ण मानवी ज्ञान, त्याने संपादन केलेले सर्व यश, त्याच्याबरोबर कायमचे नष्ट व्हावे आणि जग त्याच्या मागे अशा प्रकारे शिल्लक रहावे जणू मानवाचे, त्याचे निकट काहीच स्थान नव्हते?
    या अनुषंगाने दुसरी गोष्ट आम्हास ही जाणवते की जीवन हे केवळ वर्तमान जगापुरतेच मर्यादित आहे तर हे असे जीवन आहे ज्याद्वारे आपल्या आशा आकांक्षाची पूर्ती होऊ शकत नाही. मनुष्याची निरंतर जगण्याची इच्छा असते, मृत्यू कोणासही पसंत नाही परंतु जगात जन्मणार्या प्रत्येकाला माहीत आहे की तो अमर नाही. मनुष्य आनंद प्राप्त करू इच्छितो. दुःख यातना आणि हर प्रकारच्या त्रासाविना जीवन व्यतीत करण्याची प्रत्येक मानवाची इच्छा असते. परंतु खर्या अर्थाने काय असले जीवन कोणताही मनुष्य प्राप्त करू शकतो?
    प्रत्येक मनुष्याची इच्छा असते की त्याला त्याच्या आकांक्षापूर्तीकरिता शेवटच्या क्षणापर्यंत संधी मिळावी, आपल्या सर्व इच्छा साकार झाल्याचे तो पाहू इच्छितो परंतु या मर्यादित जगात त्याला असे करणे शक्य नाही. आपण जे काही इच्छितो, त्याकरिता हे जग अगदी अपुरे व अयोग्य वाटते. प्रत्येक पावलावर ते आपल्या मार्गात अडथळा उभा करत असते. एका ठराविक हद्दीपर्यंत जग आपला साथ देते, तद्नंतर आपणास निराश व अपयशी परतावे लागते.
    प्रश्न उद्भवतो, मानवी जीवन केवळ मार्गभ्रष्ट होऊन एका अशा जगात भरकटत आले आहे की काय जे त्याच्याकरिता बनविले गेले नव्हते आणि त्याच्या जीवन, समस्या व हिताशी ते परिचीत नसावे? काय आपल्या इच्छा, आशा - आकांक्षा, भावभावना, अनुभूती, आपले विचार अवास्तव व मिथ्या - खोट्या आहेत - ज्यांचा या जगाशी काहीच संबंध नाही?
    काय आपल्या मनातील सर्व उच्च कोटीचे विचार, कल्पना, विश्वाच्या मार्गापासून विमुख झाल्या आहेत आणि आपल्या मनमस्तिष्कात विनाकारण निर्माण होत आहेत? त्या सर्व जाणिवा, अनुभूती ज्यासह मानवजात गेल्या हजारो वर्षापासून जन्मत आहे व त्या आपल्या उराशी बाळगून प्राप्त न करताच दफन होत आहे, काय त्या अनुभूतींचे कोणतेच लक्ष्य नाही? मानवाच्या अंतःकरणात काय उगाच त्या निर्माण होत असतात, ज्यांचा ना तर भूतकाळात आधार आहे ना तर भविष्यात त्यांचे एखादे मूल्य?
    संपूर्ण विश्वात केवळ मानव हेच एक असे अस्तित्व आहे जे उद्या (Tomorrow) ची कल्पना करते. हे केवळ मानवाचेच वैशिष्टय आहे जो भविष्याबाबतीत विचार करतो, आणि आपले भविष्य उज्जवल बनवू इच्छितो. काही कीटक प्राणी जसे मुंग्या आपल्या भोजनाची साठवणूक करतात किवा बाया -एक पक्षी घरटे बनवितो, यात शंका नाही परंतु त्यांचे हे कार्य अविवेकी स्वरूपात केवळ नैसर्गिक स्वभावानुसार घडते. उद्याकरिता भोजन साठविले पाहिजे, तसेच हवामानापासून बचावाकरिता घरटे बनविले पाहिजे याचा निर्णय त्यांची बुद्धी घेत नाही. मानव आणि अन्य प्राण्या दरम्यान या फरकामुळे स्पष्ट होते की मानवाला इतरांपेक्षा जास्त संधी मिळाली पाहिजे. जनावराकरिता वर्तमान जीवनच जीवन आहे, जीवनाचा भविष्य ते बाळगत नाहीत. मग काय अशाच प्रकारे मानवाच्या जीवनाचेही भविष्य नाही? असे होणे हे प्रकृति विरुद्ध असेल. माणसामध्ये येणार्या उद्याच्या दिवसाची जी कल्पना आढळते, त्याची निकड ही आहे की जीवन त्यापेक्षा बरेच मोठे असावे जितके त्यास आज प्राप्त आहे. मानवास उद्याचा दिवस हवा आहे परंतु त्यास केवळ ‘आज’ देण्यात आला आहे.
    त्याचप्रमाणे जेव्हा आपण सामाजिक जीवनाकडे पाहतो तेव्हा आपणास प्रचंड विरोधाभास दिसून येतो. एकीकडे भौतिक जग आहे, जे आपल्या ठायी अगदी परिपूर्ण दृष्टीस पडते. ते एका निश्चित कायदा बंधनात जखडले आहे. आणि त्याची प्रत्येक गोष्ट आपल्या निर्णायक मार्गाकडे वाटचाल करीत चालली आहे. दुसर्या शब्दात सांगायचे झाल्यास भौतिक जग अशा स्वरुपात आढळते, जसे ते असले पाहिजे, परंतु मानवी जीवनाची स्थिती जशी ती असावयास होती, त्याहून विपरित आहे.
    उघड्या डोळ्यांनी आपण पाहतो की एक मनुष्य दुसर्या मनुष्यावर अन्याय करतो आणि दोघेही अशा अवस्थेत मृत्यू पावतात की एक जुलमी असतो व दुसरा अत्याचारपिडीत. मग काय अत्याचारीला त्याच्या अत्याचाराबद्दल शिक्षा आणि अत्याचारपिडीतास त्याच्या सहिष्णुतेची भरपाई मिळाल्याखेरीज दोघांच्या जीवनाला पूर्ण म्हटले जाऊ शकेल?
    एखादा मनुष्य खरे बोलतो, लोकांचे जे हक्क अधिकार आहेत, ते अदा करतो, त्याच्या परिणामस्वरूप त्याचे जीवन संकटाने वेढले जाते. दुसरा मनुष्य खोटेपणा व दगाबाजीने आपले काम निभावतो, ज्याचे काही हडप करता येते, ते हडप करतो. यामुळे त्याचे जीवन अगदी ऐषआरामात व्यतित होते. जर जग अशाच अवस्थेत संपले तर दोन्ही प्रकारच्या मनुष्याबाबत कोणता निर्णय व्हावा. यावर कोणता उपाय आहे? एक लोकसमूह दुसर्या लोकसमुहावर दरोडा घालतो, त्याच्या साधन सामग्रीवर कब्जा करतो; तरीही जगामध्ये त्याचे नाव लौकिक असते. कारण त्याच्यापाशी प्रचार प्रसारमाध्यमाची सर्व साधने आहेत. आणि या अत्याचारात भरडलेल्या लोकसमुहाच्या स्थितीशी जग अनभिज्ञ राहते. कारण त्याची ही आर्त हाक - विलाप जगापर्यंत पोहचण्याकरिता त्याचेपाशी कोणतेही साधन नाही. मग काय दोहोंचे वास्तविक रूप कधीच प्रकट होणार नाही? दोन व्यक्ती आणि दोन लोकसमुह वा जाती मध्ये एखाद्या बाबतीत मतभेद निर्माण होते आणि जबरदस्त संघर्ष होण्याची पाळी येते. दोघेही आपलीच बाजू खरी असल्याचा दावा करीत असतात आणि परस्परांना तुच्छ सिद्ध करू लागतात. परंतु जगात त्यांचा न्यायनिवाडा होत नाही. मग काय असे एखादे न्यायालय नाही जे त्यांच्या दरम्यान न्यायोचित निवाडा करू शकेल?
    वर्तमान युगाला अणु युग, परमाणु युग म्हटले जाते, परंतु त्यास स्वैराचाराचे युग संबोधिणे अधिक उचित ठरेल. आजचा मानव केवळ आपल्या स्वैराचारी मार्गाने चालू इच्छितो मग त्याच्या इच्छा व त्याचे मत कितीही चुकीचे का असेना. प्रत्येक मनुष्य भरकटलेला आहे, भ्रष्ट आहे. याउपर प्रत्येकजण मीच योग्य मार्गावर असल्याचे पूर्ण कुव्वतीनिशी सिद्ध करीत आहे. वर्तमानपत्रात नेतेमंडळी व शासनकर्त्यांच्या भाषणबाजीकडे पहा. जो तो अत्यंत निर्भयतेने, निर्लज्जपणे आपल्या अत्याचाराला, न्याय सिद्ध करीत असल्याचे आणि चुकीच्या कार्य पद्धतीला उचित सिद्ध करीत असल्याचे दिसून येईल. काय हा पडद्याआडचा सावळा गोंधळ कधीच उजेडात येणार नाही?
    हे जग याकरिता अपुरे असल्याचे वरील गोष्टीवरून स्पष्ट होते. त्याच्या परिपूर्णतेकरिता एक असे जग हवे आहे जेथे, ज्याचे त्याला उचित स्थान मिळू शकेल. भौतिक जड जगात आपण पाहतो की जेथे कोठे शून्यत्व वा पोकळी आढळते तेथे ते भरून काढण्याचा उपाय सापडतो. या जगात कोठेही एखादी उणीव दृष्टीस पडत नाही जेव्हा की माणसाच्या जीवनात प्रचंड शून्यत्व - पोकळी आढळते. ज्या निसर्गाने भौतिक जगाचा पूर्णतया विकास केला, त्याच्याकडे मानवी जीवनाची पोकळी भरून काढण्याचे एखादे साधन नाही का ?
    आपली जाणीव वा अनुभूती काही कर्मांना सत्कृत्य व काही कर्माना दृष्कृत्य समजते. काही गोष्टी घडाव्यात वा काही गोष्टी घडू नयेत असे आपणास वाटते. तरीही आपल्या या उच्च व उदात्त भावनांची गळचेपी होते आहे आणि जगात तेच सर्वकाही घडते आहे ज्यास मानवाचा मूळ स्वभाव वाईट समजत असतो. मानवामध्ये उदात्त भावना समाविष्ट असण्याचा अर्थ हा आहे की जग सत्यावर प्रस्थापित झाले आहे. याठिकाणी अन्याया ऐवजी न्यायाची प्रस्थापना झाली पाहिजे. मग काय पूर्ण न्याय मिळणार नाही वा सत्य प्रकट होणार नाही? भौतिक जगात जी गोष्ट पूर्ण होते आहे, काय ती मानवी जगात पूर्ण होणार नाही?
    हेच ते प्रश्न आहेत ज्यांना, मी वर ‘मानवतेच्या अंतिम परिणामाचा शोध’ म्हटले आहे. एक विवेकी मनुष्य जेव्हा या परिस्थितीला सामोरे जातो तेव्हा अत्यवस्थ होतो. जीवन सर्वस्वी हेच आहे, जिचे स्व चक्षूनी दर्शन घेत आहोत तर ते किती व्यर्थ व निरर्थक आहे, याची तीव्रतेने त्याला जाणीव होते. एकीकडे तो पाहतो की मानवी जीवनाकरिता इतक्या साधन सामग्री उपलब्ध आहेत, जणू सर्वकाही केवळ त्याच्याचकरिता असावे. दुसरीकडे मानवी जीवन इतके मर्यादित व अपयशी आहे की कोणत्या हेतुकरिता त्याचा जन्म झाला आहे हेच त्याला कळत नाही.
    उपरोक्त प्रश्नासंदर्भात अशा प्रकारच्या उपद्व्यापात गुरफटणे व्यर्थ व निरर्थक आहे, या सर्व प्रश्नांचे स्वरूप तात्विक आहे. जीवनाचा जो क्षणही तुम्हास प्राप्त आहे तो आनंदमय करण्याचा प्रयत्न करा, भविष्यात काय होईल अथवा जे काही घडत आहे, ते चुकीचे की बरोबर या भानगडीत पडण्याची आवश्यकता नाही, अशी सर्वसाधारण आज लोकांची विचार प्रवृत्ती आहे.
    याच्या उत्तरादाखल कमीत कमी शब्दात जे सांगितले जाऊ शकते ते हे की जे लोक अशा प्रकारच्या विचारांचे पुरस्कर्ते आहेत, त्यानी अद्याप मानवतेच्या स्थानाला काडीमात्र ओळखले नाही. अवास्तव ऐहिकवादालाच ते सत्य मानतात. अनंत जीवनाचे रहस्य जाणून घेण्यासाठी घटना त्याना आमंत्रित करीत आहेत परंतु क्षणभंगुर जीवनावरच ते संतुष्ट होऊन बसले आहेत. आपल्या इच्छा आकांक्षा, अभिलाषा पूर्तीकरिता एका मोठ्या जगताचा शोध घ्यावा ही मानवी स्वभाव मानसिकतेची निकड आहे. परंतु हे अडाणी, मूर्ख, प्रकाशाऐवजी त्याच्या सावलीवर संतुष्ट आहेत. वर्तमान जग तुमच्याकरिता अपुरे आहे, दुसर्या परिपूर्ण जगताचा शोध घ्या, अशी विश्वाची हाक आहे. परंतु या अपूर्ण विद्यमान जगातच आम्ही आपली जीवनरूपी इमारत उभी करु, आम्हाला परिपूर्ण जगाची आवश्यकता नाही, असा आम्ही निर्णय घेतला आहे. जीवनाचा एक शेवट असला पाहिजे, या गोष्टीकडे परिस्थिती स्पष्ट संकेत करीत आहे परंतु या लोकांनी केवळ आरंभाशी हातमिळवणी केली आहे. आणि अंतापासून डोळे मिटून घेतले आहेत. शहामृगाबाबतचा कथित मूर्खतेचाच हा प्रकार होय.
    खरोखरच जीवनाचा एखादा शेवट आहे तर तो आल्याशिवाय राहणार नाही आणि कोणी त्यापासून अनभिज्ञ असणे हे त्यास प्रतिबंध करण्याचे कारण बनू शकणार नाही. होय, मात्र अनभिज्ञ असणार्याकरिता ते अपयशाचा निर्णय अवश्य बनू शकते. सत्य हे आहे की विद्यमान जीवनाला संपूर्ण जीवन मानणे आणि केवळ वर्तमानालाच आनंदयुक्त बनविण्याच्या प्रयत्नांना आपले उद्दिष्ट समजणे भ्याडपणाची व मूर्खतेची गोष्ट आहे. मनुष्याने आपले जीवन आणि विश्वावर थोडासा जरी विचार केला तर उपरोक्त दृष्टिकोनातील निरर्थकपणा लगेच समोर येतो. सत्यापासून डोळे बंद करणारा आणि एक अविचारी जीवन जगणाराच चुकीचा निर्णय घेऊ शकतो.
    हे ते प्रश्न आहेत, जे विश्वाला पाहताक्षणीच आपल्या मनमस्तिष्कात गांभीर्याने निर्माण होतात. या सृष्टीचा एक सृष्टिकर्ता व निर्माता असला पाहिजे परंतु आपणाला त्याच्या बाबतीत काहीच माहिती नाही. सृष्टिला गती देणारा व सांभाळणारा असला पाहिजे परंतु आपणास ठाऊक नाही की तो कोण आहे. आपण ज्या कोणाच्या उपकाराने उफत झालो आहोत, कृतज्ञता व आभाराची साक्षात प्रतिमा बनून त्या अस्तित्वाचा शोध घेऊ इच्छितो जेणेकरून त्याच्यासमोर आपल्या श्रद्धा, भावना प्रकट करू शकावे. परंतु असले एखादे अस्तित्व आपल्या नजरेस पडत नाही. या विश्वात आपण अगदी लाचार व विवश आहोत. असले आश्रयस्थान जेथे पोहचून आपण स्वतःला सुरक्षित अनुभवू शकू आपणास हवे आहे. परंतु असले आश्रयस्थान आपल्या डोळ्या - समोर नाही. मग जेव्हा आपण आपले जीवन व आपल्या आयुष्यावर नजर टाकतो तेव्हा विश्वाचे आयुष्य खरबो वर्षे असावे आणि मानव, जो या सृष्टिचा सार आहे, त्याचे आयुष्य मात्र मोजकी वर्षे ! हा विश्वाचा विरोधाभास आपल्या डोक्यात शिरत नाही. निसर्गाने आपणास असंख्य इच्छा, आशा - आकांक्षा, अभिलाषांनी भरून टाकावे परंतु जगात त्याच्या तृप्तीच्या साधनांची व्यवस्था करू नये, हे कसे शक्य आहे?
    यानंतर सर्वाधिक मोठा विरोधाभास तो आहे, जो भौतिक जग आणि मानवी जगात आढळतो. भौतिक जग अत्यंत परिपूर्ण आहे. त्यामध्ये कोठे एखादे शून्यत्व, पोकळी किवा उणीव दृष्टीस पडत नाही परंतु मानवी जीवनात प्रचंडरित्या शून्यत्व - पोकळी आढळते. सर्वश्रेष्ठ समजल्या जाणार्या या प्राण्याची अवस्था अखिल प्राणी जगतात दयनीय असल्याचे दृष्टिस पडते. पेट्रोलच्या एखाद्या नव्या खाणीचा शोध लागला किवा शेळ्या मेंढ्याची पैदास वाढली तर यावर आपल्या आनंदाला पारावार उरत नाही. परंतु मानवी वंश वृद्धी आपल्यास खटकते, आपल्याला भेडसावण्यार्या समस्यांनी आपण इतके त्रस्त झालो आहोत की मानवाच्या जन्मावरच बंदी घालू इच्छितो, ही आपल्या दुर्भाग्याची चरमसीमा नव्हे तर आणखी काय?

मानवाची असमर्थता
हे प्रश्न आपणाला चोहोबाजूनी वेढले आहेत. आतून ही आपणास ते पोखरत आहेत आणि बाहेरूनही ग्रासून टाकले आहे. परंतु त्यांची उत्तरे आपणाकडे नाहीत. जीवनाचे सत्य माहिती करून घेण्यासंबंधीचा हा प्रश्न आहे परंतु जीवन तर आपणास मिळाले पण त्याची वास्तविकता आपणास सांगितली गेली नाही, ही अगदी अजब गोष्ट आहे.
या सत्याच्या शोधार्थ जेव्हा आपण आपली बुद्धी आणि आपल्या अनुभवाकडे रूजु होतो तेव्हा त्याचे बिनचूक व स्पष्ट उत्तर मिळविणे, हे आपल्या बुद्धी व अनुभवापलिकडचे असल्याचे उघड होते. या अनुषंगाने आजपावतो आपण जे मतप्रवाह स्थापित केले आहेत, त्यांचे एका अटकळी पेक्षा जास्त महत्व नाही. ज्याप्रमाणे आपली दृष्टी कक्षा सीमित आहे आणि आपण एका विशिष्ट आकारापेक्षा लहान वस्तूना पाहू शकत नाही, त्याचप्रमाणे विश्वाबाबत आपले ज्ञानही एका मर्यादित कक्षेपर्यंत आहे. त्याच्या मागील व पुढील गोष्टींशी आपण अनभिज्ञ आहोत. आपले ज्ञान अपूर्ण आहे. आपल्या पाहणे, ऐकणे, वास घेणे, चव घेणे व स्पर्श करणेच्या शक्ती अत्यंत सीमित आहेत. आपली संवेदनशक्ती एका ठराविक मर्यादेपर्यंत आपला साथ देते. आपण वास्तव पाहू शकत नाही. मैदा आणि काळ्या रंगाच्या पावडरचे मिश्रण केल्यास राखट रंगासारखी पावडर बनते परंतु त्या पावडर मधला एक सूक्ष्म कीटक ज्याचा आकार त्या पावडरच्या बारीक कणा एवढाच असतो आणि ज्यास सूक्ष्मदर्शक यंत्रानेच पाहता येणे शक्य आहे, तो मिश्रणास काळ्या रंगाची व पांढर्या रंगाची पर्वते समजू लागतो. त्याच्या दृष्टीच्या मूल्यमापनानुसार राखट रंगी - मिश्रित पावडरचे अस्तित्वच नाही.
मानवजातीचे जीवन त्यावेळेच्या तुलनेत जेव्हा की पृथ्वी अस्तित्वात आली, इतके सूक्ष्म व संक्षिप्त आहे की त्याची गणना करता येणार नाही. तसेच स्वतः पृथ्वी देखील विश्वरूपी या अथांग सागरात एका बारीक कणासमानही नाही. अशा परिस्थितीत विश्वाच्या वास्तवतेबाबत माणूस, जो विचार वा जी कल्पना करतो, त्यास अंधारात चाचपडण्यापेक्षा जास्त काही म्हटले जाऊ शकत नाही. सृष्टीच्या विस्ताराबाबत कल्पनाविलास करण्याचा प्रयत्न करताक्षणीच आपला परम अडाणीपणा उघडकीस येतो.
हे चित्र जर डोळ्यासमोर ठेवले की सूर्य एशी अरब वर्षापासून अस्तित्वात आहे, पृथ्वीचे वय दोन अरब वर्षे आहे आणि भूतलावर जीवसृष्टीची लक्षणे प्रकट होण्याला तीन करोड वर्षांचा कालावधि लोटला आहे. परंतु त्याच्या तुलनेत पृथ्वीवर विवेकसंपन्न मनुष्याचा इतिहास हा पंधरा वीस हजार वर्षाहून अधिक नाही, तेव्हा काही हजार वर्षातच मानवाने तत्संबधी आपली माहिती गोळा केली असल्याचे सत्य उघडकीस येते. त्याचबरोबर ती माहिती त्या दीर्घ कालावधीचा, जी वस्तुतः सृष्टीचे रहस्य उलगडण्याकरिता हवी आहे, एक अत्यल्प अंशच असल्याचे सत्य समोर येते.
सृष्टीच्या अत्यंत दीर्घ भूतकाळ आणि अनंत रहस्यमय भविष्या दरम्यान मानवी जीवन निव्वळ एका क्षणाचे स्थान बाळगते. आपले अस्तित्व अत्यंत क्षुद्र व मध्यम स्वरुपाचे आहे, ज्याच्या मागचे व पुढचे आपणास ज्ञात नाही. या सृष्टीची विशालता अमर्याद आहे आणि ती समजून घेण्यात आपली बुद्धी व आपला अनुभव हे फार तोकडे आहे, या गोष्टीचा आपल्या बुद्धीला नाइलाजास्तव स्वीकार करावा लागतो. आपणास प्राप्त सीमित क्षमताद्वारे कधीही त्यास आपण समजू शकत नाही. आजपर्यंतच्या प्रयत्नांना आलेले अपयश हे सिध्द करण्यास पुरेसे आहे.
अशा प्रकारे आपले माहितीरूपी ज्ञान व आपले अध्ययन आपणास एका अशा ठिकाणी आणून सोडते जेथे आपल्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित होतात. असले प्रश्न, निश्चितरित्या ज्यांचे उत्तर हवे आहे, ज्या विना मानवी जीवन अगदी व्यर्थ व निरर्थक वाटते. परंतु जेव्हा कधी आपण त्याबाबतीत विचार चितन करू लागतो तेव्हा आपल्या बुद्धी मार्फत त्यांचे उत्तर प्राप्त करू शकत नसल्याचे आपल्या निदर्शनात येते. आपणास ती दृष्टीच प्राप्त नाही ज्याद्वारे सत्याचे दर्शन करणे शक्य व्हावे. त्याचबरोबर तो मेंदू - मस्तिष्क ही आम्हास प्राप्त नाही ज्याद्वारे प्रत्यक्षात सत्य जाणू शकावे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget