इरसाल अब के हक़ ने किया ऐसा एक रसूल
जिसने सरों के साथ दिलों को झुका दिया
गात ज्ञान हस्तगत करण्याची जी साधने आहेत त्यापेक्षा एक अधिकचे साधन प्रेषितांकडे असते. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याकडेही ते साधन होते, ज्याचे नाव वही (वह्य /वहीह) असे आहे. ही वही म्हणजे ईश्वराचा संदेश होता. हा संदेश जिब्राईल अलै. या फरिश्त्या (ईशदूत) च्या मार्फतीने प्रेषित सल्ल. यांच्यापर्यंत पोहोचत होता. याच माध्यमातून संपूर्ण कुरआन अवतरित झाला. अल्लाह आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यातील या संपर्क व्यवस्थेबद्दल मराठी वाचकांसाठी फारसी माहिती उपलब्ध नाही. या विशेषांकाच्या माध्यमातून ती पुरवावी यासाठीचा हा लेखन प्रपंच.
पहिली वही येण्यापूर्वीची स्थिती
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा जन्म 22 एप्रिल 570 रोजी झाला. त्यांच्या जन्माची असामान्य घटना जगाच्या उद्धारासाठी ईश्वरीय योजने (मिशन)चा एक भाग होती. वयाच्या 40 व्या वर्षी सर्वप्रथम त्यांच्यावर वही नाजील (अवतरित) झाली. परंतु तिच्या अवतरणाची पूर्वची तयारी म्हणून ईश्वराने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची 40 वर्षापर्यंत विशेष काळजी घेतली होती.
त्यावेळी मक्का शहरामध्ये सर्वत्र मूर्तीपूजा प्रचलित होती. चोहिकडे अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, भ्रष्टाचार, अनैतिकता आणि विश्वासघातकीपणाचे वातावरण पसरलेले होते. अशा दुषित वातावरणामध्ये सुद्धा मुहम्मद सल्ल. यांच्या व्यक्तीमत्वामध्ये वाईट गोष्टींचा लवलेशही नव्हता, ही त्यांच्यावर ईश्वराची विशेष कृपा होती. त्यांना मूर्तीपूजेमध्ये काडीचे आकर्षण नव्हते, ते अनैतिक नव्हते, ते भ्रष्ट नव्हते, उलट मक्कामध्ये सर्वात जास्त नितीमत्तेचे धनी होते. ते एवढे विश्वासू होते की, मक्कावासीय त्यांना सादिक (खरा) आणि अमीन (अमानतदार) म्हणून ओळखत. म्नका शहरातील लोकांना शेती येत नव्हती ते व्यापारी वृत्तीच होते. व्यापारासाठी त्यांना वारंवार लांबच्या प्रवासात जाण्याचा योग येई, तेव्हा ते आपल्या मौल्यवान वस्तू अमानत म्हणून मुहम्मद सल्ल. यांच्याकडे ठेवत. प्रेषितत्व मिळण्यापूर्वी सुद्धा त्यांची विश्वासर्हता मक्का शहरामध्ये सर्वात जास्त होती. जेव्हा ते अमानती ठेऊन जात तेव्हा मुहम्मद सल्ल. त्या जसच्या तशा जतन करून ठेवत व परत आल्यावर ज्यांच्या त्यांना परत करत. त्यात काडीचा बदल होत नसे.
मक्का शहरामध्ये चोहीबाजूने वाईट गोष्टींचे थैमान चालत असतांना सुद्धा मुहम्मद सल्ल. यांना कधीच त्याचे आकर्षण वाटले नाही. बालपणी फक्त दोन वेळेस त्यांना ’किस्सा गो’ (मनाने गोष्टी रंगऊन सांगणाऱ्यां) चे किस्से ऐकण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी आपल्या सोबत शेळ्या चारणाऱ्या मुलाकडे आपल्या शेळ्या ठेऊन, ’किस्से’ ऐकण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला होता पण दोन्ही वेळा त्यांना झोप लागली व जाता आले नाही. ही ईश्वरीय व्यवस्था होती. याबद्दल मुहम्मद सल्ल. वाईट गोष्टी, रूढी आणि परंपरा यांची त्यांना प्रचंड चीढ होती. पण त्या वाईट परंपरा मोडून नवीन चांगल्या परंपरा कशा निर्माण कराव्यात या संबंधी त्यांना काहीच माहित नव्हते. चांगले म्हणजे नेमके काय? हे माहित नव्हते. हलाल काय? हराम काय? या संबंधी सुद्धा त्यांच्या मनामध्ये संभ्रम होता. म्हणून आपसुकच त्यांच्या मनामध्ये यासंबंधीचे चिंतन सुरू झाले. त्यांना तनहाई (एकटेपणा) आवडू लागला म्हणून ते ’सत्तू’ (विशिष्ट प्रकारचे भाजलेले पीठ) आणि पिण्याचे पाणी घेऊन मक्कापासून दोन मैलावर उंच पहाडावर असलेल्या एका गुहेमध्ये जाऊन जिचे नाव,’ गारे हिरा’ होते तिथे एकटे बसू लागले. चांगल्या गोष्टीबद्दल चिंतन करू लागले. वयाच्या 37 व्या वर्षी त्यांच्या व्यक्तीमत्वात झालेले हे बदल सुद्धा ईश्वरीय योजनेचाच एक भाग होता. त्यांच्या मार्फतीने ईश्वराला जगाची दिशा बदलावयाची होती. वाईट मार्गावरून जगाला चांगल्या मार्गावर आणावयाचे होते. म्हणून मुहम्मद सल्ल. यांना असे एकटे पाडण्यात आले. मक्काच्या धकाधकीच्या दिनचर्येपासून लांब जावून गारे हिराच्या कुशीत एकट्याने शांत बसण्याची आवड त्यांच्यात निर्माण करण्यात आली.
वहीच्या प्रत्यक्ष अवतरणाचा सिलसिला
वयाची 40 वर्षे पूर्ण होताच त्यांच्या व्यक्तीमत्वात एक क्रांतीकारक बदल झाला. त्यांना खरी स्वप्ने पडू लागली. ते रात्री स्वप्नात जे पाहत दिवसा अगदी तशाच घटना त्यांच्या डोळ्यासमोर घडू लागल्या. अशाच अवस्थेत सहा महिने सरले. असे म्हटले जाते की अगाऊ, खरी स्वप्ने फक्त प्रेषितांनाच पडतात व हा प्रेषितत्वाचा 46 वा भाग असतो. एव्हाना हिरामध्ये चिंतन करत तीन वर्षे संपली होती. अशातच रमजानच्या 21 व्या रात्री म्हणजे 10 ऑगस्ट 610 च्या रात्री ज्यावेळी त्यांचे वय 40 वर्षे, 6 महिने आणि 12 दिवस होते, अचानक ईशदूत जिब्रईल अलै. सलाम गारे हिरामध्ये प्रकट झाले. जिब्रईल अलै. यांच्या अशा अचानक आगमनाने मुहम्मद सल्ल. गडबडून गेले. जिब्राईल अलै. यांच्या आगमनाबरोबर गारे हिरा उज्ज्वल प्रकाशाने उजळून निघाली. इकडे मुहम्मद सल्ल. घाबरलेले होते, तिकडे जिब्राईल आत्मविश्वासाने पावले टाकत पुढ्यात येऊन उभे राहिले व म्हणाले, ’वाचा!’ तेव्हा प्रेषित उत्तरले मला वाचता येत नाही. जिब्राईल अलै. यांनी पुन्हा दोन वेळा, ’वाचा!’ असे म्हटले. मुहम्मद सल्ल. यांनी पुन्हा तेच उत्तर दिले. तेव्हा जिब्राईल अलै. यांनी मुहम्मद सल्ल. यांना तीन वेळा करकचून मिठी मारली. ती मिठी इतकी जबरदस्त होती की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी नंतर या भेटीचे वर्णन करताना सहाबा रजि. समोर सांगितले होते की, त्यांच्या मिठीने माझ्या शरिरातील जणू सर्व शक्तीच संपून गेली होती.
तिसऱ्या वेळा वाचा म्हटल्यानंतर मिठी सोडल्यावर जिब्राईल अलै. यांनी कुरआनच्या पहिल्या पाच आयती मुहम्मद सल्ल. यांच्या समोर वाचल्या आणि त्यांना त्या आयातींचे पठण करण्यास सांगितले. त्या आयाती पुढीलप्रमाणे होत, ‘इक़रा बिस्मी रब्बिकलजी खलक-खलकल इन्सान मिन अलक अकरऊ व रब्बकल अकरमू, अल्लजी अल्लम बिल-अ-कलम, अल्लमल इन्सान मआलमू याअलम’ (वाचा आपल्या पालनकर्त्याच्या नावाने! ज्याने जन्माला घातले मानवाला मांसाच्या तुकड्यापासून. वाचा! तुमचा पालनहार अत्यंत उदार आहे, त्याने लेखनीद्वारे ज्ञान शिकविले, मानवाला ते ज्ञान दिले जे तो जानत नव्हता.) (संदर्भ : सुरे अल-अलक़ आयतक्र. 1 ते 5.).
वरील पाच आयातींचा संदेश देऊन जिब्राईल अलै. अंतर्धान पावले. तेव्हा मुहम्मद सल्ल. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत घरी परतले. त्यांचे शरीर थरथरत होते. त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली होती. घरी येताच त्यांनी आपल्या पत्नी हजरत खतीजा यांना सांगितले की, ’’मला चादरीने पांघरून टाका’’ चादर पांघरून काहीवेळा शांत बसल्यानंतर ते स्थिरावले. त्यानंतर त्यांनी हजरत खतीजा रजि. यांना सर्व घटनाक्रम सांगितला व म्हणाले की, ’या घटनेमुळे मला काय झालंय कळत नाहीये. मला माझ्या जीवाची भीती वाटतेय.’’ त्यावर खतीजा रजि. उत्तरल्या, ’’कदापि नाही! आपल्या जीवाला काहीच धोका होणार नाही. आपण लोकांवर दया दाखविता, अडल्या नडल्यांच्या कामी येता, गरीबांची मदत करता, पाहुण्यांचे स्वागत व आदराआतिथ्य करता, सत्यावर असलेल्या प्रत्येकाची साथ देता, तेव्हा ईश्वर तुम्हाला कदापि धोका होऊ देणार नाही.’’
हजरत खतीजा रजि. यांच्या या बोलण्याने मुहम्मद सल्ल. यांना थोडा धीर आला. नंतर हजरत खतीजा रजि. यांनी मुहम्मद सल्ल. यांना आपले चुलतभाऊ ’वरका बिन नौफेल बिन असद बिन अब्दुल उज्जा’ यांचेकडे घेऊन गेल्या. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारलेला होता, त्यांना इब्रानी भाषा येत होती, ते बायबल हाताने लिहीत, त्यावेळी ते वृद्ध आणि दृष्टीविहीन झाले होते. त्यांनी मुहम्मद सल्ल. यांच्या मुखातून सारा वृत्तांत ऐकला आणि आश्चर्याने ओरडले. ’’अरे ! हा तर तोच ईशदूत आहे ज्याने मुसा अलै. (मोझेस)कडे ईश्वराचा संदेश आणला होता. ओह! कदाचित मी आज सुदृढ असतो किंवा त्या दिवसापर्यंत जीवंत राहू शकलो असतो ज्या दिवशी तुमचे लोक तुम्हाला मक्कामधून घालवून टाकतील तर मी तुमची खूप मदत केली असती’’ यावर प्रेषित सल्ल. यांनी चकित होऊन विचारले की, ’’अच्छा! तर मला आमीन आणि सादीक म्हणणारे माझेच लोक मला मक्कातून काढून टाकतील?’’ तेव्हा वरका बिन नौफेल उत्तरले, ’होय! ईश्वराचा हा संदेश ज्यांनी-ज्यांनी आणला त्यांना-त्यांना त्यांच्याच वंशाच्या लोकांनी शत्रुत्व करून आपल्यातून काढून टाकलेले आहे.’’
तबरी आणि इब्ने हश्शाम या इस्लामी पंडितांनी असे नमूद केलेले आहे की, पाच आयातीच्या या अवतरणानंतर घरी परतल्यावर वरका बिन नौफेल यांची भेट घेतल्यानंतर मुहम्मद सल्ल. परत गारे हिरामध्ये जावून बसले. त्यांच्या मनामध्ये नाना-विचार येत होते. पुढे त्यांनी या संबंधी सहाबा रजि. यांच्याशी बोलताना या घटनेसंबंधी असे म्हटले होते की, ’’ अल्लाहने जगामध्ये जेवढे लोक निर्माण केले त्यातील शायर (कवी) आणि पागल (वेडा) हे लोक मला अत्यंत नापसंत होते. इतके की मी त्यांच्याकडे पाहत सुद्धा नसे. परंतु वहीच्या अवतरणानंतर मी माझ्याशीच बोललो की मी त्यांच्यासारखाच आहे की काय? एका दिवशी मी पहाडाच्या टोकाकडे जात होतो, तेव्हा माझ्या मनात विचार आला पहाडावरून स्वतःला खाली झोकून देऊन आत्महत्या करावी व या दबावातून कायमची सुटका करून घ्यावी. हे विचार चालू असतानाच पहाडाच्या मध्यामध्ये मी जेव्हा पोहोचलो तेव्हा आकाशवाणी झाली की, ’’ हे मुहम्मद सल्ल. ! तुम्ही अल्लाहचे प्रेषित आहात आणि मी ईशदूत जिब्राईल आहे. तेव्हा मी आकाशाकडे पाहिले तेव्हा जिब्राईल अलै. एका माणसाच्या रूपाने आकाशात पाय रोवून उभे होते आणि म्हणत होते. ते पुन्हा म्हणाले, ’’ ऐ मुहम्मद सल्ल.! अल्लाहने प्रेषित म्हणून तुमची निवड केलेली आहे.’’तेव्हा मी एकाच ठिकाणी जड अवस्थेत उभा होतो. न मला एक पाऊल पुढे टाकता येत होते ना मागे घेता येत होते. परंतु मी माझे डोके वर करून आकाशाकडे जिब्राईल अलै. यांच्याकडे व त्यांच्या आजूबाजूला रोखून पाहत होतो. सर्वत्र मला जिब्राईलच दिसत होते. त्यांच्याकडे पाहता-पाहता मी इतका अभिभूत झालो होतो की माझ्या मनातील आत्महत्येचा विचार कधी निघून गेला हे मलाच कळाले नाही. मी निश्चल उभा होतो. शेवटी जिब्राईल अलै. अंतर्धान पावले आणि मी माझ्या घराकडे परत आलो व ह. खतीजा रजि. यांच्या जवळ बसलो. तेव्हा त्यांनी विचारले की, ’’आपण कोठे होतात? मी सेवकाला मक्का शहरामध्ये पाठवून सगळीकडे शोध घेतला.’’ त्यावर मुहम्मद सल्ल. यांनी आकाशात जिब्राईल अलै. यांना पाहिल्याची सर्व घटना सांगितली. तेव्हा हजरत खतीजा रजि. आनंदाने उद्गारल्या,’’ हे चुलत्याचे पुत्र ! आपण आनंदी व्हा आणि दृढ रहा. त्या ईश्वराची शपथ ज्याच्या ताब्यात माझा जीव आहे, मला आशा आहे की आपण एक उत्तम प्रेषित म्हणून आपली कामगिरी बजावाल. त्यानंतर त्यांनी परत वरका बिन नौफेलकडे जाऊन हा घटनाक्रम सुद्धा सांगितला. तेव्हा ते उद्गारले,’’ हे खतीजा ! त्या ईश्वराची शपथ ज्याच्या हातात वरकाचा जीव आहे. मुहम्मद सल्ल. कडे तोच ईशदूत पुन्हा आलेला आहे जो हजरत मुसा अलै. कडे वारंवार येत होता आणि त्याने मुहम्मद सल्ल. यांना प्रेषित्वाची शुभवार्ता दिलेली आहे’’ हजरत खतीजा रजि. यांनी घरी येऊन वरका बिन नौफेलशी झालेला वार्तालाप मुहम्मद सल्ल. यांच्याशी कथन केला. त्यानंतर काही अवधी लोटल्यानंतर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्वतः वरकाशी भेट घेऊन या घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर चर्चा केली. तेव्हा त्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने सांगितले की, तुम्हाला महान प्रेषित म्हणून ईश्वराने निवडलेले आहे. पुन्हा आलेला ईशदूत हा जिब्राईलच होता. यानंतर काही दिवस जिब्राईल अलै. येण्याचा क्रम बंद झाला. कुठलीही वही अवतरित झाली नाही. त्यामुळे प्रेषित मुहम्मद सल्ल. दुःखी होते आणि अनेकवेळा त्या उंच पहाडावर जात होते. त्यांच्या मनात पुन्हा आत्महत्येचे विचार घोळत होते. एक दिवस स्वतःला पहाडावरून झोकून देण्याचा पक्का विचार करून ते पहाडावर पोहोचले तेव्हा जिब्राईल अलै. पुन्हा अवतरित झाले आणि म्हणाले, ’’हे मुहम्मद सल्ल. आपणच खरे रसूल आहात.’’ जिब्राईलच्या भेटीमुळे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मनाला थोडी शांती लाभली.
हाफिज इब्ने हजर यांनी म्हटलेले आहे की, ’’वही येण्याचा सिलसिला यासाठी थांबविण्यात आला होता की, प्रेषित सल्ल. यांच्या जीवाला थोडा आराम मिळावा आणि चित्त स्थीर व्हावे. जेव्हा ते स्थिर झाले तेव्हा पुन्हा वही येण्याचा सिलसिला सुरू झाला व दूसरी आयत जी नाजिल झाली ती ’’या अय्युहल मुदस्सीर...’’ हे पांघरून ओढून पहूडणाऱ्या उठा आणि खबरदार करा, आणि पालनकर्त्याच्या महानतेची घोषणा करा आणि आपले कपडे स्वच्छ ठेवा आणि अपवित्रतेपासून दूर रहा आणि उपकार करू नका अधिक प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या पालनकर्त्यासाठी धैर्य राखा जेव्हा प्रलयाच्या दिवशी मोठा आवाज केला जाईल तो दिवस फारच कठीण असेल, अश्रद्धावानांसाठी सोपा असणार नाही. वगैरे वगैरे...’’ यानंतर वही येण्याच्या प्रक्रियेमध्ये गती आली आणि जगाला चांगले काय? वाईट काय? हराम काय? हलाल काय? इत्यादी संबंधी मार्गदर्शन करण्यात आले व हळूहळू परिपूर्ण इस्लामी जीवन शैलीचा परिचय प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मार्फतीने जगाला करून देण्यात आला. ज्यात शिक्षण, अर्थकारण, समाजकारण, राजकारण, युद्धनिती, कायदा, न्यायशास्त्र, भौतिकशास्त्र आणि या सर्व शास्त्रांचा उपयोग करण्याची विधी शिकविली गेली. थोडक्यात यशस्वी जीवन जगण्यासाठी माणसाला ज्या-ज्या ज्ञानाची गरज आहे ते-ते ज्ञान अवतरित करण्यात आले अणि या सर्व ज्ञानाचा / शास्त्रांचा पाया नैतिकतेवर ठेवण्याचे व अनैतिकेला नापसंत करण्याचे शिक्षण देण्यात आले आणि वयाच्या 63 व्या वर्षी ज्या तिथीला त्यांचा जन्म झाला होता त्याच तिथीला त्यांना पर्दा फरमाविण्याचा आदेश झाला.
एकंदरित जगातील ज्ञान प्राप्त करण्याच्या ज्या विधी आहेत, जसे स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, ज्ञान मिळविता येते. या ज्ञान मिळविण्याच्या विधींपेक्षा श्रेष्ठ विधी वहीद्वारे मिळालेले ज्ञान आहे. कारण स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, निरिक्षण करून, चिंतन-मनन करून जे काही माणसाला अवगत होते त्यात चूक होण्याची भरपूर शक्यता असते. मात्र ’वही’ एक असा विश्वासपात्र मार्ग आहे, ज्या मार्गाने मिळालेले ज्ञान हे त्रुटी विरहित असते. कारण ज्ञान देणारा हा ईश्वर असतो, ज्ञान पोहोचविणारा ईशदूत तर ज्याला ज्ञान प्राप्त झाले तो जगातील सर्वात विश्वासपात्र व्यक्ती प्रेषित असतो. आणि शेवटचे प्रेषित म्हणून द मोस्ट ट्रस्टेड मॅन ऑफ द वर्ल्ड असे ज्यांना म्हटले जाते व अल्लाहने स्वतः ज्यांच्याबद्दल असे म्हटले आहे की, ’’हे पैगंबर (सल्ल.) ! आम्ही तुम्हाला संपूर्ण जगासाठी कृपा बनवून पाठविले आहे.’’ (संदर्भ : सुरे अम्बीया आयत क्र. 107). तसेच ज्यांचा समावेश मायकेल एच. हार्ट आपल्या ’द हंड्रेड मोस्ट इन्फ्लुयन्शल पर्सन्स इन हिस्ट्री’ मध्ये प्रथम स्थानावर करतो, ते मुहम्मद मुस्तफा सल्ल. असतात तेव्हा त्यांच्यावर अवतरित झालेल्या कुरआनच्या शिकवणीवर शंका उपस्थित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. थोडक्यात वहींचा समुच्चय असलेले कुरआन हे किती कठीण कष्टाअंती प्रेषित मुहम्मद यांनी जगाला दिले या गोष्टीचा आता वाचकांना अंदाज आलाच असेल. कुरआनसारखा परिपूर्ण ग्रंथ मानवाला दिल्याबद्दल ईश्वराचे व अपरिमित कष्ट सहन करून ते आमच्यापर्यंत पोहोचविले, याबद्दल मुहम्मद सल्ल. यांचे कोटी-कोटी आभार.
प्रेषित हजरत मुहम्मद सल्ललाहु अलैहि व सल्लम ईस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित आहेत. हजरत मुहम्मद सल्ल. यांचा जन्म अरबस्थानात अशावेळी झाला जेव्हा अरबस्थान अधर्म, अशांती आणि अनेकेश्वरवादाच्या भयंकर काळोखात हेलकावे खात होता. वंशवाद, घराणेशाही आणि भूमिवाद इत्यादी कारणावरून नेहमी झटापटी होऊन रक्ताचे पाट वाहत होते. स्त्रियांची अवहेलना करणे, नवजात मुलींची हत्या करणे, जुगार खेळणे, मद्यपान करणे ह्या वाईट रूढींना चोहीकडे उधान आले होते. अरबस्थानात नव्हे तर जगातही अशांततेचा धुमाकूळ माजला होता. सर्वत्र धार्मिक अवनती होत होती. उच्च-नीच पणाला ऊत आले होते, नीतिमत्ता लयाला जात होती. स्वैराचार, अधर्म, अशांतीच्या काळकुट्ट अंधकारातून सुटका कधी होईल असे लोकांना वाटत होते. अखेर 20 एप्रिल 571 इ.स. म्हणजे ईस्लामी सन हिजरीच्या 50 वर्षापूर्वी 12 रबीउल अव्वल ईस्लामी कालगणनेनुसार तिसरा महिना, सोमवारच्या सकाळच्या प्रहरी मक्केच्या एका प्रतिष्ठित कुरैश कुटुंबात हजरत मुहम्मद सल्ल. यांचा जन्म झाला.
हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या वडिलांचे नाव हजरत अब्दुल्लाह आणि आईचे नाव ‘बीबी आमेना’ होते. त्यांच्या जन्माअगोदर 4-5 महिन्यापूर्वी त्यांचे वडील वारले होते. ते सहा वर्षाचे झाल्यावर आईचे छत्रही हरपले. आईच्या निधनानंतर त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांचे आजोबा ‘अबु मुत्तलिब’ यांच्यावर आली. दोन वर्षानंतर आजोबा सुध्दा वारले. अशा प्रकारे वयाच्या आठ वर्षापर्यंत आई-वडील आणि आजोबाविना ते पोरके झाले. आजोबानंतर काका ‘हजरत अबु-तालिब’ यांनी त्यांचे पालन पोषण केले. त्या काळातील परंपरेनुसार ते लहान वयातच आपल्या काकाबरोबर व्यापाराच्या निमित्ताने परदेशात जाऊ लागले. देशात आणि विदेशात ते ‘सादिक’ आणि ‘अमीन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या पंचविसाव्या वर्षी हजरत खतीजा नामक परमपवित्र विधवा स्त्रीशी ते विवाहबध्द झाले. वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांना ‘प्रेषितावस्था’ प्राप्त झाली आणि तेव्हापासून त्यांच्यावर क्रमाक्रमाने ‘कुरआन शरीफ’ चे अतवरण होऊ लागले. प्रेषित्व मिळाल्यावर लोकांना ईशआज्ञेकडे बोलावण्याची (इस्लामचा प्रसार करण्याची) आज्ञा त्यांना प्राप्त झाली. त्यांनी लोकांना संबोधून सांगितले की, ‘‘लोक हो ! केवळ एकट्या अल्लाहची उपासना (बंदगी) करा. व्याभिचार, चोरी, मद्यप्राशन, जुगार यांचा पूर्णपणे त्याग करा. दुर्बलांची मदत करा, स्त्रियांना त्यांचा हक्क द्या, अल्लाहची भीती बाळगा, लक्षात ठेवा मृत्यु अटळ आहे. मृत्युनंतर निर्माणकर्त्या ईश्वरासमोर सर्वांना जाब दयावा लागणार आहे. बघा, एका मनुष्याची हत्या म्हणजे संपूर्ण मानवतेची हत्या होय.’ लोक हो ! तुम्ही सर्व एकच आहात. तुमच्यात कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. श्रेष्ठत्व रंगावर अथवा वंशावर नसून ईशभक्ति आणि ईशभितीवर अवलंबून आहे.’’
हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या या प्रचाराचा आरंभ होताच स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजणारा अधिकारी वर्ग, कट्टर कुरैश आणि अनेकेश्वरवादी त्यांचे शत्रु झाले. प्रेषित्व मिळाल्यापासून मदीनेला प्रयाण करेपर्यंत म्हणजेच तब्बल 13 वर्षापर्यंत हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या अनुयायींना अतोनात कष्ट सहन करावे लागले. लोखंडी सळईने त्यांना डागले गेले, तापलेल्या वाळूवर नग्नावस्थेत ओढले गेले, त्यांच्या मार्गात काटे टाकले गेले, त्यांना विविध प्रकारे कष्ट देण्यात आले. परंतु, त्यांच्या अनुयायांची नि:स्वार्थता, निर्भयता आणि उच्चदर्जाचे चारित्र्य पाहून हळू-हळू नैसर्गिक जीवन-प्रणालीकडे लोक वळू लागले. पाहता-पाहता अरब देशातले लोकच नव्हें तर संपूर्ण जगातील लोक ईस्लामधर्माकडे आकर्षित होऊ लागले. मक्केत शत्रुचे वर्चस्व आणि कष्ट देणे अधिकच वाढल्यामुळे ईस्लाम धर्मियांना तिथे राहणे कठीन झाले होते. हजरत मुहम्मद सल्ल. यांनी ईश आज्ञेने मक्केहून मदिनेला प्रयाण केले. त्यांच्या आगमनानंतर मदिना आणि आसपासच्या परिसरात न्याय, शांतता आणि बंधुत्वाचा सुगंध दरवळू लागला आणि दिवसेंदिवस ईस्लाम धर्म प्रफुल्लित होऊ लागला, वाढू लागला. ज्या दिवशी हजरत मुहम्मद सल्ल. यांनी मक्केहून मदिनेत पदार्पण केले त्या दिवसापासून ईस्लामी कालगणना हिजरी-सनाची सुरूवात झाली. ईश्वराचे लाडके प्रणेते आणि ईस्लामचे संदेशवाहक असूनही हजरत मुहम्मद सल्ल. यांची राहणी अत्यंत साधी आणि सरळ होती. खाण्यास जाडे-भरडे अन्न आणि झोपण्यास जमिनीवर फक्त एक चटई. जीवनभर त्यांनी कधीही भरपूर जेवण केले नाही. उलट कधी-कधी तीन-तीन दिवस त्यांना उपाशी राहावे लागत होते. या साध्या राहणीमागचे कारण गरीबी आणि दारिद्रय नव्हते तर त्यांना शतकानुशतकांच्या लोकांचे मार्गदर्शन केवल उपदेश म्हणून नव्हे तर स्वत: त्याच मार्गाचर अनुसरण करून दाखवायचे होते. हजरत मुहम्मद सल्ल. यांनी अरफातच्या मैदानावर एक लाख चोवीस हजार अनुयायांच्या समक्ष जो अतिम संदेश लोकांना दिला तो त्या काळाच्या अनुयायांपुरताच मर्यादित नव्हता तर प्रलयापर्यंतच्या सर्व लोकांवर तो बंधनकारक आहे. या अंतिम उपदेशच्या वेळी त्यांनी लोकांना सांगितले. ‘‘लोक हो ! मला वाटते मी आणि तुम्ही पुन्हा इथे जमणार नाही. आजपासून या शहरात रक्त वाहणे निषिद्ध आहे. म्हणूनच तुमच्यावर हत्या करणे, कुणाचा अवमान करणे, कुणाचा माल हडपणे अपराध हराम ठरविले गेले आहे. लवकरच आपण सर्वांना ईश्वराच्या समोर हाजर व्हायचे आहे आणि सर्वांना आपल्या कृत्यांबद्दल जाब द्यावा लागणार आहे. तेव्हा माझ्यानंतर एकमेकांचे नुकसान करू नये. जे दुष्कृत्य आजपर्यंत घडले त्यांची पुनरावृत्ती होऊ देऊ नका!’’ जगाचा निरोप घेतांना, प्राणोत्क्रमणच्या वेळी जमा झालेले सहाबा रजि. (सहकारी) यांना संबोधून ते म्हणाले होते, ‘‘ज्याची मला आज्ञा झाली, आजपर्यंत तेच मी तुमच्यापर्यंत पोहचविले आहे. अल्लाहच्या आदेशात बदल करू नका. लोकांवर बळजबरी करू नका कारण अल्लाहाने फर्माविले आहे की, परलोकाचे घर म्हणजेच ‘जन्नत’ एक असे पवित्र स्थान आहे की त्यावर हक्क त्याच लोकांना मिळणार आहे जे जमीनीवर विद्रोहचे अपराधी नाहीत. जमीनीवर कोणत्याही प्रकारचे दंगे किंवा भांडण करत नाहीत. कारण जन्नत पाक आणि पवित्र लोकांसाठी आहे. पवित्र लोकांच्या कर्माचे ते फळ आहे.’’ हजरत मुहम्मद सल्ल. यांनी ज्या इस्लामची शिकवण दिली, जो मार्ग आपल्या जीवनात त्यांनी अवलंबविला, जो संदेश ते घेऊन आले. त्यावरून हे स्पष्ट होते की ते शांतीचे महान प्रणेते होते. आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे, आपल्या कृर्त्यांचा जाब विचारणारा आहे, परलोकाविषयीची ही निष्ठा माणसाला स्वैराचार प्रवृत्तींपासून दूर ठेवते. ‘जगत महर्षी’च्या दुस-या पानावर महात्मा गांधीचे म्हणणे उद्धृत केलेले आहे. ज्यात ते म्हणतात, ‘‘नि:संशय ईस्लाम तलवारीने पसरला नसून प्रेषितांचे साधे जीवन, नि:स्वार्थता, प्रेम, निर्भयता, ईश्वरावर दृढ आस्था आणि विश्वास यांच्या बळावर पसरला आहे.’’ संपूर्ण जगासाठी कल्याणाचा मार्ग दाखविण्याकरिता ईश्वराचा संदेश घेवून येणारे रहमतुल्लील आलमीन हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व सल्लम यांना ईश्वराने ज्या दिवशी जगात पाठविले होते त्याच दिवशी आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो दिवस म्हणजे 12 रबीउल अव्वलचा सोमवार होय. जगाला ईशभक्ती, शांती-समृध्दी, न्याय-बंधुत्व, एकता आणि नैतिकतेचा संदेश देणारे हजरत मुहम्मद सल्ल. ज्या दिवशी जगात आले त्याच दिवशी त्यांनी पर्दा फरमाविला. शांतीचे महान प्रणेते हजरत मुहम्मद सल्ल. यांचा जीवन, पथप्रदर्शन प्रलयापर्यंतच्या लोकांकरिता आदर्शच आहे.
- डॉ. अर्जिनबी युसूफ शेख
अकोला
dr.arjinbee@gmail.com.
मो. 93718 95126
बरस्थानाच्या निर्जन वाळवंटातून निघून या पुरोगामी आणि आधुनिक जीवन व्यवस्थेने मोरोक्कोपासून होर्डजपर्यंत फक्त आफ्रिका, अशिया आणि युरोप खंडालाच प्रभावित केले नाही तर पाहता-पाहता संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा हा प्रभाव तात्कालिक नव्हता. गेल्या दीढ हजार वर्षात यात सातत्याने वाढ होत आहे आणि आज सर्वात वेगाने प्रसार होणारी जीवन व्यवस्था आहे. जगातील प्रत्येक तीन व्यक्तीत एक या विचारधारेचा अनुयायी आहे. निसंदेह प्रेषित मुहम्मद (सल्ल.) जगातील सर्वकालीन प्रभावी व्यक्ती होत.
सत्ता, संपत्ती, सेना इत्यादी कोणतीच संसाधने जवळ नसतांना अवघ्या तेवीस वर्षाच्या संघर्षमय जीवनात प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी मानवतेवर जो असीम प्रभाव टाकला तो भारावून टाकणारा आहे. अनाथावस्था अतिशय लाचार व असहाय्य स्थितीचे दुसरे नाव आहे. त्यांच्या जीवनाची सुरूवात एका अनाथ बालकाच्या रूपाने होते. नंतर आम्ही त्यांना एक यातनाग्रस्त देशत्याग केलेल्या व्यक्तीच्या स्वरुपात पाहतो आणि शेवटी तेच एक राष्ट्राचे ऐहिक व आध्यात्मिक नेते बनले. त्यांना या मार्गात ज्या कसोट्या व प्रलोभने, अडचणी व बदल, अंध:कार व उजेड, भय व प्रतिष्ठा, परिस्थितीच्या चढ-उतारातून जावे लागले त्या सर्वात प्रेषितांना अभुतपुर्व यश प्राप्त झाले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ही प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी आपल्या तत्वाशी तडजोड केली नाही. राज्यसत्ता या जगातील भौतीक सामर्थ्याची पराकाष्ठा असते; प्रेषितांनी सामर्थ्याचे सर्वोच्च स्थान प्राप्त करुन जगाचा निरोप घेतला.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आदर्श नायकाची भूमिका पार पाडली. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) अनेक रूपात आपल्यापुढे येतात. एक राष्ट्राध्यक्ष, शासक, अजेय सेनापती, न्यायनिष्ठ न्यायाधीश, थोर तत्वज्ञानी, राजनितीज्ञ, महान उपदेशक, प्रामाणीक व्यापारी, समाजसुधारक, अध्यात्मिक गुरु, उत्तम वक्ते, योद्धे, अनाथाचे पालनकर्ते, गुलामांचे रक्षक, स्त्रीजातीचे उद्धारक, एक आदर्श पती, वडील, संत. थोडक्यात सर्वांगीणदृष्टया त्यांचे व्यक्तीमत्व एक आदर्श व्यक्तीमत्व होय. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांंनी जीवनातील प्रत्येक भूमिका अशा उत्कृष्टपणे वठविली की जगाच्या अंतापर्यंत संपूर्ण मानवजातीसाठी ती प्रमाण ठरावी. त्यांचे कर्तृव जीवनाच्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रापुरतेच मर्यादित नसून संपूर्ण जीवनावर व्यापलेले आहे. म्हणूनच कुरआन सांगतो.
’’निसंदेह! प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांचे जीवन तुमच्यासाठी उत्कृष्ट नमुना आहे.’’
प्रेषितांनी जगाला परिचय करून दिलेल्या इस्लामी जीवन व्यवस्थेचे सर्वात प्रथम वैशिष्ट म्हणजे त्यांनी मानवसमाजाला सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना वास्तविक स्वातंत्र्य प्रदान केले. माणूस स्वतंत्र जन्मला आणि स्वातंत्र्य माणसाचा जन्मसिध्द हक्क आहे. प्रेषितांनी फक्त या संबंधीचे प्रवचणच दिले नाही तर प्रत्यक्षात एक आदर्श समाज घडवून आणला.
दीड हजार वर्षापूर्वी अरब मधून गुलामगिरीचे पुर्णपणे उच्चाटन केले आणि गुलामगिरी मुक्त स्वतंत्र समाज स्थापित केला. जो आजच्या तथाकथित प्रगतीशील अमेरीका सारख्या देशालाही एकविसाव्या शतका पर्यंतही साध्य करता आला नाही. आजदेखील तेथील कृष्णवर्णीय नागरीकांना समाजात दुय्यम दर्जा दिला जातो.
गुलामांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी माणूस बनविले. हीन, दीन, माणूसपण नाकारलेल्या सामान्य गुलामांना प्रतिष्ठा बहाल केली. ते ही आपल्या सारखेच मानव आहेत ही भावना लोकांमध्ये निर्माण केली. गुलामांना मुक्त केले आणि त्यांचा विकासाचे मार्ग मोकळे केले, म्हणूनच गुलाम राजे बनले. मानवी इतिहासात गुलाम राजे बनले हे केवळ प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या शिकवणीमुळेच शक्य झाले. आपल्या देशाचा इतिहास पहिला तर दिल्लीच्या तख्तावर सुलतान म्हणून आलेला कुतुबुद्दीन ऐबक, शमसुद्दिन अल्तमश, गियासुद्दिन बलबन असे जवळपास नऊ सुलतान पुर्वाश्रमीचे गुलाम होते.
विषमता ही कोणत्याही समाजाला लागलेला दुर्दम्य आजार असतो. ज्या समाजात विषमता नांदते तो समाज कधीही प्रगती करु शकत नाही. त्या समाजात कधीही शांती नांदू शकत नाही. उलट असा समाज अंतर्गत यादवी आणि कलहामुळे नष्ट होण्याचीच जास्त शक्यता असते. पैगंबर सल्ल. यांनी सर्व विषमता आणि असमानतेचा कडाडून विरोध केला आणि विश्वबंधुत्वाचा आणि समानतेचा अद्वितीय सिध्दांत मानवतेला दिला. तसे पाहता जगातील सर्व इश्वरी धर्मांनी / समाज सुधारकांनीही याच सिद्धांताचा प्रचार केला, परंतु प्रेषितांनी या सिध्दांताला व्यवहारिक स्वरुपात सादर केले.
प्रेषितांनी लोकशाही शासनप्रणालीला तिच्या सर्वोकृष्ट रूपात स्थापन केले. राजसत्ता, राजे-महाराजे आणि तिला प्रस्थापितांच्या वंशवादाच्या परंपरेतून मुक्त करुन कर्तृत्व आणि योग्यतेवर आधारीत माणसाच्या सुपूर्द केले. कायद्याचे राज्य निर्माण केले. राष्ट्राच्या सर्वोच्च शासकाला देखील सामान्य माणसाप्रमाणे न्यायाधिशासमोर हजर व्हावे लागले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित नवीन राज्यघटना अमलात आणली. जनतेला माहिताचा अधिकार दिला जो अधिकार मिळविण्यासाठी आम्हाला एकविसाव्या शतकाची वाट पाहावी लागली तो माहितीचा अधिकार इस्लामने पंधराशे वर्षापुर्वीच दिला. जनतेला आपल्या नालायक शासकाला परत बोलविण्याचा अधिकार दिला. (ठळसहीींें लरश्रश्र लरलज्ञ) जो आज देखहल आमच्यासाठी स्वप्नवत आहे. राज्यकर्ता जनतेचा मालक नसून सेवक असल्याची नवीन संकल्पना जगासमोर आणली. डर्शीींरपीं ङशरवशीीहळि चा फक्त सिध्दांतच मांडला नाही तर प्रेषित (सल्ल.) यांनी आणि त्यानंतर आलेल्या खलीफांनी प्रत्यक्षात तो कृतीतून सिद्ध करून दाखविला.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्त्रीजातीचा उद्धार केला. शेकडो वर्षापासुन पिडीत आणि शोषित व क्षुद्र समजल्या जाणाऱ्या स्त्रीला त्यांनी सन्मान, प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य प्रदान केले. महिलांना दीड हजार वर्षापुर्वीच शिक्षणाचे, अध्यापनाचे तसेच उपासनेचे सर्व अधिकार प्रदान केले. प्रेषित सल्ल. यांच्यावर सर्वप्रथम श्रद्धा आणणारी ही स्त्रीच होती. तसेच इस्लामसाठी सर्वात प्रथम आपल्या प्राणाचे बलीदान देणारी देखील स्त्रीच होती. भावी पिढीच्या जडणघडण करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी तिच्यावर टाकून इस्लामने स्त्रीला आदर्श समाजनिर्मितीची महत्वपूर्ण जबाबदारी दिली. स्त्रीला पतीच्या निवडीचे अधिकार, ‘खुलअ’ अर्थात घटस्फोट घेण्याचे, पुर्नविवाहाचे अधिकार प्रदान केले, स्त्रीला वारसा हक्क प्रदान केला. प्रेषितांनी शोषणमुक्त आणि वेश्यामुक्त समाज निर्माण करुन दाखविला.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी अथेन्स, रोम, इराण किंवा चीनच्या विद्यापीठातून धडा घेतला नव्हता ते स्वत: निरक्षर होते. परंतु त्यांनी संपूर्ण मानवजातीला महानतेच्या सिध्दांताची ओळख करुन दिली. प्रेषित सल्ल. यांंची क्रांती ही बौध्दीक क्रांती होती. म्हणूनच कुरआनच्या अवतरणाची सुरूवात ज्ञानाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या आयातीने होते. तद्नंतर प्रेषित सल्ल. यांनी ज्ञान, विज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणली आणि संपुर्ण जगाला प्रज्वलंत केले. प्रेषित सल्ल. यांनी मानवाला शास्त्रीय दृष्टीकोन दिला. विज्ञानाची ओळख करुन दिली. संशोधन वृत्तीला प्रोत्साहीत केले. ज्ञान मिळविण्यासाठी चीनला जावे लागले तरी जाऊन ज्ञानार्जन करा असे फर्माविले. विवेकाला मानवाची सर्वात मोठी संपत्ती संबोधिले. अरबांमध्ये बोटावर मोजता येतील एवढे साक्षर लोक होते. परंतु पैगंबर सल्ल. यांनी आपल्या 23 वर्षाच्या प्रेषित्वाच्या काळात संपूर्ण अरबला फक्त साक्षरच केले नाही तर अशा पध्दतीने सुसंस्कृत केले की ते पुढे ज्ञान आणि विज्ञानासह प्रत्येक क्षेत्रात दिपस्तंभ ठरले. युरोपच्या उदयाच्या अगोदर पाचशे वर्षे मुस्लीमांनी ज्ञान, विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली.
प्रेषितांनी आपल्या जीवनव्यवस्थेने जगाला अपराध निर्मुलनाचे रहस्य सांगीतले. अपराधाची मुळ कारणे विषद करुन त्याच्या निवारणाचा मार्ग दाखविला. लोकांच्या मनात इश्वराचे भय निर्माण केले. तो सदासर्वदा आपल्याला पाहत आहे आणि अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवशी तोच आपल्या कर्माचा योग्य मोबदला देईल. ईश्वराचे भय लोकांच्या मनात इतके बसविले की लोक स्वतः अपराधापासून परावृत्त झाले. ज्यांच्या हातून काही गुन्हा झाला ते लोक गुन्हा घडल्यास स्वत: शिक्षा मागायला येऊ लागले. आज देखिल जगात जेथे जेथे इस्लामी संविधान आहे तेथे-तेथे अपराधाचे प्रमाण तुलनामत्क दृष्ट्या अत्यल्प आहे. हेच इस्लामी राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहे. म्हणून थोडक्यात म्हणावे लागेल की ही राज्यघटना त्रिकालाबाधीत व्यवहार्य आहे.अरब हे घोर व्यसनी, दारुचे चाहते होते. ज्याच्या घरात सर्वात जुनी दारु तो धनवान समजला जाई. अशा व्यसनामध्ये लिप्त समाजाला प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी पुर्णपणे नशामुक्त करुन दाखविले. टप्प्या-टप्प्यात त्यांचे प्रबोधन केले आणि कालांतरणाने जेंव्हा दारु हराम करण्यात आली त्यावेळे मदिनाच्या गल्ली बोळात दारुचे पाट वाहत होते. लोकांनी आपल्या जवळील दारु ओतून दिली. -(उर्वरित पान 4 वर)
जो त्यावेळेस दारु पित होता त्याने उलटी करुन प्यायलेली दारु बाहेर काढली. अशा पध्दतीने पुर्ण समाज नशामुक्त करण्यात आला. ज्याचे इतिहासात दुसरे उदाहरण सापडणार नाही.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी लोकांना सर्व अवडंबरातुन मुक्त करुन वैज्ञानिक दृष्टीकोन प्रदान केला. समाजाला पुर्णपणे कर्मकांड, अंधश्रध्दा, जादू टोणा, भूतप्रेत इत्यादी पासून पुर्णपणे मुक्त केले. तसेच धर्मपंडिताच्या पाखंडातून समाजाची सुटका केली. लोकांना वस्तुनिष्ठ आणि तार्कीक वैचारिक बैठक दिली.
प्रेषितांनी कोणत्याही सैनिक अॅकडमीमध्ये प्रशिक्षण घेतले नव्हते. तरी देखील अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत झालेल्या युध्दात ते अजेय राहीले. निर्विवादपणे ते एक महान योद्धे होते. त्यांच्या युध्दनितीचा अभ्यास केल्यास डोळ्याचे पारणे फिटतात. या भुतलावर एखादा व्यक्ती सिध्दांतवादीही असावा, सैनिक ही असावा आणि नेताही असावा, हे अशक्य प्राय आहे. परंतु प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या रूपाने जगाने या अतिदुर्लभ विशेषतांच्या संयोगाला मूर्त स्वरुपात पाहिले आहे.
प्रेषितांनी कुरआनच्या मार्गदर्शनात एक संपुर्ण व्यवस्था निर्माण केली. सत्य, शांती, समता, न्याय आणि स्वातंत्र्य हे या व्यवस्थेचे मूळ सिध्दांत. नैतीकता आणि सदाचार आणि इशभय या व्यवस्थेचा पाया या व्यवस्थेने समाजाला पुर्णपणे शोषणमुक्त केले. मानवी इतिहासात सर्वप्रथम मानवअधिकाराला घटनात्मक रूप दिले. कोणतेही भेदभाव न बाळगता फक्त मानवतेच्या आधारावर न्याय निर्धारित करण्यात आला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परस्पर संबंध अधोरेखीत करण्यात आले. याच तत्वाच्या प्रेरणेने आज मानवअधिकार आयोग आणि संयुक्त राष्ट्र काम करते. पैगंबर मुहम्मद सल्ल. यांनी मानवतेच्या इतिहासातील एकमेव अशी रक्तहीन क्रांती घडविली ज्यात उभय पक्षाकडून फक्त 1100 लोकांचा बळी गेला. मक्कावर विजय प्राप्त झाल्यानसंतर जवळपास दहा लाखचौरस मैलचा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली होता.परंतु प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या क्रांतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही क्रांती तात्कालिक नव्हती. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी जे तत्व आणि सिध्दांत दिले, जेव्हा-जेव्हा जगात याची अमलबजावणी होईल पुन्हा तशीच क्रांती होऊन तसाच निकोप समाज व निस्वार्थ व्यक्तीमत्वाचे लोक निर्माण होतील.
प्रेषित सल्ल. यांचे जीवन म्हणजे कुठली अख्यायिका नव्हे, ते एक अटल सत्य आहे आणि मानवतेला शेवटपर्यंत मार्गदर्शन करणारा एक दीपस्तंभ आहे. जेवढ्या सुक्ष्मपणे प्रेषित सल्ल. यांच्या संपुर्ण जीवनाचा अभ्यास करण्यात आला, तेवढा जगात कोणाचाही करण्यात आलेला नाही. प्रेषित सल्ल. यांच्या वकत्व्य आणि आचारणाची सत्यता पडताळण्यासाठी ज्या लोकांच्या माध्यमातुन ही माहिती मिळाली त्यांच्याही विश्वासहर्तेची पडताळणी करण्यासाठी त्यांच्याही संपुर्ण जीवनाचा अभ्यास करण्यात आला.
जवळपास एक लाख लोकांची पडताळणी करुन पैगंबर सल्ल. यांचे वक्तव्य आणि आचारणाला हदीस संकलकांनी संपादित केलेले आहे. परंतु प्रेषित मुहम्मद सल्ल. साहेब फक्त मुसलमानासाठी प्रेषित म्हणून पाठविले गेले नाही. कुरआनचे स्पष्ट प्रतिपादन आहे की, ’हे प्रेषित! आम्ही तुम्हाला संपुर्ण जगवासीयासाठी कृपा बनवून पाठविले आहे’ (कुरआन)
ईश्वराने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना सफल मानवी उद्धाराची जीवन व्यवस्था देऊन पाठविले नसते तर जग आतापर्यंत विनाशाताच्या खाईत लोटले गेले असते. ते आले आणि त्यांनी जगाला विनाशापासुन वाचविले. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे जगावर एवढे उपकार आहेत म्हणूनच प्रत्येक वेळेस त्यांच्या नावावर आपण मुहम्मद (स.) म्हणतो अर्थात ईश्वर त्यांच्यावर कृपा करो.
- अर्शद शेख
आर्किटेक्ट
मो. 94222 22332