Latest Post

madina

इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका च्या रचनाकारांनी लिहिले आहे - प्रेषित मुहम्मद (स) जरी पूर्णपणे अशिक्षित मुहम्मद (स) जरी पूर्णपणे अशिक्षित होते व अरबी भाषेच्या काव्यकलेपासून इतके अनभिज्ञ होते की कोणत्या त्रुटिशिवाय एक शेर (काव्याच्या दोन ओळी) देखील ते सांगू  शकत नव्हते. तरी सुद्धा स्वभावतः प्रत्येक विषयाच्या मुळापर्यंत पोचण्याची त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती होती. या गोष्टीचा संकेत देताना पवित्र कुरआनच्या एका सुप्रसिद्ध सूरह (पवित्र कुरआनचेएक प्रकरण) मध्ये त्यांना संबोधून असे म्हटले गेले आहे - प्रेषित मुहम्मद (स) यांना काव्य - विद्या प्रदान करण्यात आली नसून त्यांनी कवी असणेदेखील आवश्यक नाही.

ही गोष्ट सर्वसिद्ध आहे की प्रेषित मुहम्मद (स.) (यांच्यावर ईश्वराची दया आणि कृपा असो) यांना लिहिणे-वाचणे अजिबात येत नसे आणि हे देखील एक ऐतिहासिक सत्य आहे की ते प्रेषित होईपर्यंत कोणत्याही धर्माचा कोणताही ग्रंथ त्यांच्यापर्यंत पोचला नव्हता. याशिवाय विचारणीय गोष्ट अशी आहे की अशा विद्या व ज्ञानशून्य देश व जातीत जन्म घेऊन व त्याच वातावरणात तरूण होऊन देखील त्यांनी इतक्या महान सार्वभौम व विश्वव्यापी धर्माचे प्रवर्तन केले. एका देशात एवढी मोठी क्रांती निर्माण केली, त्यांनी प्रवर्तित केलेल्या धर्माने जगातील सर्व देशांवर, सर्व जाती व सर्व सभ्यतांवर वेळोवेळी प्रभाव टाकला. भारतासारखा धर्म, संस्कृती, विद्या व ज्ञानाने परिपूर्ण व संपन्न देशदेखील इस्लामच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकला नाही आणि त्यांच्यानंतर आजतागायत कोणताही इतका महान धर्म-नेता जन्माला आला नाही. सर्व पैलूंचा विचार केल्यानंतर हे मान्य करणे भाग पडते की ते ईश्वराचे प्रेषित होते आणि त्यांचे ज्ञान हे ईश्वरीय ज्ञान होते.  

अत्यंत तेजस्वी पुरूष एक ख्रिश्चन विद्वान मिस्टर मुहलर प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रेषित न मानणाऱ्या लोकांना प्रश्न करतो -

हे कसे शक्य आहे की एक धार्मिक ज्वाला जी जरी एका जंगलात प्रजवलित झाली होती, परंतु जिने इतक्या अल्पावधीत आश्चर्यजनक रीतीने संपूर्ण आशिया खंडात अग्नीचा डोंब उठविला, ती अशा हृदयातून निघालेली असेल ज्यात त्याची काहीही उष्णता अस्तित्वात नसेल? (एजाजुत्तंज्रील, पृ.121, बहव-ाला इन्सा्नलोपीडिया ब्रिटानिका- विषय : प्रेषित मुहम्मद (स) व त्यांचा धर्म). 

असामान्य शक्ती - संपन्न मनुष्य 

मिस्टर टॉम्स कार्यालय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर खोटे दोष लावणाऱ्या लोकांचा खरपूस समाचार घेताना लिहितो -  होय, असे कदापि नाही, हा तीक्ष्ण दृष्टीचा मनुष्य जो जंगली देशात जन्मला होता, जो मनमोहक काळे  डोळे व प्रफुल्ल, शिष्टतापूर्ण व विच-ारशील स्वभावाबरोबर आपल्या मनात मान-सन्मानाच्या इच्छेविरूद्ध काही अन्य विचार बाळगत होता, तो एक शांतिमय आणि असामान्य शक्तीशाली आत्मा होता आणि त्या लोकांपैकी होता जे सत्यवान असण्याशिवाय अन्य काही असूच शकत नाहीत. ज्याला स्वतः निसर्गाने खरा व सत्यप्रिय म्हणून जन्मास घातले होते. या काळात अन्य लोक अंधविश्वास व संस्काराचे पालन करीत होते आणि त्यावरच संतुष्ट होते. हा मनुष्य त्य विश्वास व संस्काराचे पालन करू शकत नव्हता व आपल्या आत्मा व पदार्थाच्या तथ्यांच्या ज्ञानाशिवाय तो अन्य लोकांपेक्षा भिन्न होता. जसे की मी वर्णन केले आहे की, सर्वशक्तीमानाचे रहस्य आपल्या प्रताप व सौंदर्यासह त्यावर प्रकट झाले होते आणि या तथ्यावर ज्याचे वर्णन करण्यास वाक्शक्ती असमर्थ आहे आणि ज्याने आपल्यासाठी ममी येथे आहेफ म्हणून प्रयोग केला. प्राचीन कथा त्यावर पडदा घालू शकल्या नाहीत आणि असले तस्य ज्यास एखादे पर्यायी श्रेष्ठतर शब्द न मिळाल्यामुळे आम्ही मसत्यफ नाव ठेवले आहे, ते वास्तविकतः ईश्वरी चिन्हांपैकी एक चिन्ह आहे. अशा माणसाचे कथन एक वाणी आहे जी एखाद्या संबंधाविना थेट ईश्वरी प्रकृतीच्या हृदयातून निघते, जी मानव ऐकतात आणि जी ऐकण्यासाठी व वस्तूंच्या तुलनेसाठी अधिक लक्ष देण्याची गरज आहे, कारण याच्या तुलनेत जे काही आहे तुच्छ आहे. सुरूवातीपासूनच त्याच्या हृदयात हजच्या प्रसंगी व दररोज इकडे-तिकडे भ्रमण करताना त्यांच्या मनात विभिन्न प्रकारचे हजारो विचार येत असत. उदाहरणार्थ - ममी काय आहे? लोक ज्याला जग म्हणतात व ज्यात मी रा-हतो ही अथांग गोष्ट काय आहे? जीवन काय आहे? मृत्यू काय आहे? मला कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे व काय केले पाहिजे? ज्याचे उत्तर (म्नकाच्या) हिरा व (सीरियाच्या) सीना पर्वताच्या मोठमोठ्या दगडांच्या ढिगाऱ्यांची व निर्मम निर्जन वाळवंटाने व जंगलाने काहीही दिले नाही आणि डोक्यावर गुपचूप प्रदक्षिणा घालणाऱ्या आकाशाने सुद्धा आपल्या निळा  प्रकाश देणाऱ्या नक्षत्रांसह काहीही सांगितले नाही. परंतु, जरी कुणी सांगितले असेल तर केवळ त्यांच्याच आत्म्याने व ईश्वरी ज्ञानाने सांगितले जे त्याच्यात होते.   



- नसीम गाज़ी फलाही

नसीम गाझी फलाही यांनी या पुस्तिकेत शरीर आणि शरीरासंबंधी इतर वस्तूंची स्वच्छता, शुचिर्भूतता आणि पावित्र्यासंबंधी इस्लामच्या मूलभूत शिकवणींना प्रस्तुत केले आहे.

स्वच्छता आणि पावित्र्याविषयीचे इस्लाममधील महत्त्व विषद केले आहे. अल्लाहची उपासना, नमाज इ. साठी त्यास अत्यावश्यक ठरविले आहे. आणि स्वच्छता व पावित्र्याविषयी निष्काळजी असणाऱ्यास पारलौकिक जीवनातील शिक्षेपासून सावधान केले आहे.

ही पुस्तिका वाचल्यानंतर वाचकास स्वच्छता व पावित्र्याविषयीची खरी माहिती उपलब्ध होते. शरीर व आत्मा दोन्ही आरोग्यसंपन्न, स्वच्छ व सुचिर्भूत ठेवून निरामय समाजनिर्मिती करण्यासाठी इस्लामी शिकवणीनुसार आचरण आवश्यक आहे.

आयएमपीटी अ.क्र. 232  -पृष्ठे - 48    मूल्य - 22  आवृत्ती-1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/r5f7q39qx5afiu2remgbakehwbyu6oey



माननीय अबू  हुरैरा (रजि.) यांचे निवेदन आहे,

तुफैल बिन अम्र (रजि.) अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सेवेत हजर झाले आणि सांगितले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! दौस कबिल्याच्या लोकांनी अवज्ञा केली आणि नाकारले म्हणून तुम्ही त्या लोकांना शापित करावे, असा लोकांचा विचार आहे.’’ यावर पैगंबर म्हणाले, ‘‘हे अल्लाह! दौसच्या लोकांना मार्गदर्शन प्रदान कर आणि त्यांना माझ्याजवळ पाठव.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे हे अल्लाह, मी प्रार्थना करतो की दौस कबिल्याच्या लोकांना मार्गदर्शन प्राप्त व्हावे आणि ते सर्व तुझे आज्ञाधारक मुस्लिम बनून जावेत आणि त्या लोकांनी माझी अवज्ञा करू नये.

पैगंबरांची सर्वश्रेष्ठ अभिलाषा हीच असते की मार्गभ्रष्ट लोकांनी सन्मार्गावर मार्गस्थ व्हावे आणि मार्गदर्शनरुपी संपत्ती त्यांच्या नशिबी यावी जी मानवी जीवनाची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. ईशदासांचा कल्याणभाव पैगंबर व नबींच्या हृदयात सामावलेला असतो. खरे तर हे ईशप्रेमाचे प्रतीक तसेच ईशप्रेमाची अपेक्षा असते की ईशदासांशी घनिष्ट संबंध तुमचा असावा. त्यांच्याशी प्रेम करावे आणि त्यांच्या भल्यासाठी व कल्याण करण्यासाठी सतत कार्यरत राहावे.


हुमेरा आणि सिद्दीका यांची उपाधी उम्मे अब्दुल्लाह. अब्दुल्लाहची आई आएशा (रजि.) होती. या कुरैश खानदानातील बनू तैइम या कबिल्यातील होत्या. आईचे नाव उम्मे रुमान बिन्ते आमीर (रजि.) होते. त्या एक महान माननीय साहबीया होत्या. पैगंबरांना पैगंबरी मिळून चार वर्षे झाली, तेव्हा शव्वाल महिन्यात त्या जन्मल्या होत्या. माननीय आएशा (रजि.) यांचे बालपण माननीय अबू बकर सिद्दीक (रजि.) यांच्या छत्रछायेत गेले. त्या लहानपणापासूनच बुद्धिमान व चाणाक्ष होत्या. बालपणीची प्रत्येक गोष्ट त्यांना आठवत होती. तेवढी स्मरणशक्ती इतर साहबी साहबीयांची नव्हती.

पैगंबरांशी विवाह होण्यापूर्वी माननीय आएशा (रजि.) यांचे लग्न जूबेर बिन मतआम यांच्या मुलाशी ठरले होते. परंतु त्या मुलाच्या आजीच्या सांगण्यावरुन हा विवाह जुबेरने मोडला. कारण माननीय अबू बकर (रजि.) यांचे सर्व कुटुंबीय मुस्लिम झाले होते. खुला बिन्ते हकीम (रजि.) यांनी पैगंबरासाठी आएशा (रजि.) यांना विवाह करण्याबाबत संदेश दिला. अबू बकर (रजि.) यांनी आश्चर्याने विचारले, ``मी त्यांचा मानलेला भाऊ आहे. भावाच्या मुलीबरोबर लग्न होऊ शकते काय?'' पैगंबरांना (स.) येऊन खुला (रजि.) ने विचारले असता पैगंबर म्हणाले, ``अबू बकर (रजि.) माझे धर्मबंधु आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलीशी विवाह होऊ शकतो.'' ऐवूâन अबू बकर (रजि.) खूश झाले. आपली मुलगी पैगंबरांची पत्नी होणार याचा त्यांना आनंद झाला. हा विवाह पार पडला. पाचशे दिरहम महर देऊन अबू बकर (रजि.) यांनी स्वत:च निकाह पढवून हा विवाह संपन्न केला.

एकदा अरबस्तानात शव्वाल महिन्यात प्लेग पसरला व त्याने वस्त्या उजाड झाल्या होत्या. माननीय आएशा (रजि.) यांचा विवाह याच महिन्यात झाला व काही वर्षांनंतर याच महिन्यात सासरी त्यांची पाठवणी केली गेली. तेव्हापासून या महिन्याला अशुभ समजणे बंद झाले. माननीय आएशा (रजि.) यांच्याशी विवाहाची शुभवार्ता पैगंबर (स.) यांना   स्वप्नात दिली गेली होती. स्वप्नात त्यांनी पाहिले की एकजण रेशमी कपडात गुंडाळलेली एक वस्तु पैगंबरांना दाखवीत म्हणाला, ``ही वस्तु तुमची आहे.'' पैगंबर (स.) यांनी ती उघडली तर त्यात माननीय आएशा (रजि.) यांचा चेहरा दिसला. हा विवाह अत्यंत साधेपणाने झाला. त्या म्हणत, ``मी मैत्रिणीबरोबर खेळत होते तेव्हा माझ्या आईने घराबाहेर जाण्यास प्रतिबंध करेपर्यंत मला त्या विवाहाची काहीच कल्पना नव्हती.'' जेव्हा त्या जन्मल्या तेव्हा आई-वडील मुस्लिम होते. त्यामुळे त्याच्या जन्मापासूनच इतर धर्माचे संस्कार त्यांना मिळाले नाहीत.


mother child

जगातील सगळ्यात कठीण काम लहान मुलांचे संगोपन करणे हे आहे. बाळाला जन्माला घालणे आणि त्याचे संगोपन करणे हा एक फुलटाईम मदर्स जॉब आहे. हे काम जगातील सर्वात महत्वाचे काम आहे. 

कारण हे काम व्यवस्थित झाले तर भविष्यात आदर्श समाज निर्माण होतो आणि जर का हे काम व्यवस्थित नाही झाले तर भविष्यात निर्माण होणारा समाज हा दिशाहीन होऊन जातो. सर्वशक्तीमान अल्लाह ने या महान कार्यासाठी स्त्रीची निवड केलेली आहे. तिची मानसिक आणि शारीरिक रचना या कामाच्या अनुरूप केलेली आहे. या कामाचे महत्व समजाऊन सांगताना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्त्रीचा दर्जा हा पुरूषापेक्षा तीन पटीने मोठा असल्याची ग्वाही दिलेली आहे. मात्र ही गोष्ट सुशिक्षित/उच्च शिक्षित जाहील (अडाणी) लोकांच्या लक्षात येणार नाही. कोणी स्त्री वेतन घेऊन आईचे कर्तव्य बजावेल, अशी अपेक्षा करणेच मुदलात मुर्खपणाचे लक्षण आहे. 

साधारणपणे नौकरी करणाऱ्या स्त्रीया एकतर बाळ जन्माला घालायला उत्सुक नसतात. जन्माला घा-तलेच तर बाळाला प्ले ग्रुपमध्ये टाकून किंवा घरी एखादी महिला नोकरीला ठेवून बाळाला सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकून निघून जातात. बाळाला सांभाळ करण्याची कठीण जबाबदारी थोड्याश्या वेतनावर करतांना अशा महिलांच्या नाकी नऊ येते. मग त्या बाळांना शांत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबतात. कधी मारहाण करतात, कधी झोपेच्या गोळीचा तुकडा त्यांना खाऊ घा-लतात, कधी अफू तर कधी अल्कोहलयुक्त खोकल्याचे औषध त्यांना पाजवितात. एकदा बाळ झोपलं की मग अशा स्त्रीया मस्त टि.व्ही. पाहत बसतात. बाळाच्या आईला परत आल्यानंतर सकृतदर्शनी बाळ व्यवस्थित दिसते. पण नियमितपणे झोपेची गोळी, अफू,अल्कोहोल युक्त खोकल्याचे औषध इत्यादी दिल्यामुळे बाळाची शारीरिक आणि बौद्धीक वाढ खुंटते. ही गोष्ट मूल मोठं झाल्यावर लक्षात येते. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आईने आईची जबाबदारी कुठल्याही कारणासाठी टाळू नये. मग लाखो रूपयांच्या वेतनाची नोकरीही बाळाच्या स्वास्थ्यापुढे महत्वहीन ठरते. याचा महिलांनी विचार करणे खारघरच्या या घटनेनंतर आवश्यक झालेले आहे. 

इस्लामने बाळाच्या संगोपणाची महान  जबाबदारी आईवर अशीच नाही सोपविली. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटंले आहे की, माँ की गोद बच्चे की पहली  दर्सगाह होती है. अर्थात आईच्या कुशीत बाळाची पहिली शाळा असते. एवढेच नव्हे तर विज्ञानाने हे सिद्ध झालेले आहे की, आईच्या शरिराचा संपर्क आणि स्नेह बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी अत्यावश्यक असतो. नोकरी करणाऱ्या स्त्रीचा स्पर्श हा आईच्या स्पर्श आणि स्नेहाची बरोबरी करूच शकत नाही, हे या सुशिक्षित अडाणी लोकांच्या लक्षातच येत नाही. यांनी आपल्या गरजा एवढ्या उंचीवर नेवून ठेवलेल्या आहेत की, महिलांना काम केल्याशिवाय, त्यांची पूर्तताच होऊ शकत नाही. 

घराची कामे करणे आजकाल काही घराण्यांमध्ये हलकेपणाचे लक्षण मानले जाते. फक्त नोकरपेशा महिलाच नव्हे तर उच्च उत्पन्न गटातील काही गृहिणी सुद्धा घरातील काम करणे म्हणजे कमीपणाचे लक्षण समजतात. म्हणून अशा घरांमध्ये लहान मुलांना सांभाळण्यासाठी, स्वयंपाक व इतर कामांसाठी एक किंवा एकापेक्षा जास्त महिलांना नोकरीवर ठेवले जाते. अशा नोकरपेशा महिला/ पुरूषांमुळे अनेक कुटुंबांना अनेक वेळेस अपरिमित नुकसान सोसावे लागलेले आहे. अशा नोकरांकडून टीप दिली गेल्याने अनेकवेळेस घरावर डाके पडलेले आहेत. वृद्धांची हत्या झालेली आहे. अनेक महिलांवर बलात्कार झालेले आहेत.  लहान मुले किडनॅप झालेली आहेत. कमी वेतनामुळे नाराज कामगार महिला अशी कृत्य करतात. 

स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या महिलांनी पूर्वगृह बाजूला ठेवून इस्लामने महिलांना कोणते अधिकार दिलेले आहेत व त्यांचे कोणते कर्तत्व सांगितलेले आहे याचा अभ्यास करावा आणि आपल्या बाळाची देखभाल स्वतः करावी, हीच अपेक्षा. 



- प्रा. दत्तप्रसन्न साठे

या पुस्तिकेत प्रा. दत्तप्रसन्न साठे, यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांचा अल्पसा परिचय वाचकास करून दिला जेणेकरून अंतिम पैगंबराविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा वाचकाच्या मनात निर्माण होते.

आपल्या ओघवत्या भाषाशैलीत प्रा. दत्तप्रसन्न साठे यांनी पवित्र जीवनाचा अल्पसा आढावा घेतला आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनातील घटनाक्रम देऊन मोठ्या प्रभावीपणे जीवनपट डोळयांसमोर चित्रीत केला आहे. यासाठी लेखक महोदयांनी कुरआन व हदीससंग्रहाचा आधार घेतलेला दिसून येतो.     

आयएमपीटी अ.क्र. 231   -पृष्ठे - 48    मूल्य - 22  आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/e83d72myewt935jr3uwacuf1e1y6zc9u







माननीय अनस (रजि.) यांच्याकडून निवेदन आहे,

पैगंबर मुहम्मद (स.) यांना वाटेत एक खजूर पडलेली दिसली (सापडली) तेव्हा ते म्हणाले, ‘‘जर मला आशंका नसती की ही खजूर दानपुण्य केलेली नाही तर मी ही खजूर खाल्ली असती.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे मला शंका आहे की ही खजूर दान केलेल्या खजुरींपैकी आहे आणि कुणाच्या हस्ते नेताना रस्त्यात ही खजूर पडली असावी. म्हणून ही खजूर खाणे माझ्यासाठी वैध नाही अन्यथा या खजुरीला उचलून घेऊन खाण्यात काहीच वाईट नव्हते. ती खजूर दान केलेल्या खजुरींपैकीच असेल, असे नव्हे परंतु ही खजूर दान केलेल्यापैकी (सदका) असू शकते म्हणून हिला न खाणे हेच योग्य आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget