‘‘मी कधी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांना अशा प्रकारे हसताना पाहिले नाही की तोंड पूर्णत: उघडे आहे आणि आतील कंठी दिसू लागेल. पैगंबर केवळ स्मितहास्य करीत असत जेव्हा आकाशात ढग व सोसाट्याचा वारा पहात तेव्हा त्यांचा चेहरा बदलून जात ज्याला सहज समजले जात असे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांचा चेहरा भयभीत होण्याची लक्षणे स्पष्ट दिसत असत. त्यांचे हृदय नेहमी ईशभययुक्त असे. आकाशात ढग आच्छादित होणे व सोसाट्याचा वारा वाहणे, यावर ते अधिक चिंतीत होत असत, कारण ढग व हवेच्या मागे एखादे वेळी ईशप्रकोपाची वीज तर दडलेली नसावी.
एका हदीसनुसार कळते की अशा परिस्थितीत त्यांची चिंता अधिक वाढत असे, ज्यामुळे ते घरात व घराबाहेर ये-जा करीत असत. त्यांची ही व्याकुळ स्थिती तेव्हाच संपत असे जेव्हा पाऊस पडणे सुरू होत असे.
माननीय आएशा (रजि.) यांनी पैगंबरांना त्यांच्या व्याकुळतेविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘हे आएशा! कोणास ठाऊक, हे ढग तेच तर नाहीत ज्यांच्याविषयी आदच्या राष्ट्रातील लोकांनी सांगितले होते, ‘हे ढग आहेत, पाऊस पडेल.’ परंतु आद लोकसमुदाय भ्रमात राहिला होता. ईश्वराने त्या राष्ट्राला नष्ट करून त्वरित त्यांचा हा भ्रम दूर केला.’’
रोजाचे शारीरिक फायदे
1. वजन कमी होते : सतत एक महिना नियमितपणे 14 तास उपाशी राहिल्यामुळे रोजेधारकांचे वजन कमी होते. टेक्सास विद्यापीठाने या संबंधी जे संशोधन केलेले आहे त्यात म्हटलेले आहे की, बराच काळ रिकाम्यापोटी राहिल्याने किंवा सातत्याने कमी खाल्ल्याने शरिराचे वजन कमी होते. रोजे केल्याने शरिरातील पेशींवर ताण पडतो व त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
2) बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो : अनेक आहार तज्ज्ञांचे यावर एकमत आहे की रमजानचे रोजे ठेवल्याने वजन कमी होण्यासोबतच रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलची मात्रा सुद्धा कमी होते. त्यामुळे हृदयाची क्षमता वाढते. हृदयघात आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारापासून माणूस सुरक्षित राहतो.
3) पचनक्रिया मजबूत होते : आपण वर्षभर भरपूर खात आणि पीत असतो. अनेकजणांना घास 32 वेळा चाऊन खाने गरजेचे असते याची एक तर माहिती नसते किंवा वेळ नसतो. घास व्यवस्थितरित्या चर्वन न करण्याच्या सवयीमुळ अर्धवट चावलेले अन्न नित्यनेमाने पोटात ढकलले गेल्यामुळे पचन क्रियेवर सातत्याने अतिरिक्त तान पडत असतो. ही जवळ-जवळ सर्वांचीच परिस्थिती आहे. पोटाला स्वतःच्या कामाबरोबर दातांचेही काम करावे लागते. रोजांच्या काळात दिवसभर काहीही पोटात जात नसल्यामुळे पोटाला अर्थात पचन संस्थेला आराम मिळतो. झोपल्याने जसे शरीर ताजे तवाने होते तसेच रोजे राहिल्याने पचनसंस्था ताजी तवानी होते. सातत्याने 14 तास लांब कालावधीसाठी उपाशी राहिल्याने शरिरात अॅडीपोने्निटन नावाचेे हारमोन तयार होते जे की पचन संस्थेला अन्नातील पौष्टिक घटक पचविण्यास मदत करते. थोडक्यात सतत 30 दिवस रोजे केल्याने पचन संस्था सुधारते.
4) वाईट सवईपासून सुटका : तंबाखू, पान, बिडी, सिगारेट, दारू सतत काहीबाही खाने, सतत गोड आणि तळलेले पदार्थ खाने, पाकेट बंद फरसान फस्त करणे, चहा, कॉफी, कोल्ड्रींक्स पीनेे या सारख्या वाईट सवई रमजानच्या 30 दिवसांच्या रोजांच्या पालनामुळे सुटण्यामध्ये मदत होते.
मनोवैज्ञानिक फायदे
फक्त दिवसभर काही न खाणे आणि न पिणे यालाच बहुतेक लोक रोजा समजतात. पण प्रत्यक्षात तसे नाही. रमजानमध्ये दिवसा उपाशी राहणे हा शरिराचा रोजा झाला. पण वाईट न पहाणे, वाईट कृत्य न करणे, वाईट न बोलने, वाईट न ऐकणे, सतत इबादत करत राहणे, रात्रींची 20 रकाअत अतिरिक्त नमाज अदा करणे, सतत पवित्र वातावरणात रहाणे अपेक्षित आहे. एरव्ही माणसे छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल आपसात वाद घालत असतात. रोजांच्या अवस्थेत त्यापासून रोखलेले आहे. शांत राहणे, कुणाशीही वाद न घालणे, पुढचा स्वतः होऊन वाद घालत असेल तर तरी त्याला अतिशय नम्रपणे ’मी रोजादार आहे’ येवढंच उत्तर देणे, गरीबांना आपल्या बचतीतून 2.5 टक्के जकात देणे व घरातील प्रत्येक लहान-थोरांच्या नावे पावणे दोन किलो गहू अथवा त्याची किमत गरीबांमध्ये फितरा (दान) म्हणून ईदच्या नमाजला जाण्यापूर्वी अदा करणे, सातत्याने कुरआनचे पठण करणे, वगैरे क्रिया या महिन्यात महिनाभर केल्या जातात. ज्यांचे अतुलनीय असे मानसिक लाभ मिळतात व रोजादाराचे चारित्र्य या 30 दिवसांच्या कठीण उपासनेच्या मुशीतून ताऊन-सुलाखून निघते व रोजादारांना यातून एवढी ऊर्जा मिळते की पुढील रमजानपर्यंत चांगले चारित्र्य जपण्यासाठी ती पुरेशी ठरते. थोडक्यात रमजानच्या रोजांमुळे माणूस आरोग्यवानच नव्हे तर चारित्र्यवान सुद्धा बनतो. शरीरासोबत मनही शुद्ध होते.
पुरुष आणि स्त्री
पुरुष आणि स्त्री एकमेकांची वस्त्रे आहेत. (पवित्र कुरआन) वत्र् जसे माणसाचे थंडी, उष्णता आणि इतर त्रासांपासून रक्षण करते त्याचप्रमाणे पुरुष आणि महिलेचेही आहे. दोघे एकमेकांच्या सुरक्षेचीी काळजी घेतात. वस्त्र परिधान केल्याने जसे माणसाला सौंदर्य प्राप्त होते, तसेच सौंदर्य स्त्री-पुरुष यांच्या संबंधामुळे दोघांना प्राप्त होते. वस्त्र धारण करण्याने जसे शरीरावरील अवगुण झाकले जातात त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकतात. स्त्री आणि पुरुष या दोघांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. जे जे अधिकार स्त्रीला प्राप्त आहेत तेच अधिकार पुरुषालाही प्राप्त आहेत. पवित्र कुरआनने आई-वडील आणि इतर नातलगांमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांना वाटा दिलेला आहे. स्त्री स्वत:चा व्यापार किंवा कोणताही दुसरा व्यवसाय करू शकते. या व्यवसायातल्या कमाईवर स्त्रीचा पूर्ण अधिकार असेल. जर तिच्याकडे मालमत्ता, शेत-जमीन, घरदार असेल तर कुणालाही न विचारता, कुणाचीही संमती न घेता ती विकू शकते. स्त्रीच्या चालचरित्रावर आरोप लावल्यास भयंकर पाप म्हटले गेले आहे. पवित्र कुरआनात असे म्हटले आहे की, “जे लोक पावित्र्यसंपन्न महिलेवर आरोप लावतात आणि त्यासाठी ४ लोकांची साक्ष आणू शकत नाहीत अशा लोकांना ८० फटके मारून शिक्षा द्या आणि पुढे कोणत्याही प्रकरणात त्यांची साक्ष कबूल करू नका. (कुरआन, सूरह नूर-५)” आपल्या शेवटच्या हजप्रसंगी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जे प्रवचन दिले होते त्यामध्ये असे म्हटले आहे की, “लोकहो, तुमच्यावर तुमच्या पत्नीचे हक्काधिकार आहेत, तसेच त्यांच्यावर तुमचे अधिकार आहेत. तुमच्या पत्नींनी इतर पुरुषांना तुमच्या बिछान्यावर बसू देता कामा नये. ज्यांना तुम्ही पसंत करीत नाही त्यांनी तुमच्या घरी विना परवानगी येऊ नये. आपल्या पत्नीशी सौहार्दाने वागा, अल्लाहचे नाव घेऊन तुम्ही तिचा स्वीकार केला आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करा, कैद्यांप्रमाणे घरी बंदिस्त करून ठेवू नका. पत्नीसंबंधी कुरआनात म्हटले आहे की त्या सदाचारी आहेत अल्लाहच्या आज्ञा पाळतात. पतीच्या गैरहजेरीत त्याच्या हक्काधिकारांचे संरक्षण करतात.”
- सय्यद इफ्तिखार अहमद
बर्थ कंट्रोल ही एक यहुदी चळवळ आहे. यास िख्र्चाश्नांनी प्रथम प्रसिद्धी दिली आणि हळूहळू तिला जागतिक रुप देण्यात आले. सामाजिक नीतीमूल्ये यामुळे उद्ध्वस्त झाली. म्हणून आज या चळवळीच्या व्यावहारिक परिणामांना जाणून घेण्याची अत्याधिक आवश्यकता निर्माण झाली आहे. ही पुस्तिका विश्लेषनात्मक महत्त्व ठेवून असल्याने तिचे महत्त्व अधिक आहे.
या पुस्तिकेत या चळवळीचे दुष्परिणामांना स्पष्ट करुन वाचकांपुढे वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आयएमपीटी अ.क्र. 256 -पृष्ठे - 64 मूल्य - 30 आवृत्ती - 1 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/hkk64qggokzcl43lvo78fxncazeegnf9
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मी का म्हणून आनंद व सुखाचा उपभोग घ्यावा जेव्हा की वस्तुस्थिती तर ही आहे की नरसिंग फुंकणाऱ्या देवदूताने (फरिश्ता) नरसिंगास आपल्या तोंडात घेतले आहे. तो खाली मान करून उभा आहे आणि कान देऊन प्रतिक्षेत आहे की केव्हा त्याला सूर फुंकण्याचा आदेश दिला जातो.’’
साथीदारांनी विचारले, ‘‘या अवस्थेत तुम्ही आम्हाला कोणता आदेश द्याल?’’
पैगंबर म्हणाले, ‘‘सांगा! आम्हासाठी अल्लाह पुरेसा आहे आणि तो उत्तम कार्यसाधक आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण
अर्थात, ज्या व्यक्तीला या स्थितीचे गांभीर्य कळेल की देवदूत सूर फुंकण्यास अगदी तयार आहे, कोणत्याही वेळी कयामत येऊ शकते आणि ज्याला या स्थितीची पूर्ण जाणीव आहे तो चैनीत कसा राहू शकेल? जगातील कोणतेही सुख व आराम त्याला या स्थितीपासून निश्चिंत राहू कसे देतील? त्याला हीच चिंता लागून राहील की या जगात त्याच्या जीवनाचा प्रत्येक क्षण कारणी लागावा आणि जीवनक्षण व्यर्थ जाऊ नये. तो मनुष्य सतत ईशभय बाळगून जीवन जगत राहील.
मनुष्य ज्या परिस्थितीतून जात आहे जर त्याला त्याची गंभीरता जाणवेल तर तो कदापि चैनीत राहणार नाही. अशा स्थितीत मनुष्यासाठी योग्य कार्यनीती ही आहे की त्याने अल्लाहची अवज्ञा व अपराधांपासून अलिप्त राहावे आणि ईशभक्तीची (बंदगी) कधीही उपेक्षा करू नये. परंतु दृढविश्वास मात्र त्याला स्वत:च्या कामगिरीवर नव्हे तर आपल्या अल्लाहवर असावयास हवा. कोणावर भरोसा व विश्वास ठेवला जाऊ शकतो तर ते दुसरे इतर काहीही नसून अल्लाहच आहे. मनुष्याने अल्लाहलाच आपला कार्यसाधक समजावे आणि आपला मामला त्याच्याच हवाली करावा आणि घोषित करावे की अल्लाह आमच्यासाठी पर्याप्त आहे. संकट काळात याचमुळे शांती प्राप्त होऊ शकते.