Latest Post

- सय्यद अबुल आला मौदूदी

    या पुस्तिकेत एक लेख आहे इ.स. 1962 साली हजच्या प्रसंगी इस्लामी जगताच्या विद्वतजनांसमोर वाचण्यात आला होता.
    यात इस्लाम आणि सामाजिक न्याय, सत्याच्या रूपात असत्य, सामाजिक न्याय फक्त इस्लाममध्येच आहे, न्याय हेच इस्लामचे उद्दीष्ट आहे, इस्लामी न्याय, सामाजिक सेवा, व्यिक्त स्वातंत्र्य, सामाजिक संस्था आणि त्यांची सत्ता, भांडवलशाही व समाजवादाच्या त्रुटी, समाजवाद हे सामुहिक अत्याचाराचे अंतिम टोक इ. विषयावर चर्चा आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 140   -पृष्ठे - 16    मूल्य - 08      आवृत्ती - 2 (2011)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/oimmruwz0affdhqxrjlc6ugeaeq50hu6

शेगाव येथे मस्जिद परिचय


शेगाव (शोधन सेवा)
इस्लाम धर्मातील रूढी, परंपराची अन्य धर्मियांना माहिती व्हावी आणि मुस्लिम समाजाबाबत असणारी नकारात्मक धारणा बदलावी. तसेच मस्जिदमध्ये नेमके काय चालते हे समजून  घेण्यासाठी शेगाव येथे मस्जिद परिचय हा उपक्रम रविवार, 4 ऑगस्ट रोजी घेण्यात आला.
संतनगरी शेगाव येथील जामा मस्जिदमध्ये मस्जिद परिचय कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील हूड, माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, पत्रकार अविनाश  दळवी, हभप शास्त्री , इस्लामचे विचारवंत इश्तीयाक अहेमद, मुहम्मद अमीन, मुहम्मद हारून यांच्यासह जमाअते इस्लामी हिंदचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
जो सर्व समाजाला एकत्र आणतो, सर्वांना सोबत घेऊन चालतो तो खरा धर्म. या तत्वाला समोर ठेवून जामा मस्जिद ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. मस्जिद  पाहण्यासाठी आलेल्या सर्वधर्मीय लोकांचे मस्जिद ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यांची वेगवेगळ्या गटात विभागणी करून मस्जिदीसंबंधीची सविस्तर माहिती देण्यात आली.  त्यात वजू कशाला म्हणतात, नमाज कशी अदा करतात इत्यादी बद्दल माहिती देण्यात आली. कितीवेळेस नमाज होते, शुक्रवारच्या नमाजचे महत्वही यावेळेस समजावून सांगण्यात  आले. प्रास्ताविक मुहम्मद जाकीर यांनी केले. मुफ्ती अनिस आणि हिदायत शेख यांच्या व्याख्याना पश्चात नमाजचे प्रात्यक्षिकही दाखविले गेले. अनेक मुस्लिमेत्तर बांधवांनी जोहरच्या   नमाजामध्ये सामील होऊन सामुहिक नमाजचा अनुभव घेतला. काहींनी गॅलरीत बसून नमाजचे दृश्य आपल्या डोळ्यात साठवून घेतले. हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत शेगाव  शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनिल हुड, माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, पत्रकार अविनाश दळवी, हभप शास्त्री यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमातून शहरातून मोठा प्रतिसाद  मिळाला. आपसामध्ये एकोपा घडवून आणण्याचे एक उत्तम स्थान म्हणजे मस्जिद. अशी भावना म्हणजे अनेक अन्य धर्मीय बांधवांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार पत्रकार फहीम  देशमुख यांनी मानले. मौलाना कलीम सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात जमाअते इस्लामी हिंदचे स्थानिक सदस्यांचाही समावेश होता. यावेळेस  जमाअततर्फे दोन कुरआन करून 20 पुस्तिका मुस्लिम्मेत्तर बांधवांना जमाअततर्फे देण्यात आले.

बकर ईद म्हणून सर्वसाधारणपणे आपल्या देशात जो उत्सव प्रचलित आहे त्याचं खरं नाव ईद उल अज़हा आहे. ईद उल अज़हा म्हणजे आहुती देण्याचा सण होतो. याला त्यागोत्सव  देखील म्हटलं जाऊ शकतो. हा एक संस्कार आहे. आज आपण एका जनावराची आहुती देतोय, पण उद्या सत्यासाठी, मानवी समाज व देशासाठी प्राणाची, मालमत्तेची, वेळ व  कलागुणांची आहुतीही द्यावी लागली तरी त्यासाठी आपण तयार असण्याची त्यागाची मानसिकता या संस्कारातून निर्माण होते. हा कोणताही नवस किंवा बळी देण्याचा अंधश्रद्धेचा प्रकार  नाहिये. उलट मटणाची भाजी खाल्याने पाप लागते, विटाळ होतो, हीच एक अंधश्रद्धा आहे. हीच अंधश्रद्धा अस्पृश्यतेच्या आणि मॉब लिंचिंगच्या मूळाशी आहे. हा खाद्य विटाळ दूर होणे  आज आवश्यक आहे...
हज यात्रेचे सर्व सोपस्कार मक्का शहर व त्याच्या भोवताल परिसरातच पूर्ण केले जातात. दर दरवर्षी अरबी वॅâलेंडरमधील जिलहज्ज महिन्याच्या आठ तारखेला प्रत्यक्ष हजला सुरूवात  होते, तर पुढील पाच दिवस हाजी लोकांचे विविध सोपस्कार केले जाऊन बारा तारखेला त्याची सांगता होते.
खाली लुंगीसारखं एक कापड गुंडाळून आणि वर एका कपड्यानं अंग झाकलं जातं. त्याला अहेराम म्हणतात. पण फक्त या दोन कपड्यांनाच अहेराम म्हटले जात नाही, तर अहेराम ही  एक अवस्था आहे. या अवस्थेत काही विशिष्ट गोष्टी अवैध ठरविल्या गेल्या आहेत. जसे शिवलेले कपडे नेसणे, उंच बूट नेसणे, सुगंधीत अत्तर किंवा इतर क्रिम वगैरे लावणे, शरीर- संबंध करणे, शरीरसंबंधांविषयी शृंगारिक चर्चा करणे, विषारी जीवांव्यतिरीक्त इतर जीवांची शिकार करणे, भांडणं करणे, केसं कापणे, नखं कापणे इत्यादी गोष्टी अवैध ठरविल्या गेल्या  असून त्यावर या अवस्थेत प्रतिबंध लागू होतात. म्हणूनच अहेराममध्ये पुरूषांनी फक्त दोन कपडे नेसायचे असतात. पायात साधी स्लीपर घालायची असते.
महिलांचा अहेराम म्हणजे फक्त चेहऱ्याला कपडा लागू द्यायचा नाही. त्यामुळे बऱ्याच महिला तिथे एकतर चेहरा उघडा ठेवतात किंवा एक हॅटसारखी टोपी नेसतात आणि त्या टोपीला  एक कपडा जोडून तो खाली लोंबकळता सोडून देतात. महिला अहेरामच्या व्यस्थतीत साधे कपडे नेसू शकतात. त्यावर बुरखा नेसू शकतात. असा अहेराम नेसून मक्का शहरातील  मस्जिद-एहराम येथे भाविक प्रवेश करतात. या मशिदीच्या सर्वसाधारपणे मध्यभागी काबागृह आहे.
हजयात्रेचा केंद्रबिंदू म्हणजे काबागृह. याविषयी कुरआनातील अध्याय क्रमांक ३ मधील श्लोक क्रमांक ९६ मध्ये अल्लाह सांगतो - ‘‘निसंशय (जगातलं) सर्वात पहिलं उपासनागृह (धर्मस्थळ) जे मानवांकरिता बांधण्यात आले आहे, ते (म्हणजे जे) मक्का शहरी विद्यमान आहे.’’
इथे ‘मानवांकरिता’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. म्हणजे अल्लाह अन् त्याच्या प्रेषितांशी इमान राखणारा कुणीही तिथं जाऊ शकतो, उपासना करू शकतो, मग तो कोणत्याही जातीपातीत जन्मलेला का असेना, कारण हे धर्मस्थळ मानवांकरिता बांधलेलं आहे. परंतु फक्त पर्यटन म्हणून, मौज मजा करण्याकरिता तीथं जाता येत नाही.
काबागृहाची चारही टोकं ज्या देशांच्या दिशेने आहेत, त्या देशांवर आधारित त्यांची नावं दिलेली आहेत. महत्त्वाचं म्हणजे काबागृहाच्या पुर्वेकडे म्हणजे भारताच्या दिशेने असलेल्या कोपऱ्याला चक्क ‘रूवन-उल-हिंद (भारताकडचा कोपरा)’ असे नाव आहे. ही आम्हा भारतीयांसाठी अभिनास्पद बाब आहे. या काबागृहाच्या भोवती विविध देशांतून आलेले अल्लाहचे  भाविक भक्त जेंव्हा गोलाकार रांगेत नमाज पढण्याकरिता उभे राहतात, तेंव्हा जागतिक मानवी एकात्मता अक्षरश: आपण डोळ्याने पाहू शकतो. त्या वेळी एक अश्वेत वर्णीय आफ्रीकन  हा गौरवर्णिय प्रेंâच माणसाच्या खांद्याला खांदा लाऊन उभा असतो. एक रशियन हा अमेरिकन माणसाच्या खांद्याला खांदा लाऊन उभा असतो. विविध भाषा बोलणारे इथे एकाच भाषेत  मंत्रोच्चार करतात. हा एक सांस्कृतिक चमत्कारच म्हणावा लागेल. इथे येऊन सगळे वर्णभेद, सगळे जातीभेद, सगळा प्रांतवाद, सगळे राष्ट्रभेद लोकं विसरून जातात. अशा प्रकारे काबा 
हे आंतरराष्ट्रीय मानवी एकात्मतेचे केंद्र आहे. ईदच्या दिवशी याच एकात्मेच्या दुधात मानवी प्रेमाची साखर पडते आणि जगभरात बंधुत्त्वाच्या भावनेने ओतप्रोत असं एक उत्साहाचं वातावरण पसरतं.
काबागृहावर नजर पडतातच ही प्रार्थना म्हटली जाते- ‘‘अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर,अल्लाहु अकबर व ला इलाहा इल्लाहो व अल्लाहु अकबर’’ याचा भावानुवाद असा होतो - अल्लाहच (ईश्वरच) सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाहच सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाहच सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाहशिवाय कुणीही उपासना करण्यास लायक नाही, अल्लाहच (ईश्वरच) सर्वश्रेष्ठ आहे.  याशिवाय आणखीही काही दुआ येथे म्हटल्या जातात. त्यानंतर काबागृहाभोवती सात प्रदक्षिणा घातल्या जातात. नमाज पढली जाते. जवळच असलेल्या सफा व मर्वा या दोन  टेकड्यां दरम्यान धावत पळत सात फेऱ्या मारल्या जातात. याला ‘सई’ म्हणतात. या सईची पाश्र्वभूमीदेखील बोधप्रद आहे. ती पाश्र्वभूमी जाणून घेण्याकरिता आपल्याला प्रेषित इब्राहीम (अ.)   यांचा इतिहास माहित असणे आवश्यक आहे.
प्रेषित इब्राहीम (अ.) यांना ईश्वराकडून प्रेषित्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी समाज सुधारणेला सुरूवात केली. चळवळीच्या कामानिमित्त प्रेषित इब्राहीम (अ.) हे ईश्वरी कार्याकरिता  पॅलेस्टीनला जात असताना त्यांची पत्नी हाजरा व त्यांचं तान्हं बाळ (प्रेषित इस्माईल अ.) यांना एकटेच सोडून गेले होते. त्या वेळी मक्का शहर हे पूर्णपणे विराण झालेलं होतं. प्रेषित  नूह यांच्या काळात आलेल्या महाजलप्रलयात कस्रfचत ही वस्ती त्या वेळी उद्ध्वस्त झालेली असणार बहुतेक. त्यामुळे प्रेषित इब्राहीम (अ.) आले त्यावेळी मक्का हे शहर वसलेलं  नव्हतं. काबागृहाचाही जिर्णोद्धार अजून व्हायचा होता. चोहीकडे भयाण प्रचंड वाळवंटी प्रदेश. आजूबाजूला सफा व मर्वा नावाच्या दोन टेकड्या होत्या. आदरणीय हाजरा यांचं लेकरू एकदा  तहानेने रडत होतं. आपल्या लेकराला पाणी पाजण्याकरिता त्या इकडं तिकडं पाहू लागल्या. तेंव्हा त्यांना दूरवरच्या सफा टेकडीवर पाणी दिसू लागलं. हाजरा त्या दिशेने धावत गेल्या.  पण टेकडीवर पोहचल्यावर त्यांना तिथं पाणी सापडलं नाही. वाळवंटी भागात जमिनीतून निघणारी वाफ ही दुरून पाणीच दिसते. याला ‘मृगजळ’ म्हणतात. हाजरांना मृगजळ दिसत  होतं. सफा टेकडीवरून पाहिलं असता त्यांना मर्वा टेकडीवर पाणी असल्याचा भास झाला. म्हणून त्या तिकडेही धावत सुटल्या. पण तिथंही पाणी नव्हतं. तेदेखील मृगजळच होतं. अशा  प्रकारे तहानेने कासाविस झालेल्या आपल्या लेकरासाठी भर उन्हात उजाड- वैराण वाळवंटी सफा-मर्वा टेकड्यांदरम्यान त्या सैरावैरा धावत होत्या. लेकरासाठी धावपळ करणाऱ्या त्या  आईवर अल्लाहला दया आली. हाजरांचं लेकरू ज्याठिकाणी रडत होतं, तिथून अल्लाहने एक झरा फोडला. त्या झऱ्याच्या पाण्याला हाजरांनी वाळूने अडवलं आणि ‘‘ज़म़जम (थांब-थांब)’’  म्हटलं. अशाप्रकारे त्या झऱ्याला ज़म़जम नाव पडलं. आज त्या झऱ्याचं पाणी पाइपद्वारे दूरदरपर्यंत नेण्यात आलं. मस्जिद-एहराममध्ये जागोजागी नळांद्वारे या झऱ्याचं पाणी उपलब्ध  आहे. अतिशय चवदार, पवित्र, आरोग्यदायी व शुद्ध असं पाणी. नेहमी वाहतं पाणीच शुद्ध असते. एका जागी तुंबलेलं पाणी हे शुद्ध असूच शकत नाही. पण ज़म़जम याला अपवाद आहे.   एकाच ठिकाणी साठलेलं हे पाणी हजारों वर्षांपासून शंभर टक्के शुद्ध असल्याचं वैज्ञानिक प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. आदरणीय हाजरा यांनी आपल्या तहानलेल्या लेकरासाठी पाणी  आणण्याच्या आशेने सफा व मर्वा या दोन टेकड्यांदरम्यान धावाधाव केली होती. त्या माऊलीची ती धावपळ अल्लाहला इतकी आवडली की, जगाच्या शेवटपर्यंत या दोन टेकड्यांदरम्यान  धावणे हजसाठी येणाऱ्यांकरीता अनिवार्य करून टाकलं. या धावण्याला ‘सई’ म्हणतात. हा अल्लाहने अशा महिलांचा केलेला सम्मान आहे, ज्यांचे पती किंवा वडिल हे सामाजिक  परिवर्तनाच्या चळवळीत गुंतले असल्यामुळे महिलांना कुटुंबाचं आकाश पेलावं लागतं आणि असा संघर्ष करावा लागतो. माता हाजरांच्या त्या लेकींना सलाम! सई केल्यानंतर मस्जिद- ए-हरामच्या बाहेर निघून केसांचं मुंडन केलं जाते आणि अहेराम काढून नेहमीचे कपडे नेसले जातात. या संपूर्ण सोपस्काराला उमरा म्हणतात. हजपूर्वी हा उमरा करावा लागतो. हजचे एकूण सोपस्कार पाच दिवसांत पूर्ण केले जातात. जिलहज्ज महिन्याच्या आठ तारखेला म्हणजे हजच्या पहिल्याच दिवशी अहेराम धारण करून मक्का शहराच्या बाहेर ‘मीना’ नावाच्या  एका मैदानात भाविक एक दिवस व एक रात्र मुक्काम करतात. या दिवशी भावीक भक्त तंबूत राहून नमाज पढतात, यथाशक्ती अल्लाहचं नाम:स्मरण करतात, कुरआन पठन करतात,  तर काही जन आरामही करतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ तारखेला यात्रेकरू ‘अराफात’ मैदानात जाण्याकरिता निघतात. सर्वसाधारणपणे सूर्य डोक्यावरून ढळण्यापूर्वीच या मैदानात  भाविक पोहोचण्याचा प्रयत्न करतात. या मैदानात सूर्यास्तापर्यंत थांबले जाते. भाविक इथे नमाज पढतात. इमामचे प्रवचन ऐकतात. आपल्या पापांची क्षमा मागतात, अल्लाहची करूणा भाकतात.
भूतलावरील पहिले मनुष्य व इस्लामचे पहिले प्रेषित आदम (अ.) यांना अल्लाहने जन्नतमधून खाली भूतलावर अवतरीत केले. तिथे जन्नतमधूनच आलेल्या त्यांच्या पत्नी व भूतलावरील प्रथम महिला हव्वा यांच्याशी त्याच मैदानात भेट झाली. त्या दोघांनी त्या मैदानात प्रार्थना केली. नंतर ते लगतच्या ‘मुजदलफा’ मैदानात जाऊन तिथे त्यांनी मुक्काम केला.  दुसऱ्या दिवशी ते मीना नावाच्या मैदानात आले आणि नंतर आज जिथे मक्का शहर आहे, तिथे आले. काबागृहाचा जिर्णोद्धार करून त्याला सात प्रदक्षिणा घातल्या. अशाप्रकारे मक्का  शहरातून निघून अराफातमध्ये थांबणे, नंतर मुजदलफा येथे रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मीना येथे जाऊन तिथे आणखी काही सोपस्कार पूर्ण करून पुन्हा मक्का शहरात परत  येणे आणि काबागृहाला सात प्रदक्षिणा घालणे हे सोपस्कार आजही हजयात्रेत केले जातात. म्हणून हज हा मानवी इतिहासाचा सर्वात जुना धार्मिक संस्कार मानला जातो. तसेच ईद उल  ज़ोहा हादेखील मानवी  इतिहासाचा सर्वात जुना उत्सव मानला जातो. अराफात मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे. या मैदानात आज जमतात तसं क़यामत (महाप्रलया)च्या दिवशी असंच  सगळे माणसं याच मैदानात एकत्रित जमणार आणि केल्यासवरल्याचा हिशेब अल्लाहकडून घेतला जाणार आहे. एक दिवस हे विश्व नष्ट होऊन सगळी माणसं मरणार आणि ‘हश्र’च्या   दिवशी सगळी माणसं जीवंत होऊन अल्लाहसमोर ज्या मैदानात उपाqस्थत केले जाणार, त्या मैदानाचा केंद्रबिंदू हेच मैदान राहणार असल्याची माहिती इस्लामी ग्रंथात आपल्याला  मिळते. खरंच, एक ना एक दिवस सर्वांना मरण अटळ आहे. एक दिवस हे विश्व नष्ट होणारच असल्याचं विज्ञानदेखील मानते. माणूस मेल्यानंतर ़कयामतच्या दिवशी  पुन्हा कसा  काय परत जीवंत होणार याविषयी अल्लाह कुरआनाच्या अध्याय क्रमांक १९ मधील श्लोक क्रमांक ६६ मध्ये सांगतो-
‘‘मनुष्य म्हणतो, काय खरोखरच जेव्हा मी मेलो असेन तेव्हा पुन्हा जिवंत करून बाहेर आणला जाईन? काय मनुष्याला आठवत नाही आम्ही पूर्वी त्याला निर्माण केले आहे जेव्हा तो  काहीच नव्हता?’’
माणूस आईच्या गर्भात येण्यापूर्वी कुठं असतो? आईवडिलांच्या शरीरातील दोन भिन्न तत्त्वांच्या मिश्रणातून माणूस जन्म घेतो, ते तत्त्व कुठून येते? ते जे अन्न खातात त्यातून. ते  अन्न कुठून येते? जमिनीतून, पाण्यातून. म्हणजे जमीनीतली माती, पाणी, हवा, प्रकाश व इतर तत्त्वे मिळून एक माणूस उत्पन्न होतो. त्यापूर्वी तो कुठेच नसतो. तो मोठा होतो.  मरतो. मरून त्याची माती होते किंवा राख होते. हाडं उरतात. तो जेंव्हा काहीही नसताना अल्लाह (ईश्वर) त्याला उत्पन्न करू शकतो, तेंव्हा त्याचे काहीतरी अवशेष शिल्लक असताना  का नाही त्याला पुन्हा जीवंत करू शकत? त्याला हे शक्य आहे. एक खून करणाऱ्या आणि शंभर खून करणाऱ्यालाही या जगात फक्त एकदाच फाशी दिली जाऊ शकते. तेंव्हा इतर ९९  खुनांची शिक्षा केंव्हा मिळणार? मग ईश्वर जर न्यायी आहे, तर मग तो न्याय केंव्हा करणार? यासाठी नक्कीच तो एक दिवस सर्वांना जमा करून हिशेब घेणारच आहे, यावर इमान  ठेवल्याशिवाय गत्यंतर नाही. ईश्वरावर श्रद्धा ठेऊन परलोक नाकारणे, हिशेबाचा दिवस नाकारणे म्हणजे त्याच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह उत्पन्न करून त्याचा घोर अपमान करणे होय.   अशा ईशद्रोही लोकांना तो नरकात टाकणार. म्हणून मेल्यानंतर जीवंत होऊ, यावर प्रत्येकाला इमान राखणे गरजेचं आहे. अशाप्रकारे आपण मेल्यानंतर पुन्हा जीवंत होऊन याच मैदानात  येणार आहोत, याची तीव्र जाणीव या मैदानात होते. या अरफातच्या मैदानात पहिले मानव आदम व हव्वा यांची भेट होऊन मानवी समाजाच्या लौकिक कर्मकलापाची सुरूवात इथेच  झाली होती आणि मानवी कर्मांचा हिशेब होऊन लौकिक जीवनाचा शेवटदेखील इथेच, याच मैदानात होणार आहे, इन्शाल्लाह! या ईदच्या दिवशी हजयात्रेकरू व्यतिरिक्त जगभरातील  सक्षम मुसलमान जनावरांची कुरबानी करत असतो. ईदच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या दोन दिवसांतही कुरबानी केली जाऊ शकते. या कुरबानीची जी सामाजिक पाश्वभूमी आहे,  तीदेखील समजून घेणे गरजेचे आहे. कुरबानीचा उद्देश एखाद्या जनावराचा जीव घेणे नाही. एखादा नवस फेडण्याकरिता कुरबानी केली जात नाही की फक्त पार्टी करून मौज मजा  करण्याकरिता कुरबानी केली जात नाही. अल्लाह कुरआनात अध्याय क्रमांक २२, श्लोक क्रमांक ३७ मध्ये सांगतो -
‘‘अल्लाहप्रत त्यांचं (जनावरांचं) मांस किंवा रक्त पोचत नसते तर त्यामागची तुमची निष्ठा पोचते.’’
प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी दिलेल्या आदेशावरून कुरबानीच्या मटणाचे तीन भाग केले जातात. एक भाग स्वत:साठी अन् स्वत:च्या कुटुंबियांकरिता, दुसरा भाग हा आपले नातेवाईक   व मित्रांकरिता पण मटनाचा तीसरा भाग गोरगरिबांसाठी राखून ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. अशा प्रकारे या कुरबानीच्या निमित्ताने ज्या गोरगरिबांना मटण  हे महिनोगिणती  डोळ्याने पाहायलाही मिळत नाही, अशांना या ईदनिमित्त ते खायला मिळते. म्हणून बळी व कुरबानीत फरक आहे. माणसाच्या नावाने देवासाठी बळी दिला जातो, तर अल्लाहच्या  नावाने माणसासाठी कुरबानी दिली जाते, गोरगरिबांसाठी कुरबानी दिली जाते. फक्त जनावरांचं मांस पाहून नव्हे तर गरिबांची रिकामी खळगी भरलेली पाहून अल्लाह प्रसन्न होत  असतो. त्यासोबतच सामाजिक क्रांतीकरिता आपली व आपल्या कुटुंबियांची कुरबानी देण्यासही ही कुरबानी प्रेरणा देत असते, ही ईद प्रेरणा देत असते. अशा त्याग व कुरबानीचा उत्सव असणाऱ्या ईद-उल-़जोहाच्या आपल्या सर्वांना सदिच्छा!
ईद मुबारक!

- नौशाद उस्मान

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘उत्तम उपदेशवचन अल्लाहचा ग्रंथ आणि उत्तम चरित्र मुहम्मद (स.) यांचे जीवनचरित्र आहे (ज्याचे  आज्ञापालन करावयास हवे).’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मला सांगितले, ‘‘हे माझ्या लाडक्या मुला! शक्य असल्यास तू अशाच प्रकारचे जीवन व्यतीत कर की तुझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नसावेत.’’ पैगंबर (स.) पुढे म्हणाले, ‘‘आणि हीच माझी पद्धत आहे (की माझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नाहीत) आणि ज्याने माझ्या  पद्धतीवर प्रेम केले, निश्चितच त्याने माझ्यावर प्रेम केले आणि ज्याने माझ्यावर प्रेम केले तो नंदनवनात (स्वर्गात) माझ्याबरोबर असेल.’’ (हदीस : मुस्लिम)
अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, तीन माणसे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उपासनेच्या बाबतीत माहिती घेण्याकरिता पैगंबरांच्या पत्नींकडे आले, जेव्हा त्यांना सांगण्यात आले तेव्हा  त्यांना पैगंबरांच्या उपासनेचे प्रमाण कमी वाटले. त्यांनी आपल्या मनात विचार केला की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी आमची तुलना कशी शक्य आहे? त्यांच्या हातून न पूर्वी अपराध  घडला आहे न येथून पुढे घडेल (आणि आम्ही लहान थोडेच आहोत, मग आम्ही अधिकाधिक उपासना करावयास हवी). मग त्यांच्यापैकी एकाने निश्चय केला की तो नेहमी संपूर्ण रात्र  ‘नफ्ल नमाज’ (अनिवार्य नसलेली प्रार्थना) अदा करील आणि दुसरा म्हणाला, ‘‘मी नेहमी ‘नफ्ल रोजे’ (अनिवार्य नसलेले उपवास) ठेवीन, दिवसा कधीच जेवणार नाही’’ आणि तिसरा  म्हणाला, ‘‘मी महिलांपासून अलिप्त राहीन, कधीही लग्न करणार नाही.’’ (जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांना ही गोष्ट समजली तेव्हा) पैगंबर (स.) त्यांच्यापाशी गेले आणि म्हणाले,  ‘‘तुम्ही तीच माणसे आहात काय ज्यांनी अमुक अमुक म्हटले!’’ मग पैगंबर (स.) पुढे म्हणाले, ‘‘खरोखरच मी तुमच्यापेक्षा अधिक अल्लाहचे भय बाळगणारा आणि त्याची अवज्ञा न  करणारा आहे. परंतु पाहा, मी (नफ्ली) रोजे कधी ठेवतो, कधी ठेवत नाही. त्याचप्रमाणे (रात्री) ‘नवाफिल’ (अनिवार्य नसलेली नमाज) अदा करतो आणि झोपही घेतो. तसेच पाहा, मला  पत्नीदेखील आहेत (तेव्हा तुमच्यासाठी माझ्या पद्धतीने उपासना करणेच लाभप्रद आहे) आणि ज्याच्या दृष्टीने माझी पद्धत महत्त्वाची नसेल, जो माझ्या पद्धतीकडे दुर्लक्ष करेल,  त्याच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही.’’ (हदीस : मुस्लिम)
आयशा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अगोदर एक काम करण्यास मनाई केली होती, मग त्यांनी ते काम केले जेणेकरून लोकांना माहीत व्हावे की आता पैगंबर (स.) ते काम करण्याची परवानगी देत आहेत. तरीही काही लोक ते काम करण्यास तयार झाले नाहीत. जेव्हा पैगंबरांना त्यांच्या या धारणेबाबत माहीत झाले तेव्हा त्यांनी भाषण  दिले आणि अल्लाहच्या स्तुती व गुणगान केल्यानंतर म्हणाले, ‘‘मी करीत असलेले काम करण्यापासून काही लोक का धजावत नाहीत. अल्लाह शपथ! मला त्या सर्वांपेक्षा अधिक ज्ञान  आहे आणि त्या सर्वांपेक्षा अधिक अल्लाहचे भय बाळगतो.’’ (हदीस : बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण
ज्यूंनी आपला ग्रंथ ‘तौरात’च्या शिकवणींमध्ये फेरफार  केला होता, परंतु त्यामध्ये काही सत्य गोष्टीदेखील होत्या ज्या मुस्लिम लोक ऐकत होते आणि पसंतही करीत होते. जर पैगंबर  मुहम्मद (स.) यांनी परवनागी दिली असती तर ‘दीन’ (जीवनधर्म) ला हानी पोहोचली असती. कोणत्या धर्मात काही सत्य व चांगल्या गोष्टी आढळत नाहीत? आदरणीय पैगंबरांनी जे  उत्तर माननीय उमर (रजि.) यांना दिले त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की ज्याच्या घरात स्वच्छ व निर्मळ पाण्याचा झरा असेल त्याने खडकाळ जमिनीकडे जाण्याची इच्छा बाळगू नये. 

एकेश्वरत्वाला आणि प्रेषित्वाला मान्यता तोंडी स्वरूपात दिली जाते. ते त्यांच्या शाब्दिक अर्थापेक्षा जास्त काही सूचित करते. ते तोंडी एकेश्वरत्वाचे आणि प्रेषित्वाचे अभिवचन सर्व प्रेषितांना, ईशग्रंथांना, दूतांना तसेच पारलौकिक जीवन आणि नशीब या सर्वांना मान्यता देते. थोडक्यात, हे इस्लामच्या संपूर्ण श्रध्देलाच मान्यता आहे. कारण जो प्रेषित मुहम्मद (स) यांचे प्रेषित्व मान्य करतो त्याच क्षणी तो या सर्व अदृश्य सत्यतेलासुध्दा मान्य करतो की ज्यांना प्रेषितांनी सर्वांपर्यंत पोहचविले आहेत.
एकेश्वरत्वात आणि प्रेषित्वात अंतःकरणपूर्वक श्रध्दा असणे हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग त्या श्रध्देला मान्य करणे आणि मानल्यानंतर तोंडी अभिवचन देणे होय, प्रेषितवचनांचा आणि धार्मिक विद्वानांच्या टिकात्मक साहित्याचा अभ्यास केल्यानंतर हे कळून येते की मुस्लिम (श्रध्दावंत) बनण्यासाठी फक्त मनापासून श्रध्दा असणे हे पुरेसे नाही तर त्यासाठी तोंडी अभिवचन अथवा घोषणा करणे हेसुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. तोंडी घोषित केल्याशिवाय श्रध्दा वैध ठरत नाही. तोंडी अभिवचन देणे आणि घोषणा करणे म्हणजे सत्य मान्य करणे की इस्लाम हा धर्म- परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे आणि कुजबुजणारी मुहीम मुळीच नाही. इस्लामच्या कर्तव्यांची पूर्तता एकांतात होऊच शकत नाही. हा तो धर्म आहे जो समस्त मानवतेशी उंच आवाजात संभाषण करीत आहे. (कुजबुज नव्हे) जीवनाच्या प्रचंड अशा गोगांटामध्ये इस्लाम मनुष्याला प्रस्थापित करीत आहे. इस्लाम मनुष्याला चांगल्या आणि वाईटाच्या दरम्यानच्या निरंतर चाललेल्या संघर्षात गुंतवून ठेवतो. इस्लाम मुस्लिमाला अविश्वास आणि अनाचाराच्या निरंतर लढाईतील सैनिकांमध्ये सर्वांत पुढे ठेवतो. अशा परिस्थितीत इस्लामचा स्वीकार करण्याची आम घोषणा करणे अत्यावश्यक ठरते. ती त्याच्या श्रध्दाशीलतेने (ईमानने) त्यावर सोपविलेल्या धर्मप्रचारकाची आणि कर्तव्यपूर्तीसाठी लढणारा सैनिकाच्या जबाबदारीची घोषणा आहे. म्हणून इस्लामच्या श्रध्दाशीलतेबद्दल आम घोषणा करणे हे अत्यंत महत्त्वाचे मौलिक कार्य आहे.
या मान्यतेचा आणि उद्घोषणेचा आपण जर राजकीय दृष्टिकोणातून विचार केला तर त्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. जो कोणी व्यक्ती अल्लाहच्या एकेश्वरत्वाला आणि मुहम्मद (स) यांच्या प्रेषित्वाला जाहिररित्या मान्य करून विश्वास ठेवतो, त्याला श्रध्दावंत (मुस्लिम) म्हणतात. जरी तो खरोखरच विश्वास श्रध्दा ठेवत नसेल किवा व्यवहारात इस्लामच्या कर्तव्यपूर्तीस अपयशी ठरत असेल. श्रध्दाशीलतेची (ईमानची) जाहिररित्या कबूली देऊन त्या व्यक्तीस इतर मुस्लिमांप्रमाणेच राजकीय आणि सामाजिक फायदे मिळतात. जर दुसरा एखादा व्यक्ती मनापासून इस्लामवर श्रध्दा ठेवून आहे परंतु त्याने त्यास जाहिररित्या कबूली दिली नाही तर त्याला मुस्लिम म्हणून स्वीकारले जाणार नाही. तो तर मुस्लिमेतरच राहील आणि त्याच्याशी तसाच व्यवहार केला जाईल. मनुष्याने जर इस्लामच्या श्रध्देतील अचूकपणा आणि सत्यतेवर निष्ठा ठेवली तर अशी व्यक्ती इस्लामचा मजबूत पाया प्राप्त करून घेते आणि उत्साहाने इस्लामवर श्रध्दा ठेवून जाहिररित्या त्याला मान्य करते. अशा प्रकारे मनुष्य इस्लामच्या प्रथमस्तंभास परिपूर्ण करतो म्हणजेच इस्लामच्या प्रथमस्तंभाची उभारणी करतो.

तथाकथित मुस्लिम। महॉमिडन पर्सनल लॉ मधील कायदे वास्तविक इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे ही हकीकत सिद्ध झाल्यामुळे इतर दूसर्या जमातीच्या व्यक्तिगत कायद्याहून त्याची हकीकत पूर्णपणे भिन्न आहे. इतर जमातीचे व्यक्तिगत कायदे त्यानी स्वतःहून तयार केलेले आहेत. मुस्लिम कायद्याचा उगम मुस्लिमांची बुद्धी, समज, आवडनिवड किवा त्यांचे विचार यातून झालेला नसून त्याचे उगमस्थान पवित्र कुरआन आणि सुन्नत आहे. म्हणून त्याना मुस्लिम किवा महॉमिडन पर्सनल लॉ(मुस्लिम । महॉडिन व्यक्तिगत कायदा) म्हणणे त्या कायद्याच्या मूळ दर्जावर पडदा पाडणे आहे.
वास्तविक या कायद्याला हे नाव ब्रिटिश राजकर्त्याची कुत्सित आणि अशुभ देणगी आहे. ते नेहमी मुस्लिमांची संस्कृती, सभ्यता आणि धर्म याना क्षति पोहोचवून त्यांच्या धारणाना नष्ट करण्याच्या प्रयत्नात असत. इस्लाम धर्माशी शत्रुत्व आणि इस्लाम धर्माच्या अनभिज्ञतेच्या विचारांच्या परिणतीमुळे या कायद्याला ‘‘कुरानिक लॉ’’ किवा ‘‘इस्लामिक लॉ’’ म्हणण्या ऐवजी ‘महॉमिडन लॉ’ असे नामकरण करण्यात आले. कायद्याच्या पुस्तकातुन आणि न्यायसंस्थेत हेच नांव प्रचल्लित केल्यामुळे खर्या वस्तुस्थितीची शंका सुद्धा येऊ नये अशी मखलाशी करून ठेवली आहे. मुस्लिमांच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित असणार्या शरीअतच्या कायद्याला ‘मुस्लिम पर्सनल लॉ’ नांव दिले गेले. तथापि ते मुस्लिम कायदे नसून इस्लामिक कायदे होते आणि आजही आहेत.
म्हणून या कायद्याना ‘इस्लामी व्यक्तिगत कायदा । इस्लामिक पर्सनल लॉ’ हे नाव देणे सत्य, वास्तवाला आणि प्रामाणिकपणाला धरून होईल. इस्लाम धर्माच्या अनभिज्ञतेची आज ही परिस्थिती आहे की सुशिक्षित लोकांना सुद्धा ‘इस्लामी’ आणि ‘मुस्लिम’ यातील फरक समजत नाही. अशा परिस्थितीत मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न चालू राहिल्यास त्याचा स्वाभाविक परिणाम असा होईल की, शरीयतच्या आदेशांचे मूळ चित्र सर्वसामान्य लोकांना दिसू शकणार नाहीत. हा तर मुस्लिम पर्सनल लॉ आहे, त्याच्याशी इस्लामचा काही संबंध नाही. असाच लोक विचार करतील. सर्व संबंध केवळ मुस्लिमांशी असून मुस्लिम नावांच्या समाजाचे तसेच सांस्कृतिक कायदे आहेत, जसे जगामध्ये बर्याच अन्य समाजाचे व्यक्तिगत कायदे असून त्यांच्या धर्माशी फारकत घेतलेले आणि केवळ सांस्कृतिक कायदे आहेत. इतका मोठा पायाभूत गैरसमज चालू ठेवणे आणि त्याचीच वृध्दी करत राहणे. प्रामाणिक आणि न्यायसंगत आहे काय?

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget