माननीय इब्ने अब्बास (रजि.) हे वर्णन करतात.
पैगंबर मुहम्मद (स.) बद्रच्या युद्धाप्रसंगी एका राहुटीत खालीलप्रमाणे प्रार्थना (दुआ) करत होते. ‘‘हे अल्लाह मी तुझ्यापाशी तुझ्या आश्रयासाठी याचना करतो आणि तुझे वचन पूर्ण व्हावे याची याचना करतो. हे अल्लाह! तू जर इच्छिले की (मुस्लिम नष्ट व्हावेत) तर आजनंतर तुझी इबादत (भक्ती) होणार नाही.’’
यावर अबू बकर (रजि.) यांनी पैगंबरांचा हात धरून विनंती केली, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! बस, इतके पर्याप्त आहे. तुम्ही अत्यंत द्रवणशीलतेसह व रुदनभाविभोर होऊन प्रभुशी याचना केली आहे.’’
यानंतर पैगंबरांनी चिलखत परिधान केले आणि तंबूतून त्वरित बाहेर आले आणि पुढील आयतचे ते पठण करीत होते, ‘‘सत्यविरोधकाचा हा दल लवकरच पराजित होईल आणि हे पाठ दाखवून पळत सुटतील.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण
ईश्वराने पैगंबर मुहम्मद (स.) यांना वचन दिले होते,
‘‘आणि स्मरण करा जेव्हा अल्लाह तुम्हाला वचन देत होता की दोन दलांपैकी एक दल तुमच्या स्वाधीन केला जाईल.’’ (दिव्य कुरआन, ८:७)
अल्लाहच्या या वचनाचा हवाला देऊन पैगंबर दुआ (प्रार्थना) करीत होते. अल्लाहच्या वचनावर विश्वासाव्यतिरिक्त दासाचे कर्तव्य आहे की त्याने प्रभुशी प्रार्थना व विनयपूर्वक याचना करण्याकडे दुर्लक्ष करू नये. दासाचे दास्यत्व व अल्लाहच्या महानतेची हीच मागणी आहे की दासाने अतिद्रवित भावनेसह प्रभुशी प्रार्थना करत राहावी. या प्रार्थनेमुळे इस्लामी सैन्याच्या मनाला बळ प्राप्त झाले आणि त्यांच्या उत्साहात अपार वृद्धी झाली होती.
पैगंबर चिलखत परिधान करून बाहेर आले तेव्हा त्यांच्या जिव्हेवर कुरआनची ही आयत होती जिचा उल्लेख वर आला आहे. या आयतद्वारा पैगंबर ईमानधारकांना अल्लाहकडून शुभसूचना देत होते की शत्रूवर मुस्लिमांना विजय प्राप्त होणार आहे.
Post a Comment