तिसऱ्या आयतीमध्ये ईशभय आणि धर्मपरायणतेबरोबरच एक अत्यंत महत्त्वपूर्ण शिकवण देण्यात आली आहे, ``(नेहमी) सत्य बोला.'' हृदयानंतर सर्वात महत्त्वाचा अवयव जीभ आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ``कर्मांची भिस्त कशावर आहे?'' नंतर पैगंबर (स.) यांनी आपली जीभ पकडून सांगितले, ``याला आपल्या काबूत ठेवा.'' (हदीस : तिर्मिजी, इब्नेमाजा, मुसनद अहमद)
आणखी एके ठिकाणी म्हटले,
``जी व्यक्ती मला मुख आणि गुप्तांगाच्या (वाईट बोलण्यापासून आणि व्यभिचारी कर्मांपासून) संरक्षणाची हमी देईल, त्यास मी स्वर्ग-प्रवेशाची हमी देतो.'' (हदीस : तिर्मिजी, इब्ने माजा, मुसनद अहमद)
आणखी एके प्रसंगी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
``जी व्यक्ती अल्लाहवर आणि अंतिम निवाड्याच्या दिवसावर श्रद्धा ठेवते, तिने फक्त सत्यच बोलावे अन्यथा गप्प बसावे.'' (हदीस : बुखारी, मुस्लिम)
वास्तविकता अशी आहे की, अल्लाहच्या आणि मानवाच्या हक्कांची जितकी अधिक पायमल्ली मुखावाटे होते, अन्य अवयवाद्वारे क्वचितच होते आणि कधी कधी मनुष्याला याचे ज्ञान नसते. भांडण-तंट्याची सुरवात जिभेनेच होते. जेव्हा आम्ही कमी बोलू, विचारांति बोलू, अपराधात्मक बोलणार नाही आणि तोंडाद्वारा इतराना दु:ख देणार नाही आणि नेहमी भले व सत्य बोलू तेव्हाच घरातील व बाहेरील जीवन आनंददायी बनेल.


Post a Comment