Latest Post


माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मी का म्हणून आनंद व सुखाचा उपभोग घ्यावा जेव्हा की वस्तुस्थिती तर ही आहे की नरसिंग फुंकणाऱ्या देवदूताने (फरिश्ता) नरसिंगास आपल्या तोंडात घेतले आहे. तो खाली मान करून उभा आहे आणि कान देऊन प्रतिक्षेत आहे की केव्हा त्याला सूर फुंकण्याचा आदेश दिला जातो.’’

साथीदारांनी विचारले, ‘‘या अवस्थेत तुम्ही आम्हाला कोणता आदेश द्याल?’’

पैगंबर म्हणाले, ‘‘सांगा! आम्हासाठी अल्लाह पुरेसा आहे आणि तो उत्तम कार्यसाधक आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण

अर्थात, ज्या व्यक्तीला या स्थितीचे गांभीर्य कळेल की देवदूत सूर फुंकण्यास अगदी तयार आहे, कोणत्याही वेळी कयामत येऊ शकते आणि ज्याला या स्थितीची पूर्ण जाणीव आहे तो चैनीत कसा राहू शकेल? जगातील कोणतेही सुख व आराम त्याला या स्थितीपासून निश्चिंत राहू कसे देतील? त्याला हीच चिंता लागून राहील की या जगात त्याच्या जीवनाचा प्रत्येक क्षण कारणी लागावा आणि जीवनक्षण व्यर्थ जाऊ नये. तो मनुष्य सतत ईशभय बाळगून जीवन जगत राहील.

मनुष्य ज्या परिस्थितीतून जात आहे जर त्याला त्याची गंभीरता जाणवेल तर तो कदापि चैनीत राहणार नाही. अशा स्थितीत मनुष्यासाठी योग्य कार्यनीती ही आहे की त्याने अल्लाहची अवज्ञा व अपराधांपासून अलिप्त राहावे आणि ईशभक्तीची (बंदगी) कधीही उपेक्षा करू नये. परंतु दृढविश्वास मात्र त्याला स्वत:च्या कामगिरीवर नव्हे तर आपल्या अल्लाहवर असावयास हवा. कोणावर भरोसा व विश्वास ठेवला जाऊ शकतो तर ते दुसरे इतर काहीही नसून अल्लाहच आहे. मनुष्याने अल्लाहलाच आपला कार्यसाधक समजावे आणि आपला मामला त्याच्याच हवाली करावा आणि घोषित करावे की अल्लाह आमच्यासाठी पर्याप्त आहे. संकट काळात याचमुळे शांती प्राप्त होऊ शकते.

 


तिसऱ्या आयतीमध्ये ईशभय आणि धर्मपरायणतेबरोबरच एक अत्यंत महत्त्वपूर्ण शिकवण देण्यात आली आहे, ``(नेहमी) सत्य बोला.'' हृदयानंतर सर्वात महत्त्वाचा अवयव जीभ आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ``कर्मांची भिस्त कशावर आहे?'' नंतर पैगंबर (स.) यांनी आपली जीभ पकडून सांगितले, ``याला आपल्या काबूत ठेवा.'' (हदीस : तिर्मिजी, इब्नेमाजा, मुसनद अहमद)

आणखी एके ठिकाणी म्हटले,

``जी व्यक्ती मला मुख आणि गुप्तांगाच्या (वाईट बोलण्यापासून आणि व्यभिचारी कर्मांपासून) संरक्षणाची हमी देईल, त्यास मी स्वर्ग-प्रवेशाची हमी देतो.'' (हदीस : तिर्मिजी, इब्ने माजा, मुसनद अहमद)

आणखी एके प्रसंगी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे, 

``जी व्यक्ती अल्लाहवर आणि अंतिम निवाड्याच्या दिवसावर श्रद्धा ठेवते, तिने फक्त सत्यच बोलावे अन्यथा गप्प बसावे.'' (हदीस : बुखारी, मुस्लिम)

वास्तविकता अशी आहे की, अल्लाहच्या आणि मानवाच्या हक्कांची जितकी अधिक पायमल्ली मुखावाटे होते, अन्य अवयवाद्वारे क्वचितच होते आणि कधी कधी मनुष्याला याचे ज्ञान नसते. भांडण-तंट्याची सुरवात जिभेनेच होते. जेव्हा आम्ही कमी बोलू, विचारांति बोलू, अपराधात्मक बोलणार नाही आणि तोंडाद्वारा इतराना दु:ख देणार नाही आणि नेहमी भले व सत्य बोलू तेव्हाच घरातील व बाहेरील जीवन आनंददायी बनेल.



माननीय इब्ने अब्बास (रजि.) हे वर्णन करतात. 

पैगंबर मुहम्मद (स.) बद्रच्या युद्धाप्रसंगी एका राहुटीत खालीलप्रमाणे प्रार्थना (दुआ) करत होते. ‘‘हे अल्लाह मी तुझ्यापाशी तुझ्या आश्रयासाठी याचना करतो आणि तुझे वचन पूर्ण व्हावे याची याचना करतो. हे अल्लाह! तू जर इच्छिले की (मुस्लिम नष्ट व्हावेत) तर आजनंतर तुझी इबादत (भक्ती) होणार नाही.’’

यावर अबू  बकर (रजि.) यांनी पैगंबरांचा हात धरून विनंती केली, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! बस, इतके पर्याप्त आहे. तुम्ही अत्यंत द्रवणशीलतेसह व रुदनभाविभोर होऊन प्रभुशी याचना केली आहे.’’

यानंतर पैगंबरांनी चिलखत परिधान केले आणि तंबूतून त्वरित बाहेर आले आणि पुढील आयतचे ते पठण करीत होते, ‘‘सत्यविरोधकाचा हा दल लवकरच पराजित होईल आणि हे पाठ दाखवून पळत सुटतील.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

ईश्वराने पैगंबर मुहम्मद (स.) यांना वचन दिले होते,

‘‘आणि स्मरण करा जेव्हा अल्लाह तुम्हाला वचन देत होता की दोन दलांपैकी एक दल तुमच्या स्वाधीन केला जाईल.’’ (दिव्य कुरआन, ८:७) 

अल्लाहच्या या वचनाचा हवाला देऊन पैगंबर दुआ (प्रार्थना) करीत होते. अल्लाहच्या वचनावर विश्वासाव्यतिरिक्त दासाचे कर्तव्य आहे की त्याने प्रभुशी प्रार्थना व विनयपूर्वक याचना करण्याकडे दुर्लक्ष करू नये. दासाचे दास्यत्व व अल्लाहच्या महानतेची हीच मागणी आहे की दासाने अतिद्रवित भावनेसह प्रभुशी प्रार्थना करत राहावी. या प्रार्थनेमुळे इस्लामी सैन्याच्या मनाला बळ प्राप्त झाले आणि त्यांच्या उत्साहात अपार वृद्धी झाली होती.

पैगंबर चिलखत परिधान करून बाहेर आले तेव्हा त्यांच्या जिव्हेवर कुरआनची ही आयत होती जिचा उल्लेख वर आला आहे. या आयतद्वारा पैगंबर ईमानधारकांना अल्लाहकडून शुभसूचना देत होते की शत्रूवर मुस्लिमांना विजय प्राप्त होणार आहे.



- माईल खैराबादी

या पुस्तिकेत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनाची काही वैशिष्ट्ये संक्षिप्तरित्या वर्णन करण्यात आली आहेत. लहान मुलांनासुद्धा समजेल अशा सोप्या भाषेत पैगंबराविषयी सांगण्यात आले आहे.

त्यांचे व्यिक्तमत्व, पोषाख, भोजन, स्वच्छता, दिनचर्या, संभाषणशैली, अल्लाहवर दृढ विश्वास, समानता, लाजाळूपणा, सत्यवचनी, धैर्यशील, वचनपूर्ती, वाईटाच्या बदल्यात चांगुलपणा, लहान मुलांशी प्रेम, मृदुस्वभावी, क्षमाशील इ.वर चर्चा करण्यात आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 255      -पृष्ठे - 32 मूल्य - 18        आवृत्ती - 1 (2014)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/grjz0jk5g7447o81ql1zqlnoehrvskqc








- सय्यद सआदतुल्लाह हुसैनी

जगातील संसाधनावर कब्जा करुन जगाला आर्थिक शक्तीद्वारे  गुलाम बनविणे हा भांडवलशाहीचा मूळ उद्देश आहे. उद्देशप्राप्तीसाठी साम्राज्यवाद वेगवेगळी रुपे धारण करतो यासाठी कळसूत्री शासकांना नियुक्त करतो.

साम्राज्यवादामुळे स्थानिक व्यवसाय नष्ट होतो आणि त्याची जागा मोठ्या कंपन्या घेतात. जी राष्ट्रे भांडवलदारांविरुद्ध अडथळा निर्माण करतात, त्यांच्याविरुद्ध लष्करी कारवाई करुन त्यांना नष्ट केले जाते. याविषयीची चर्चा या पुस्तिकेत करण्यात आली आहे. शेवटी इस्लामची पर्यायी आर्थिक व्यवस्थेवर चर्चा आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 254     -पृष्ठे - 44 मूल्य - 20        आवृत्ती - 1 (2014)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/vtyf385cmpqphc7qr8yu0wea3ugygw3q






statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget